बंगळूरमधली खादाडी

Submitted by admin on 26 June, 2009 - 01:33

बंगळूरमधली खादाडी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा हा धागा केव्हा उघडला..
आधी बंगलूरूमध्ये काय खादाडी करू नये ते लिहीते.

पाणिपूरी.. अज्जीब्बब्ब्बात खाउ नये. ह्या लोकांना पाणिपुरी अजिबात बनवता येत नाही.
पाणिपुरी शेवपुरी मधे साम्बार मसाला टाकतात Uhoh भेळेत.. बेचव गाजर किसून टाकतात.

वडापाव/ समोसा - जयनगर ४ थ्या ब्लॉक ला राजलक्ष्मी ज्वेलर्स च्या समोर छोटसं भैयाचं दुकान आहे तिथे चांगला मिळतो.

तसं बघायला गेले तर काहीच खादाडू नये... पाणीपुरी कांदा घालून, वडापाव गाजर घालून Proud

अरे काय आणि कुठे खावे हे लिहा की Happy

गोवळकोंडा चिमणी whitefield . चांगले आहे. चिकन छान मिळते.

काहीच खादाडू नये>> Lol चेतन मोदक तूला.

ए असं नाही हा...
बनेरघट्टा रोड वर शिवसागर हॉटेल मधली थाळी चांगली असते.. पनिर आयटम्स. Happy

जयनगर ४थ्या ब्लॉक जैन मंदिराजवळ.. एम टी आर चं नविन हॉटेल उघडलंय मैय्या नावाचं तिथे साउथइंडीयन थाळी चांगली. पुण्यातल्या दुर्वांकुरला जशी गर्दी असते तश्शी गर्दी होती.

तुम्ही वाट्टेल तिथे वाट्टेल ते खाउ शकता प्रश्न तुमच्या आवडिचा आहे... Proud हाकानाका....!!

डॅफो... एकूण घरी जेवण कमीच होतयं ते दिसतय Proud

शिवाजीनगर एंपायरमधील non-veg executive थाळी, गांधीनगर्-कामतमधील north karnataka थाळी, मेनलँड चायनामधील चायनीज

गप्प रे चोमड्या... ते सुक्या बांगड्याच काही तरी करुन आणणार होतास..? माझी लाळ गळून गळुन.. लाळे लाळे तळे साचे झाले... Happy तळ्यातल्या पाण्यात बांगडे जगत नाही हे तुला माहीत नाही का?

असो...आवरतो घेतो.... भापो ना?

आयटी कडे जीटीजीला सगळ चांगल मिळत.. ते पण बंगळुरात Happy

फोरम च्या समोर हैदराबाद हाउस आहे - ते पण बेक्कार आहे एकदम. सर्व्हिस नाही, जेवण सुद्धा खास नाही, भयंकर महाग.
एच एस आर मधे मालगुडी आहे ते मस्त आहे एकदम. तिथेच एक मल्लिगे होतं - साउदिंडियन स्नॅक्स भारी अन कॉफी तर फर्स्ट्क्लास.
कोरा मंगला मधे सुखसागर, नंदिनी अन खुबे तिन्ही छान आहेत. तिथेच एक आंनंद स्वीट आहे त्यांची मिठाई पण खास असते.

व्हाइटफिल्ड मधे अदा छान आहे.

>> तळ्यातल्या पाण्यात बांगडे जगत नाही हे तुला माहीत नाही का? >> अरे थोडे मीठ टाकायचे मग खारट पाण्यात जगले असतील Proud

गंगानगर बसस्टॉप जवळ 'गंगोत्री' मधे बंगलोरातली सगळ्यात उत्तम भेळ, पाणीपुरी आणि इतर चाट आयटम्स मिळतात. असा माझ्या चार वर्षांच्या 'रिसर्च' चा निष्कर्ष आहे. Happy
सुखसागर, शांतीसागर, मेघसागर अश्या सगळ्या सागरांतले इडली दोसे सांबार चटण्या एकाच चवीच्या वाटतात.
लालबागच्या MTR चे सगळे पदार्थ मस्तच.
एमजी रोड, ब्रिगेड रोड, चर्च स्ट्रीट ह्या भागातली काबूल, चुंग वा, एबोनी आवडायचे.
रेसिडेन्सी रोडला एक 'तवा' नावाचं हॉटेल होतं. अप्रतीम पराठे मिळायचे. बहुतेक आता बंद झालंय किंवा दुसरीकडे कुठे उघडलंय.

