लोहगडाच्या कड्यावरून कोसळलेला केतन .. गेले काही दिवस सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. पोलीस तपास , नाते संबंध , कटकारस्थान , मोबाईल मधले पुरावे, सीसीटीव्ही फूटेज, दोन आरोपींनी मुख्य आरोप एकमेंका वर ढकलायचा केलेला प्रयत्न - या सगळ्यामुळे ,हे प्रकरण एखाद्या गुन्हेगारी कथा कादंबरी पेक्षाही चमत्कारिक वाटायला लागलेले आहे . कायद्याच्या अभ्यासकांना हा प्रकार नवा नाही. "- “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn’t.”! हे किती तरी वेगवेगळ्या केसेस मध्ये या पूर्वी हि दिसलेले आहे .. या नंतरही दिसत राहील..
प्रत्येक गाजलेल्या प्रकरणामागे फक्त पिडीत, न्यायालये, तपास् काम , आरोपी ... एवढीच पात्रे नसतात . त्यामागे एक समाजही उभा असतो. त्या समाजाच्या अपेक्षा, परंपरा, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, तरुणांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना आणि आधुनिकतेशी चाललेला संघर्ष हे सारे घटक त्या कथेत कुठे ना कुठे गुंतलेले असतात.सिया आणि केतन यांच्या प्रकरणाकडे पाहताना म्हणूनच केवळ "कोणी खून केला?" हा प्रश्न पुरेसा ठरत नाही. त्यापलीकडे जाऊन "अशा परिस्थिती निर्माणच का होतात?", "आजच्या तरुण पिढीसमोर नेमकी कोणती द्वंद्वे उभी आहेत?", "प्रेम, विवाह आणि कुटुंब यांच्या पारंपरिक संकल्पना बदलत्या समाजात कशा धडकत आहेत?" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक अपेक्षा यांच्या संघर्षाची किंमत कोण मोजत आहे?" असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. मी त्या प्रश्नांची निश्चित उत्तरे देण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण प्रश्न नीट मांडायचा मात्र करते आहे. एका गाजलेल्या खुनाच्या निमित्ताने (त्याच्या कायद्याशी संबधित कोणत्याही बाबीला,तूर्तास बिलकुल बाजूस ठेवून) आपल्या समाजाच्या आरशात डोकावण्याचा प्रयत्न आहे.
भावनिक प्रौढत्व आणि सामाजिक बाल्यतुम्न्ही जर वीस वर्षाचे असाल आणि साधारण सुस्थित मध्यमवर्गी कुटुंबात असाल तर हि विसंगती तुमच्या साथीला असते. .. तुम्ही मानसिक दृष्ट्या प्रौढ असता . तुम्हाला तुमचा रोमांटिक पार्टनर निवडता येतो, तुमचा मोबाईल तुम्हाला संपर्क आणि संवाद करायचे स्वतंत्र देतो, तुमचे छान एक डीजीट्ल आयुष्य असते , तुम्हाला तुमच्या आशा आकांक्षा असतात , त्या पाठी जाण्याची माध्यमे खुली असतात .. ती तुम्हाला मुक्तपणे वापरायला मिळत असतात. मानसिक दृष्ट्या तुम्ही मस्त स्वतचे स्वत: एक परिपूर्ण निर्णयक्षम व्यक्ती असता ... पण एकदा का ..तुमचा मानसिक परीघ संपला आणि तुम्ही सामाजिक वर्तुळात आलात कि ते तुमचे प्रौढत्व बासनात गुंडाळा!!... तू पैशाने कुटुंबावर अवलंबून .. सामाजिक प्रतिष्ठे साठी कुटुंबावर अवलंबून... तू कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईवडील भाऊ बहिणीच्या हिताला बाधा आणणारा निर्णय घेऊच शकत नाहीस या दबावावर अवलंबून .... यातून एक प्रकारची अंतर्गत विसंगती निर्माण होते—व्यक्ती मानसिकदृष्ट्या प्रौढ असते, पण सामाजिकदृष्ट्या अजूनही तिला अल्पवयीनासारखीच वागणूक मिळते किंवा वागावे लागते. ही दरी जेव्हा विवाहसंस्था, कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाशी जोडली जाते, तेव्हा ती अधिक तीव्र आणि कधी कधी असह्य स्वरूप धारण करते.आधुनिक तरुणाई मला ह्या एका अदृश्य पण तीव्र मानसिक तणावाच्या चौकटीत अडकलेली दिसते.यातून मग उद्रेकाचे असे वेगळाले मार्ग तयार होत जात असतील का?.......
