ऑपरेशन ब्लॅक एम्बर – भाग १०
पूर्वभाग
डॅनियल क्रॉस मुंबईत पोहोचतो आणि त्याला कळतं की Black Ember आता फक्त विलंब निर्माण करण्याच्या टप्प्यात नाही, तर प्रत्यक्ष विध्वंसाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे.
दरम्यान आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत यांना वेस्ट कोस्टवरील फ्युएल ट्रान्सफर युनिटशी संपर्क तुटल्याची आणि संभाव्य आगीची माहिती मिळते.
लवकरच समुद्राकडून उठणारा काळा धुराचा प्रचंड लोळ दिसू लागतो आणि Black Ember चा खरा उद्देश स्पष्ट होतो - बाजारात भीती आणि अफाट घबराट निर्माण करणारा “visible disaster.”
मुंबईत पेट्रोल पंपांवर रांगा लागतात, बाजार कोसळू लागतो आणि संपूर्ण व्यवस्था अस्थिर होऊ लागते.
शेवटी डॅनियल त्यांना शोधत त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचतो आणि दुष्यंत देशमुखच्या गूढ NAMES.enc फाईलमागचा “pattern” त्याला माहिती असल्याचं सांगत तो ती decrypt करण्यात यशस्वी होतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग ११ - The Ember Chain
खोलीत आता फक्त त्या जुन्या लॅपटॉपच्या फॅनचा हलका आवाज येत होता. स्क्रीनवर नावांची एक विस्तीर्ण यादी उघडली होती. काही खरी नावे होती, काही बनावट नावे, तर काही अर्धवट सोडलेली अक्षरे.
त्या यादीच्या वर एक मुख्य टायटल होतं:
EMBER CHAIN -PARTIAL INDEX
ते पाहताना आरवचा श्वास मंद झाला. कारण त्या यादीतलं अगदी पहिलं नाव होतं:
DUSHYANT DESHMUKH -STATUS: DEVIATED
त्याखाली
DANIEL CROSS -STATUS: INACTIVE
ELENA VOLKOVA -STATUS: ACTIVE
SAMEER NAIR - STATUS: COMPROMISED
त्यानंतर खाली शेकडो नावांची यादी सुरू होत होती-शिपिंग एक्झिक्युटिव्ह्ज, इन्शुरन्स एजंट्स, पोर्ट कन्सल्टंट्स आणि बड्या कंपन्यांचे एनर्जी ट्रेडर्स. त्यातले काही भारतीय होते, काही युरोपियन, तर काही थेट सरकारी सिस्टीमच्या अत्यंत जवळचे लोक होते.
Black Ember ही एक साधी अंडरवर्ल्ड संघटना नव्हती... ते जगभर पसरलेलं, रक्ताने आणि पैशाने जोडलेलं एक महाभयानक जाळं होतं.
विनायकरावांच्या तोंडून केवळ एकच कुजबुज बाहेर पडली, “देवा...”
तेवढ्यात, स्क्रीनच्या अगदी तळाशी असलेल्या एका वेगळ्या आणि जास्त गडद एनक्रिप्टेड सेक्शनवर डॅनियलची नजर गेली. तिथे लिहिले होते: DIRECTORIAL TIER
डॅनियलच्या हालचाली तिथेच गोठल्या. आरवने लगेच विचारले, “डॅनियल, काय झालं? काय आहे तिथे?”
डॅनियल काही सेकंद बोलूच शकला नाही. मग तो अत्यंत धीम्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, “दुष्यंतने फक्त या नेटवर्कच्या मेंबर्सचा माग काढला नव्हता, आरव... त्याने ब्लॅक एम्बरचे 'escalation structure शोधून काढलं होतं.”
त्याने तो सेक्शन उघडला. आत काही अत्यंत गुप्त ऑपरेशनल नोट्स समोर आल्या:
DIRECTORIAL ESCALATION CONDITIONS:
Maritime destabilization
Fuel corridor pressure
Insurance surge threshold
Visual panic event
आरवच्या छातीतली धडधड कमालीची वाढली. कारण त्या गंभीर नोट्सच्या खाली, लाल रंगात हायलाईट केलेली अजून एक शेवटची ओळ होती:
VISUAL EVENT REQUIRED IF MARKET RESPONSE REMAINS BELOW EXPECTED RANGE.