>>लालबागच्या MTR चे सगळे पदार्थ मस्तच. >> हेच टंकायला आले होते, तर आधीच टंकलेलं! Happy
मल्लेश्वरमला, एक दुकान/ रेस्टॉरंट आहे, नाव विसरलेय खायच्या नादात!:P पण तिथेही सगळं छान मिळत. डिंकाच्या लाडवांपासून! तेही सुका मेवा घालून Proud

विजयनगरला एका छोट्याश्या दुकानात भाकर्‍या, शेंगदाण्याची सोलापुरी चटणी, वांग्या बटाट्याचा रस्सा मिळाल्यावर केवळ वाटलं होतं! Happy महाराष्ट्र मंडळातली साबुदाण्याची खिचडी उत्कृष्ट! Happy

शोधा म्हंजी सापडेल!

सत्या, खास थ्यांक्यू Happy

इंफंट्री रोड वर समरकंद आहे. मी ३ वर्षांपूर्वी तिथे गेलो होतो. मला खूप आवडले होते. मुघलाई, अफगाणी प्रकारचे जेवण. (मेनूमधे North West Frontier असे म्हटले आहे). तिथले वातावरण एकदम मस्त होते. आतमधे बसलो असलो तरी वाळवंटात रात्री उघड्यावर शेकोटी जवळ बसल्यासारखे वातावरण होते. जेवण यायला थोडा उशिर लागला. पण त्याचे सार्थक झाले. त्यांचा मेनूही एकदम वेगळा आहे. समरकंद एक्सप्रेस नावाचे वृत्तपत्र वाटेल अशा कागदावर आणि बातम्यासारख्या टाईपमधला मेनू. अगदी बाजूला छोट्या जाहिराती सकट.

आता १५ वर्षांपूर्वीचे अनुभव. त्यातल्या किती गोष्टी अजून आहेत माहीती नाही.

IISC मधली मेस. कुणि विद्यार्थी मित्र असेल तर जरूर एकदा तरी अनुभव घेऊन पहावा.

IISC च्या बाहेर रामय्या कॉलेजकडे जाणार्‍या रस्त्यावर एक पंजाबी ढाबा होता. तिथे स्वस्तात मस्त अगदी दर्जेदार पंजाबी मिळत असे.

मल्लेश्वरमधे " शक्ती" तिथे गरमगरम पोळ्या आणि साध्याच (खूप मसालेदार नसलेल्या) पण चविष्ट भाज्या असायच्या. बाहेरचे खाऊन कंटाळा आला असेल तर साधे सुधे खाण्यासाठी मस्त होते.

महाराष्ट्र मंडळात अगदी पातळ (धारवाड प्रकारच्या) भाकरी मिळायच्या. इतक्या पातळ भाकरी मी पहिल्यांदा बंगळुरात खाल्या.

एम.जी रोड वर एका इमारतीत अगदी वर Ebony नावचे रेस्टॉरंट होते. तिथे पार्शी पदार्थ मिळायचे. मुंबईतल्या एखाद्या हॉटेलची आठवण झाली तर दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी जात असे.

बंगळुरात बर्‍याच ठिकाणी कालवलेला मस्त दहीभात मिळतो. दहिभात खावा तर दक्षिणेत. मिरचीची फोडणी दिलेला दहीभात, बाजुला चविपुरते लोणचे .... आणि संपल्यावर मग म्हणायचं "अष्टे". तो दहीभात खाल्यावर या "अष्टे" चा अर्थ समजण्यासाठी कानडी येत असण्याची गरज नाही. तो आपोआप कळतो.

मी बर्‍याचदा सेंट मार्कस् रोडवरच्या अमृत मधे दहीभात खाल्ला आहे.

सेंट मार्कस् रोडवर आणखी पुढे गेले की एम.जी रोड च्या अगोदर स्टेट बँकेची मोठी शाखा होती. त्या समोर एक चायनीज रेस्टॉरंट होते. नाव आठवत नाही पण चव अगदी वेगळी आणि चांगली होती.