“दुहेरी जीवन” (double life) संकल्पना हा आणखी एक आयाम . आजच्या आधुनिक भारतात अनेक तरुण-तरुणी दोन वेगवेगळ्या ओळखी एकाच वेळी जगताना दिसतात.As Arundhati Roy famously suggests, India does not live in a single historical time-frame; it lives in several centuries simultaneously. एकीकडे परंपरा मानणारी “आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी” ही ओळख असते—जी कुटुंबाच्या अपेक्षा, संस्कार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांशी जोडलेली असते. तर दुसरीकडे - अतिशय आधुनिक “स्वतंत्र प्रेमसंबंध असलेली व्यक्ती” ही ओळख असते—जी वैयक्तिक निवड, भावनिक नातेसंबंध आणि खाजगी स्वातंत्र्याशी निगडित असते.ह्या दोन्ही ओळखी बराच काळ एकत्र चालू शकतात. अगदी कधीकधी या वागवण्यात एक मजा - एक साहस पण वाटत असते. परंतु विवाहाचा प्रश्न जेव्हा प्रत्यक्षात उभा राहतो, तेव्हा या दोन्ही जगांमध्ये निवड करणे अपरिहार्य बनते. आणि इथेच खरी तणावपूर्ण अवस्था निर्माण होते. जी गोष्ट आधी लपलेली असते, ती उघड होण्याचा धोका वाढतो; आणि जे “कल्पनेतले स्वातंत्र्य” होते, ते अचानक वास्तवाच्या दबावाखाली येते.या टप्प्यावर अनेकदा एक मानसिक संघर्ष निर्माण होतो—आता एकाच वेळी दोन्ही भूमिका सांभाळणे शक्य राहत नाही. त्यातली " मजा" संपून "सजा" दिसायला आणि डाचायला लागते. त्यामुळे काही व्यक्तींसाठी ही अवस्था केवळ सामाजिक नाही तर खोलवर existential संकट बनते. अश्याच मानसिक ओढाताणीतून सुटायला हा टोकाचा मार्ग निवडला असेल का ?.....आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते.
परंतु दुसरीकडे अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चौकटीतच कार्यरत आहेत—कुटुंबीय निर्णयपद्धती, प्रतिष्ठेचा विचार, आणि विवाहासंबंधी ठरावीक अपेक्षा या गोष्टी अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे या दोन जगांमध्ये सतत एक तणाव निर्माण होत राहतो. हे असिमेट्रिक मॉडर्नायझेशन” (asymmetrical modernization) आहे का ? भारताने सांस्कृतिक पातळीवर वेगाने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे, पण संस्थात्मक आणि सामाजिक संरचना मात्र त्याच वेगाने बदललेल्या नाहीत. परिणामी एक प्रकारची विसंगती निर्माण झाली आहे. त्या विसंगतीतून निर्माण झालेला हा सामाजिक विकार आहे का?आता हा तणाव काही सिया केतन यांनाच नाहीये - सगळ्यांनाच आहे .. सगळेच असा मार्ग निवडत नाहीत ! हा तणाव बहुतेक वेळा तरुण-तरुणी यशस्वीपणे हाताळतात आणि आपल्या आयुष्याचा समतोल साधतात. परंतु काही अपवादात्मक प्रसंगी हा ताण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि व्यक्तीगत पातळीवर अत्यंत चुकीच्या, टोकाच्या प्रतिक्रिया निर्माण करू शकतो .. इथे एक महत्त्वाचा समाजशास्त्रीय प्रश्न उभा राहतो. फक्त “सिया किंवा केतन प्रकरणात नेमके काय घडले?” असा विचारून तो थांबत नाही. तो त्यापेक्षा अधिक खोल प्रश्न विचारतो—“ज्या लाखो तरुण-तरुणी अशाच सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक दबावातून जातात, त्यापैकी बहुतांश लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत!” अजून तरी ...पण म्हणून तो दबाव कमी लक्षणीय मानावा का ?
