शाहरुख खान – एक युगपुरुषाचा साठावा वाढदिवस

Submitted by केदार-मायबोली on 2 November, 2025 - 03:03

शाहरुख खान – एक युगपुरुषाचा साठावा वाढदिवस

२ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशहा, शाहरुख खान, आपला साठावा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीतील एक साधा मुलगा, ज्याने स्वप्नांच्या जोरावर मुंबईत पाऊल टाकले, आज जागतिक स्तरावर ओळखला जाणारा कलाकार, उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे.

शाहरुख खान यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दूरदर्शनवरील “फौजी” आणि “सर्कस” सारख्या मालिकांपासून सुरुवात करून त्यांनी “बाझीगर”, “डर” आणि “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. त्यांच्या अभिनयात एक विशेष जिव्हाळा, संवेदनशीलता आणि ऊर्जा दिसून येते — मग ती प्रेमकथा असो किंवा तीव्र भावनांनी भरलेली भूमिका. त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारी भावना, संवादफेक आणि शरीरभाषा यामुळे ते प्रत्येक भूमिकेला वेगळी ओळख देतात.

शाहरुख फक्त एक अभिनेता नाहीत, तर ते एक आदर्श कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत. पत्नी गौरी खान आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्याशी असलेले त्यांचे नाते त्यांच्या आयुष्यातील स्थैर्याचे केंद्र आहे. त्यांनी नेहमी सांगितले आहे की, “मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळेच आहे.” त्यांचा कुटुंबावरचा विश्वास आणि आदर ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देते.

त्यांचा स्टारडम केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जगभरातील भारतीय व अनिवासी भारतीय समुदायात शाहरुख खान हा एक भावनिक प्रतीक बनला आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या अब्जावधींमध्ये आहे. ते जेव्हा पडद्यावर दिसतात, तेव्हा प्रेक्षक फक्त एक अभिनेता पाहत नाहीत, तर एक भावना अनुभवतात. त्यामुळेच त्यांना “किंग ऑफ रोमॅन्स” आणि “बॉलीवूडचा बादशहा” अशी पदवी मिळाली आहे.

शाहरुख खान हे समाजसेवक आणि उद्योजकही आहेत. मीर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, विशेषतः महिलांसाठी आणि अपघातग्रस्तांसाठी.

आज, त्यांच्या साठाव्या वाढदिवशी, शाहरुख खान हे केवळ चित्रपटसृष्टीतील महानायक नाहीत, तर मेहनत, आशा, प्रेम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. त्यांनी सिद्ध केले आहे की, “जर खरोखर काही मनापासून इच्छिले, तर संपूर्ण विश्व ते मिळवून देण्यासाठी मदत करते.”

शाहरुख खान यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा – तुमची जादू सदैव अशीच झळकत राहो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विधाने स्वतःच करायचे आणि शोधायला आम्हाला लावायचे
त्यापेक्षा एखादा शाहरुखचा पिक्चर पुन्हा नाही बघणार Happy

ज्यांना युगपुरुष वर ऑब्जेक्शन आहे त्यांनी शोधा आणि ते तसे नाहीये हे सिद्ध करा अन्यथा युगपुरुष तसेच राहणार Happy

तसेही ती कौतुकाने दिलेली पदवी आहे. काही शासनाचा शिक्का मारून सर्टिफिकेट दिले नाही.

प्रश्न एकाला उत्तर दुसर्‍या आयडी कडून यात काही राम नाही.
>>>>>

शाहरुखच्या संपत्ती बद्दल एकाला प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर दुसऱ्याने देऊ नये हा कुठला नियम?

जगातला सर्वात श्रीमंत कलाकार आहे इतके पुरेसे आहे ना..
मग तो आकडा नेमका किती वगैरे डिटेल मध्ये कश्याला शिरायचे. इन्कम टॅक्स वाले बघून घेतील ते.

अरे हो कितीतरी जास्त इन्कम टॅक्स तो भरत असेल नाही. एखाद्या छोट्या-मोठ्या शहरात त्याच्या टॅक्स पैशातून कित्येक सुविधा मिळत असतील.

विधाने स्वतःच करायचे आणि शोधायला आम्हाला लावायचे हे फारच भावले.
रजत बेदी हा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे हे पुरेसे आहे.*

उत्तर दुसऱ्या आयडीने दिल्यावर सहमत आहे असे म्हटले नसेल तर हात वर करता येतात.
तारतम्य असेल तर नियम आहे का हे विचारण्याची गरज नाही.

