एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने!

Submitted by विजनवासि on 25 June, 2026 - 02:42

लोहगडाच्या कड्यावरून कोसळलेला केतन .. गेले काही दिवस सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. पोलीस तपास , नाते संबंध , कटकारस्थान , मोबाईल मधले पुरावे, सीसीटीव्ही फूटेज, दोन आरोपींनी मुख्य आरोप एकमेंका वर ढकलायचा केलेला प्रयत्न - या सगळ्यामुळे ,हे प्रकरण एखाद्या गुन्हेगारी कथा कादंबरी पेक्षाही चमत्कारिक वाटायला लागलेले आहे . कायद्याच्या अभ्यासकांना हा प्रकार नवा नाही. "- “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn’t.”! हे किती तरी वेगवेगळ्या केसेस मध्ये या पूर्वी हि दिसलेले आहे .. या नंतरही दिसत राहील..
प्रत्येक गाजलेल्या प्रकरणामागे फक्त पिडीत, न्यायालये, तपास् काम , आरोपी ... एवढीच पात्रे नसतात . त्यामागे एक समाजही उभा असतो. त्या समाजाच्या अपेक्षा, परंपरा, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, तरुणांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना आणि आधुनिकतेशी चाललेला संघर्ष हे सारे घटक त्या कथेत कुठे ना कुठे गुंतलेले असतात.सिया आणि केतन यांच्या प्रकरणाकडे पाहताना म्हणूनच केवळ "कोणी खून केला?" हा प्रश्न पुरेसा ठरत नाही. त्यापलीकडे जाऊन "अशा परिस्थिती निर्माणच का होतात?", "आजच्या तरुण पिढीसमोर नेमकी कोणती द्वंद्वे उभी आहेत?", "प्रेम, विवाह आणि कुटुंब यांच्या पारंपरिक संकल्पना बदलत्या समाजात कशा धडकत आहेत?" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक अपेक्षा यांच्या संघर्षाची किंमत कोण मोजत आहे?" असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. मी त्या प्रश्नांची निश्चित उत्तरे देण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण प्रश्न नीट मांडायचा मात्र करते आहे. एका गाजलेल्या खुनाच्या निमित्ताने (त्याच्या कायद्याशी संबधित कोणत्याही बाबीला,तूर्तास बिलकुल बाजूस ठेवून) आपल्या समाजाच्या आरशात डोकावण्याचा प्रयत्न आहे.
भावनिक प्रौढत्व आणि सामाजिक बाल्यतुम्न्ही जर वीस वर्षाचे असाल आणि साधारण सुस्थित मध्यमवर्गी कुटुंबात असाल तर हि विसंगती तुमच्या साथीला असते. .. तुम्ही मानसिक दृष्ट्या प्रौढ असता . तुम्हाला तुमचा रोमांटिक पार्टनर निवडता येतो, तुमचा मोबाईल तुम्हाला संपर्क आणि संवाद करायचे स्वतंत्र देतो, तुमचे छान एक डीजीट्ल आयुष्य असते , तुम्हाला तुमच्या आशा आकांक्षा असतात , त्या पाठी जाण्याची माध्यमे खुली असतात .. ती तुम्हाला मुक्तपणे वापरायला मिळत असतात. मानसिक दृष्ट्या तुम्ही मस्त स्वतचे स्वत: एक परिपूर्ण निर्णयक्षम व्यक्ती असता ... पण एकदा का ..तुमचा मानसिक परीघ संपला आणि तुम्ही सामाजिक वर्तुळात आलात कि ते तुमचे प्रौढत्व बासनात गुंडाळा!!... तू पैशाने कुटुंबावर अवलंबून .. सामाजिक प्रतिष्ठे साठी कुटुंबावर अवलंबून... तू कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईवडील भाऊ बहिणीच्या हिताला बाधा आणणारा निर्णय घेऊच शकत नाहीस या दबावावर अवलंबून .... यातून एक प्रकारची अंतर्गत विसंगती निर्माण होते—व्यक्ती मानसिकदृष्ट्या प्रौढ असते, पण सामाजिकदृष्ट्या अजूनही तिला अल्पवयीनासारखीच वागणूक मिळते किंवा वागावे लागते. ही दरी जेव्हा विवाहसंस्था, कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाशी जोडली जाते, तेव्हा ती अधिक तीव्र आणि कधी कधी असह्य स्वरूप धारण करते.आधुनिक तरुणाई मला ह्या एका अदृश्य पण तीव्र मानसिक तणावाच्या चौकटीत अडकलेली दिसते.यातून मग उद्रेकाचे असे वेगळाले मार्ग तयार होत जात असतील का?.......
