
( आमीर खान चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने चित्रपट या ग्रुपमधे हा धागा आहे. व्यक्ती म्हणून त्याचं योगदान अनेक क्षेत्रात असल्याने अॅडमिन समितीस योग्य वाटेल त्या ग्रुपमधे धागा हलवू शकता).
आमिर खानच्या कारकिर्दीचा आढावा
आमीर खानचं संपूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान असं आहे. त्याचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला.
आजवरची त्याची कारकीर्द ३० वर्षांहून अधिक आहे. याळात त्याची मिस्टर परफेक्शनिस्ट अशीही ओळख निर्माण झाली कारण तो निर्माण करत असलेल्या चित्रपटासाठी किंवा कुठल्याही प्रोजेक्ट्स साठी प्रचंड मेहनत घेतो. नॅशनल चॅनल वर त्याने देशापुढील वेगळ्या समस्या मांडण्यासाठी एक शो बनवला होता त्यात त्याचा हा गुण ठळक झाला.
आमिर खानचा जन्म एका ज्या कुटुंबात झाला त्या कुटुंबाचा फिल्म इंडस्ट्रीशी अनेक दशकांचा संबंध आहे. त्याचे वडील ताहिर हुसेन हे निर्माते होते, तर काका नासिर हुसेन हे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी संबंध आहे, तसेच तो भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्याशीही नातेसंबंधाने जोडला गेला आहे.
आमिरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी आपल्या काकांच्या *यादों की बारात* (१९७३) या चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर *मदहोश* (१९७४) मध्येही तो दिसला होता. यादों कि बारात आता बघताना तो लगेचच ओळखू येतो.
त्याची हिरो म्हणून कारकीर्द कयामत से कयामत तक पासून सुरू झाली असे आपल्याला वाटते. पण राख आणि १९८४ मध्ये केतन मेहता दिग्दर्शित *होली* या चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केले होते. हे दोन्ही सिनेमे लक्ष वेधून घेऊ शकले नाहीत खरी प्रसिद्धी त्याला १९८८ मध्ये मन्सूर खान दिग्दर्शित *कयामत से कयामत तक* या चित्रपटाने मिळाली. हा सिनेमा त्याच्या काकाच्या म्हणजे नासीर हुसेनच्या बॅनरखाली बनला होता. नासीर हुसेन यांचा मुलगाही दिग्दर्शक म्हणून डेब्यु करत होता. त्याला आपल्या वडलांच्या हरवले सापडले किंवा मल्टीस्टारर पण सरधोपट पिक्चर पेक्षा वेगळं काही तरी बनवायचं होतं. वडलांच्या आग्रहास्तव आणि त्यांचा अनुभवाचा सल्ला ऐकून त्याने लव्हस्टोरी बनवायची ठरवलं. त्या वेळी मन्सूर खान नवखा होता. त्यामुळं अनेक नायकांकडून त्याला नकार आल्यावर मग नवीन हिरोला घेऊन प्रोकेट सुरू करायचं ठरवलं आणि आमीरखानची निवड झाली.
या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले आणि त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
या चित्रपटाने त्याची इमेज चॉकलेट बॉय अशी झाली . पण यानंतर आमीर खानने कुणाचाही सल्ला न घेता येतील ते सिनेमे धडाधड स्विकारायला सुरूवात केली. त्याच्या कयामतचं यश एन्कॅश करण्यासाठी अनेक सुमार दर्जाच्या चित्रपटात त्याला घेतलं. परिणाम हा झाला कि त्याची स्टार व्हॅल्यू कुमार गौरव प्रमाणेच संपण्याच्या टोकावर येऊन ठेपली. अधून मधून काही हिट मिळाले होते पण त्याला एका बड्या हिटची आवश्यकता होती.
या फेजमधून त्याच्या मदतीला पुन्हा त्याचा भाऊ मन्सूर खान मदतीला आला. त्याच्या बॅनरखाली बनलेल्या जो जिता वही सिकंदरने पिटातल्या प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांची शाबासकी मिळवली. भारतातला हा पहिलाच स्पोर्ट्स शी संबंधित यशस्वी सिनेमा असावा. यानंतर ९० च्या दशकात त्याचं स्टारडम बहरू लागलं. इथे आमीर खानने आपली चूक सुधारली आणि तो मोजकेच चित्रपट स्विकारू लागला.