विधाने स्वतःच करायचे आणि शोधायला आम्हाला लावायचे हे फारच भावले.
रजत बेदी हा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे हे पुरेसे आहे.
>>>>>

घाईत ट्रेन मध्ये चढू नका.
वरची माझी पोस्ट युगपुरुष संदर्भात होती.

तरी पण तुम्हाला सुद्धा रजत बेदी हा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे हे विधान करायचे असल्यास खुशाल करा. ना मी हे खोदायला जाणार किंवा ना तुमच्याकडे सिद्ध करा म्हणून मागे लागणार. विषय शाहरुखचा आहे म्हणून चर्चा आहे. इतर कोणाबद्दल कोणाला रस आहे इथे...

मला जर कोणी अशी सारखी माझ्या आवडीची भाजी वाढली तर मी माझ्या मूडनुसार ती खाईन आणि मूड नसल्यास ताटाच्या पाया पडून उठेन आणि दुसरे काहीतरी खाईन. अन्नाला नावे ठेवून त्याचा अपमान नक्कीच करणार नाही. >>>>> रजत बेदीजींचा अपमान केला. रस नाही म्हणून कसं चालेल?

लोकांनी या नासक्या भाजीला कसं सहन केलं असेल? जिथे ती कुणालाच नको होती. इतक्या लवकर खरे रंग... असो Happy

रजत बेदी आणि शाहरुख खान यांची तुलना केली तर उंची, शरीरयष्टी आणि चेहरेपट्टी मुळे हाणामारी पटासाठी रजत बेदी योग्य ठरतो. शाहरूख खान बुटका आहे. उंच हिरॉइन्स सोबत सीन करताना कॅमेरामॅनची सर्कस होत असेल.

बिंदू, कमल सदाना, रजत बेदी, जुही चावला, विवेक ओबेरॉय, अभिषेक बच्चन, अलंकार जोशी सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, रितेश देशमुख हे अभिनेते शाहरुख खान पेक्षा श्रीमंत आहेत. -. Good joke

हा आमीर खानचा धागा आहे. पण शाहरूख खान आणला कि नाही?
https://www.maayboli.com/node/87063
अजून एक सलमान खानचा धागा. पण शाहरुख खान आणला कि नाही?
https://www.maayboli.com/node/86816
हा गाणे आणि गायक. यातही शाहरुख आणला.
https://www.maayboli.com/node/86255
असे हजारो धागे आहेत.

मग इथे रजत बेदी ला येऊ द्या. चिडायचं कशाला? Happy

शाहरुख भारतातीलच नाही तर जगातील पहिल्या क्रमांकाचा richest actor आहे..

I repeat... जगातील !>>>>
अवांतर( कारण हे माझे वैयक्तिक मत आहे): आपण उठसूट कोणत्याही माणसाला देवपदावर ( इथे युगपुरुष) बसवायला आतुर असतो, ते त्यांच्याच करणीने त्यांचे मातीचे पाय कसे दाखवून देतात या संदर्भात २ ठळक उदाहरणं आठवतात.

१) शाखा त्याचा व्यावसायिक मित्र मोहम्मद अली अलाब्बर याच्या विनंतीने जेंव्हा २०१३ मध्ये अहमद हाशेम खुरी याच्या मुलीच्या लग्नात ८ कोटी (त्यावेळचे १ मिलियन युएसडी) घेऊन नाचलेला ३० मिनिटाचा परफॉर्मन्स दिलेला.(रच्याकने शाखा ला बॉलिवूडमध्ये या गोष्टीचा डिझर्विंगली पायोनियर मानले जाते.)

२) जेव्हा २००२ मध्ये सचिन तेंडुलकरने भेट म्हणून मिळालेल्या फेरारी वरचे कस्टम शुल्क माफ करावे म्हणून सरकारला जाहीरपणे केलेली विनंती.

आता निदान वैयक्तिक माझ्या नजरेतून, शाखा काय किंवा तेंडल्या काय, जगातले सर्वात श्रीमंत ऍक्टर/ खेळाडूच सोडा, अगदी सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले तरीही, वो जो बूंद से गयी है, ती हौदच्या हौद रिकामे केल्यावरही भरून नाही येणार.

