बंगळूरमधली खादाडी

Submitted by admin on 26 June, 2009 - 01:33

बंगळूरमधली खादाडी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फोरम मधील "साहब सिंध सुलतान" आवडले, food & ambience दोन्ही.. आणि नागर्जुनाची आंध्रा थाळी पण सही आहे!

आयटी, ते कृष्णा स्वीटस असेल अजून तर सांग Happy
जेव्हा देशवारीत बंगुलुरु मधे येतीये, तर तिकडे नक्कि चक्कर मारेन Happy

सीएमएच रोड वर मला कृष्णा स्वीट्स दिसले नाही Sad

कार्तिक स्वीट्स आहे आणि तिथे पाणीपूरी छान मिळते (मुंबईसारखी नाही - त्यातल्या त्यात बरी)
रसमलाई छान मिळते तिथे.

जीवन बीमा रोडवर डोसा स्टॉप मध्ये मिनि ईडली आणि त्यांचा स्पेशल चहा मस्तय.

द बीच १०० फीट रोडवर मध्ये सी फुड लव्हर्स ची चंगळ होते Happy हे खाउ की ते खाऊ Proud (मी एकदाच गेलेय, त्यामुळे सगळेच चांगले मिळते की नाही माहिती नाही पण पापलेट फ्राय आणि झिंगा मसाला आवडला)

सीएमएच रोडवरच गोकुळच्या शेजारी एक छोटा दोसा चिकन स्टॉल आहे . तिथे अरबट चरबट बरच मिळते आणि चवही छान असते.

टिपसंद्रा मध्ये ट्रीट आहे . तिथला चिकन टिक्का मसाला आणि तंदुरी चांगली.

सरजापूर रिंग रोडचे द ढाबा नवर्‍याला आवडते.

कोरमंगलातले चांदनी चौक झक्कास आहे. one of my most fav in bangalore Happy

मारवाडी थाळी खायची असेल तर एच एस आर लेआउटला एक हॉटेल आहे.. हवेली का काहीतरी तिथे चांगली थाळी मिळते.
मीपुणेकर तुला कांती स्वीट्स म्हणायचं आहे का?

कांती का कृष्णा का अजून काही (?), नवर्‍याला विचारलं तर त्यालाही त्या दुकानाचं नाव कृष्णा च वाटतय :गोंधळलेली बाहुली :
मला इतक नक्की आठवत आहे की, त्या दुकानातच वरच्या मजल्यावर मस्त पराठे वगैरे पण मिळायचे.
सी.एम्.एच. रोड वरच होत ते , त्या दुकानाच्या थोडं अलिकडे अस फर्निचर वगैरे विकायला असायचं.
दर आठवड्याला पडिक असायचो, आणि आता नाव पण नाही आठवतं Sad

नमस्कार लोकहो........
मी येथे नविन आहे मायबोली वर...
हा माझा १लाच प्रतीसाद आहे ईथला..
मी ईथे बंगलोर मधे ५ महिने झाले आहे...........

माझे नाव मनाली आहे.......
खादाडी करायला अजुन मला ईथले काहि जास्त नाहि माहित...
मी फक्त कम्पनीच्या केन्टीन मधेच जेवते..
म्हनुनच म्हट्ले ईथुन्च काहि माहिति मिलते का??????
पन हे मात्र अगदि खरे कि ईथे कुथेहि पानिपुरि आनि भेल मात्र कधिच खाउ नये..
नको त्या सर्व गोश्टिन्चे कोम्बिनेशन केलेले अस्ते त्याम्धे..

ओके मनाली Happy सकाळी आधी स्नेहल अशी तुम्ही आयडी घेतलेली मी पाहिली होती, म्हणून स्नेहल म्हटलं. मनाली तर मनाली Happy

पन हे मात्र अगदि खरे कि ईथे कुथेहि पानिपुरि आनि भेल मात्र कधिच खाउ नये.. >>> बाकीची पण 'खाउ नये' ची लिस्ट येवूद्या Wink

सकाळी आधी स्नेहल अशी तुम्ही आयडी घेतलेली मी पाहिली होती>>> Lol

हो त्याचे काय झआले कि मला मिनी असे नाव द्यायचे हो ते पन ते आधिच कुनाचे तरि आहे. मग काही सुचेना....
मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. हा हा हा.....
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले.......
नविन आहे.. मराथि समजुन घ्या प्लिज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज.....

मग शेजारिच असलेल्या १ कलिग चे नाव दिले.. >> Lol १ नंबर!!!
मग साय्नकाली ओफीस मधे कोनि नसताना पुन्हा बदलले>>> कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला Wink Light 1

कोणी अस्ताना जरी बदलले अस्ते तरी माबोवर कोणी काही म्हणाल नस्तं तुम्हाला >>> हे जरि खरे असले तरि, जर त्या कलिगने बघीतले असते तर...????? Sad म्हणून कोनि नसताना पुन्हा बदलले.....
थॅन्क्यु valsangikar.......

