लोहगडाच्या कड्यावरून कोसळलेला केतन .. गेले काही दिवस सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. पोलीस तपास , नाते संबंध , कटकारस्थान , मोबाईल मधले पुरावे, सीसीटीव्ही फूटेज, दोन आरोपींनी मुख्य आरोप एकमेंका वर ढकलायचा केलेला प्रयत्न - या सगळ्यामुळे ,हे प्रकरण एखाद्या गुन्हेगारी कथा कादंबरी पेक्षाही चमत्कारिक वाटायला लागलेले आहे . कायद्याच्या अभ्यासकांना हा प्रकार नवा नाही. "- “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn’t.”! हे किती तरी वेगवेगळ्या केसेस मध्ये या पूर्वी हि दिसलेले आहे .. या नंतरही दिसत राहील..
प्रत्येक गाजलेल्या प्रकरणामागे फक्त पिडीत, न्यायालये, तपास् काम , आरोपी ... एवढीच पात्रे नसतात . त्यामागे एक समाजही उभा असतो. त्या समाजाच्या अपेक्षा, परंपरा, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, तरुणांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना आणि आधुनिकतेशी चाललेला संघर्ष हे सारे घटक त्या कथेत कुठे ना कुठे गुंतलेले असतात.सिया आणि केतन यांच्या प्रकरणाकडे पाहताना म्हणूनच केवळ "कोणी खून केला?" हा प्रश्न पुरेसा ठरत नाही. त्यापलीकडे जाऊन "अशा परिस्थिती निर्माणच का होतात?", "आजच्या तरुण पिढीसमोर नेमकी कोणती द्वंद्वे उभी आहेत?", "प्रेम, विवाह आणि कुटुंब यांच्या पारंपरिक संकल्पना बदलत्या समाजात कशा धडकत आहेत?" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक अपेक्षा यांच्या संघर्षाची किंमत कोण मोजत आहे?" असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. मी त्या प्रश्नांची निश्चित उत्तरे देण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण प्रश्न नीट मांडायचा मात्र करते आहे. एका गाजलेल्या खुनाच्या निमित्ताने (त्याच्या कायद्याशी संबधित कोणत्याही बाबीला,तूर्तास बिलकुल बाजूस ठेवून) आपल्या समाजाच्या आरशात डोकावण्याचा प्रयत्न आहे.
भावनिक प्रौढत्व आणि सामाजिक बाल्यतुम्न्ही जर वीस वर्षाचे असाल आणि साधारण सुस्थित मध्यमवर्गी कुटुंबात असाल तर हि विसंगती तुमच्या साथीला असते. .. तुम्ही मानसिक दृष्ट्या प्रौढ असता . तुम्हाला तुमचा रोमांटिक पार्टनर निवडता येतो, तुमचा मोबाईल तुम्हाला संपर्क आणि संवाद करायचे स्वतंत्र देतो, तुमचे छान एक डीजीट्ल आयुष्य असते , तुम्हाला तुमच्या आशा आकांक्षा असतात , त्या पाठी जाण्याची माध्यमे खुली असतात .. ती तुम्हाला मुक्तपणे वापरायला मिळत असतात. मानसिक दृष्ट्या तुम्ही मस्त स्वतचे स्वत: एक परिपूर्ण निर्णयक्षम व्यक्ती असता ... पण एकदा का ..तुमचा मानसिक परीघ संपला आणि तुम्ही सामाजिक वर्तुळात आलात कि ते तुमचे प्रौढत्व बासनात गुंडाळा!!... तू पैशाने कुटुंबावर अवलंबून .. सामाजिक प्रतिष्ठे साठी कुटुंबावर अवलंबून... तू कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईवडील भाऊ बहिणीच्या हिताला बाधा आणणारा निर्णय घेऊच शकत नाहीस या दबावावर अवलंबून .... यातून एक प्रकारची अंतर्गत विसंगती निर्माण होते—व्यक्ती मानसिकदृष्ट्या प्रौढ असते, पण सामाजिकदृष्ट्या अजूनही तिला अल्पवयीनासारखीच वागणूक मिळते किंवा वागावे लागते. ही दरी जेव्हा विवाहसंस्था, कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाशी जोडली जाते, तेव्हा ती अधिक तीव्र आणि कधी कधी असह्य स्वरूप धारण करते.आधुनिक तरुणाई मला ह्या एका अदृश्य पण तीव्र मानसिक तणावाच्या चौकटीत अडकलेली दिसते.यातून मग उद्रेकाचे असे वेगळाले मार्ग तयार होत जात असतील का?.......