जर बाजारपेठेची प्रतिक्रिया अपेक्षेपेक्षा कमी असेल, तर एक 'दृश्य विध्वंस' घडवून आणणे अनिवार्य आहे.
समीर पूर्णपणे सुन्न झाला होता.
डॅनियल लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत अत्यंत शांतपणे म्हणाला, “समुद्रात त्या रिफायनरी युनिटला लागलेली आग हा कोणताही अपघात नव्हता...”
तो क्षणभर थांबला आणि त्याने आरवकडे पाहिले, “...तो ब्लॅक एम्बरचा आधीपासूनच ठरलेला 'एस्केलेशन प्रोटोकॉल' होता. बाजार कोसळवण्यासाठी त्यांनी तो मुद्दाम घडवून आणला आहे.”
तेवढ्यात समीरला अचानक डॅनियलला दुष्यन्त बरोबर पूर्वी क्वचित कधीतरी बघितल्याचं आठवलं आणि तो अचानक ओरडला, " तुम्ही डॅनियल...डॅनियल क्रॉस? आता आठवलं"
"खूप लवकर ओळखलंस." डॅनियल उपहासाने म्हणाला.
************************************************************************************************************************
जर्मनी.
संध्याकाळचा पाऊस आता आणखीनच तीव्र झाला होता.
बर्लिनच्या त्या प्रचंड इमारतीच्या काचेवरून वाहणाऱ्या पाण्याच्या जड प्रवाहामधून बाहेरच्या शहराचे रंगीबेरंगी दिवे तुटक आणि अंधुक चमकत होते. पण सहाव्या मजल्यावरच्या मुख्य ऑपरेशन्स फ्लोअरवर मात्र आत्ता कोणाचाच आवाज नव्हता. तिथे फक्त एक जड, सुन्न शांतता पसरली होती.
एलिना व्होल्कोवा समोरच्या महाकाय स्क्रीन्सकडे अत्यंत शांतपणे पाहत उभी होती. तिच्या समोरच्या मॉनिटर्सवर 'इन्शुरन्स एक्स्पोजर बँड्स' वेगाने वरच्या दिशेने सरकत होते. 'फ्युएल फ्युचर्स'ची अत्यंत अनपेक्षित हालचाल सुरू होती. आणि मुंबईच्या किनारपट्टीवर उसळणाऱ्या त्या काळ्या धुराचे थेट प्रक्षेपण आता आंतरराष्ट्रीय न्यूज नेटवर्कवर वेगाने फिरायला लागले होते.
खोलीतल्या एका विश्लेषकाने अत्यंत मंद आवाजात माहिती दिली “Singapore reacting.”
दुसरा विश्लेषक म्हणाला - “Emergency energy positions activating.”
एलिनाने यावर कोणतेही उत्तर दिले नाही. तिची तीक्ष्ण नजर मुख्य आलेख आणि त्यावरील वळणावर स्थिर झाली होती. बाजारपेठेची ही पडझड आणि लोकांची भीती खूप वेगाने, अंदाजापेक्षा जास्त तीव्रतेने वाढत होती.
तेवढ्यात... तिच्या खाजगी स्क्रीनवर एक नवीन नोटिफिकेशन लाल रंगात चमकले: DIRECTOR LINK REQUEST
एका सेकंदात संपूर्ण खोलीत बर्फासारखी शांतता पसरली. तिथे उपस्थित असलेले सगळे विश्लेषक एका शब्दाचाही उच्चार न करता, अत्यंत शांतपणे पावले टाकत मागच्या अॅक्सेस रूममध्ये सरकले. मुख्य ऑपरेशन्स फ्लोअरच्या स्क्रीन्स आपोआप म्यूट झाल्या.
मुख्य स्क्रीन पूर्णपणे काळी पडली. चेहरा, नाव काही नाही . तिथून फक्त एक आवाज आला... फोनच्या लाईनमधून येणाऱ्या एनक्रिप्टेड स्टॅटिकसह शांत. स्थिर. आणि कमालीचा थंड.
“Western corridor responding?”
एलिनाचा चेहरा नेहमीसारखाच निर्विकार राहिला, “Beyond projection.”