“दुहेरी जीवन” (double life) संकल्पना हा आणखी एक आयाम . आजच्या आधुनिक भारतात अनेक तरुण-तरुणी दोन वेगवेगळ्या ओळखी एकाच वेळी जगताना दिसतात.As Arundhati Roy famously suggests, India does not live in a single historical time-frame; it lives in several centuries simultaneously. एकीकडे परंपरा मानणारी “आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी” ही ओळख असते—जी कुटुंबाच्या अपेक्षा, संस्कार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांशी जोडलेली असते. तर दुसरीकडे - अतिशय आधुनिक “स्वतंत्र प्रेमसंबंध असलेली व्यक्ती” ही ओळख असते—जी वैयक्तिक निवड, भावनिक नातेसंबंध आणि खाजगी स्वातंत्र्याशी निगडित असते.ह्या दोन्ही ओळखी बराच काळ एकत्र चालू शकतात. अगदी कधीकधी या वागवण्यात एक मजा - एक साहस पण वाटत असते. परंतु विवाहाचा प्रश्न जेव्हा प्रत्यक्षात उभा राहतो, तेव्हा या दोन्ही जगांमध्ये निवड करणे अपरिहार्य बनते. आणि इथेच खरी तणावपूर्ण अवस्था निर्माण होते. जी गोष्ट आधी लपलेली असते, ती उघड होण्याचा धोका वाढतो; आणि जे “कल्पनेतले स्वातंत्र्य” होते, ते अचानक वास्तवाच्या दबावाखाली येते.या टप्प्यावर अनेकदा एक मानसिक संघर्ष निर्माण होतो—आता एकाच वेळी दोन्ही भूमिका सांभाळणे शक्य राहत नाही. त्यातली " मजा" संपून "सजा" दिसायला आणि डाचायला लागते. त्यामुळे काही व्यक्तींसाठी ही अवस्था केवळ सामाजिक नाही तर खोलवर existential संकट बनते. अश्याच मानसिक ओढाताणीतून सुटायला हा टोकाचा मार्ग निवडला असेल का ?.....आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते.
परंतु दुसरीकडे अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चौकटीतच कार्यरत आहेत—कुटुंबीय निर्णयपद्धती, प्रतिष्ठेचा विचार, आणि विवाहासंबंधी ठरावीक अपेक्षा या गोष्टी अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे या दोन जगांमध्ये सतत एक तणाव निर्माण होत राहतो. हे असिमेट्रिक मॉडर्नायझेशन” (asymmetrical modernization) आहे का ? भारताने सांस्कृतिक पातळीवर वेगाने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे, पण संस्थात्मक आणि सामाजिक संरचना मात्र त्याच वेगाने बदललेल्या नाहीत. परिणामी एक प्रकारची विसंगती निर्माण झाली आहे. त्या विसंगतीतून निर्माण झालेला हा सामाजिक विकार आहे का?आता हा तणाव काही सिया केतन यांनाच नाहीये - सगळ्यांनाच आहे .. सगळेच असा मार्ग निवडत नाहीत ! हा तणाव बहुतेक वेळा तरुण-तरुणी यशस्वीपणे हाताळतात आणि आपल्या आयुष्याचा समतोल साधतात. परंतु काही अपवादात्मक प्रसंगी हा ताण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि व्यक्तीगत पातळीवर अत्यंत चुकीच्या, टोकाच्या प्रतिक्रिया निर्माण करू शकतो .. इथे एक महत्त्वाचा समाजशास्त्रीय प्रश्न उभा राहतो. फक्त “सिया किंवा केतन प्रकरणात नेमके काय घडले?” असा विचारून तो थांबत नाही. तो त्यापेक्षा अधिक खोल प्रश्न विचारतो—“ज्या लाखो तरुण-तरुणी अशाच सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक दबावातून जातात, त्यापैकी बहुतांश लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत!” अजून तरी ...पण म्हणून तो दबाव कमी लक्षणीय मानावा का ?
कोणताही कायदेशीर निष्कर्ष काढण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला नाही. हा केवळ एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे— हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजात, एकाच वेळी अतिशय घट्ट कौटुंबिक आणि समुदायाधारित रचनांमध्ये वाढणाऱ्या- पण आजूबाजूला मोकळाढाकळा, ग्लोबल सिटीझन पाहणाऱ्या - तरुण पिढीसाठी काही दीर्घकालीन चिंताजनक प्रवृत्ती निर्माण होत आहेत का....पारंपरिक कौटुंबिक अधिकार आणि आधुनिक वैयक्तिक स्वायत्तता यांच्यातील संघर्ष—हा असा तणाव आहे- तो घट्ट विणलेल्या व्यापारी आणि समुदायाधारित सामाजिक नेटवर्क्समध्ये घुस्मटून आतापर्यंत टाकला गेलाय - पण इथून पुढे तसेच होऊ शकणार आहे का ?? कि ह्या कड्यावरून एकटा केतनच कोसळणार नाहीये ......!??? .