“दुहेरी जीवन” (double life) संकल्पना हा आणखी एक आयाम . आजच्या आधुनिक भारतात अनेक तरुण-तरुणी दोन वेगवेगळ्या ओळखी एकाच वेळी जगताना दिसतात.As Arundhati Roy famously suggests, India does not live in a single historical time-frame; it lives in several centuries simultaneously. एकीकडे परंपरा मानणारी “आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी” ही ओळख असते—जी कुटुंबाच्या अपेक्षा, संस्कार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांशी जोडलेली असते. तर दुसरीकडे - अतिशय आधुनिक “स्वतंत्र प्रेमसंबंध असलेली व्यक्ती” ही ओळख असते—जी वैयक्तिक निवड, भावनिक नातेसंबंध आणि खाजगी स्वातंत्र्याशी निगडित असते.ह्या दोन्ही ओळखी बराच काळ एकत्र चालू शकतात. अगदी कधीकधी या वागवण्यात एक मजा - एक साहस पण वाटत असते. परंतु विवाहाचा प्रश्न जेव्हा प्रत्यक्षात उभा राहतो, तेव्हा या दोन्ही जगांमध्ये निवड करणे अपरिहार्य बनते. आणि इथेच खरी तणावपूर्ण अवस्था निर्माण होते. जी गोष्ट आधी लपलेली असते, ती उघड होण्याचा धोका वाढतो; आणि जे “कल्पनेतले स्वातंत्र्य” होते, ते अचानक वास्तवाच्या दबावाखाली येते.या टप्प्यावर अनेकदा एक मानसिक संघर्ष निर्माण होतो—आता एकाच वेळी दोन्ही भूमिका सांभाळणे शक्य राहत नाही. त्यातली " मजा" संपून "सजा" दिसायला आणि डाचायला लागते. त्यामुळे काही व्यक्तींसाठी ही अवस्था केवळ सामाजिक नाही तर खोलवर existential संकट बनते. अश्याच मानसिक ओढाताणीतून सुटायला हा टोकाचा मार्ग निवडला असेल का ?.....आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते.
परंतु दुसरीकडे अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चौकटीतच कार्यरत आहेत—कुटुंबीय निर्णयपद्धती, प्रतिष्ठेचा विचार, आणि विवाहासंबंधी ठरावीक अपेक्षा या गोष्टी अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे या दोन जगांमध्ये सतत एक तणाव निर्माण होत राहतो. हे असिमेट्रिक मॉडर्नायझेशन” (asymmetrical modernization) आहे का ? भारताने सांस्कृतिक पातळीवर वेगाने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे, पण संस्थात्मक आणि सामाजिक संरचना मात्र त्याच वेगाने बदललेल्या नाहीत. परिणामी एक प्रकारची विसंगती निर्माण झाली आहे. त्या विसंगतीतून निर्माण झालेला हा सामाजिक विकार आहे का?आता हा तणाव काही सिया केतन यांनाच नाहीये - सगळ्यांनाच आहे .. सगळेच असा मार्ग निवडत नाहीत ! हा तणाव बहुतेक वेळा तरुण-तरुणी यशस्वीपणे हाताळतात आणि आपल्या आयुष्याचा समतोल साधतात. परंतु काही अपवादात्मक प्रसंगी हा ताण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि व्यक्तीगत पातळीवर अत्यंत चुकीच्या, टोकाच्या प्रतिक्रिया निर्माण करू शकतो .. इथे एक महत्त्वाचा समाजशास्त्रीय प्रश्न उभा राहतो. फक्त “सिया किंवा केतन प्रकरणात नेमके काय घडले?” असा विचारून तो थांबत नाही. तो त्यापेक्षा अधिक खोल प्रश्न विचारतो—“ज्या लाखो तरुण-तरुणी अशाच सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक दबावातून जातात, त्यापैकी बहुतांश लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत!” अजून तरी ...पण म्हणून तो दबाव कमी लक्षणीय मानावा का ?
