राम रावण

Submitted by मिरिंडा on 12 October, 2026 - 02:02

राम रावण
*********

प्रत्येकाचा राम वेगळा असतो
तुमचा वेगळा,माझा वेगळा. धृ

सगळ्यांच्याच रामात रावण लपतो
रावण लवकर रिॲक्ट करतो
आजकाल असंच असतं
आजकाल असंच असतं. धृ

राम कसा विचारी एकपत्नी एकवचनी
सोज्वळ, शांत व संयमी
म्हणूनच समजायला कठीण
उमजायला तर जास्तच कठीण. धृ

रावणाचं तसं नाही, त्वरित कृती
त्यामुळे वातावरण बदलतं
अशा वातावरणात प्रत्येक श्वास नवीन
प्रत्येक जण रंगलेला दिसतो. धृ

आजकाल रामाची कृती सरकार सारखी
"स्लो बट शुअर,धीरसे गंभीर"
देरसे आये दुरुस्त आये
देर है, लेकिन अंधेर नहीं. धृ

राम म्हणजे,रावणावरची सात्विक साय
क्वचितच खाता येते,लवकरच नाहीशी होते
रावण सारखा उतू जातो
सायीची वाफ व लोकांची परवड होते. धृ

तरीही रावणाचं नाव घेत नाहीत
म्हणूनच म्हणतात " राम बोलो भाई"
हेच आजचं वास्तव, हेच तर जीवन
हेच आजचं वास्तव हेच आजचं जीवन ". धृ

अरुण कोर्डे
©®

Group content visibility: 
Public - accessible to all site users