“Good.”
एलिनाने काही क्षण उत्तर दिले नाही. ती काहीतरी विचार करत होती. मग तिने बाजूच्या स्क्रीनकडे पाहत म्हटले, “या विनाशाची visibility वेगाने वाढतेय, डायरेक्टर.”
“Profit too.” डायरेक्टर म्हणाला.
खोलीत काही सेकंद फक्त तो एनक्रिप्टेड स्टॅटिक आवाज ऐकू येत राहिला. मग डायरेक्टरचा आवाज पुन्हा घुमला, “Indian market resisted longer than expected.”
“Elastically, त्यांची व्यवस्था अत्यंत लवचिक आहे, तिने दबाव शोषून घेतला" एलिना शांतपणे म्हणाली.
“Which is why correction became necessary.”
एलिनाने पुन्हा एकदा मुंबईच्या त्या लाईव्ह फीड्सकडे पाहिले. भयानक काळा धूर. मदतकार्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकांचे आपत्कालीन दिवे. मीडियाचे हेलिकॉप्टर्स. ते सगळे काही जणू एकाच वेळी, कोणाच्या तरी इशाऱ्यावर सिंक्रोनाइझ झाल्यासारखे हलत होते.
ती अत्यंत मंद आवाजात म्हणाली, “बाजारपेठेत उमटणाऱ्या एवढ्या मोठ्या आणि तीव्र प्रतिक्रिया आता तिथल्या सरकारला आपल्याकडे आकर्षित करतील.”
“सरकार नेहमी बाजारपेठ पूर्णपणे कोसळल्यानंतरच जागे होते , एलिना. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
पुन्हा एकदा काही सेकंदांची शांतता पसरली. मग डायरेक्टरचा आवाज आधीपेक्षा थोडा मंद पण गंभीर झाला, तुला अजूनही असे वाटते का, की त्या जुन्या लोकांना संपवून किंवा कोंडून ठेवून आपण आपल्या नेटवर्कचे संरक्षण करू शकतो?
एलिनाने उत्तर द्यायला काही सेकंद घेतले. ती विचारपूर्वक म्हणाली, “It protects continuity.”
थेट लाईनवरचा स्टॅटिक आवाज किंचित वाढला. मग डायरेक्टर अत्यंत शांतपणे म्हणाला, “Continuity without expansion becomes stagnation.” विस्ताराशिवाय लाभलेले सातत्य म्हणजे संथपणा किंवा संथ मृत्यू असतो, एलिना. आपल्याला सतत पुढे जावे लागेल.
खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. पण एलिनाच्या डोक्यात आता एकाच वेळी अनेक गोष्टी प्रचंड वेगाने चक्रावून फिरत होत्या, refinery escalation, मुंबईत अचानक दाखल झालेला डॅनियल क्रॉस, दुष्यंत देशमुखचे विखुरलेले माहितीचे तुकडे... आणि त्यांच्या सिस्टीमचे ते गुप्त टी-डब्लू मार्कर्स हे सगळे धागेदोरे शेवटी एकाच बिंदूवर येऊन मिळत होते. ती अत्यंत मंद आवाजात म्हणाली, “क्रॉस आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पुन्हा समोर आला आहे.”
“Old operators follow old routes.”
ते ऐकताच पहिल्यांदाच एलिना पूर्णपणे स्थिर झाली. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेची एक पुसटशी रेषा उमटली. कारण डायरेक्टरच्या त्या उत्तराचा अर्थ एकदम स्पष्ट होता, त्यांच्या सिस्टीमची एअरपोर्ट ऑब्झर्व्हेशन चेन अजूनही सक्रिय होती आणि डॅनियलच्या प्रत्येक हालचालीवर डायरेक्टरची नजर होती.
डायरेक्टर पुढे म्हणाला, “Dushyant trusted memory. That made him vulnerable.”
क्लिक.