कोणताही कायदेशीर निष्कर्ष काढण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला नाही. हा केवळ एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे— हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजात, एकाच वेळी अतिशय घट्ट कौटुंबिक आणि समुदायाधारित रचनांमध्ये वाढणाऱ्या- पण आजूबाजूला मोकळाढाकळा, ग्लोबल सिटीझन पाहणाऱ्या - तरुण पिढीसाठी काही दीर्घकालीन चिंताजनक प्रवृत्ती निर्माण होत आहेत का....पारंपरिक कौटुंबिक अधिकार आणि आधुनिक वैयक्तिक स्वायत्तता यांच्यातील संघर्ष—हा असा तणाव आहे- तो घट्ट विणलेल्या व्यापारी आणि समुदायाधारित सामाजिक नेटवर्क्समध्ये घुस्मटून आतापर्यंत टाकला गेलाय - पण इथून पुढे तसेच होऊ शकणार आहे का ?? कि ह्या कड्यावरून एकटा केतनच कोसळणार नाहीये ......!??? .
एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने!
Submitted by विजनवासि on 25 June, 2026 - 02:42
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुनिती, सगळ्या पोस्ट्सना +१.
सुनिती, सगळ्या पोस्ट्सना +१.
ट्विशा शर्मा हुंडाबळी - इथे तिची सासू स्वतः निवृत्त जिल्हा न्यायाधीश होती
पुण्याचीच विशाखा टिळेकर. अंबरनाथमधल्या डॉक्टरशी लग्न. दीड महिन्यांत आत्महत्या.
या आधी पुण्याचीच राजकारणी घरातील सुनेची आत्महत्या.
अजूनही हुंड्यासाठी मुली मारल्या जात असतील , मुलीचे आई वडील त्याबाबत खंबीर भूमिका घेत नसतील, इतर वेळी कीबोर्ड बनवणार्या बाया याबाबत गप बसत असतील तर हे पितृसत्ताक पद्धतीच्या साखळ्या अजूनही किती बळकट आहे, हेच दाखवतं.
<<< एखाद्या मुलीच्या
<<< एखाद्या मुलीच्या मनाविरुध्द लग्न होत असेल तर ती इतक्या उत्साहाने इन्स्टाग्रामवर रिल्स टाकेल?
>>>
इतका खून केला म्हणजे लग्न मनाविरुद्ध होते हे उघड आहे.
आणि insta reels संशय येऊ नये म्हणून असतील.
प्रश्न आहे खरेच त्याच्याशीच लग्न करावे असे इतरांचे इतके प्रेशर होते का? की तिने स्वतःच ते गृहीत धरले होते आणि ठाम नकार द्यायची हिंमत नसल्याने हे पाऊल उचलले. पण तिला घरच्यांना विरोध करण्यापेक्षा खून करणे कमी हिमतीचे कसे वाटले हा सुद्धा प्रश्न आहे.
म्हणून तुम्ही म्हणता तसे बॉयफ्रेंडने बहकवले ही शक्यता असू शकते.
मुलीत घरी सांगायची हिंमत नाही तर याने म्हटले असेल आपण मारुया तिला. मी करतो सगळी मदत.
ऋन्मेष मी मुद्दाम, अर्थाचा
ऋन्मेष मी मुद्दाम, अर्थाचा अनर्थ करणारा प्रतिसाद दिला. म्हटलं इथे सगळे करतात, आपणही करुन बघू
होय दृष्यम पाहीलाय पण आठवत नाही आता. पण जबरदस्त होता पुस्तक वगैरे तो लिहीतो ना. इम्प्रेशन आठवतय.
गुन्ह्याचे motive काय आहे हे
गुन्ह्याचे motive काय आहे हे माझ्यामते महत्वाचे असते.Just to add to you .. मोटीव्ह हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी काहीही कामाचा नसतो .. गुन्हा सिद्ध इंटेशन मुळे होतो.. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत .. मोटीव्ह कितीही निरागस असला तरी .. जर इंटेन्शन कायदा बाह्य असेल तर शिक्षा ही होतेच ..( हाच धागा त्यांनी दृश्यंम 3 मध्ये गुंफला आहे ) तो तुम्ही एव्हाना बघितला असेलच .. उदाहरणार्थ : आपल्या मुलीच्या बचाव साठी हा मोटीव्ह होता .. तो कितीही नैसर्गिक म्हणून निष्पाप असला तरी जीव घेणे हे इंटेन्शन होतेच त्या पिक्चर मध्ये मोहनलाल चे ..( मी हिन्दी दृश्यंम म्हणत नाहीये ) .. त्यामुळे गुन्हा शिक्षेस पात्र होताच !..Intention is immediate purpose.. Motive is latent cause for action... Intention is a must ... for guilt .. Motive is relevant only as an investigative break through ..or ..mitigation of sentence post decision of Guilt !