कोणताही कायदेशीर निष्कर्ष काढण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला नाही. हा केवळ एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे— हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजात, एकाच वेळी अतिशय घट्ट कौटुंबिक आणि समुदायाधारित रचनांमध्ये वाढणाऱ्या- पण आजूबाजूला मोकळाढाकळा, ग्लोबल सिटीझन पाहणाऱ्या - तरुण पिढीसाठी काही दीर्घकालीन चिंताजनक प्रवृत्ती निर्माण होत आहेत का....पारंपरिक कौटुंबिक अधिकार आणि आधुनिक वैयक्तिक स्वायत्तता यांच्यातील संघर्ष—हा असा तणाव आहे- तो घट्ट विणलेल्या व्यापारी आणि समुदायाधारित सामाजिक नेटवर्क्समध्ये घुस्मटून आतापर्यंत टाकला गेलाय - पण इथून पुढे तसेच होऊ शकणार आहे का ?? कि ह्या कड्यावरून एकटा केतनच कोसळणार नाहीये ......!??? .
एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने!
Submitted by विजनवासि on 25 June, 2026 - 02:42
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>> सामान्य माणूस खूनाच्या
>> सामान्य माणूस खूनाच्या भानगडीत पडत नाही. त्याला ट्रॅफिक पोलीसापासून सर्वांची भीती असते. पण खून करून लोक आरामात सुटतात यामुळे त्याचा राग अशा प्रतिक्रियेतून बाहेर पडत असतो. <<
लोल. सामान्य माणूस सामान्य असतो म्हणून त्याला मुदडे पाडावेसे वाटतात. हे जे प्रतिक्रिया देणारे लोक असतात ना, त्यांचे खरे फ्रस्ट्रेशन हे असते की हे मोठ्या घरचे लोक मात्र आरामात सुटतात पण मला मात्र खून पचवता येत नाहीत. न्याय वगैरे सगळ्या रिलेटिव संकल्पना असतात, प्रत्येकाच्या मनातला त्याचा त्याचा न्यायाधीश वेगळा असतो मात्र प्रत्येकाच्या मनातला खुनी मात्र बदलत नाही. सगळ्यांना खून करावेसे वाटत असतात, ते फक्त करता येत नसतात. मग त्याला उदातता आणि जस्टिफिकेशन देण्यासाठी राष्ट्र धर्म वगैरे सगळे फिक्शन रचले जाते. साक्षात तिकडे श्रीकृष्ण सांगतोय की बाबा कर खून. (तुझे तर जन्मदत्त कर्तव्यच आहे ते)
सामान्य माणसासारखी भिका#ट आणि दांभिक एंटिटी कुठली नसते. खुनाचे सोडा प्रत्येक पुरुष स्वप्नात कुणाचा कंसेंट वगैरे घेऊन सेक्स करत नाही.
हे जे प्रतिक्रिया देणारे लोक
हे जे प्रतिक्रिया देणारे लोक असतात ना, त्यांचे खरे फ्रस्ट्रेशन हे असते की हे मोठ्या घरचे लोक मात्र आरामात सुटतात पण मला मात्र खून पचवता येत नाहीत. >> मानसोपचारतज्ञ आहात कि खून पचवलेले श्रीमंत?
इट्स ओके, राज मदन
इट्स ओके, राज मदन
जिथे तिथे आपलच रडगाणं गाऊ नये
खून केला गेला असेल तर त्याचे
खून केला गेला असेल तर त्याचे समर्थन नाहीच.
पण कोणालाही प्लॅन करून मारण्याचा प्रयत्न करणे हा कोणाचाच पहिला ऑपशन नसावा.
होऊ घातलेले सासर बडे घर ,पैशासोबत येणारे वर्चस्व हे सगळे फॅक्टर आहेत.
