बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.

अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.

पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0

उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्याचा सार्वजनिक उत्सव हा सांस्कृतिक ठेवा आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवाने तो समृद्ध होत गेला आहे.
एका गणेशोत्सवात एका आगामी मराठी पिक्चरमधलं दुग्धशिरोमणी हे गाणं बाप्पासमोर वाजत होतं.
https://www.youtube.com/watch?v=XYuy2Mj6iio&list=RDMMXYuy2Mj6iio&start_r...

यामुळेच महाराष्ट्र आज दूधदुभत्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

बापटांना मशिदींवरच्या भोंग्याचा त्रास होत नाही का असं विचारणार्‍यांच्या प्रतीक्षेत.

पुण्याचे बापट सुरूवातीला हसण्यावारी नेण्याचा विषय वाटले तरी आता त्यांना ४०००० ऑनलाईन पिटीशनर्सचा सपोर्ट मिळाला आहे. बहुतेक कोर्टातही अर्जदार पोहोचले आहेत. तसेच पुनीत बालन या गणेश मंडळाच्या जाहीरातदारानेही डीजेमुक्त मंडपांनाच जाहीराती असे धोरण जाहीर केले आहे आणि त्याला दोनशे मंडळांनी पाठिंबा दर्शवला आहे.

गेल्या वर्षी दोन जणांचा आवाजाच्या दणक्याने हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या होत्या. वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स देखील पोहोचू शकली नव्हती.

हा सर्व वेडेपणा का आणि कुणासाठी चालू होता? सुरूवातीला राजकारण झालं. पण आता ज्या मतदारांनी अस्मितेचा प्रश्न बनवला त्यांनाही त्यातला फोलपणा जाणवतोय. कुणाला तरी हरवण्यासाठी म्हणून त्रास सहन करणे हा वेडेपणा जास्त काळ चालणे शक्यच नाही. काळे नावाच्या भाजपच्या नगरसेवकांनी आता पोलीस कमिशनरांना पत्र दिलेले आहे.

बरं गणेशोत्सवामुळे मग इतर लोकही आता डीजे लावत होते, त्यात नवनव्या उत्सवांची भर पडत चालली आहे. त्यांना का बोलत नाही, आम्हाला का बोलता यामुळे हे दुष्टचक्र थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे कुठेतरी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे झालेले आहे. गणेशोत्सवात कला सादर करावी. कुणाचीच ना नाही. त्यासाठी स्पीकर्स माफक आवाजात चालतात.

आंबेडकर जयंतीला प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवावेत. लावणी कशाला? (एकदा झालेली आहे).
अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी जमलेल्या वर्गणीतून विद्यार्थ्यांना दप्तर, शैक्षणिक साहीत्य दिले जावे.
पैगंबर जयंतीच्या दिवशी इस्लामचा खरा अर्थ जिज्ञासूंना समजावून सांगावा.

असे अनेक उपक्रम करता येऊ शकतात. डीजेच्या दणदणाटाने काय साध्य होतं?
आता हे वेड सातासमुद्रापलिकडं गेलं आहे आणि तिथे नाराजीचा सूर उमटत आहे. थांबायला हवं.

ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा गणेश उत्सवात १० वाजेपर्यंत डीजे वाजवता येत होता नंतर शिंदे आले त्यांनी ती मर्यादा १२ वर नेली. नाचणारे आता १२ वाजेपर्यंत उर बडवत नाचतात. विनाकारण दुसऱ्या लोकांना त्रास. सरकार पण येडछाप आहे. दोन चार लोकांना खुश करण्यासाठी १०० लोकांचे हाल करतात. हे जे परदेशात जाऊन राहिलेले भारतीय आहेत त्यांच्यावर तिथल्या सरकारने कडक कारवाई करून परत भारतात पाठवलं पाहिजे. एकदा का त्यांची लोकसंख्या जास्त झाली की हे त्यांचे असली रंग दाखवायला सुरवात करतील. गणपती नवरात्रीत १२ वाजेपर्यंत कमरेपर्यंत उड्या मारत नाचतील, पान तंबाखू काढून फॉरेनच्या रस्त्यांवर पचापचा थुंकतील, रस्त्याच्या मधोमध मंडप बांधलीत. परदेशातील वातावरण, लोकं शांततेत जगताहेत त्यांना तरी आरामात जगू द्या. हाकलवा सगळ्यांना तिथून.