Group content visibility: 
Use group defaults

Submitted by रात्रीचे चांदणे on 8 July, 2026 - 04:03......
रात्रीचे चांदणे, अगदी माझ्या मनातले बोललात!
मुळात या घटनेला इतके कव्हरेज मिळण्याचे कारण म्हणजे घटनेत सहभागी (दोन्ही) पार्टीज (आरोपी आणि पिडीत) हे अतिश्रीमंत असणे, हे असू शकते.
मुळात जेव्हा हे प्रकरण घडले, त्या सुरवातीच्या दिवसात (जेव्हा सियावर कोणताही आरोप नव्हता) तेव्हाही 'बोलभिडू' सारख्या YouTube Channel ने या घटनेवर video बनवला होता, जो आजही उपलब्ध आहे. आणि असा video बनविण्याचे कारण म्हणजे त्यांच्या भव्य-दिव्य लग्नाची सुरु असलेली तयारी. १७ कोटी रुपये खर्च करून पॅलेस भाड्याने घेणे, पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी २ चार्टर्ड प्लेन्सची व्यवस्था करणे वगैरे वगैरे.

हीच जर घटना एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबात घडली असती तर पोलीसांनीही कदाचित केवळ 'अपघाती मृत्यू' म्हणून नोंद करून प्रकरण बंद केले असते, माध्यमात १-२ दिवस बातमी आली असती आणि नंतर सगळे विसरून गेले असते. पण येथे दोन्ही बाजू या अतिश्रीमंत आहेत, म्हणून या प्रकरणाची चर्चा जास्त होते आहे.

एक साधा प्रश्न विचारतो:
समजा, जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी थोबाडीत मारली आणि त्याच घटनास्थळापासून काही अंतरावर एखाद्या मजूर स्त्रीने आपल्या दारुड्या नवऱ्याला ३-४ थोबाडीत ठेवून दिल्या तर कोणत्या प्रकरणाची जास्त चर्चा होईल??? कोणत्या प्रकरणावर जास्त YouTube videos बनतील???

केतन-सिया प्रकरणात आरोपी एक महिला आहे, म्हणून ते प्रकरण जास्त चघळले जाते आहे, असा आरोप करणाऱ्यांसाठी:
वर्ष २००२ मध्ये सलमान खान या 'पुरुष' अभिनेत्याने दारू पिऊन गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या काही मजुरांना चिरडले आणि त्यात एका मजुराचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले, ही घटना सगळ्यांच्याच स्मरणात असेल!

वर्ष २०१५ मध्ये जान्हवी गडकर या एका 'महिला' वकिलाने दारू पिऊन Eastern Freeway वर उलट दिशेने गाडी चालवून एका taxi ला जोरदार धडक दिली आणि त्यात २ व्यक्तींचा मृत्य आणि ४ जण गंभीर जखमी झाले होते. आता ही घटना किती जणांच्या लक्षात आहे???

मग आम्ही पुरुषांनी सुद्धा कांगावा करायचा का की, सलमान खान हा पुरुष आहे म्हणून त्याची घटना इतकी वर्षे झाली तरी लोकांच्या लक्षात आहे आणि जान्हवी गडकर महिला आहे, म्हणून तिने केलेल्या अपघाताची फारशी चर्चा केली गेली नाही, सगळेजण लगेच विसरून गेले वगैरे वगैरे???