>>> मूळ धाग्यात गोची अशी आहे
>>> मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे.
असेच मलाही वाटले धागा वाचून
@ विजनवासी, मी कायद्यानुसार
@ विजनवासी, मी कायद्यानुसार शिक्षा देणे न देणे बाबत म्हणत नाहीये.
माझ्या पोस्टमध्ये आपल्याला घटनेबद्दल वाटणाऱ्या चीड आणि सहानुभूतीचा विषय होता.
गुन्ह्यामागची पार्श्वभूमी काय आहे त्यानुसार ज्याने हत्या केली त्याबद्दलची चीड आणि जो मेला त्याबद्दलची सहानुभूती कमी जास्त होते.
दृश्यं ३ पाहिला नाही.
अजय देवगण येईल तेव्हा बघेन
>>> मूळ धाग्यात गोची अशी आहे
>>> मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे.
>>>>
यात गोची कसली?
घटना सर्वांना माहीत आहे.
त्यावर आपापले मत मांडा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून.
लेखिकेने काहीतरी बोलले पाहिजे मग त्या अनुषंगानेच आम्ही बोलू अशी भूमिका/हट्ट कश्याला?
लेखिका समाजशास्त्राच्या
लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक असतील किंवा त्यांना त्यात रस असेल. त्यांनी मॅक्रोलेव्हलला आणि मूलगामी (?) विचार केला.
सगळ्यांना ते जमेल , रुचेल असे नाही. एखाद्या केसच्या तपशिलावरून कीस काढण, जजमेंट देणं जास्त सोपं असतं.
मूळ धाग्यात गोची अशी आहे कि
मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे.मूळ धाग्यात गोची अशी आहे कि
मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे...मी उत्तर दिलेले आहे .. ते वाचून सुद्धा हे च म्हणायचे असेल तर माझा पास .. आणि rhuन्मेष तुम्ही मोटीव्ह शब्द कलोकीयल अर्थाने वापरला - टेक्निकल अर्थाने वापरला नाहीत .. हे समजले !
आता तो सहानुभूति आणि आणि चीड चा मुद्दा चर्चेला घेत येईल .. पण त्यात विचारांपेक्षा भावनेचा तिळा उघडलेला असेल ही बाब लक्षात घ्यायला हवी .. आणि मी काय म्हणते आहे ते बघण्याबरोबरच तुमचे काय म्हणणे आहे हेही सांगितले तर चालेलच की .. बेफिकीरसाहेब !
>>> आणि मी काय म्हणते आहे ते
>>> आणि मी काय म्हणते आहे ते बघण्याबरोबरच तुमचे काय म्हणणे आहे हेही सांगितले तर चालेलच की .. बेफिकीरसाहेब
मॅडम, जरा विस्कळीत पद्धतीने माझ्या पहिल्या प्रतिसादात मी ते लिहिले होते. नीट लिहायचे झाले तर लवकरात लवकर गुन्हेगारांना जबरी शिक्षा व्हावी व उदाहरण घालून द्यावे. एवढे विचारमंथन व्हावे ह्या योग्यतेचे ते सिया, चेतन वा त्यांचे पालक नाहीत.
(हेच पोर्श प्रकरणातही लवकरात लवकर व्हावे)
ही चर्चा या घटनेनिमित्त चालू
ही चर्चा या घटनेनिमित्त चालू असेल तर त्यातल्या घडामोडींच्या संदर्भात समाजशास्त्रीय विचार करणे अशक्य नाही एव्हढेच म्हणायचे आहे.
या केस मधे मुलीने सांगितले आहे (असे पोलिसांचे म्हणणे आहे, पुन्हा कुणी तरी मुलीला आरोपी का करता असा टाहो फोडतील) कि तिने तिच्या बॉयफ्रेंडची तिच्या घरच्यांशी भेट करून दिली होती. बोलभिडूने हा वृत्तांत दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलगा गोयल यांच्या तोलामोलाचा नव्हता. तर मुलाच्या काकाने सांगितले कि जात वेगवेगळी आहे.
मुलीने असेही सांगितलेय कि जर पळून गेलो असतो तर वडलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असता आणि बाजारपेठेत असलेली पत गमावली असती. समाजात नाचक्की झाली असती.