१९९० च्या दशकात आमिरने अनेक यशस्वी चित्रपटांमधून आपली छाप पाडली. *दिल* (१९९०), *दिल है की मानता नहीं* (१९९१), *जो जीता वही सिकंदर* (१९९२), *हम हैं राही प्यार के* (१९९३), आणि *रंगीला* (१९९५) यांसारख्या चित्रपटांनी त्याला व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीने यश मिळवून दिले. १९९६ मध्ये *राजा हिंदुस्तानी* या चित्रपटासाठी त्याला पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले.
पण आमीरला आपली वेगळी ओळख बनवायची असल्याने त्याने स्वतःच निर्माता बनण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये त्याने बनवलेल्या सरफरोश या चित्रपटातील त्याच्या अभिनयाने समीक्षकांची विशेष प्रशंसा मिळवली. हा सिनेमा सुद्धा समीक्षकांनी गौरवला होता. याच काळात त्याने *अंदाज अपना अपना* (१९९४) सारख्या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले, जो रिलीजच्या वेळी फ्लॉप ठरला, परंतु नंतर कल्ट क्लासिक बनला. या काळात आमीर खान म्हणजे हमखास चांगला सिनेमा असा विश्वास प्रेक्षकांच्या मनात रुजायला सुरूवात झाली होती. या काळात त्याने खूप काळजीपूर्वक सिनेमे केल्याने त्याचे अव्वल नंबर, तुम मेरे हो सारखे तद्दन फालतू सिनेमे लोकांनी माफ करून टाकले.
१९९९ मध्ये आमिरने आमिर खान प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा पहिला चित्रपट *लगान* (२००१) हा ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकित झाला. या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिले. याच वर्षी *दिल चाहता है* मधील त्याच्या अभिनयाने तरुण प्रेक्षकांना भुरळ घातली.
चार वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याने २००५ मध्ये मंगल पांडे: द रायझिंग या चित्रपटातून पुनरागमन केले. २००६ मध्ये रंग दे बसंती आणि फना यांसारख्या चित्रपटांनी त्याला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेले. २००७ मध्ये त्याने *तारे जमीन पर* या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्याने त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. हा चित्रपट डिस्लेक्सियासारख्या सामाजिक विषयावर आधारित होता आणि त्याला प्रचंड यश मिळाले.
२०१० नंतरच्या काळात आमिरने *गजनी* (२००८), ३ इडियट्स (२००९), धूम ३ (२०१३), पीके (२०१४), आणि दंगल (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपली लोकप्रियता कायम राखली. दंगल हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आणि विशेषतः चीनमध्ये त्याने २००० कोटींहून अधिक कमाई केली.
२०२५ मध्ये आलेला *सितारे जमीन पर* हा चित्रपट त्याच्या नवीनतम प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. हा चित्रपटही सामाजिक संदेश देणारा आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.
आमिर खान केवळ अभिनयापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक कार्यातही सक्रिय आहे. त्याच्या *सत्यमेव जयते* या टेलिव्हिजन शोने सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, लिंगभेद, आणि सामाजिक समानता यांसारख्या विषयांवर त्याने आपल्या चित्रपटांमधून आणि शोमधून सातत्याने आवाज उठवला आहे.
आमीरच्या कारकिर्दीतल्या नकारात्मक बाजू
आमीर खान अनेकदा वादात अडकला. त्याच्या काही वक्तव्यांमुळे वादळ उठलं. यामुळे त्याच्यावर बहीष्काराचं पाऊल उचललं गेलं होतं. याचा फटका त्याला बसला.
तसेच ज्या वेळी त्याची प्रतिमा ही चांगले सिनेमे बनवणारा अभिनेता अशी झाली त्या वेळी त्याने काही अचाट आणि function at() { [native code] }अर्क्य सिनेमे स्विकारल्याने काही प्रेक्षकांना धक्काच बसला. उदाहरणार्थ गझनी. हा यशस्वी सिनेमा असला तरीही तो काही त्या वेळच्या आमीर स्विकारत असलेल्या चित्रपटांशी सुसंगत नक्कीच नाही. तो चालला कारण आमीरचा सिनेमा म्हणजे चांगला या डोळे झाकून विश्वास टाकण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीने. याबद्दल आमीर खानला विचारले असता त्याने मी मनोरंजन क्षेत्रात काम करतो, त्यामुळं प्रत्येक सिनेमात संदेश असला पाहीजे असं काही गरजेचं नाही असं मत व्यक्त केलं होतं.