अरे बापरे !
सलमान खान मुसलमान , गडकर हिंदू हा अ‍ॅंगल सोडून भलतंच काय?
आता मुसलमान खान पुरूष झाला आणि जान्हवी स्त्री. हे पुरूष आणि स्त्री आहेत ही जाणिव या धाग्यावर झाली हे या धाग्याचं योगदान आहे. जगात कुठलीही गोष्ट अकारण नाही. सेकुलर्सच्या संख्येत एकाने वाढ.

आता मुसलमान खान पुरूष झाला आणि जान्हवी स्त्री. हे पुरूष आणि स्त्री आहेत ही जाणिव या धाग्यावर झाली हे या धाग्याचं योगदान आहे. ...
नाही, नाही! तसे मला पुरुषांची उदाहरणे म्हणून वेदांत अगरवाल किंवा वरळी हिट and रन केसमधील मिहीर शह यांचीही उदाहरणे घेता आली असती, किंबहुना या दोन्ही केसमध्ये victim महिला आहेत. पण मग या दोन्ही केस नुकत्याच घडलेल्या आहेत आणि जान्हवी गडकरची केस ११ वर्षे जुनी आहे, म्हणून लोक विसरले, असा युक्तिवाद केला गेला असता. तो करता येऊ नये म्हणून मला जान्हवी गडकर प्रकरणाच्या आधी घडलेले एखादे प्रकरण हवे होते उदाहरण म्हणून द्यायला.
by the way, मी विचारसरणीने हिंदुत्ववादीच आहे! माझी गणना कृपया सेक्युलर्स मध्ये करू नका!!!

सुबोध खरे, पोस्ट आवडली. विचारप्रवर्तक आहे.

वर अस्मिताने म्हटलेय की फेमिनिझमची फळे चाखणार्‍या स्त्रियासुद्धा आम्ही फेमिनिस्ट नाही असे म्हणतात.

याचे कारण फेमिनिझमबद्दल आजही समाजात बरेच गैरसमज आहेत. कित्येक स्त्रियांना या चळवळीची पुर्ण माहिती नाही. अर्धवट माहितीच्या आधारे त्या हातात चाबुक घेऊन उभ्या राहतात आणि पुरुषजातीवर आसुड ओढत राहतात.

साहित्यात व माध्यमातही हीच अपुर्ण माहिती आहे. ‘शिकलेली आधुनिक स्वतंत्र स्त्री म्हणजे संसाराचे तळपट गॅरंटीड’ या एका ओळीच्या कथेवर कित्येक चित्रपट आले व लाखोंचा धंदा करुन गेले Happy भारतात(तरी) फेमिनिस्ट शब्दाला एक निगेटिव किनार आहे. त्यामुळे ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात लढुन स्वातंत्र्य मिळवले अशा स्त्रियाही फेमिनिस्ट शब्दापासुन दुर राहतात. तो शिक्का त्यांना नको असतो.

स्ट्राॅमॅन आर्ग्युमेंट्स आणून फायदा नाही.
ह्या केसमधे इतकं नॅशनल लेवलला जनआक्रोश करण्यासारखं काय वेगळं आहे, एवढाच प्रश्न आहे. श्रीमंत असले तरी ते काय टाटाबिर्ला लेवल श्रीमंतही नाहीत की सिंघानिया सारखे प्रसिद्धही नाहीत की गाॅसिपिंग म्हणून चर्चा व्हावी. मिडीयाला हे प्रकरण इतके वाढवण्याची काय गरज पडलि?

बाकी खरातबाबा, कोसळणारे पूल, मंदीर देणगीची चोरी, पेपरलीक, पावसाने उडवलेला बोजवारा, इथनाॅल आणि संबंधित कारनामे, एपस्टीन फायलीत अडकलेले महान मंत्री हे सगळे बाजूला ठेवा- let us discuss and throw tantrums over a 20 year old girl who allegedly murdered her fiance. THAT is the most imp topic for the nation and thats what this "nation wants to know". बाकी सब चंगासी..