मुला /मुलींवर टाकला जाणारा दबाव, ऑनर किलिंगची प्रकरणे हे ह्या देशाला नवीन नाहीत.त्यातून ठाम नकार द्यायची हिंमत कुठून आणणार?
तुम्ही विश्लेषण छान केले आहे.
आला आला, स्पार्कल आयडी आला. अ
आला आला, स्पार्कल आयडी आला. अॅडमिनने सोडला.
पोपटाचा डावा डोळा दिसतो तसा या आयडीला मी दिसतो. भास्कराचार्य, अमितव किंवा अन्य जे कुणी याचे पालक असतील त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा.
पुढचं पाऊल नावाचा सिनेमा
पुढचं पाऊल नावाचा सिनेमा होता. मी कॉलेजात असताना आला होता. एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी हे गाणं त्यातलंच.
त्यातल्या नायिका आता आजीच्या भूमिका करतात.
मधुमती मधे दिलीपकुमारच्या
मधुमती मधे दिलीपकुमारच्या पुढच्या जन्मात वैजयंतीमालाही जन्म घेत असते आणि त्याच्या मागेच येत असते.
तिचे चाहते होते आणि आजही आहेत. त्यांचं एक युनिवर्स आहे.
सगळे तीर आपल्या साठीच सुटले
आयडी चुकला वाटतं. एव्हढे आयडी
आयडी चुकला वाटतं. एव्हढे आयडी बाळगताना हा गोंधळ उडणे साहजिक आहे.
मूळ आयडी कुठला हे लक्षात आणून देण्याचे नीतीकर्तव्य केल्याबद्दल आभार.
हा सातवा आयडी आहे.
माझा जन्म ही झाला नव्हता
माझा जन्म ही झाला नव्हता तेव्हा "शेजारी" नावाचा पिक्चर आला होता. साल १९४१.
"ही कथा हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रासंगिक मुद्द्यावर केंद्रित होती.[७][८] मुस्लिम लीगच्या स्थापनेदरम्यानच्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवण्यात आला होता. शांताराम यांनी हिंदू आणि मुस्लिमांमधील मैत्रीपूर्ण संबंध दर्शविणारा विषय वापरला. अधिक चांगली उदारता प्राप्त करण्यासाठी, त्यांनी मजहर खान या मुस्लिमाला हिंदूची भूमिका आणि गजानन जहागीरदार या हिंदूला मुस्लिम व्यक्तिरेखा साकारण्यास सांगितले."
संदर्भ विकीपीडिया
काय उपयोग झाला?
जाऊ द्या आता. बिंग फुटले.
जाऊ द्या आता. बिंग फुटले.
त्यातल्या नायिका आता आजीच्या
त्यातल्या नायिका आता आजीच्या भूमिका करतात. >>>> मानसी मागिकर. गोट्या सीरिअलमध्येही होत्या त्या.
लेटेस्ट घडामोड.
लेटेस्ट घडामोड.
केतनला विग होता हे समजल्यावर सियाची जवळीक चेतनशी वाढली असा तिचा खुलासा आहे. ( मीडीयाच्या हवाल्याने.)
"आजची तरुण पिढी
"आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते."
दुर्दैवाने सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारीचे भान जेव्हढे हवे तेव्हढे आलेले दिसत नाही. सरसकटीकरण नाही, काही अपवाद नक्कीच आहेत पण प्रमाण नगण्य ( टक्केवारीचा विदा नाही )
दोन्ही घरच्यांनी नाकारले तरी स्वतःच्या आणि जोडीदाराच्या साहाय्याने आपण संसार करू शकू निभावून नेऊ याचा आत्मविश्वास दिसत नाही.
याच केसमध्ये घरचे आर्थिक पाठबळ आणि घरी राहून मिळणारी सामाजिक सुरक्षा नाकारून स्वतःच्या बळावर उभे राहू अशी हिम्मत ना मुलीमध्ये होती ना मुलामध्ये (बॉयफ्रेंड) म्हणून प्रतिष्ठेची ढाल बनवून लग्नास ठाम नकार दिला नाही.