परदेशी स्थायिक झालेले मायबोलीकर चांगले आहेत. ते सोडले तर बाकीचे वरच्या केटेगरीमध्ये येतात.

डीजे का नको हे मला काही कळत नाही. मुलांना डीजे वर नाचायचे असेल तर नाचू द्या.

फक्त तो आवाज आणि एकूण धिंगाणा contained ठेवता आला तर बरे होईल.

म्हणजे गरबा खेळायला ग्राउंड असतात तसे डीजे खेळायला स्पेसेस का करता येऊ नयेत?

परदेशात या स्पेसेस ना क्लब असेही म्हणतात. तिकडेही फेस्टीवल्स वगैरे होतात की. मात्र पोलिसांच्या नजरेखाली चालते की सगळे. अर्थात तिथे एंट्री फी असते आणि बाकीच्या गोष्टी.

मग समजा आमच्या मायबाप सरकारांनी अशा जागा करून, ज्यांना आपण डीजे पार्क म्हणू, आवाज कंटेन करणाऱ्या मोठमोठाल्या भिंती उभ्या करून आता धिंगाणा घालायला परवानगी दिली आणि पोलीस संरक्षण दिले तर

आणि सर्व डीजे मंडळांच्या तिथल्या तिथेच म्हणजे आतल्या आतच मिरवणुका काढल्या तर काय हरकत आहे?

त्यातुन एक डीजे चा आवाज शतपतींनी वाढून आतल्या लोकांना जास्त मज्जा,

बाहेरचे रस्ते मोकळे, प्राणी पक्षी म्हातारे बाळं यांना त्रास नाही.

ना सणांचे बंधन ना वेळेचे बंधन. तसेही दर दिवशी कुठली ना कुठली मिरवणूक असतेच. वाढदिवस, जयंत्या, पुण्यतिथ्या, सगळे सण, जत्रा सगळ्यांना एकच हक्काची मोठी जागा राहिल आणि सर्व डीजे प्रेमींना वर्षभर एकच ठिकाण मिळेल. त्यांच्यासाठी सब्सक्रिप्शन पण सुरू करता येईल. मंडळांना फिया भरवायला लावता येईल. थोडेफार उत्पन्न पण राहील. शिवाय इतर कुठल्या मोठ्या आवाजाच्या कार्यक्रमना एक हक्काची जागा देखील राहील की.

मिडल ग्राउंड काढता येत असताना सरसकट बंदी आणि सरसकट मुभा असे दोन्ही नको.

बापट अतिशय बुद्धिमान आहेत.अभ्यासू आहेत.कोर्ट केसेस चे संदर्भ, संस्कृत, इतिहासाचे संदर्भ इत्यादी.त्यांचे मुद्दे परफेक्ट होते.फक्त त्यांच्यासमोर उभे असलेले लोक उत्सवाच्या तोंडावर सर्व ऍडव्हान्स, आर्थिक गणितं,खर्च करून झाल्यावर सध्या त्यांचे मुद्दे समजून घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नाहीत.(ते एक आहेत त्यांनी जवळजवळ शाब्दिक हल्लाच चढवला होता.मानसोपचाराची गरज वगैरे.)

एक नाना पेठ मधले कार्यकर्ते(पिंक कुर्ता), आणि लाऊड स्पीकर असोसिएशनचे अध्यक्ष यांचेही मुद्दे पटले.

मला एक उत्सवप्रिय व्यक्ती म्हणून ढोल ताशे लांबून कधीतरी ऐकायला आवडले तरी जो त्या गोंधळात गणपतीचे 10 दिवस जगतो त्याच्या यातना समजू शकते.