पेस्ट्रीज/पॅटीस साठी ब्रिगेडरोडवर निलगिरीज प्रसिद्ध होते. पण तिथे दोन वेगळ्या प्रकारचे चहा (घरी करण्यासाठी) मिळायचे. एक म्हणजे अगदी किंचीत कळेल न कळेल अशी चॉकलेट्ची चव असलेला चहा आणि दुसरा म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेली पण फक्त वाळवलेली चहाची पाने. मला पहिल्यांदा "चॉकलेटी चहा" ऐकून कसेसेच झाले होते पण प्रत्यक्ष प्यायल्यावर खूप आवडला होता.

एका किलोला १०,००० रु (सन 1993-94 मधे) असलेला चहाही तिथे मिळत असे. पण तो घ्यायची ऐपत नव्हती. त्याच्या नुसत्या रिकाम्या टिनाच्या डब्ब्याकडे काचेबाहेरून बघून आम्ही समाधान मानत असू. (२००७ साली सगळ्यात महाग भारतीय चहा किलोमागे $३३०० ला विकला जात होता . संदर्भः http://most-expensive.net/tea )

अवांतरः ही ऐकीव गोष्ट आहे. कितपत खरी माहिती नाही. गेल्या १५-२० वर्षांपूर्वी बंगळुरात टोफू तयार होत नसे. बंगळुरातली पंचतारांकीत हॉटेल सिंगापूरहून आयात करत असत. मुंबईतही कुठूनतरी बाहेरुन टोफू येत असे. Outsourcing च्या काळात कुठल्यातरी अमेरिकेन सॉफ्टवेअर कंपनीचा एक CEO (मूळ चायनीज) बंगळूरात नवीन ऑफीस सुरु करण्यासाठी रहात होता. त्याला टोफूबद्दल कळल्यावर त्याने काही महिन्यानी नोकरी सोडून देऊन बंगळुरात टोफू तयार करायला सुरुवात केली आणि त्या धंद्यात CEO म्हणून कमावले असते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले. गोष्टीबद्दल खात्रि देता येत नसली तरी टोफू आयात होण्याबद्दलची माहिती खरे असावी. संदर्भः http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090117121632AANLFye या पानावरचे Best Answer पहा.

मढिवाला च्या टोटल मॉल च्या सर्वात वरच्या मजल्यावरचं सिल्व्हर मेट्रो Happy नॉनव्हेज खाणार्‍यांना मस्त पर्वणी. इथे व्हेज आणि नॉन्व्हेज दोन्ही बुफे.

त्याच मजल्यावरचं सेरेंगिटी पण छान आहे. जेवण महाग आहे पण टेस्टी जेवण प्लस ते जंगल थिम रेस्टॉरंट आहे. पोरंबाळं खुश. Happy

इलेक्ट्रॉनिक सिटी मधल्या मालगुडी मध्ये सुद्धा मस्त पातळ भाकरी मिळते. Happy बाकी भाज्या खुपश्या आवडल्या नाहीत तिथे.

समरकंद मला पण खुप आवडत.
The Taste of Rampur: फोरमच्या जवळ आहे. non-veg फार चांगल मिळत.

अजय, चवदार आठवणी सांगीतल्यात!
>>> IISC मधली मेस.
हो हो. डी मेसमधे कोणालाही जाता येतं पैसे देऊन. ए आणि सी मेसमधे मैत्रिणी आणि नवर्‍याबरोबर जेवलेय. ह्यातल्या एकात मांसाहारी पदार्थ मिळतात. तीथे पहील्यांदाच 'अनारकली' नामक भयानक प्रकार खाल्ला. पफ पेस्ट्रीच्या दोन प्रचंड भाकर्‍यात टुटीफ्रुटीचा गचका भरलेला. बाकी जेवण छान असायचं.
IIScच्या कॅफेटेरियातला दोसा, कॉफी, दही भात आणी चाव्चाव भात (एका ताटलीत एक मूद शिरा आणि एक मूद उपमा) फारच मस्त असायचं.