<.आजची तरुण पिढी
<.आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते.
परंतु दुसरीकडे अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चौकटीतच कार्यरत आहेत—कुटुंबीय निर्णयपद्धती, प्रतिष्ठेचा विचार, आणि विवाहासंबंधी ठरावीक अपेक्षा या गोष्टी अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे या दोन जगांमध्ये सतत एक तणाव निर्माण होत राहतो >
हे फार नेमकं लिहिलं आहे.
आपल्या मुलांना त्यांच्या पसंतीने जोडीदार निवडू द्यावा, हे अजूनही बर्याच लोकांना उमगलेलं नाही - इथे लिहिणार्याही.
मला हे लिहिणं सोपं आहे, कारण माझ्यावर अशी वेळ येणार नाही. पण समाजातच हा बदल होतोय हे आधीच्या पिढीच्या लक्षात येत नाही का?
यातलीच दुसरी केस - गे मुलांना आपली लैंगिकता लपवून ठेवायला लागणं. ती उघड केली तरी पालकांनी मान्य न करणं . आणि त्या मुलांनी पालकांच्या इच्छेखातर किंवा स्वेच्छेनेही लग्न केल्याने मिळणार्या तथाकथित सामाजिक प्रतिष्टे आणि मान्यतेसाठी मुलीशी लग्न करणं आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न. याच्याही अनेक बातम्या असतात. पहिल्या पानावर नसतील. पण असतात.
अज्ञान बालक, यांच्या वरच्या प्रतिसादाशीही सहमत. पण यालाही काही अंशी पालक जबाबदार नाहीत का? तुम्ही आमच्या पसंतीचा जोडीदार निवडला तर कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, भावनिक पाठिं बा देऊ ( हुंडा ही देऊ
) नाही निवडला तर कोंडून ठेवू, मुलावर पोलिस केस करू , हॉनर किलिंग करू , धर्मांतर विरोधी कायद्याखाली तक्रार करू. आणखी काय.
सियाच्या निमित्ताने अनेकांनी
सियाच्या निमित्ताने अनेकांनी फेमिनिझम , स्त्रीवादाला झोडपायला आणि तथाकथित भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. सावध ऐका पुढल्या हाका.
प्रिव्हिलेज्ड आणि म्हणून नशिबवान बाया, ज्यांना या संस्कृतीचा जाच सहन करावा लागत नाही, त्याही यात सूर मिसळतात
मला वाटतं की ह्या प्रकरणातील
मला वाटतं की ह्या प्रकरणातील सारं सत्य पूर्ण तपशीलासह अजून उघड झालेलं नाही. इतक्यातच त्याची सामाजिक व मानसिकतेच्या स्थित्यंतराशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करू नये.
>>> इतक्यातच त्याची सामाजिक व
>>> इतक्यातच त्याची सामाजिक व मानसिकतेच्या स्थित्यंतराशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करू नये.
+1
हे सिया चेतन केतन प्रकरण
हे सिया चेतन केतन प्रकरण उघडकीस आले तेव्हा बाकी कुठली खळबळजनक बातमी घडत नव्हती. नीट पेपर फोडणारे पकडून झाले, आमदार, खासदार फुटणे प्रकरण नुकतेच संपले, इराण होर्मुझ प्रकरण थोडे थंड पडले आहे तेव्हा नेमकी ही घटना घडली त्यामुळे समस्त मराठी माध्यमे आणि आत सगळी भारतीय माध्यमे ह्या प्रकरणाच्या मागे हात धुवून लागली आहेत. २४ तास बातम्या देणार्या वाहिन्यांना एक चांगले खाद्य मिळाले आहे.
सगळ्या कुटुंबियांची आणि कदाचित त्यांच्या पूर्वजांचीही कुंडली मांडली जात आहे.
सिया बाईंनी आपले दुष्कृत्य करताना मुहुर्त नीट निवडला नाही!