लाईन तातडीने डिस्कनेक्ट झाली. स्क्रीन पुन्हा एकदा पूर्णपणे काळी पडली. त्या बंद ऑपरेशन्स फ्लोरवर काही सेकंद कोणीच आपल्या जागेवरून हलले नाही. सगळे स्तब्ध होते. तेवढ्यात... एलिना समोर असलेल्या तिच्या मुख्य वैयक्तिक मॉनिटरवर एक नवीन, internal alert प्रचंड वेगाने चमकायला लागला: LEGACY ROUTING SIGNATURE DETECTED
तिचे डोळे बारीक झाले. पुढच्याच क्षणी दुसरी ओळ हळूहळू स्क्रीनवर उमटली:
POSSIBLE FRAGMENT RECONNECTION
ते वाचताच एलिनाची नजर अत्यंत तीक्ष्ण झाली. कारण याचा अंतिम अर्थ एकच होता, दुष्यंत देशमुखचे ते विखुरलेले तुकडे आता मुंबईत कुठेतरी एकमेकांना शोधून पुन्हा जोडले जात होते...Archive Re-assembly.
तिने अत्यंत सावधपणे मागच्या खोलीत गेलेल्या मुख्य विश्लेषकाकडे पाहिले. तिचा आवाज आता कमालीचा थंड आणि हुकमी झाला होता.
“Find the reconnect point. तो ज्या बिंदूवर हे तुकडे जोडत आहेत, ती जागा तातडीने शोधा."
ती काही क्षण थांबली. बाहेर खिडकीवर आदळणाऱ्या पावसाच्या आवाजात तिचा पुढचा शब्द खोलीत स्पष्ट घुमला, “And do it before the Director does.”
************************************************************************************************************************
मुंबई.
रात्र पडायला अजून थोडा वेळ बाकी होता.
पण संपूर्ण मुंबई शहर आज आधीच कमालीचं थकल्यासारखं आणि सुन्न दिसत होतं. पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या त्या भीषण आगीनंतर, इंधनाचा तुटवडा होणार या भीतीने दक्षिण मुंबईतल्या अनेक पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या अनपेक्षित, लांबच लांब रांगा लागल्या होत्या. न्यूज चॅनेल्सवर डिफेन्स एक्सपर्ट्स, निवृत्त अॅडमिरल्स, मार्केट अॅनालिस्ट्स आणि राजकीय नेते एकमेकांवर ओरडून आकाशपाताळ एक करत होते.
डॅनियल क्रॉस स्क्रीनसमोर डोळे बारीक करून बसला होता. त्याची तीक्ष्ण नजर NAMES.enc या फाईलमधल्या एकमेकांशी जोडलेल्या हजारो नोड्सवर वेगाने फिरत होती. आरव देशमुख आत्ता त्याच्या अगदी मागे, श्वास रोखून उभा होता.
त्यांच्या समोरच्या स्क्रीनवर एका प्रचंड जाळ्यासारख्या गोष्टी उघडल्या होत्या, शिपिंग कंपन्या, इन्शुरन्स प्रॉक्झीज, एनर्जी फंड्स...आणि शेकडो shell entities.
ते सगळं काही एकमेकांशी कसं जोडलेलं होतं, हे स्पष्ट दिसत होतं. जणू काही संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेणारं ब्लॅक एम्बरचं एखादं महाभयानक कोळ्याचं जाळं.
समीर खिडकीच्या काचेजवळ उभा राहून त्याच्या फोनवर harbour traffic feeds तपासत होता. “पोर्ट ऑथॉरिटी सिस्टीममध्ये partial slowdown झाल्याचं उघडपणे नाकारतायत,” तो म्हणाला, “पण तिथले tug allocation patterns (टग बोटी कुठे आणि कशा तैनात केल्या जात आहेत, त्यातील पॅटर्न) पूर्णपणे बदललेत.”
टेबलाजवळ बसलेले विनायकराव अत्यंत शांतपणे म्हणाले, “market panic कधीच तथ्यांवर चालत नाही, समीर.”
त्यांनी लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहिले, “ती फक्त आणि फक्त 'परसेप्शन'वर चालते.”
आरवने विस्मित होऊन डॅनियलकडे पाहिले, “हे सगळं... बाबा एकट्याने ट्रॅक करत होते?”
डॅनियल काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दुष्यंतबद्दलचा एक अथांग आदर उमटला. मग तो म्हणाला, “आरव, तुझ्या वडिलांनी 'ब्लॅक एम्बर'ला थांबवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही.”