......let us discuss and throw tantrums over a 20 year old girl who allegedly murdered her fiance.....
@सुनीती. ताई, तुमचा नेमका आक्षेप कशाला आहे?
म्हणजे सिया (आरोपी) एक महिला आहे म्हणून तिची केस जास्त चर्चिली जाते आहे असे तुमचे म्हणणे आहे की ती केवळ २० वर्षांची आहे म्हणून तिच्या बाबतीत इतकी चर्चा होऊ नये (जेणेकरून तिचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये वगैरे)

तुम्ही कदाचित विसरला असाल तर माहितीसाठी सांगतो:
२ वर्षांपूर्वी पुण्यात पोर्शे प्रकरण घडले, त्यातील आरोपी (वेदांत अगरवाल) हा १७ वर्षांचा मुलगा (male) होता. तेव्हाही ते प्रकरण माध्यमांत अशाच प्रकारे चर्चिले गेले होते.त्याच्या आजोबांनी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी आपल्या चालकाचे अपहरण करून त्याच्यावर सगळा आरोप स्वतःवर घेण्यासाठी टाकलेला दबाव, आरोपीच्या आईने सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना हाताशी धरून / पैसे चारून मुलाच्या रक्ताच्या samples ची केलेली अदलाबदल या सगळ्या गोष्टींवर अशाच प्रकारे काथ्याकूट होत होता. फरक इतकाच की, तेव्हा आम्ही कोणीच पुरुष मंडळीनी 'एका १७ वर्षाच्या मुलाच्या केसची इतकी सोशल मिडियामध्ये चर्चा का होते आहे' वगैरे आकांडतांडव केला नव्हता!! (कोणी केला असेल तर दाखवून द्या!) उलट कित्येक पुरुषांनीच '३०० शब्दांचा निबंध' या अत्यंत कठोर (!) शिक्षेची यथोच्चित खिल्ली उडवली होती.

असु द्या, नाही समजायचं तुम्हाला. त्यासाठी अंगी संवेदनशीलता लागते.

आता ही बातमी वाचा- https://lawbeat.in/amp/news-updates/akriti-sutar-death-husband-admits-be...
आणि सर्व "मी नै बै फेमिनिस्ट" वाल्या आयाबाया आनि वाट्सप अंकल्स येऊन चर्चा करा की ही मुलगी घर सोडून का नाही गेली , व त्यामुळे तिच्या मरण्यात चूक तिचीच आहे यावर निबंध लिहा. पुरूषाची कुठे चुक असते होय?
त्याचवेळी दुसरीकडे हे गुर्हाळही चालु ठेवा- हल्लीच्या मुली इतक्या कमवतात तरी त्यांना कमी कमवणारा नवरा नकोच असतो= "महिला किती स्वार्थी" हा चिरतरूण विषय चालु ठेवा.
त्विषासिंग का मेली? तिने पैशासाठी श्रीमंत नवरा केला म्हणून.
ही आक्रिती का मेली? ती नवर्यापेक्षा जास्त कमवत होती म्हणून.
चुक त्या दोघींचीच हा निष्कर्ष नक्की. तिथवर पोचायला वैचारिक कोलांट्याउड्या मारायला लागल्या तरी चालतंय तेवढं. तेवढाच डोक्याला व्यायाम.

अनेक वाक्ये अशी आहेत ज्यांचा अर्थ लिहीणार्‍य्साठी वेगळा असतो. पण लेखकाचं ब्रँडींग काय आहे त्यानुसार किंवा वाचणारा कुठला वादी आही त्याप्रमाणे अर्थ बदलतो आणि मग चर्चेला वेगळं वळण लागतं. कालांतराने ज्याने पहिलं वाक्य लिहीलं तो ही आपल्याला काय सांगायचे होते हे सोडून त्या प्रवाहात सामील होतो. कधीकधी त्याला मला हे सांगायचं होतं हे सांगणे अशक्यच होते, कारण गड्डी तो निकल पडी. ही गोष्ट आता नैसर्गिक वाटू लागली आहे.

मोटिव्हेटेड इंटरप्रिटेशन म्हटलं तरी मान्य आहे. पण काही वेळा यातली संदिग्धता पण असे वळण देते. संदिग्धता कशातून येते? कारण सोशल मीडीयात काही स्टेटमेण्टस हे अर्धवट केले जातात. ती चतुराई म्हणा, शहाणपण म्हणा किंवा व्यवहार म्हणा. पुढे काय होतं? वळण लागलंय हे स्विकारून पुढे पुढे आहे त्या वळणावर कुणी ना कुणी लॉजीकल, रॅशनल मतं मांडत जातं. म्हणजे रस्ता चुकलाच आहे तर इथलं निसर्गसौंदर्य बघूनच जाऊ.

एक गंमत आहे.
ध्रुवीकरण झालेल्या राजकीय वातावरणात, एकच वाक्य वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक त्यांच्या पूर्वग्रहांच्या चष्म्यातून कोेा वाचतात.