तेव्हा नेमकी ही घटना घडली
तेव्हा नेमकी ही घटना घडली त्यामुळे समस्त मराठी माध्यमे>>> ना ना ! मुबै तक सोडून..तिथे फक्त ठाकरे एके ठाकरे चालु असत...साहिल आणी अनुजाला जितकी काळजी उबाठा सेनेची आहे त्यातली १ % जरी प्रत्यक्ष उबाठानी केली तरी फरक पडेल.
सियाच्या निमित्ताने अनेकांनी
सियाच्या निमित्ताने अनेकांनी फेमिनिझम , स्त्रीवादाला झोडपायला आणि तथाकथित भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. >> हे करायला मिळावे यासाठीच तर इतकी हवा मिळतेय या प्रकरणाला. नायतर नवर्याने बायकोला मारले अशा दिवसाला शंभर तरी केसेस होत असतील, कोण बातमी देतं नि कोण वाचतं..
बहुसंख्येचा धर्म किंवा उच्चजातीय किंवा पुरूष किंवा श्रीमंत यांविरूद्ध गुन्हा घडला की मिडीयामधे तो दिवसरात्र चघळायचा व त्यानिमित्ताने respectively मायनाॅरिटी धर्मीय, दलित, महिला, गरीब यांना झोडपायचे हा नेहमीचाच कार्यक्रम झालाय आता.. फेबु व इतर सोमिवर पुरूष ( स्पेशली तरूण) मागची पाचसात वर्षे एकच हाडुक चघळत बसलेत- alimony.
त्यांना सतत अशा बातम्यांचा रतीब नको घालायला?
तो लोहगडावरून पडला तेव्हांच
तो लोहगडावरून पडला तेव्हांच माध्यमांना समजले होते का कि त्याचा खून झालाय?
शोलेतील मौसीचा डायलॉग आठवला.
शोलेतील मौसीचा डायलॉग आठवला.
"ठीक कहते हो बेटा! चोरी करे वो, शराबी वो, जुआरी वो, कोठे पर जाए वो, लेकिन उसका कोई दोष नही!"
सियाने इतके उत्तम प्लॅनिंग करून आपला प्रकल्प यशस्वी केला तर निदान तिला श्रेय द्या की. निव्वळ पुरुषप्रधान संस्कृती, भांडवलशाही पद्धत, मोदी, बामण, बनिया वगैरे नेहमीच्याच रक्तपिपासू मंडळींना आयते श्रेय देणे ठीक वाटत नाही.
आदरणीय प्राजक्ता व आदरणीय
आदरणीय प्राजक्ता व आदरणीय सुनिती हे सदस्य काय म्हणत आहेत हे कळले नाही.
आता मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल
आता मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची या केसमधे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी मान्य केली आहे.
मुख्यमंत्री म्हणतायत अनाकलनीय घटना आहे. यामधे फक्त गुन्हेगारीचा अँगल नाही तर सामाजिक अँगलही बघावा लागेल.
आणि उज्ज्वल निकम म्हणतायत, महाराष्ट्र नही, पुरा देश हिल गया. चीफ मिनिस्टर ने मुझे दरख्वस्त की तो मैने चॅलेंज accept किया
मला तर बिझिनेस डिल असल्याने
मला तर बिझिनेस डिल असल्याने इतके प्रेशर असेल मुलीला आई वडिलांकडून. नाहितर त्या नवर्यामुलाला इतकं( असा दावा केलाय बातमीत) तो का लग्न करेल कोणी करोडपती?
बरं इतका येडचाप होता का कि इतक्या वेळा मारण्याचा प्रयत्न केला तरी कळले नाही.
दोन्ही पार्टींची पाणी मुरतय…मालदार आहेत, सुटेल ती मुलगी.
प्रियकराचा दबाव, किंवा नवरामुलगा तरी दबाव आणत असेल, ब्लॅक्मेल करत असेल…
नाहितर श्रींमत घरातील मुलगी कशाला इतकी दबेल?
>>पकडले गेल्यावर आपल्या
>>पकडले गेल्यावर आपल्या दोघांचे आयुष्य सुद्धा उध्वस्त होईल याची त्यांना कल्पना असणारच.<<
ऋन्म्या, प्यार अंधा होताय, रे बाबा. आणि प्रत्येक कोल्ड-ब्लडेड मर्डररला आपण परफेक्ट मर्डर करतोय याची खात्री असते. असो.