मला मैदानात ढोल ताशे वाली कल्पना खरंतर आवडली.आपण coep मैदानात प्रदर्शन करतो, पार्किंग ची नीट व्यवस्था ठेवून, तसं एका मैदानात गणपती, एका परफॉर्मन्स एरियात ढोल ताशे.(फक्त त्या मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटीज ना काहीतरी व्यवस्था करावी लागेल.

आमच्या सोसायटीच्या मागे लग्नाचा आणि इव्हेंट चा लॉन आहे.होळीच्या दिवशी 5 तास फुल व्होल्यूम पार्टी.इतर दिवशी लग्नं.स्टेज आणि स्पीकर भिंती थेट आमच्या मागे कंपाउंड आला लागून.पण फार त्रास करून घेत नाही.होळीला खिडक्या हादरतात.बांधकामाला इम्पॅक्ट होऊ नये म्हणून किंचित फट ठेवतो खिडक्यांना.गाणी चांगली असली तर घरात नाचत गात कामं करतो.गाणी अतिशय भंगार असली तर मनात प्रचंड शिव्या घालतो.पोलिसांना फोन करून, ट्विट करून झालेली आहेत.हे मात्र खरं की हल्ली बरीच सुधारणा आहे.लग्नाचा आवाज 11 ला बंद होतो.बरेचदा नाचगाणी 10 पर्यंत बंद होऊन लोक मंद संगीत लावून जेवतात.

लहानपणी आठवतं, नातेवाईकांकडे छत्रपती संभाजीनगर ला गेल्यावर त्या एका मैदानात एकाच ठिकाणी सर्व दिवाळी फटाके विक्री ची दुकानं होती.

अगदी सगळं पुणं एका जागी एका मैदानात असं नाही जमलं, तरी 10 गणेश मंडळं मिळून एका मैदानात मंडप, ढोल ताशे असं काही जमू शकेल.पुढच्या वर्षी आधीपासूनच प्लॅन करून.

ढोल ताशे अत्यंत वैताग आणणारा प्रकार बनला आहे. कधीकाळी आवडायचे. प्रश्न फक्त दहा दिवसांचा नाही. हे लोक किमान दोन अडीच महिने आधीपासून सराव सुरू करतात. तो पण संध्याकाळी किमान दोन तीन तास सलग. माझ्या घरापाशी जे मैदान आहे तिथे ह्या वर्षी 1 जुलै सुरुवात झाली सरावाला, मागच्या वर्षी जूनमध्येच. कुणाला आठवत असेल तर दोन वर्षापूर्वी वाकड फाट्याला भर गर्दीच्या रस्त्यात हे मुर्ख लोक दोन दोन महिने सराव करत, आणि कार्यकर्ते वाहतूक आवरत. गेली दोन वर्षे ह्या मुर्ख लोकांना जगताप डेअरी चौकात ब्रीज खाली मोकळे रान करून दिले आहे. तिथे सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होते. पूर्वी द्न्यान प्रबोधिनी , स्वरूपवर्धिनी वै पथके चांगली वाटत पहायला आणि ऐकायला. हल्ली जे सगळे रुद्र, गर्जना भरले आहेत ते वाजवतात पण भयाण.

रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत जी नाचायची मजा आहे ती मैदानात नाही.
त्यात पाऊस आला तर आणखी धमाल. लहानपणीच्या फार मस्त आठवणी आहेत. हातगाड्यावर असलेले स्पीकर आणि बेंजो पार्टी.
हल्ली मात्र छातीत धडकी भरवणारे डीजे आणि त्याच्या आवाजाशी स्पर्धा करायला बडवलेले ढोल ताशे हे सर्व फसादची जड आहेत. वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकमुळे आणि मंडळातर्फे केल्या जाणाऱ्या भक्ती की शक्ती प्रदर्शनामुळे रस्त्यावरच्या मिरवणूक सुद्धा त्रासदायक झाल्या आहेत. नुसते विसर्जन नाही तर आगमन सोहळा सुद्धा मोठा करायचे फॅड सुरू झाले आहे. आणि ते एका दिवशी सुद्धा नसते. कोणाचेही कधीही असते. काही लोकांनी अती केल्यामुळे काही सणातील काही गोष्टीतील मजा गेली आहे. अन्यथा मुंबईसारखी सणांची मजा नाही जगात.