बाकी साधक-बाधक चर्चा सुरु राहीलच. Happy

फाविदडी, लग्नात कॉन्ट्रॅक्ट घेऊन नाचण्यात बूँद से गई का वाटलं? प्रामाणिकपणे विचारतोय. म्हणजे तो काही गुन्हा वगैरे नाही, कला सादर करायची जागा आहे. त्यात उच्च नीच भाव का? हा स्लिपरी स्लोप आहे. म्हणजे नाटक, चित्रपट, मालिका, कॉन्ट्रॅक्ट शो, अँकरिंग ही अशी उतरंड वगैरे आहे असं म्हणायचं आहे का?
आपल्याकडे सर्वार्थाने दिग्गज, प्रतिथयश गायिका ठेवलेल्या होत्या. कोण जीवनात काय करतो तो ज्याचा त्याचा स्ट्रगल असतो. तुम्ही अशी पोस्ट का टाकावी याचं आश्चर्य वाटलं.

म्हणजे तो काही गुन्हा वगैरे नाही, कला सादर करायची जागा आहे....
कोण जीवनात काय करतो तो ज्याचा त्याचा स्ट्रगल असतो.>>>
म्हणूनच मी ते माझं  वैयक्तिक मत आहे असं लिहिलंय. कारण २०१३ मध्ये देखील शाखा काही कमी यशस्वी (प्रसिद्धी आणि आर्थीक दोन्ही बाबतीत) नव्हता, किंबहुना २००० च्या पहिल्या दशकातच त्याला किंग खान संबोधन मिळालेले. तो बॉलीवूड मधील दिग्गज सुपरस्टार्सचा वारसा पुढे चालवत होता...It's more about a legacy than a personal thing at that stage IMO.  न जाणो तो त्या वेळी ही कदाचीत त्याच्या क्षेत्रात येनकेन प्रकारे स्ट्रगल करत असेलही, जे पूर्णपणे माझ्या आकलनाच्या कक्षेबाहेरचे असू शकते. पण माझ्या मते तो आर्थीक बेरजेकरिता  वैयक्तिक लग्नसमारंभात परफॉर्म करणे टाळू शकत नव्हता, इतका काही तो निश्चितच हतबल नव्हता (२०१३  मध्ये त्याने १० कोटी रुपये आगाऊ टॅक्स भरलेला). त्याने लग्नात परफॉर्म करायला जावं यामध्ये मला कला सादर करणे हा उद्देश दिसत नाही, निदान तेवढा निरागस विचार माझ्या डोक्यात येत नाही, म्हणजे असा कदाचित कोणताच परफॉर्मन्स नसेल जो तो सिनेमाच्या पडद्यापेक्षा वैयक्तिक लग्नसमारंभात अधिक उत्कटपणे सादर करत असेल. (जर असा कोणता परफॉर्मन्स असेल तर त्या बद्दल जाणून घ्यायला निश्चितच आवडेल), आणि म्हणूनच मी ज्या संदर्भात माझा प्रतिसाद दिलेला (शाहरुख  जगातील पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत ऍक्टर आहे.) तो संदर्भ मला अपील होत नाही,...इतकंच. 

Lol ओके. फेअर इनफ! पैसे हाच हेतू नसेल काही संबंध वगैरे असेल. पण अगेन मला माहित नाही आणि जाणून घ्यायची इच्छा ही नाही. दोन अंगुली वर चाललेल्या रथाला जमिनीवर यायला ते कारण पुरेसं ठरवायचं असेल तरी काही हरकत नाही. तर असो. Happy

एखाद्या यशस्वी माणसाने पैशांसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावावी का ?
मित्राच्या लग्नात आवर्जून नाचावे. कितीही मोठ्या पदावर गेलेली यशस्वी व्यक्ती असो, तिने मित्राच्या लग्नात नाचल्याने उलट त्या व्यक्तीचे डाऊन टू अर्थ असणे उठून दिसते. पण मित्राच्या लग्नात पैसे घेऊन नाचल्याने अजून प्रतिष्ठा वाढत असेल तर जरूर तसे करावे.

शाहरूख खानला फक्त सिनेमातून पैसा मिळत नाही. पूजा ददलानी या त्याच्या मॅनेजरमुळे त्याच्या संपत्तीत भर पडत गेली आहे. ती त्याचा सर्व पैसा गुंतवते, ज्यातून त्याची संपत्ती वाढत गेली आहे. तिच्यावर खान कुटुंबाचा विश्वास आहे आणि ती सोडून जाऊ नये यासाठी तिला घसघशीत पगार आहे. आठ हजार कोटी एव्हढी संपत्ती असताना एखाद्या कोटीसाठी लग्नात नाचून जर प्रतिष्ठा मिळत असेल तर का नाही ?