या गोष्टी समाजशास्त्रीय विश्लेषणासाठी, मनोव्यापार धुंडाळण्यासाठी पुरेशा आहेत.
सध्या गाजत असलेल्या घटनेबद्दल जरी चर्चा असेल तरी .......असे म्हटल्याने मग अशा सत्राशेसाठ घटनांचे एकत्रीकरण होऊन कुठेच मुदेसूद चर्चा होत नाही असे मत होते ते मांडले. तुम्हाला ते नाही पटले हा तुमचा दृष्टीकोण आहे जो मान्य आहे.
विचारमंथन व्हावे ह्या
विचारमंथन व्हावे ह्या योग्यतेचे ते सिया, चेतन वा त्यांचे पालक नाहीत....हे योग्यता ठरवायचे कसब नाही बुवा जमण्यातले !! ते ही अश्या कॉन्फिडेन्स ने !!! केवळ सलाम .. मला वाटले .. जे मनाला अस्वस्थ करते आणि जे मानवी व्यवहार किंवा समाजिकतेशी जोडलेले आहे ते ते सर्व विचारार्थ योग्य च आहे !!! we agree to disagree on that ..perhaps !
एक खून झाला आहे. तपास सुरू
एक खून झाला आहे. तपास सुरू आहे. येणाऱ्या बातम्या वाचून कळत आहे की थिल्लर कारणासाठी एक जीव सहजपणे घेतला गेला.
ही घटना अतिशय वाईट आहे. अश्याच घटना गेल्या सहा महिन्यांत, वर्षभरात अनेकदा झाल्या आहेत. काल मुंबईत लोकल ट्रेनमध्ये एकाला किरकोळ कारणावरून भोसकून मारले. पोर्श प्रकरण तसेच आहे. खरात, मिश्रा, कांबळे अशी प्रकरणेही समाजाची खालावलेली मूल्यव्यवस्था किंवा काही दर्शवतात. (धागा भरकटावा म्हणून हे सगळे येथे आणायचे हा माझा अजिबातच उद्देश नाही).
आधी गुन्हेगारांना जबरी वचक बसेल अश्या शिक्षा व न्यायदान प्रक्रियेचा वेग हवा हे म्हणणे आहे.
आपण माझ्या प्रतिसादांवर उपहासात्मक लिहीत आहात म्हणून मी तूर्त थांबतो व काही लिहावेसे वाटले लिहीन असे म्हणून हे भाषण संपवतो.
काल प्रशांत कदम ने सांगितलं,
काल प्रशांत कदम ने सांगितलं, त्या मुलीने पूर्वीही प्रयत्न केला होता म्हणे केतनला मारण्याचा.
केतन च्या वडिलांची मुलाखत बघितली एके ठिकाणी..,
ती वारंवार भांडायचे म्हणे त्याच्याशी... तो पण सतत विचारायचा म्हणे की तुम्ही केलीय ना नीट चौकशी...
मुलगी नात्यातील होती, आणि तिच्या घरचे खूप घाई करत होते लग्नाची.
(असे पोलिसांचे म्हणणे आहे,
(असे पोलिसांचे म्हणणे आहे, पुन्हा कुणी तरी मुलीला आरोपी का करता असा टाहो फोडतील) >>>
मुलीने असे सांगितले आहे का कि मी त्याला कड्यावरून ढकलले?
तुम्ही मुलीला आरोपी ठरवत आहात का? नाही ना? मग एव्हढे मनाला लावून धेऊ नका.
मारण्याचा इतका निर्धोक
मारण्याचा इतका निर्धोक प्रकार वापरला आहे की चांगला वकील ह्या दोघांची सुटका करू शकेल. जर झालीच तर किरकोळ शिक्षा होईल असे वाटते. एकंदरीत संबंधित आरोपींची आर्थिक परिस्थिती पाहता, चांगला वकील सहज मिळू शकेल.
प्रत्यक्ष हत्येचा फारसा पुरावा सापडेल असे वाट्त नाही. त्या मुलीचे निर्विकार असणे, तिच्या कथनातील तफावत वगैरे मुद्दे खुनाचा गुन्हा सिद्ध करतील असे वाटत नाही.
बरं.
बरं.
मुलीने पोलिसांना काय सांगितले ते तपशीलवार द्या इथे. आम्हाला सूत्रांवर नाही मीडीयावर अवलंबून रहावं लागतं.