सत्यमेव जयते हा चांगला शो आहे. पण छोट्या पडद्यावर त्याचं दर्शन सतत होत राहीलं, पाणी पंचायत मुळे तो गावोगावी फिरत राहिला. या काळात त्याला सिनेक्षेत्रातल्या कारकिर्दीकडे लक्ष देता आले नाही. अती दर्शन ही बाधक आणि मोठी गॅपही बाधक अशा दोन्हीचा त्याला फटका बसला. पण दंगल, तारे जमीन पर सारख्या उत्कृष्ट सिनेमामुळे तो पुन्हा सन्मानाने मेन स्टॄम मधे परतला.
पण यानंतर त्याने ठग्ज ऑफ हिंदुस्तान सारख्या सिनेमात काम करून लोकांची तीव्र नाराजी ओढवून घेतली.
धूम ३ हा सुमार दर्जाचा बिग बजेट पिक्चर आधीच्या धूम चित्रपटांपेक्षा जास्त चालला. पण त्यासाठी आमीरचे गुडविल खर्च झाले.
त्यानंतर आलेला त्याचा लालसिंग चढ्ढा हा आश्चर्यकारक रित्या आपटला. दोनशे कोटीचं बजेट असताना फक्त साठ कोटी इतकाच धंदा झाला.
याचे कारण बहीष्कार सांगितले जाते.
आमीरचे मॅनरिजम अतिपरिचित झाल्याने आणि त्याचा वापर टाळता न आल्याने तसेच पीकेच्या प्रभावाखालून निघता न आल्याचा फटका त्याला बसला असे म्हणतात. नेटफ्लिक्सने याच काळात टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप प्रदर्शित केल्याने त्याचाही फटका बसला. लालसिंग हा सिनेमा फॉरेस्ट गंपशी तुलना झाली नाही तर चालायला हरकत नव्हती. पण तुलना झाली तर त्यातले वैगुण्य ठळक होणारच. फॉरेस्ट गंपच्या वेळी ऐतिहासिक व्यक्तींसोबत टॉम हँक्स पडद्यावर दिसला. या सीजी करामतींचे कौतुक झाले होते. त्या वेळी जुरासिक पार्क सुद्धा याच करामतींमुळे हिटझाला होता. इतकेच नाही तर अशा करामतींचा फॅन असलेल्या कमल हसनने त्याच्या इंडीयन मधे सुभाषबाबूं सोबत कमल स्वतःला दाखवल्याने त्याचीही क्रेझ निर्माण झाली होती. लालसिंग चढ्ढाच्या वेळी या सर्व गोष्टी नॉर्मल झाल्या होत्या. त्यामुळे या सिनेमाचा युएसपी काय हाच कळीचा मुद्दा होता.
ट्रेण्डसेटर होण्याच्या वेडापायी त्याने आत्मघातकी निर्णय घेतले आहेत.
लालसिंगच्या रिलीजच्या आधी नेटफ्लिक्सची मिळालेली १६५ कोटींची ऑफर नाकारून सहा महीन्यांनी ओटीटीवर पिक्चर रिलीज करण्याचा त्याचा आग्रह अव्यावहारीक असल्याने ओटीटी वाल्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.
सितारे जमीन पर या सिनेमालाही पुन्हा एकदा १४५ कोटी मिळत असताना त्याने युट्यूबवर सिनेमा प्रदर्शित करण्याचा काहीच्या काही निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका त्यालाच बसला.
एखाद्या नव्या सिनेमाच्या गेट अप मधे सतत फिरत राहण्याने त्याच्या स्टारडम वर परिणाम होतो. सतत ती विचित्र दाढी, चित्रविचित्र केशभूषा यातच इंटरव्ह्यू देत राहिल्याने त्याच्या इमेजलाही धक्का बसतो.