आरव गोंधळला, “म्हणजे? मग ते नक्की काय करत होते?”
डॅनियलचा आवाज आता कमालीचा मंद आणि खोल झाला, “ते त्यांना 'प्रेडिक्टेबल' बनवण्याचा प्रयत्न करत होते. जेणेकरून त्यांच्या पुढच्या चालींचा अंदाज लावता येईल.”
अचानक स्क्रीनवर एक दुसरा, जास्त गडद एनक्रिप्टेड सेक्शन आपोआप उघडला: RECOVERY PROTOCOL - STAGE 3
डॅनियल क्रॉस त्या सेकंदाला जागेवरच ताठ बसला. विनायकरावही टेबलाकडे अधिक पुढे झुकले. स्क्रीनवर पुढच्या ओळी एकामागोमाग एक उमटू लागल्या होत्या,
Shell abandonment (शेल कंपन्यांचे तातडीने विसर्जन)
Intermediary extraction (मध्यस्थांना सिस्टीममधून बाहेर काढणे/संपवणे)
Observer activation (गुप्त निरीक्षकांना सक्रिय करणे)
Transit purge (वाहतुकीचे मार्ग आणि पुरावे पूर्णपणे नष्ट करणे)
आरवचा घसा कोरडा पडला. तो त्या कोड्सकडे पाहत म्हणाला, “हे... हे काय आहे नक्की?”
डॅनियल स्क्रीनवरून नजर न हटवता अत्यंत धीम्या आवाजात म्हणाला, “Cleanup procedure. पुरावे मिटवण्याची अंतिम प्रक्रिया.”
समीरने दाराकडे लक्ष ठेवत मागे वळून पाहिले, “म्हणजे नक्की काय?”
डॅनियल काही क्षण पूर्णपणे शांत राहिला. खोलीतल्या अंधारात त्याचा चेहरा कमालीचा गंभीर दिसत होता. तो म्हणाला, “याचा सरळ अर्थ असा... की ज्यांना सिस्टीमबद्दल जास्त माहिती आहे, ते आता या जगातून अचानक गायब होणार.”
विनायकरावांनी थरथरत्या आवाजात कुजबुजले, “दुष्यंतने हे मुद्दाम करून ठेवलं होतं...”
डॅनियलने अत्यंत हलकेच आपली मान होकारार्थी हलवली. “हो,” तो लॅपटॉपची स्क्रीन आता पूर्णपणे बंद करत म्हणाला, “त्याला अचूक माहिती होतं... की ज्या दिवशी हे विखुरलेले तुकडे पुन्हा जोडले जातील, त्या दिवशी ब्लॅक एम्बर स्वतःला वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने बाहेर पडेल.”
त्याच क्षणी... त्या जुन्या बिल्डिंगच्या शांत कॉरिडॉरमध्ये कुठेतरी धातूचा एक हलका आवाज घुमला.
क्लिक.
आणि मग... तसाच दुसरा आवाज आला. जणू कुणीतरी वरच्या मजल्यावर जाणारा जड फायर डोअर अत्यंत हळूच, आवाज न करता बंद केला होता.
समीर एका सेकंदात सावध झाला. डॅनियलही क्षणाचाही विलंब न करता उभा राहिला. या वेळी मात्र त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक किंचित अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तो तातडीने खिडकीजवळ गेला. त्याने बाजूला सरकून खाली रस्त्यावर नजर टाकली. रस्त्याच्या अगदी पलीकडे, अंधारात ती काळी एसयूव्ही उभी होती. तिचे इंजिन बंद होते. तिचे हेडलाईट्स बंद होते. पण तिचा ड्रायव्हर अजूनही आत तसाच बसलेला होता. स्थिर. निर्विकार.
डॅनियल काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला, मग तो अत्यंत मंद आवाजात स्वतःशीच पुटपुटला, “ते इतक्या लवकर हालचाल करतील असं मला वाटलं नव्हतं...”
आरवचा घाबरला , “त्यांनी आपल्याला ट्रॅक केलंय?”
डॅनियलने लगेच नकारार्थी मान हलवली. “नाही,” तो कॉरिडॉरमधून येणाऱ्या आवाजाकडे कान देऊन ऐकत म्हणाला.