(वाक्यापेक्षा वक्त्याची ओळख अर्थ ठरवते. जर आधीच हिंदुत्ववादी, डावा, बहुजनवादी, काँग्रेसी, संघी, अर्बन नक्षल इत्यादी लेबल लावले असेल, तर त्याचं वाक्य त्याच्या शब्दांपेक्षा त्या लेबलातूनच पाहिलं जातं.)

उदाहरणार्थ:

इतिहासाचा पुनर्विचार झाला पाहिजे.

हिंदुत्ववादी: हो, तुमच्यासारख्या डाव्यांनी विकृत केलेला इतिहास दुरुस्त करायला हवा.
डावे: अ‍ॅब्सोल्युटली! हा इतिहास भगवाकरणाचा प्रयत्न आहे.
बहुजनवादी: ब्राह्मणकेंद्री इतिहास बदलायला हवा.
काँग्रेसी: "इतिहासावर राजकारण सुरू आहे.

सगळ्यांना वाटतं हे वाक्य त्यांच्या बाजूने आहे.

कोणताही समाज पूर्णपणे निर्दोष नसतो.

हिंदुत्ववादी: म्हणजे मुस्लिम समाजावर टीका करतोय हे खपत नाही का? वकीलपत्र घेतलं का?
डावे: बहुसंख्यक समाजाच्या हिंसेचं समर्थन आहे.
बहुजनवादी: जातिव्यवस्थेचं सौम्यीकरण आहे.
समाजवादी: भांडवलशाहीवरील टीका टाळतोय.

आपण तथ्यांकडे पाहायला हवं.

या इतके धोकादायक वाक्य दुसरे कुठलेच नसेल.

प्रत्येक गट म्हणेल , हो, पण खरे तथ्य आमच्याकडे आहे.

भावना आणि वास्तव वेगळे असतात.

एकाला वाटेल ही धर्मावर टीका आहे.
दुसऱ्याला वाटेल राष्ट्रवादावर टीका आहे.
तिसऱ्याला वाटेल जातीय राजकारणावर टीका आहे.

पीडित असणं म्हणजे नेहमीच बरोबर असणं नाही.
हे वाक्य तर जवळजवळ प्रत्येक विचारसरणी वेगळ्या अर्थाने घेते.

बहुसंख्य असणं म्हणजे कायम अत्याचारी असणं नाही.

डावे: मेजॉरिटेरियन राजकारणाचं समर्थन.
हिंदुत्ववादी: अगदी बरोबर.
बहुजनवादी: सत्तासंबंध लपवण्याचा प्रयत्न.

अल्पसंख्य असणं म्हणजे नेहमीच बळी असणं नाही.
याचंही तसंच.

कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत.

वरकरणी सर्वमान्य वाटणारं हे वाक्यसुद्धा आरक्षण, समान नागरी कायदा, धार्मिक स्वातंत्र्य, जातीय प्रतिनिधित्व अशा संदर्भात पूर्णपणे वेगवेगळ्या अर्थाने घेतलं जाऊ शकतं.

मी कोणाच्याही बाजूने नाही; मी पुराव्याच्या बाजूने आहे.

हे वाक्य अनेकदा उलट संशय निर्माण करतं.

जो स्वतःला निष्पक्ष म्हणतो तो बहुतेक आमच्या विरोधात आहे.

इथे हे लिहीण्याचं कारण तटस्थ आहे आणि गंमत बघतोय असा नाही. मी स्वतःही यापैकी कुठल्या ना कुठल्या गटात असतो. फक्त हे स्वतःला रिमांईडर आहे. या प्रत्येक केस मधे मनोरंजन आहे पण त्याच वेळी प्रत्येक केस मधे कुणी ना कुणी बरोबर पण आहे. बस तरतमभावाची गरज असते. तो नसला कि सोसवेल तांडव चालू होतो. लेबलिंग आणि त्यामधून होणारे समज इतकाच इंटरेस्ट आहे,

लेबलिंग झाल्यावर काय घडतं? - कन्फर्मेशन बायस!
व्यक्तीला लेबल लावलं जातं. पुढची प्रत्येक गोष्ट त्या लेबलातूनच ऐकली जाते. त्याच्या शब्दांमध्ये नसलेले अर्थही वाचले जातात. मग मूळ मुद्द्याऐवजी त्या "समजलेल्या" अर्थावर वाद सुरू होतो.
यामुळे चर्चा मूळ विषयापासून भरकटते.