आमिर खानला त्याच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत:
फिल्मफेअर पुरस्कार : ९ पुरस्कार, यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : ४ पुरस्कार.
पद्मश्री (२००३) आणि पद्मभूषण (२०१०) हे भारत सरकारचे सन्मान.
-चीन सरकारचा मानद पुरस्कार** (२०१७), त्याच्या चित्रपटांच्या चीनमधील लोकप्रियतेमुळे मिळाला.
एकंदरीत यशस्वी असूनही अनेक चढ उतार असलेली कारकीर्द, वादग्रस्तता, खासगी जीवनातल्या अनेक गोष्टींमुळे नाराजी, भावाचे आरोप ते उत्तम चित्रपटनिर्माता म्हणून ओळख अशी त्याची कारकीर्द बहुरंगी, बहुढंगी असूनही त्याच्या बद्दल एव्हढी चर्चा मायबोलीवर नाही.
आभार : या निबंधासाठी संदर्भ म्हणून ग्रोकची मदत घेतली आहे.
छान आढावा घेतलाय.
छान आढावा घेतलाय.
एक नट म्हणुन आमिर आवडतोच. पण सातत्याने यश मिळवणारे हिरो नंतर लार्जर दॅन लाईफ होतात. नट म्हणुन जे करायला हवे त्यात ही लार्जर दॅन लाईफ इमेज मोठी भिंत बनुन उभी राहते.
आमिरचे कौतुक अजुन यासाठी करावेसे वाटते यासाठी की त्याने किरण राव व सत्यमेव जयते टिमसोबत पानी फाउंडेशन हा ट्रस्ट स्थापन करुन महाराष्ट्रातल्या शेतकर्यांसाठी एक उत्तम आधार निर्माण केलाय.
सुरवात त्यांनी पाणी संबर्धनाने केली. नंतर महाराष्ट्राचे कृषी खाते, कृषी विद्यापिठे, उमेद फाऊन्डेशन मिळुन डिजिटल शेती शाळा सुरु केली.
डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातुन गाव व तालुका स्तरावरील कृषी सहाय्यकांची मदत घेऊन गावोगावी गटशेती प्रमोट केली जातेय. शेतकर्यांना लागणारी खते, किटकनाशके व इतर निविष्ठा या सहाय्यकांतर्फे मोफत पुरवल्या जातात आणि शेती व शेतकरी कसे फायद्यात येतील यावर मार्गदर्शन केले जाते.
सेंद्रिय व रासायनिक दोन्ही सल्ले दिले जातात. सध्या जमिन आयसियुमध्ये आहे, तिला रासायनिक खते गरम पडताहेत आणि सेंद्रिय खते जीव वाचवु शकत नाहियेत. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञ दोन्हीची सांगड घालुन आहे त्या परिस्थितीत शक्य तितके उत्तम पिक घेण्यात शेतकर्याला मदत करताहेत.
२०१६ पासुन फार्मर कप स्पर्धा भरवली जातेय. गट व स्वतंत्र शेतकरी यात भाग घेताय. सगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या शेतकरी गटाला कप मिळतो. .
पिकाच्या पेरणीपासुन कृषी अधिकारी मार्गदर्शन व लक्ष ठेऊन गट कामगिरीचे मुल्यांकन करतात. प्रत्येक पिकासाठी sop बनवलेली आहे. त्याप्रमाणे शेतकर्याने लागवड केलीय का याची वेळोवेळी तपासणी कृषी सहाय्तक व पानी फाऊंडेशन करतात.
रोज डिजिटल शेतीशाळा असते. झुम मीटिंग व यु ट्युब लाईव. संध्याकाळी ७.३० ला सुरु झालेली मिटिंग रात्री ९.३०
ला संपणे अपेक्षित असते. परंतु कित्येकदा ती रात्री १० - १०.३० - काही प्रसंगी ११ पर्यंत सुरु राहिलेली मी पाहिलीय. कृषी विद्यापिठांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ इतक्या उशिरापर्यंत बसुन शेतकर्यांच्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरे देतात. कित्येकदा तीच ती माहिती त्यांना परत परत द्यावी लागते. पण एस ओ पी चेक करा, मागचे एपिसोड बघा वगैरे न सांगता परत दहा वेळा तीच माहिती सांगतात.