समीरने टेबलावरची बॅग एका झटक्यात उचलली. “आपण आताच्या आता इथून निघूया.”
त्याच्या या निर्णयाला कोणीच विरोध केला नाही. विनायकराव आधीच अत्यंत सावधपणे सगळे पेपर्स आणि ड्राईव्ह्ज गोळा करत होते.
डॅनियलने त्याच्या जॅकेटच्या आतल्या खिशातून एक छोटी, पितळी अॅनालॉग चावी बाहेर काढली. त्याने ती थेट आरवच्या हातावर ठेवली आणि त्याचा हात घट्ट बंद केला. “Dock 14.”
आरवने चक्रावून त्याच्याकडे पाहिले. डॅनियल अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाला, “जर या धावपळीत आपण एकमेकांपासून वेगळे पडलो... तर तिथे भेटायचं.”
बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज घुमला. एकापेक्षा अधिकजण होते.
समीरचा हात नकळत त्याच्या जॅकेटच्या आत लपवलेल्या शस्त्राकडे गेला. आरवच्या छातीतली धडधड आता कमालीची वाढली होती.
त्याच वेळी, दाराच्या अगदी पलीकडून एक अत्यंत शांत, सुशिक्षित आणि निर्विकार आवाज ऐकू आला, “Building security. Please open the door.”
नेमक्या त्याच क्षणी, दाराच्या खालच्या फटीतून फ्लॅशलाईटचा एक तीक्ष्ण, पांढरा प्रकाश खोलीतल्या अंधाऱ्या जमिनीवर सरपटत आत आला.
...आणि त्याच्या पुढच्याच सेकंदाला, बाहेर कॉरिडॉरमध्ये कुणीतरी अतिशय शांतपणे आपल्या शस्त्राचं दुसरं मॅगझिन लोड केल्याचा तो धातूचा भयानक आवाज घुमला.
दाराच्या खालून येणारी ती फ्लॅशलाईटची पांढरी तीक्ष्ण बीम पुन्हा एकदा हलली. मंद. आतल्या लोकांची नेमकी जागा निश्चित करत असल्यासारखी स्थिर झाली होती.
खोलीत आता कोणीच, अगदी इंचभरही हलले नाही. फक्त बाहेरच्या शांत कॉरिडॉरमध्ये कुणाच्या तरी जड बुटांचा तळ मजल्याच्या धातूवर घासल्याचा एक कर्कश आवाज घुमत होता.
डॅनियल क्रॉस बंद दाराकडे रोखून पाहत पूर्णपणे स्थिर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे भीती किंवा 'पॅनिक'चा एकही अंश नव्हता. पण त्याच्या डोक्यात आता अत्यंत वेगाने विचारचक्र सुरु होते.
त्याने मान मागे न फिरवता अतिशय मंद, दबलेल्या आवाजात विचारले, “या बिल्डिंगचा सर्व्हिस एक्झिट कुठे जातो, समीर?”
समीरने दारावर नजर ठेवत तातडीने उत्तर दिले, “मागच्या लोडिंग लेनमध्ये .”
“तिथले सीसीटीव्ही ?”
“काही सुरू आहेत, काही बंद.”
डॅनियलने अंधारातच हलकी मान डोलावली. मग तो आरवकडे वळला. आरव देशमुखच्या हातात अजूनही ती छोटी, पितळी अॅनालॉग चावी घट्ट पकडलेली होती. भीतीमुळे त्याचे हात थरथरत होते.
“आरव, Dock 14 कुठे आहे, हे तुला अचूक माहिती आहे?” डॅनियलने विचारले.
आरवने अंधारातच नकारार्थी मान हलवली.
डॅनियल काही सेकंद शांत राहिला. त्याचा चेहरा निर्विकार होता. मग तो मंद आवाजात म्हणाला, “चांगलं आहे. तुला माहिती नसणं म्हणजेच त्यांनाही माहिती नसणं.”
तेवढ्यात... बाहेरून पुन्हा तोच नम्र आवाज ऐकू आला:
“Sir, building maintenance check. Please open the door.”
या वेळी मात्र त्या आवाजात आधीसारखा संयम नव्हता. तिथल्या शब्दांमधून आता किंचित अधीरता स्पष्ट जाणवत होती.