निलगिरीची ब्रेड, पेस्ट्रीज ब्रिगेड रोडला गेले की घ्यावीच लागायची. त्यांचं दर वर्षी ख्रिसमसला केक्सचं प्रदर्शन भरायचं. मोठमोठे, प्रसिध्द इमारतींच्या आकारचे केक, रथ, बागा ह्यांच्या प्रतिकृती, जुन्या मोटारींच्या केकने बनवलेल्या प्रतीकृती... अप्रतीम असायचं.

स्वीट चॅरियट्चे पदार्थ पण छान असायचे. केक तर फारच!

कॉपर चिमनी नावाचं एक हॉटेल होतं. त्यातले नॉर्थ इन्डियन पदार्थ ए वन! (आता त्याचं लोकेशन आठवत नाही.)

कामत यात्री निवास. ऑल टाइम फेवरिट! भरली वांगी आणि गरम भाकरी. क्या केहेने!

बंगलोरच्या पब्जबद्दल लिहीलं नाहीये कुणी अजून! Happy

ते वेगळ्या पोस्टमधे, फुरसतीत.

अकरा वाजता लास्ट कॉल होतो तिथे. काय डोंबल पब्ज बद्दल लिहिणार...

मायबोली गणेशोत्सव २००९

**************************************************
B&W_Teaser_1.jpg
**************************************************
Paryavaran_Teaser_1.jpg
**************************************************
chitrakala_teaser_1.jpg
**************************************************
Pakakruti_Teaser_1.jpg
**************************************************

१. सागरी खाद्य आवडत असेल तर
केरळी प्रकरचे Coconut groove चांगले आहे. चर्च स्ट्रीट (ब्रिगेड रोड) किंवा मारथल्ली ब्रिज ओलांड्ल्यावर आहे.
'कुडला' मंगलुरी प्रकारचे जेवण चांगले मिळते. रिचमंड सर्कल जवळ आहे.

२. पोर्क बीअर आणि रॉक आवडत असेल तर pecos pub (ब्रिगेड रोड) डोसा आणि चिकन करी, डोसा आणि कुर्गी पोर्क करी माझे आवडते.

३. बीफ मी खात नाहि पण मिलर स्ट्रीट वर '४६ मिलर स्ट्रीट' चागले आहे असे म्हणे.

४. कोरमंगला सिग्नल जवळ 'पोडुसामी' आहे. तेथे ससा आणि तीतर मिळते. पण ते मसाला खुप घालतात.

अकरा वाजता लास्ट कॉल होतो तिथे. काय डोंबल पब्ज बद्दल लिहिणार...>>>
सकाळी brunch (breakfast+lunch) साठी pecos pub (ब्रिगेड रोड) ला जा... आवडेल [:)]

बंगुलुरुत इंदिरानगर मधे सीएमएच (?) रोड वर एका मिठाईच्या दुकानात अप्रतीम चविचा म्हैसुरपाक साजुक तुपातला,ढोकळा खूप छान मिळायचा.
त्याच दुकानात वरती छान पराठे मिळायचे काही वर्षांपुर्वी, आता ते आहे का ते माहित नाही.

आयटी, अगं इतके दिवस बंगुलुरुत खादाडी कडे चक्कर नाही मारली Happy
त्या दुकानाचं नाव बहुधा कॄष्णा स्वीटस का असच काहीस होतं.
काय साजुक तुपातला मस्त म्हैसुरपाक मिळायचा. मी बंगलोरहून पुण्याला जाताना नातेवाईकांना, शेजार्‍यांना आवडतो म्हणून भरपूर घेऊन जायचे आणि पुण्याहून परतताना बाकरवडी आणि आंबा बर्फी बंगलोरातल्या मित्रमंडळींना..

आज वर कुणी तरी उल्लेख केलेल्या कुडला मधे गेलो होतो. कारवारि/ मँगलोरि पद्धतीचे मासे उत्तम मिळतात. काणे फ्राय स्पेशालिटि, क्रॅबची साईज आणि चव दोन्ही उत्तम

बंगळुरात आंध्रा स्टाईल बरीच रेस्टॉरंट्स आहेत RR , नागार्जुनातली गन पावडर खाउन नाका तोंडातुन धारा लागतात

Pages