ते जगताप डेअरी पुलाखालचे एक अगदी बेसिक टोन बरेच दिवस सराव करत असतात.तेही 2 महिने आधी रोज 3 तास एकच बेसिक टोन चा सराव करत असतात.मुख्य पूर्ण सिक्वेन्स बहुतेक अगदी शेवटी शिकवत असणार.

पावसाळ्यात पी एम टी ने जावे लागते बरेचदा मेट्रो ऐवजी. Brt लेन मधली बस जगताप डेअरी चौकात बरोब्बर ह्या yz लोकांच्या वादना मध्ये पंधरा वीस मिनिट अडकते. आणि हे जवळपास ६०/७० लोक ब्रिजच्या खाली दुतर्फा वादन सराव करत असतात.
2 महिने आधी रोज 3 तास एकच बेसिक टोन चा सराव करत असतात>> नाही यंदा नवीन आहे ताल. ते जमत नाहीये त्यांना पण म्हणून अजून जोरात बडवत असतात.

आले आले.

बापट ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झालेत. त्यामुळे त्यांना शिव्या देणं सोपं झालंय.

तिथेही ते थोडक्यात तरीही मुद्देसूदपणे आटोपताहेत.

अशा लोकांबाबत पुण्याचा इतिहास चांगला नाही. Sad
A Communist and an Atheist will never denounce his Brahman surname

Gazette allows him to change his Hindu Brahman surname but Bapat surname has privileges

Individually, no one takes these Atheists seriously.. hence they use their Brahman surnames to spread hatred against Hindu culture.

त्रास होत असेल तर सहन करा

आमचा सण… आमचं राज्य

असले बांडगुळं आमच्यात खूप आहेत. यांना गल्लीत आणि ब्राह्मण समाजात काही स्थान नाही

काळानुसार आम्ही सुधार आणतो आहे

त्या वेळेला गरिबी होती आता आमच्या मंडळांचं बजेट मोठ आहे

सध्याचा वेग पाहता अजून पंचवीस तीस वर्षात भारत पूर्णपणे इस्लामी प्रभावाखाली जाईल. तेव्हा असले प्रकार आपोआप बंद होतील. तेव्हा बापट साहेब, काही वर्षे हा आवाज सहन करायला हरकत नाही.

बापटांना त्यांचे जुने एखाद्या ऑफिस पार्टीचे फोटो बिटो किंवा एखादं विधान उकरून काढून बदनाम केलं जाईल.ही इंटरनेट ची अनेक वर्षं जुनी परंपरा आहे.

यातून काही चांगलं निघून डीजे(किंवा प्रेशर मिड प्लाझ्मा जे काय असेल ते) ठणठणाट आवाज वाले जोरात/अजिबात न लावल्यास, तसे पूर्ण 10 दिवसाचे पुरावे दिल्यास मंडळाला मोठं बक्षीस अश्या काही योजना निघाव्यात, काही प्रमाणात डेसिबेल कमी व्हावे इतकं झालं तरी खूप आहे.

सध्या चाललेला साउंडचा विषय हे निव्वळ थोतांड आहे. भाजपचीच पुणे महानगरपालिकेत सत्ता आहे आणि भाजपचेच 'देवाभाऊ' गृहमंत्री, म्हणजेच पोलिस खात्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे सध्या घातलेले निर्बंध हे त्यांच्या परवानगीनेच घातले गेले आहेत. आणि "सदर बंधनं उठवून हिंदूंच्या सणांसाठी आपण सगळं अलाऊ करू," अशी भाषणं धीरज घाटे आणि हेमंत रासने यांनी द्यायला सुरुवात देखील केली आहे. अर्थात, हे सगळं स्क्रिप्टप्रमाणे घडत आहे! या स्क्रिप्टनुसार आता थोडे दिवस विषय तापवणार, आणि मग ठरल्याप्रमाणे देवाभाऊ गणेशोत्सव 'निर्बंधमुक्त' करणार! मग "थँक्यू हिंदू किंग देवाभाऊ" असे बॅनर्स लागणार... म्हणजे निर्बंध टाकायचे ह्यांनीच, ते निर्बंध काढण्यासाठी टीव्ही न्यूज चॅनेलवर चमकायचं पण ह्यांनीच, निर्बंध काढून पण ह्यांनीच टाकायचे आणि मग स्वतःचेच आभार पण ह्यांनीच मानायचे! काय मूर्खपणा आहे

