Submitted by 'स्वच्छंदी on 28 September, 2026 - 08:42
दखल जगाने घ्यावी माझी...म्हणून रडलो
मी माझ्यावर हसणाऱ्यांना बघून रडलो
बसून हसणाऱ्यांनी वेडे मला ठरवले
फक्त एवढे चुकले की..मी उठून रडलो
तेव्हा कोठे ह्या अश्रूंना किंमत आली
मी दुनियेच्या समोर जेव्हा जपून रडलो
जमेल तितके ओठ दाबले, हसू आणले
नाही जमले तेव्हा मागे वळून रडलो
मला तसे तर दुखले-खुपले नव्हते काही
सगळे होते रडत इथे मी म्हणून रडलो
एक हुंदका दिला न मीही दिसू जगाला
जेव्हा रडलो तेव्हा डोळे मिटून रडलो
काही नव्हते तो जाताना हसला अन् मी
सारेकाही हातामध्ये असून रडलो
: *महेश मोरे "स्वच्छंदी", सातारा*
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
वा! वा!! आवडली गझल!!
वा! वा!!
आवडली गझल!!
मस्तच!
मस्तच!
सारेकाही हातामध्ये असून रडलो >> काटाच आला अंगावर!
What's app वर दाद दिलीच होती
What's app वर दाद दिलीच होती
येथेही देतो
अनेक शेर खूप आवडले
मनापासून धन्यवाद मान्यवर
मनापासून धन्यवाद मान्यवर