सगळ्यात कौतुक तर अशिक्षित खेडुत बायांचे. गटशेती करणार्या या बाया मोबाईलवर पिकावरची किड, रोग वगैरेंचे उत्तम फोटो काढुन झुम चॅटवर अपलोड करुन सल्ले विचारतात. पुढच्या खेपेस अपडेट देतात. कित्येकदा सगळा गट एकत्र बसुन मीटिंग अटेण्ड करताना दिसतो. जिथे नेटचा प्रॉब्लेम आहे तिथे क्रुषी सहाय्यकाच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे मिळवतात. इकडे तिकडे ट्रेनिंग घ्यायला जातात, विद्यापिठांना भेटी देतात. मिटिंगवर येतात तेव्हा शास्त्रज्ञ व इतर मंडळी यांच्या मदतीबद्दल त्या इतक्या प्रेमाने आपुलकीने बोलतात ते ऐकुनच शास्त्रज्ञाना घेतलेल्या कष्टांचे चिज झाल्यासारखे वाटत असणार
आजवर फारसे मार्गदर्शन न मिळालेल्या शेतकर्यांना पानी फाउंडेशनने अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण करुन दिला याबद्दल आमिरचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
https://www.paanifoundation.in/training-films/
https://youtube.com/@paanifoundation?feature=shared
या निबंधासाठी संदर्भ म्हणून
या निबंधासाठी संदर्भ म्हणून ग्रोकची मदत घेतली आहे.
>>>>>
थोडे वाचल्यावर अंदाज आला म्हणून खाली चेक केले तर बरोबर निघाला
त्यामुळेच कदाचित लेख विकिपीडिया सारखा झाला आहे. लेखात तुमचे असे वाचायला आवडेल. तसे प्रतिसाद इथे येतीलच..
आमिर आमच्या पिढीचा हिरो आहे. मी चाहता शाहरुखचा असलो तरी मला या माणसाबद्दल फार कौतुक आहे.
अभिनयात मेहनत तर तो घेतोच. पण सामाजिक कार्यात देखील पुढे असतो.
त्या अनुषंगाने आलेली साधना यांची पोस्ट आवडली.
परवाच युट्युब सर्फ करताना करताना त्याचे सत्यमेव जयते चे गाणे खूप दिवसांनी ऐकले. छान वाटले.
साधना, धन्यवाद. पाणी
साधना, धन्यवाद. पाणी फाऊंडेशनचं काम खूपच विस्तृत लिहीलं आहे. मध्यंतरी त्यांचे व्हिडीओज पाहिले होते, पण हा शेतकरी म्हणून फर्स्ट हॅण्ड फीडबॅक वाटला. आदर वाढला.
ऋन्मेष - ग्रोकची मदत घेण्यात काय वाईट आहे ? सतराशे साठ गुगल सर्च मधून आलेल्या लिंक्स पेक्षा एका क्लिकवर माहिती मिळते. हा लेख थोडा आठवणी वगैरे असा रंगवला असता तर पर्सनलाइज्ड्ड वाटला असता. पण त्याला खूप वेळ लागेल. सध्या मेंदू इतर कशात तरी बिझी आहे.
आढावा असाच असतो असं मला वाटतं. बाकी कमेण्ट बॉक्स मधे येईलच. यात माझं असं आहेच, पण ही सगळी पब्लीक डोमेनमधलीच माहिती आहे.
चुकीचं जे असेल ते माझं आणि बरोबर ते ग्रोकचं असं समजा.
पाणी फाऊंडेशनचं काम खूपच
पाणी फाऊंडेशनचं काम खूपच विस्तृत लिहीलं आहे.>>>>
विस्तृत लिहिण्याचे कारण हेच की शेती व शेतकरी हा माबोकरांचा विषय नाही, हाताच्या बोटावर मोजावे इतके शेतकरी असतील इथे. पण इथल्या अनेकांच्या घरी आजही कोणी शेती करत असतील. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत जावी हा उद्देश.
आणि अजुन एक उद्देश हा की आपण परिचित नसलेल्या क्षेत्राशी संबंधित जी कामे होताहेत त्यांची माहिती सगळ्यांना मिळावी.