धागाकर्तीने लिहिल्या प्रमाणे हा सोश्यलाजिकल इशु आहे. मूळात अशा प्रसंगात कुटुंबांमधे कम्युनिकेशन होत नाहि, झालंच तर ते एकतर्फि होतं. या केसमधे देखिल तेच झालेलं जाणवतंय. शिवाय वारंवार रेड फ्लॅग्ज दिसत असुनहि केतन अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबियांनी वेळीच उपाय योजना का केली नाहि हा प्रश्न उद्भवतोच. केतनच्या वडिलांची हि मुलाखत त्यांच्या दृष्टिकोनातुन असली, आणि सिया भ्रमिष्टा सारखी बोलत असली तरीहि सर्कंमस्टँशियल एविडंसची सूई सध्यातरी सियाच्या दिशेने आहे...
शेंडेनक्षत्र यांच्या प्रतिसा
शेंडेनक्षत्र यांच्या प्रतिसा दामुळे एका गोष्टीची खात्री पटली.
<हे सिया चेतन केतन प्रकरण उघडकीस आले तेव्हा बाकी कुठली खळबळजनक बातमी घडत नव्हती. > अयोध्येतल्या राममंदिराशी संबं धित भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या / आहेत. दुसरी पुण्यभूमी महाकालेश्वराचा उज्जैन इथे मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब सहपरिवार भूखंडांचं श्रीखंडं खाल्ल्ल्याच्या बातम्या आहेत.
आता मीडिया त्यांना त्या बातम्या दाखवत नाही, म्हणजे
१. या बातम्या दाखवायच्या नाहीत, म्हणूनच सिया प्रक रण चघळायला घेतलंय.
किंवा २ भाजपने भ्रष्टाचार करणं हे स्वाभाविक असल्याने त्याला बातमीमूल्य नाही.
किंवा ३ काँग्रेस सत्तेत नाही , त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल दोष कोणाला देणार, तेव्हा गप्पच बसावं. मी अन्यत्र म्हटलं तसं मूगडाळीचा हलवा भरपेट खाऊन ढेकर द्यायलाही तोंड उघडू नये असं सांगितलं गेलंय
किंवा या तिन्ही शक्यता.
मुंबई तक , साहिल आणि अनुजा यांना फॉलो करतो. चांगले लोक दिसताहेत. माहिती दिल्याबद्दल प्राजक्ता यांना धन्यवाद.
कधमाल आहे.
कधमाल आहे.स्पार्कल हा आयडी माझ्या प्रत्येक प्रतिसादानंतर भोकाड पसरायला येत असतो. आता या आयडीचं बिंग नीतिका या फेक फिमेल आयडीमुळे फुटलं.
मूळ आयडीने द्यायचा प्रतिसाद चुकून या शत्रूवर भुंकायच्या आयडीने दिला हा माझा प्रतिसाद मात्र नाहीसा झाला. अॅडमिन आता सक्रीय झाले कि आधी ग्लानीत होते? आम्ही असू अॅडमिनचे लाडके
स्मायल्या टाकणं विचित्र वाटतंं, पण या वेळी खरोखर हसू आलं.
वाईट हेसुद्धा वाटतं की
वाईट हेसुद्धा वाटतं की इतक्या लहान वयात भयंकर चूक करुन बसली ही मुलगी. आता जर आरोप सिद्ध झाला तर, तुरुंगात सडणार. अनेक आयुष्ये, स्वप्ने उध्वस्त झाली. राखरांगोळी झाली.
हॉरिबल!!!
राज यांनी पोस्ट केलेल्या केतनच्या वडीलांचा व्हिडिओ पाहीला. त्यांना आवंढा गिळताना पाहून काटा येतो अंगावर. भयंकर वाईट वाटतं ते म्हणतात आम्ही जगत असलेले दिसलो तरी मेलेलो आहोत. जिवंत प्रेत आहोत
Pages