इथेही व्यक्तिस्वातंत्र्य आणि
इथेही व्यक्तिस्वातंत्र्य आणि जबाबदार्या यांचा तिढा आहे.
मुलं काय बघतात, काय शिकतात हे स्वातंत्र्य अनिर्बंध असावे असा मतप्रवाह आहे. मग कुणाचा खून करावा असा विचार त्यांच्या मनात येतो. त्यावर नियंत्रण कसं ठेवणार? मुलांना काय चांगलं काय वाईट हे कसं सांगणार असे प्रश्न पडतात.
अनेकदा असं वाटतं कि गेल्या सतरा अठरा वर्षात समाजमाध्यमे, माध्यमे यावर व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल टोकाच्या चर्चा चालू आहेत. दोन्हीकडून. दुसर्या धाग्यावर लिहीलेले आहे. आपण जिथे राहतो तिथे कसे वागायचे याचा विचार म्हणजे बुरसटलेले असणे असा टोकाचा विचार सुद्धा यात येतो. शहाणपणा आणि तात्विक गप्पा यात गल्लत होतेय.
म्हणायला कुणीही म्हणतं कि मी तुझ्याशी सहमत नसलो तरी तुझ्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी मी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. ही झालं तत्वतः भूमिका. प्रत्यक्षात हाच मनुष्य (अॅडमिन असेल तर) आपल्याला न पटणारी भूमिका मांडणार्याला एखादा ड्युआय सोडून बेजार करतो आणि क्षुल्लक चूक झाली कि ताबडतोब उडवत असतो. हे उदाहरण आहे. सांगायचे आहे कि तत्वतः भूमिका प्रत्यक्षात कुणी घेत नाही. पण नव्याने वाचणारा भारावलेला जीव त्यावर पुढची अनेक वर्षे (फोल पणा समजत नाही तोवर) त्यावर कीस पाडत राहतो.
इथे त्या मुलीला सामाजिक प्रतिष्ठाही सोडायची नाही, समाजाच्या विरोधातही जायचे नाही पण आपल्या मनासारखे होत नाही त्यालाही शरण जायचे नाही... हे सर्व सामाजिक ताणतणाव आहेत. त्यावर बिनधास्त चर्चा करू.
मला स्वतःला मुलं खूनापर्यंत सहज जातात यात कुणाचं काय चुकतंय हा मुद्दा कळीचा वाटतो. पॅरेंटिंगबाबत या धाग्यावर चर्चा होऊ शकत असेल तर ठीक. नाहीतर थांबूयात.
>>>>>कांबळे अशी प्रकरणेही
>>>>>कांबळे अशी प्रकरणेही समाजाची खालावलेली मूल्यव्यवस्था
तो मनुष्य पेडॉफाईल आहे ना? मनोरुग्ण आहे. त्याशिवाय अशी हिंसा करताच येणार नाही. यात खालावलेली मूल्यव्यवस्था कोठुन आली?
कांबळे हा विकृत आहे हे लक्षात
कांबळे हा विकृत आहे हे लक्षात न घेता त्याला त्याच्या शिक्षेतून सूट दिली गेली. अशा विकृत इसमाला समाजात वावरण्याचा हक्क असताच कामा नये. पण निदान ह्याला जी पी एस ट्रॅकिंग वगैरे काहीतरी सक्तीचे केले पाहिजे. जो कुणी ह्याला नोकरीवर ठेवतो त्याला त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सहज तपासता आली पाहिजे मग तो ठरवेल की अशा पार्श्वभूमीच्या माणसाला ही नोकरी योग्य आहे की नाही.
कांबळे कुटुंबियांना हा एक विकृत इसम आहे हे माहित असूनही त्याला आधीच्या दुष्कृत्यांची शिक्षा न मिळण्याचा प्रयत्न केला गेला. ही सामाजिक विकृती आहे.
अशा प्रकारचा विकृत इसम अमुक गावात आलेला आहे ह्याची पूर्वसूचना तिथल्या रहिवाशांना देण्याची कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नाही.
मूल्यव्यवस्था खालावलेली नाही. मूल्यव्यवस्था अस्तित्वातच नाही.
वैताग आणला आहे या जीपीटीजन्य
वैताग आणला आहे या जीपीटीजन्य पोस्टसनी.
साला एवढ्या गोष्टीचे काय करून ठेवले आहे.
लोक का चर्चा करत आहेत इतके? ही हाय प्रोफाइल केस आहे म्हणून?