टीना अंबानी सुद्धा पूर्वीची अभिनेत्रीच आहे. सध्या घरची परिस्थिती वाईट आहे. लग्नात नाचून हातभार लावला तर अंबानींच्या प्रतिष्ठेत भरच पडेल.
अंबानींच्या लग्नात अमिताभ बच्चन, आमीर खान पासून सर्वच बॉलीवूड सेलेब्रिटींनी वाढप्याचं काम केलं होतं. देशभरात त्यांचं कौतुक झालं होतं.

रजत बेदीची कॅनडात भागीदारी फर्म आहे. काही वर्षांपूर्वी त्याची संपत्ती १२ हजार कोटी रूपये होती. त्या वेळी कुणाकडेही एव्हढा पैसा नव्हता. तिथे त्याने एक फिल्म प्रॉडक्शन कंपनीही बनवली आहे. अलिकडेच कुठेतरी त्याची संपत्ती ३५ हजार कोटी असल्याचं ऐकलं होंतं. कंपनीची कि वैयक्तिक हे सांगता येणार नाही. त्याच्या घरच्या कार्यात या सर्व मंडळींनी जरूर नाचावे. आनंदच होईल. पैसेही मिळतील.

लग्नात पैसे घेऊन परफॉर्म करणे हा त्याने आणखी एक इन्कम सोर्स तयार केला तर त्यात त्याच्या प्रतिष्ठेला बाधा येण्यासारखं काहीच नाहीए...

ज्यांना कमीपणा वाटतो, आवडत नाही ते नाही करणार..
बारा हजार चारशे कोटी नेटवर्थ ने जगातला सर्वांत श्रीमंत ॲक्टर झाल्याबद्दल शाहरुखचे खूप कौतुक आणि अभिनंदन

@ शाहरुख आणि त्याचा लग्नसमारंभातील नाच

शाहरुखने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे असे मी बिलकुल म्हणणार नाही!
कारण तसे म्हटल्याने लग्नात, वाढदिवसात, कुठल्याही खाजगी समारंभात, नाचणारे, बँड वाजवणारे, आपल्यातली कुठलीही कला सादर करणारे तसेच अँकरिंग करणारे, या सर्व व्यवसायांचा आणि त्यातील कलाकारांचा मी नकळत अपमान करेन, त्यांना हलके काम करणारा म्हणेन, जे मला बिलकुल करायचे नाहीये.

याउलट शाहरुखने जे केले त्यामुळे या कामांना जी एक प्रतिष्ठा निर्माण झाली त्याचा या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना नक्कीच फायदा झाला असणार. यासाठी खरे तर मला शाहरुखचा अभिमान आहे.

तुम्हा कोणाला शाहरुखवर टीका करायचीच असेल तर प्लीज असे मुद्दे घेऊन या कामांना हलके लेखू नका ही विनंती.

हवे तर मी तुम्हाला योग्य मुद्दे देतो.
टीका करायची असेल तर तो पानमसाला, दारू, ऑनलाइन जुगार अँप यांच्या जाहिराती करतो त्यावर टीका करा.
मला स्वतःलाही त्याचे किंवा कुठल्याही सेलिब्रिटीचे यात काम करणे रुचत नाही.
मला तर मायबोलीवर दारू कशी प्यावी असा धागा निघतो यालाही विरोध होता. दुर्दैवाने आपल्याकडे अश्या गोष्टींना कोणी विरोध करत नाही.
निदान शाहरुखवर टीका करायच्या निमित्ताने तरी हा विरोध झाल्यास आवडेल.

अरे हो रानभुली,

मी आमिर सलमानच्या धाग्यावर शाहरुख आणला हे मला माहीत होते. फक्त तेच तुमच्या तोंडून कबूल करून घ्यायचे होते की चित्रपट आणि चित्रपट अभिनेते सोडून यात अजून कुठला धागा नव्हता.