समीर जवळ येत कुजबुजला, “ते वर येत आहेत. त्यांच्याकडे वेळ कमी आहे.”
विनायकराव अचानक आपल्या जागेवरून उठले. त्यांच्या डोळ्यांत एक जुनी आठवण चमकली. “या फ्लोअरवर एक दुसरं stairwell आहे.”
डॅनियलने एका सेकंदात त्यांच्याकडे पाहिले, “लॉक आहे का?”
“पूर्वी होतं.”
“पूर्वी?” डॅनियलचा आवाज किंचित धारदार झाला, “नक्की कधी?”
विनायकराव त्यावर काहीच बोलले नाहीत. त्यांच्याकडे आता स्पष्टीकरण द्यायला वेळ नव्हता. समीरने खांद्यावरची जड बॅग नीट अडकवली आणि विचारले, “डॅनियल, आपल्याकडे नक्की किती वेळ आहे?”
डॅनियलने बंद दाराकडे पाहिले. मग कॉरिडॉरमध्ये पसरलेल्या त्या भयानक शांततेकडे कान देत तो म्हणाला, “माहित नाही समीर.”
डॅनियल अचानक खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या, गंजलेल्या इलेक्ट्रिकल कॅबिनेटच्या दिशेने गेला. त्याने खाली गुडघ्यांवर बसून कॅबिनेटच्या मागच्या अरुंद फटीत आपला हात घातला. काही सेकंदांची शांतता. डॅनियल काहीतरी शोधत होता.
...आणे पुढच्याच क्षणी, तिथून त्याने एक लहान, जुनं मॅग्नेटिक कार्ड बाहेर काढले.
समीर ते पाहून ताठ झाला. “हे... हे तुम्हाला कसं माहिती?”
डॅनियलचा चेहरा अंधारात निर्विकार राहिला. “दुष्यंत प्रत्येक इमारतीचे इमर्जन्सी एक्झिट्स पाठ करून ठेवायचा ,” तो उभा राहत म्हणाला, “मी त्याच्यासोबत राहून फक्त वाईट गोष्टीच शिकलो नाहीये, समीर.”
तेवढ्यात...
ठक.
दाराच्या बाहेरील हँडलवर एक हलका, धातूचा प्रेशर आला. बाहेर उभा असलेला माणूस दाराची कडी आतून लॉक आहे की नाही, हे तपासून पाहत होता.
डॅनियलने हातातील ते मॅग्नेटिक कार्ड विनायकरावांच्या दिशेने हवेत फेकले. “स्टॅअरवेल उघडा.”
समीरने लगेचच खोलीतल्या लॅपटॉपची बंद झालेली स्क्रीन आणखी ढापली. आता संपूर्ण खोली एका गडद काळोखात बुडाली होती. तिथे उरला होता फक्त खिडकीबाहेरच्या मुंबई शहराचा तो लांबून येणारा फिकट, पिवळसर प्रकाश.
बाहेर पुन्हा एकदा आवाज आला. पण या वेळी तो आवाज शब्दांचा नव्हता.
ठक-ठक... ठक.
एक लहान, सांकेतिक नॉक.
डॅनियलचे डोळे त्या आवाजाने एकदम बारीक झाले. तो दात ओठ खाऊन कुजबुजला, “Retrieval confirmation.”
आरवचा श्वास अडकला, “म्हणजे नक्की काय?”
डॅनियलचा आवाज आता कमालीचा गंभीर झाला होता, “त्याचा अर्थ असा... की ते आत येण्यापूर्वी आपल्या अंतिम पोझिशन्स एकमेकांना कन्फर्म करून सांगत आहेत. द अॅटॅक इज रेडी.”
विनायकराव कॉरिडॉरच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या, लोखंडी दाराजवळ पोहोचले होते. त्यांचे हात थरथरत होते. त्यांनी ते मॅग्नेटिक कार्ड दाराच्या बाजूला असलेल्या गंजलेल्या रीडरवर वेगाने स्वाइप केले.
पहिल्यांदा काहीच झाले नाही. सिस्टीमची लाल लाईट तशीच राहिली. समीरच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. बाहेरून येणारी ती फ्लॅशलाईट आता दाराखालच्या फटीतून वेड्यासारखी इकडेतिकडे हलत होती.