मी खरेच ह्या धाग्यावर हे विषय येऊ शकतील असे समजत नव्हतो. अजूनही माझ्यामते हे विषय येथे संदर्भहीन किंवा 'निगडित नसलेले' असे आहेत. ही गर्भश्रीमंतांची केस आहे म्हणून एवढा फोकस आहे एवढीच माझी समजूत आहे. स्त्री-पुरुष समानता हा विषय येथे का आला हे मागे जाऊन वाचणे आत्ता तरी शक्य नाही.

<< गर्भश्रीमंतांची केस आहे म्हणून एवढा फोकस आहे एवढीच माझी समजूत आहे. >>

हो कदाचित. या केसमध्ये गॉसिप आहे म्हणून जास्त चर्चा असावी. मागे सुशांत सिंग राजपूत केसबाबत सुद्धा असेच झाले होते.

इतर समस्यांवरून लक्ष दूर हटावे म्हणून सुद्धा याला मीडियामध्ये जास्त चघळले जात असेल ही शक्यता नाकारता येत नाही.
किंवा टीआरपी मिळत आहे तर का नाही दाखवावे असाही विचार आपला व्यवसायिक मीडिया करत असेल.

मी मायबोलीवर हा धागा नियमित वाचत आहे परंतु अजून पर्यंत तरी माझ्या फीडमध्ये या संबंधित काही येत नाहीये.
कदाचित आपण विविध पैलूंवर चर्चा करत असावे जे मिडिया पलीकडे आहे. अल्गोरिदम गोंधळात पडत असेल

म्हणजे -- 'पुरुषांनी स्त्रियांना मारले ह्याची बातमी इतकी दाखवली जात नाही. मात्र एखाद्या स्त्रीने पुरुषाला मारले म्हणून ही बातमी इतकी दाखवली जात आहे. ह्याचाच अर्थ स्त्री-पुरुष समानता नाही.'

असे एका माबो-सदस्य गटाचे म्हणणे आहे का?

तसे असल्यास दंडवत!

अजूनही माझ्यामते हे विषय येथे संदर्भहीन किंवा 'निगडित नसलेले' असे आहेत>>>> असहमत आहे. पोस्ट मधे लिहिलेले आहे की एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने! तेव्हा अनुषंगिक चर्चा ही निमित्ताने होणे स्वाभाविक आहे. चर्चेत कुणी आज पुण्यात अंजिराचे भाव काय असे मुद्दे काढले नाहीत. धागा भरकटण्याचा धोका या माझ्य्या पोस्ट मधे यावर सविस्तर चर्चा झालेली आहे.
@ राज (अ)ज्ञानी प्रतिक्रियेशी सहमत आहे.
@सुबोध खरे. चांगली प्रतिक्रिया, सुरवातीला मात्र तुमच्या त्रोटक प्रतिक्रियेमुळे उगीचच गदारोळ झाला
असो. काही चर्चा कालांतराने लुपमधे जातात. पण चर्चा होणे हे महत्वाचे.

>>> पोस्ट मधे लिहिलेले आहे की एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने

होय, तुमच्या व मूळ धागाकर्त्याच्या मताचा आदरच आहे. मात्र माझ्या पहिल्या एक दोन प्रतिसादांमध्ये मी अश्या अर्थाचे लिहिले होते की ह्या दुर्दैवी घटनेवरून एकदम समाजशास्त्रीय दृष्टिकोन मांडण्याइतकी ह्यातील आरोपींची वा घटनेची योग्यता नाही.

अवांतर - कोणतीच दुर्घटना कमी किंवा जास्त नसते, पण आज राजस्थानात एक तेरा वर्षाची मुलगी मेली. सलग पाच दिवस बत्तीस जणांनी तिच्यावर अत्याचार केल्यामुळे! अश्या भयंकर घटनांबाबत असे अभ्यासपूर्ण लेख अधिक आवश्यक वाटतात (मला). सिया-केतन-चेतन ही संस्कृतीपतनाची थिल्लर व तिरस्करणीय उदाहरणे आहेत. (असे म्हणायचे होते).

सियाबाईंनी म्हणे चेतनशी गुपचुप लग्न केले होते.
पुरुषप्रधान संस्कृतीने इतकी नाडलेली होती की गुपचूप आपल्या आवडीच्या मित्राशी लग्न करून टाकले!
जय स्त्रीमुक्ती!

Pages