जरा तळाशी खरवडले तर काय असते माहिती आहे का.
खरी खंत असते की आपण एवढे श्रीमंत नाही आहोत जेव्हडे हे लोक आहेत पोलीस वगैरे मॅनेज करायला आणि खुनातून सुटायला.
म्हणून यांना तर शिक्षा झालीच पाहिजे कारण त्याशिवाय माझा फ्रस्ट्रेशन मधे गेलेला अहंकार सुखावणार नाही.
असे खून रोज अक्षरश: तासाला एक या गतीने घडत असावेत उभ्या देशात. अनैतिक संबंध हे हे पेट्ट कारण असते, संगनमताने खून करणे अगदी कॉमन गोष्ट आहे आणि भारतासारख्या अजस्त्र देशात ती सतत घडत असते. पण मात्र तेव्हा कोणाचेही रक्त वगैरे उसळत नाही. तेव्हा कुणी लगेच मोरल जजमेंट द्यायला जात नाही.
मग या मुलीच्या बाबतीतच असे काय विशेष घडले आहे? म्हणजे ती खून करू शकते पण घरच्याच्या विरोधात जाऊ शकत नाही ही भयानक गोष्ट दिसत नाही काय लोकांना? असे काय कंप्लशन आले असेल तिला? बरे ठिक आहे आपण ती मुळातच ईविल डोक्याची होती असे मान्य करू. मग एक नार्मल खुनाची केस म्हणून आपण सोडून का देत नाही?
कशाला एवढे खरडात बसतो ह्यांव त्यांव. पुढच्या पिढ्या वगैरे? कशाला एवढा संताप व्यक्त करतात?
याचे सायको एनालिसिस केले की एकच उत्तर येते, की बाबा आपण एवढे सावकार नाही आहोत की खून करून सुटू शकतो. म्हणून 'तिला' शिक्षा झाली पाहिजे. एका खुन्याला शिक्षा व्हावी एवढाच मुद्दा होऊन तो सोडून देत नाही.
(या खुनात मुलीला बेड्या अडकवणारे पोलिस इन्स्पेक्टर हे फॅमिली फ्रेंड आहेत)
डब्यात चार खडे टाकले आणि तो
डब्यात चार खडे टाकले आणि तो जोरजोरात हलवला कि जो आवाज येतो तशी पोस्ट आली एकदाची. एकवेळ चॅटजीपीटीची मदत घेतली तर किमान लोक मुद्देसूद तरी लिहीतील. पण खेडेगावात भरारी पथकाच्या भीतीने रस्त्याच्या कडेची साधना अर्धवट सोडून पळणार्या भाविकाच्या मनात जो कल्लोळ दाटतो तद्वत घोंगावणारे विचार भयानकच.
रॉय, तुमचे फॅमिली फ्रेंड की
रॉय, तुमचे फॅमिली फ्रेंड की त्या मुलीचे?
फॅमिली फ्रेंड : आमचेच आहेत.
फॅमिली फ्रेंड : आमचेच आहेत. त्यांनी यापूर्वी अजून एक गडावरची केस हाताळली होती. जी देखील अशीच गाजली. एमपीएससी पास झालेल्या मुलीने परीक्षेनंतर नकार दिला म्हणून सिंहगडावर की राजगडावर खून झाला होता ती! त्यात ते पोरगं सगळ्या भारतभर फिरत होते आणि त्याचा माग काढणे प्रचंड अवघड होऊन बसले होते. अतिशय सुरस कहाणी आहे, पुन्हा कधी तरी. आता या केस मधे देखील, काही तरी काळे बेरं आहे असा संशय आधीच आला होता त्यांना.
हजारो हुंडाबळी होऊनही अजूनही
हजारो हुंडाबळी होऊनही अजूनही मागणाऱ्यांशी मुलींची लग्न लावली जातात. मुलींचे जीव जाईपर्यंत त्यांना निभावून घेण्याचे सल्ले दिले जातात...
आता ह्या घटनेमुळे तरी मुलींची पसंती नापसंती विचारात घेतली जाईल?
या आधी हनिमूनला जाऊन
या आधी हनिमूनला जाऊन प्रियकराच्या सोबतीने नवर्याचा खून केल्याची केस झाली आहे ना? त्यावरून नवर्या मुलाचं अख्खं कुटुंब त्याच्या संरक्षणासाठी हनिमूनला सोबत येतं असे मीम्स बनत होते.