- साभार फेसबुक

मला ह्या बापटांच्या मुलाखती ऐकायचा चस्का लागलाय.
भाषेची भुरळ पडली हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या माणसाचा ह्या विषयावरचा गृहपाठ पक्का आहे. समोरच्यानं कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात ऑफेंड होत‌ नाहीत.
बापट बोलत असताना मुलाखत घेणाऱ्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, तेव्हा बेकार हसू यायला लागतं. या लोकांना अशा ट्रीटमेंटची सवय नाही. यांना बापट फारच 'क्रूरपणे' वागवत आहेत. या बिचाऱ्यांपुढे हे अचानक एक आऊट ऑफ सिलॅबस प्रकरण उभं ठाकलेलं आहे. आणि कसं डील करावं ते कळत नाहीये.

मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांची पण दया यायला लागते. यांचंपण पितळ उघडं पडलेलं आहे.
एखादा मूर्ख प्रश्न विचारला गेला तरी हे बापट समोरच्याची अक्कल न काढता, नव्या जोमाने सविस्तरपणे उत्तर द्यायला लागतात. इतकं सविस्तर आणि संदर्भासहित स्पष्टीकरण की समोरच्याचा ते झेलण्याचा आवाका नसतो.‌ अशा प्रकारे हा अटेंप्ट पण फेल जातो.

मुळात या पत्रकारांकडे, कार्यकर्त्यांकडे, नेत्यांकडे मराठी शब्दांचा साठा शून्य आहे. त्याच त्याच किडुकमिडूक शब्दांच्या आधारे काहीतरी उसना प्रतिवाद करायला जातात आणि तेवढ्यात समोरून बापटांकडून आणखी नव्या संकल्पनांचा, संदर्भांचा, तर्कांचा, शब्दसमृद्ध जलप्रपात यांच्यावर कोसळतो. आणि त्यात हे घाटे वगैरे लोक गटांगळ्या खायला लागतात.

"सैन्यबलाचा वापर करा"
"मिरवणुका अवजड वाहतूकीसारख्या शहराच्या बाहेरून वळवा आणि तिकडेच पवना वगैरे नद्यांच्या काठी हौदांमध्ये विसर्जन करा"
"धर्मस्वातंत्र्य हे एक स्खलनस्वातंत्र्य म्हणून मला मान्य आहे. आम्ही त्याच्याशी काऊन्सेलिंगच्या किंवा प्रबोधनाच्या मार्गाने डील करू"

ही अशा प्रकारची जबरदस्त विधानं पहिल्यांदा ऐकली तेव्हा वाटलं की हा माणूस मुद्दाम समोरच्यावर घसरतोय की काय. पण नंतर नंतर दिसायला लागलं की नाही, हा काही मुद्दामहून बोचकारत नाहीये, हा फक्त क्यूट, इनोसंट आहे‌. याच्या मनाची बैठकच वेगळी आहे.

बघितले नव्हते व्हिडिओ बापटांचे. बघतोय, आता हेडर मधला पाहिला, अगदी संयंतपणे मुद्देसूद उत्तर देतात. धार्मिक, सांस्कृतिक, समाजकार्य या दृष्टिकोनातून या उत्सवाचं महत्व केव्हाच संपलंय हे पण व्यवस्थितपणे मांडलंय. एक इव्हेंट एवढंच महत्व राहिलंय.