विनायकरावांनी पुन्हा एकदा कार्ड ओढले... आणि या वेळी, क्लिक. ते जुने लोखंडी लॉक सुटले. विनायकरावांनी दार किंचित आत ढकलले. आतल्या अंधारात खाली उतरणारा एक अत्यंत अरुंद, जुना जिना दिसत होता. ओलसर. गंजलेला. आणि तिथून दक्षिण मुंबईच्या जुन्या समुद्री हवेसारखा एक खाऱ्या पाण्याचा वास येत होता.
डॅनियलने आरवकडे पाहिले आणि आदेश दिला, “तू आधी पुढे जा.”
“आणि तुम्ही?” आरवने विचारले.
डॅनियल काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्या काळोखात त्याने पहिल्यांदाच आरवच्या डोळ्यांत पूर्णपणे पाहिले. डॅनियलच्या डोळ्यांत आत्ता कमालीचा थकवा होता... आणि त्या थकव्याच्या मागे दडलेला होता एक जुना अपराध.
“आरव... तुझ्या वडिलांनी एकदा माझ्यासाठी थांबण्याची सर्वात मोठी चूक केली होती,” डॅनियल अत्यंत धीम्या पण जड आवाजात म्हणाला, “मी आज त्यांच्या मुलाच्या बाबतीत ती चूक पुन्हा रिपीट करणार नाही.”
खोलीत एक सेकंद संपूर्ण शांतता पसरली.
तेवढ्यात... दाराच्या बाहेर धातूवर काहीतरी जड आदळल्याचा भयानक आवाज झाला. आणि दाराचे हँडल आता हळूहळू, ताकदीने फिरायला लागले.
समीर दातांवर दात घासून कुजबुजला, “शिट... ते आत येत आहेत!”
डॅनियल क्षणाचाही विलंब न करता पुढे झाला. त्याने खोलीच्या कोपऱ्यात असलेला तो जड, लोखंडी मेटल फायलिंग कॅबिनेट दोन्ही हातांनी पकडला आणि पूर्ण ताकदीने दाराच्या समोर ढकलला.
धाड!
त्या आवाजाने संपूर्ण खोली हादरली. कॅबिनेट दाराला जाऊन घट्ट टेकले. बाहेर सुरू असलेली हँडलची हालचाल एका क्षणासाठी थांबली. कॉरिडॉरमध्ये पूर्ण शांतता पसरली.
आणि मग... बाहेरून पहिल्यांदाच एका अनोळखी, शांत आणि धारदार माणसाचा आवाज त्या दारावरून आत घुमला, “Cross. This ends only one way.”
डॅनियल पूर्णपणे स्थिर झाला. त्याने कॅबिनेटच्या मागे असलेल्या दाराकडे पाहिले. मग चेहऱ्यावर एक अत्यंत मंद, अनाकलनीय हास्य आणून त्याने उत्तर दिले, “It already did. Years ago.”
त्या उत्तराच्या पुढच्याच सेकंदाला, बाहेरून पहिला अत्यंत जोरदार, हिंस्त्र धक्का दारावर आदळला... दाराचे लाकूड कडकड कडकडले.
...आणि त्या अरुंद स्टॅअरवेलच्या गडद काळोखात, समीर आणि विनायकरावांच्या मागे आरव देशमुख अत्यंत वेगाने पायऱ्या खाली उतरायला लागला.
मस्त लिहिताय सर.
मस्त लिहिताय सर.
वाचतोय. छान लिहिता तुम्ही.
वाचतोय. छान लिहिता तुम्ही.
शेयर मार्केटमधे छोट्या-छोट्या घटनांमुळे panic selling कसे होते ते जवळून बघितले आहे. त्यामुळे इतर काही terms समजायला थोड्या कठीण गेल्या तरी थीम relate करता येतेय.
पु भा प्र
खरेच थरारक..
खरेच थरारक..
खूप भारी वेब सीरिज बनेल यावर आणि आधीच्या गडचिरोली कादंबरीवर. कॉपी राईट्स जपून ठेवा.
धन्यवाद Sharadg, अनिंद्य आणि
धन्यवाद Sharadg, अनिंद्य आणि धनवन्ती.