रॉयचा कीबोर्ड पळवून - हुंडाबळी जाणार्या शिक्षित आईबापांच्या शिक्षित मुलींबद्दल मला आता सहानुभूती वाटत नाही. दागदागिने मेकप करून प्रत्येक सणाला किंवा उगाचच रील्स किंवा फोटो काढून फेसबुकवर टाकणं हाच यांच्या शिक्षणाचा उपयोग असेल तर सावित्रीबाईचा जन्म फुकट गेला.
बाकी असलं काही खळ बळजनक झालं की हल्ली खून का बदला खून असं म्हणून झट की पट न्याय झाल्याचं समाधान मिळवायला लोक हपापलेले असतात. एन्काउंटरच हवे असतात त्यांना.
त्या पिडोफाइल कांबळे मुळे आमच्या मुली धोक्यात आहेत म्हणणारे लोक आसारामबापूच्या प्रेरणेने १५ फेब्रु वारीला तुलसीपूजन दिवस आणि गुढीपाडव्याला अखिल हिंदू समाजाच्या बॅनरखाली नव्या विक्रम संवतच्या स्वागतात शोभायात्रेत सामील होत असतील.
मायबोलीवर आलो तेव्हां हे असलं
मायबोलीवर आलो तेव्हां हे असलं काही वाचून (मनोरुग्णावरून एकदम झोडपाझोडपी) खूप तगमग झाली. आता सवय झाली. ज्यांना नुकतेच मुख्य धारेत सामील व्हायची संधी मिळतेय, त्यांची विचार करण्याची पद्धत थोडी रॉ असेल, पण प्रिव्हिलेज्ड म्हणवणारे जास्त हिंसक असून सभ्य म्हणून मिरवतात यावर बोट ठेवण्याची खुमखुमी होती. ती विझली.
इथे मात्र श्रीमंत घरातल्या मुलीने खून का केला याच्या तळाशी आम्हाला खून करायची संधी मिळत नाही असे तर्कट वाचून धन्य झालो. या आयडीने केकु यांना एफ च्या शिव्या दिल्या आहेत. अॅडमिनच्या वतीने मागे लागणारे स्पार्कल वगैरे आयडी यांच्या मागे लागत नाहीत. म्हणजे यांना अभय आहे. अजून काय पाहिजे? या न्यायाने निर्भया केस वर चर्चा होत असेल तर त्याच्या तळाशी काय असेल या महाशयांच्या मते? इतकी असंवेदनशील मतं मांडत असताना ना कुणी अजब गजब राव उपटतात. आधी हे निपटलं तर इथे लिहीण्यात अर्थ आहे.
काहीही लिहून त्याला
काहीही लिहून त्याला मनोव्यापार म्हटले कि झाले.
सामान्य माणूस खूनाच्या भानगडीत पडत नाही. त्याला ट्रॅफिक पोलीसापासून सर्वांची भीती असते. पण खून करून लोक आरामात सुटतात यामुळे त्याचा राग अशा प्रतिक्रियेतून बाहेर पडत असतो. कुठल्या मानसशास्त्रज्ञाने याचे असे विश्लेषण केलेय हे जाणून घ्यायला आवडेल. या विद्वान मानसशास्त्रज्ञाला भारतरत्न का मिळू नये? त्याने सर्व्हे केला असेल तर त्याचे रिपोर्टस सुद्धा बघायला आवडतील. थोडक्यात दरोडा पडला तर दरोडा घालायची संधी मिळत नाही म्हणून चर्चा, स्कॅम केल्यावर ती संधी मिळत नाही म्हणून चर्चा हे लॉजिक थोर आहे...
साहेबांनी सज्जड संदर्भ तोंडावर फेकावेत आणि विथ डिफरन्स आपले म्हणणे बिनतोड सिदध करावे. मतं चुकीची असू शकतात, पण अशी?
हुंडाबळी जाणार्या शिक्षित
हुंडाबळी जाणार्या शिक्षित आईबापांच्या शिक्षित मुलींबद्दल मला आता सहानुभूती वाटत नाही >>> १०००+
विशेषतः दीड दोन कोटी रुपये, SUV वगैरे हुंड्यात देऊन लग्न करून मुलींचा छळ होतोय तरी त्यांना परत ये असं न सांगणाऱ्या आणि त्यांनी आत्महत्या केल्यावर किंवा खून झाल्यावर गळा काढणाऱ्या आईबापांबद्दल तर अजिबातच नाही.
Pages