नमस्कार ,
मी होतो बंगलोर ला जवलपास २ वर्षे . खुप खादाडी करायचो . जे.पी. नगर ला होतो . तेथे ऐक मराठी हॅआटेल होते. खुप छान होते. अजून असेल हि बहुतेक. महाग होते , पण सगळा मिळायचा आणि चव पण मस्त . तसाच लाल बाग चा M.T.R पण ऐकदम छान. शिवाय आपला ४th ब्लाअ‍ॅक जे.पी. नगरचा तो तर विचारु नका.
ज्युस कॅआर्नर , डोसा सेंटर , कॅआफी . वाह वाह . Marathalli च्या चौकातला कुठलातरी सागर. तेथे पण मेदु-वडा , माझा आवडता सेट डोसा .. आई ग ... आता फार आठावण येतेय .. Maharashtra Mandal पण खुप Active आहे . मी Lib लावलि होती त्यांची .

-- विशी

देवेगौडा पेट्रोल बंक जवळ आऊटर रिंग रोड वर 'माय टी हाऊस' नामक रेस्टो आहे..
जवळपास पन्नासेक प्रकारचे चहा इथे मिळतात... सोबत स्नॅक्स आणि मील्स पण...
सर्व पदार्थ ओपन किचन मधे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर बनवून फ्रेश सर्व्ह केले जातात...

चहाची ऑर्डर किटली मधून येते, सोबत फिल्टर, फिल्टरहोल्डर, साखर, दूध आणि ज्या पद्धतीचा चहा असेल त्या पद्धतीची कपबशी... {चायनीज / जॅपनीज चहा बिन कानाच्या कपातून प्यायला जातो.. अरबी चहा मग मधून...}

एकदा नक्की अनुभवून पहा...

हायला, हा बाफ मी कधीच कसा काय नाही पाहीला ?
वा, पार IISc पासूनचं लिहीलंय की लोकांनी. त्यांची कँटीन्स लईच भारी.
मी माझ्या आवडत्या ठीकाणांची नावं लिहायची म्हणली तर अर्धा तास तरी वेळ काढायला हवा. Proud

लोकहो, मला इथे खूपच खूप लिहायचंय पण सध्या हे एक अगदी नवीन शोध लागलेले (म्हणजे माझ्यासाठी तरी नवीन शोध.)
बंगलोर्-मैसूर हायवेवर बंगलोरच्या बाजूने जाताना डावीकडे , चेन्नपटना शहराच्या हद्दीत एक 'कदंबम' नावाचे 'अय्यंगार क्विझिन रेस्तराँ' प्रकारचे ठीकाण आहे अगदी हायवे वरच. ते 'द बेस्ट' आहे.
साउथ इंडीयन थाली मध्ये हे पदार्थ आले - भरपूर साधा भात, सांबार, दहीभात, पुलिओगेरे, खारा पोंगल, स्वीट पोंगल, मिक्स भाज्यांचे लोणचे, पापड, ताक, सार, भेंडीची भाजी, चना सुंदल, अवियल, आण्खी दोन मिक्स भाज्या. सर्व पदार्थांची चव अ फ ला तू न होती. अतिशय उच्च. Happy आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंमत फक्त ६० रुपये. आधी पदार्थ चाखून मी जी खुश झाले होते, अस्सल चवीचा सौदींडियन दहीभात अन सगळंच.. त्यावर ही किंमत ऐकून डोळ्यातून पाणीच यायचे बाकी होते. Proud
तर लोकहो नक्की ट्राय करा. Happy
आणि हो, त्यांना विचारलं तर त्यांची बंगळुरुमध्ये कुठेही शाखा नाही. तेव्हा नाव तेच असेल तरी ते हे नव्हेच. Wink

Lol हो हो अत्यानंदाने/आनंदाश्चर्याने. मला खरं तर वाटत होतं की आपणच १०० तरी द्यावे, इतके सही पदार्थ, क्वालिटी, क्वांटीटी, व्हरायटी सगळंच. Happy

अरेरे फारच जवळचे ठिकाण सांगितलेत. तिकडे जायचे म्हणजे विकांतालाच गेले पाहिजे. जायचा यायचा खर्च थाळीच्या किंमतीपेक्षा निश्चितच जास्त असेल.
मागल्या आठवड्यात राजवर्धन मधे जाऊन खाऊन पाहिले. अजिब्बात चांगले वाटले नाही.
एकतर किमती काहीच्या काही आहेत. पोहे ३५ रू. , मिसळ ५० रू. , इ.
तर्री वडापाव नावाचा प्रकार घेऊन पाहिला (तो पण ५० रू.) पण चव काही खुप भारी नव्हती.
एकमेव मराठी पदार्थांचे ठिकाण आणि त्यातही मजा नाही. Sad

Pages