ते तुम्ही केलेत याबद्दल मनापासून आभार Happy

बाकीचे धागे सांगावेत असे वाटले नाही. सूज्ञास सांगणे न लगे. Happy

ज्यांचा व्यवसाय गाणे बजावणे आहे त्यांच्या पंक्तीत शाहरूख खान ला आणून ठेवले. कोणताही चाहता असे करणार नाही.
उलट अशा अवमूल्यनामुळे मायबोलीवरचे शाहरूखचे चाहतेही वैतागलेत. रोज रात्रंदिवस घराशेजारी फटाके फोडणार्‍याचं कौतुक करणार्‍याचंच कौतुक आहे. ते मरू दे.

आज शाहरूख खानच्या घरी काय भाजी केली होती ?
पांढरा रस्सा तांबडा रस्सा कि आख्खा मसूर ?

रच्याकने शाखा ला बॉलिवूडमध्ये या गोष्टीचा डिझर्विंगली पायोनियर मानले जाते.)>>>डान्स मधे असु शकेल पण सिनेमाच्या तुटपुन्ज्या फेमचा उपयोग करुन लग्न ते मयत बोलवाल त्या ठिकाणी हजर राहुन त्याचे पैसे घेण्याचा पायोनियर "चन्की पान्डे " आहे.
शाखा त्याचा व्यावसायिक मित्र मोहम्मद अली अलाब्बर याच्या विनंतीने जेंव्हा २०१३ मध्ये अहमद हाशेम खुरी याच्या मुलीच्या लग्नात ८ कोटी (त्यावेळचे १ मिलियन युएसडी) घेऊन नाचलेला ३० मिनिटाचा परफॉर्मन्स दिलेला>>> यात काय गैर आहे? ह्या बेभरवशाच्या क्षेत्रात आज असलेले फेम अगदी थोड्या अवधित लयाला गेल मग कुणीच विचारल नाही असे अनेक किस्से आहेत...एबिसिएल फ्लॉप गेल्यावर अमिताभ येस महानायकाला सुद्धा प्रॉब्लेम आलेले (हे त्याने स्वतःच सान्गितलय)...अस असताना असलेल फेम कॅश करुन घेण्यात काय चुकिच आहे??
शाखा अ‍ॅव्हरेज लिमिटेड नट आहे अस अनेकाना वाटत पण तो खुप हुशार आणी उत्तम व्यावसायिक आहे याबद्दल दुमत नसाव.

आणि बोलण्यात, हजरजबाबीपणात त्याच्यासारखा दुसरा नाही. प्रचंड हुशार आहे तो. त्याचे सिनेमे नाही बघितले तरी त्याच्या मुलाखती आणि प्रेझन्स एकदम व्यापणारा असतो आणि मजा येते. इथेपण काहीही मुद्दे नसताना लोक अगदी आवर्जून येऊन शाखाला नावं ठेवतात आणि ऋणम्या धू धू धुतो ते वाचायला मजा येते.

आणि बोलण्यात, हजरजबाबीपणात त्याच्यासारखा दुसरा नाही. प्रचंड हुशार आहे तो. त्याचे सिनेमे नाही बघितले तरी त्याच्या मुलाखती आणि प्रेझन्स एकदम व्यापणारा असतो आणि मजा येते.>>> येस !!त्याचा ह्युमर कोशन्ट ,वयानुसार आलेला हम्बलनेस हे सगळच वाखाणण्यासारख आहे..मुख्य म्हणजे यातल काहीच ओढुन ताणून आणलेल खोट वाटत नाही....तो अ‍ॅक्टर झाला नसता तरी दुसर्‍या कुठल्याही क्षेत्रात तितकाच यशस्वी झाला असता...
खरतर शाखा पेक्षा त्याच्या ओव्हर द टॉप फॅनचाच वैताग जास्त येतो.

ज्यांचा व्यवसाय गाणे बजावणे आहे त्यांच्या पंक्तीत शाहरूख खान ला आणून ठेवले. कोणताही चाहता असे करणार नाही.
>>>>>>>

कारण ना शाहरुख insecure आहे ना शाहरुखचे चाहते insecure आहेत Happy

गाणे बजावणे करणाऱ्यांचा असा उल्लेख मात्र खटकला. जणू काही तो दुय्यम दर्जाचा व्यवसाय आहे.
पण आता पुन्हा तेच सांगण्यात अर्थ नाही.

तो अ‍ॅक्टर झाला नसता तरी दुसर्‍या कुठल्याही क्षेत्रात तितकाच यशस्वी झाला असता...
>>>>>>>>>>>

+७८६
आणि म्हणूनच दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात असलेल्या व्यक्तीने त्याच्यातील या क्वालिटी कश्या आत्मसात करता येतील हा प्रयत्न करावा.

अमितव धन्यवाद Proud

वर तुम्ही जे शाहरुख क्वालिटी सांगितल्या तोच तर खरा शाहरुख आहे ! आणि त्याच्या त्या क्वालिटी औट ऑफ द वर्ल्ड आहेत म्हणून त्याच्यासारखा कोणी नाही.

आणि याचसाठी गेले कित्येक वर्षे मी आता इतर कलाकारांसोबत त्याची तुलना करणे, फॅन वॉर करणे बंद केले आहे. माझ्यामते त्याची आता इतर अभिनेत्यासोबत स्पर्धा अशी नाहीच आहे.

आणि त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो आजही हे ग्रांटेड धरत नाही. काळासोबत बदललो नाही तर आपण मागे पडू, संपून जाऊ, या पिढीशी स्पर्धा करू शकणार नाही हे पक्के ध्यानात ठेवून आजही तो तितक्याच डेडीकेशनने आपले काम करतो.

मी मागे देखील म्हटले होते की आमच्याकडे तिन्ही पिढ्या त्याच्या फॅन आहेत. आणि मला स्वतःला खरेच छान वाटते जेव्हा माझी लेक शाहरुख खान मूवी असे सर्च करून त्याचे ऐकून एक चित्रपट बघून काढते. कारण आजकालच्या कुठल्या इतर कलाकाराच्या influence मध्ये येण्यापेक्षा पडद्यावर आणि बाहेरच्या जगात असे दोन्हीकडे कुटुंबवत्सल आणि स्त्रियांचा आदर सन्मान करणारा इमेज राखलेला शाहरुख मुलांना आवडत असेल तर ते मला जास्त सुरक्षित वाटते.

अगदी काल सुद्धा आम्ही चक दे पाहिला. कितव्यानदा ते आम्हा दोघांनाही आठवत नाहीये Happy

गाणे बजावणे करणाऱ्यांचा असा उल्लेख मात्र खटकला. >> का खटकला ? गाणे बजावणे हा काही अपमानास्पद व्यवसाय आहे का ?

ज्यांचे बिचार्‍यांचे पोट फक्त याच व्यवसायावर आहे त्यांच्या आडून एका गब्बर व्यावसायिकाने पैसे घेण्याचे समर्थन करून त्यांना वेठीस धरण्यासारखे महापाप दुसरे नाही. त्यांचे काम तेच आहे , मग अंबानींनी तसं केलं तर तुलना करायची का ?
तरतम भाव आणि सूज्ञ या दोन शब्दांशी फारकत असेल तर पुन्हा सांगून काय फायदा ? Happy

चला,या धाग्यावर आधी शाहरूखचा धागा असल्याने इतर कलाकार नकोत पासून चित्रपटांचा धागा आहे इथपर्यंत माकडउड्या झाल्या.

आता काय तर... माऊ !
सुभारात्री.
सुबोध भावेचे सिनेमे बघा..

मी मागे देखील म्हटले होते की आमच्याकडे तिन्ही पिढ्या त्याच्या फॅन आहेत.>>>>>> आमच्या कडे तिन्ही पिढ्यांना तो आवडत नाही.

का खटकला ? गाणे बजावणे हा काही अपमानास्पद व्यवसाय आहे का ?
>>>>>>>>>

हाइंगग.. तसा उल्लेख तर तुम्हीच केलात ना. शाहरुखला त्यांच्या पंक्तीत बसवले, कोणी चाहता असे करणार नाही म्हणत.. जणू काही हा दुय्यम दर्जाचा व्यवसाय आहे. आणि त्यांच्या पंक्तीत बसवल्याने शाहरुखची शान कमी होणार आहे. जे कोणी चाहता करणार नाही..

असो, राहू दे. इतके मक्याचे दाणे उगाच कोणासाठी सोलायचे..
समय समाप्ती की घोषणा!
शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज Happy

आमच्या कडे तिन्ही पिढ्यांना तो आवडत नाही.
>>>>>>

आमच्याकडे देखील लिस्ट केली तर असे बरेच कलाकार निघतील जे तिन्ही पिढ्यांना आवडत नाही.
पण जे आवडतच नाही त्यांना जास्त भाव देत त्यांची लिस्ट का करत बसा म्हणून राहू देतो Happy

तुम्हालाही शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज Happy

Pages