आणि हे सगळे एका नटाने सामाजिक जाणिव म्हणुन केले ही त्याची एक बाजुही कळावी. कित्येकांना सत्यमेव जयते ही मालिका माहित आहे पण त्याचे पुढे काय झाले हे माहित नसते. आपल्या माहितीबाहेरही खुप जण खुप काही करताहेत हे कळावे.
रानभूली
रानभूली
ग्रोकची मदत घेण्यात काय वाईट आहे? >>> काहीच नाही. अंदाज बांधला तो बरोबर आला इतकेच.
सतराशे साठ गुगल सर्च मधून आलेल्या लिंक्स पेक्षा एका क्लिकवर माहिती मिळते >>>>> ती एवढ्या प्रसिद्ध हिरोबद्दल विकीवर सुद्धा मिळते असे वाटले.
हा लेख थोडा आठवणी वगैरे असा रंगवला असता तर पर्सनलाइज्ड्ड वाटला असता >>>> एकजेक्टली. काही स्वतःच्या आठवणी, तर काही आमिरचे किस्से, तर काही त्याने साकारलेल्या भूमिकांबद्दल.. मला तसेच वाचायला आवडला असता म्हणून म्हटले
पण ते आता तुमच्या आणि इतरांच्या प्रतिसादात शोधेन.
जसे एक पैलू मला साधना यांच्या विस्तृत प्रतिसादात सापडला आणि त्यांनी ती पोस्ट लिहायचा जो उद्देश सांगितला नेमके तेच.
यावर फार चर्चा न करता आता हा धागा आमिरवर जाऊ देऊया आणि आमिरवर राहू देऊया
यावर फार चर्चा न करता आता हा
यावर फार चर्चा न करता आता हा धागा आमिरवर जाऊ देऊया >>
हो नं ,
खूपच भरकटवला मी धागा
अंदाज बांधायचे कष्ट वाचवले , खाली आधीपासूनच लिहीले होते

मदत घेतली याचा अर्थ ग्रोकने निबंध लिहीला असा अर्थ काढल्याबद्दल आभारी आहे.
या निमित्ताने प्रतिसाद दिलेत म्हणून दुसर्यांदा आभारी आहे.
आमिर आवडता कलाकार ! साधना
आमिर आवडता कलाकार ! साधना पाणी फौंडेशनची विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
छान आढावा घेतला आहे.
छान आढावा घेतला आहे.
<<आमिर आवडता कलाकार ! साधना पाणी फौंडेशनची विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!>> +१
रच्याकने: QSQT कोलेजध्ये असताना प्रकाशीत झाला. आम्ही दर चार पाच दिवसांनी जाऊन बघायचो, बऱ्याच वेळा बघितला तेव्हा बहुतेक कॉलेज तरुण-तरुणींनी.
सगळे डायलॉग पाठ झाले होते तेव्हा.
हो, त्याची क्रेझ होती. मी ती
हो, त्याची क्रेझ होती. मी ती अनुभवण्याच्या वयात नव्हतो.
पण दिल मधील सुरुवातीचा अतरंगीपणा आठवतो. आय मीन त्याच्या फर्स्ट हाफची सुद्धा एक हवा असल्याचे आठवते.
सगळे डायलॉग पाठ झाले होते तेव्हा.
>>>
पण अंदाज अपना अपना डायलॉग प्रेमींना टक्कर नाही देऊ शकणार कोणी
या निमित्ताने प्रतिसाद दिलेत
या निमित्ताने प्रतिसाद दिलेत म्हणून दुसर्यांदा आभारी आहे.

>>>>>
या निमित्ताने कश्याला आमिर हेच मोठे निमित्त आहे इथे प्रतिसाद द्यायला
शाहरुख, आमिर, सलमान या तिघांवर माझी पिढी आपला हक्क समजते. या तिघांच्या समान धागा असलेल्या तीन आयकॉनिक चित्रपटांवरचा एक धागा माझा पेंडिंग आहे
उदाहरणार्थ गझनी. हा यशस्वी
उदाहरणार्थ गझनी. हा यशस्वी सिनेमा असला तरीही तो काही त्या वेळच्या आमीर स्विकारत असलेल्या चित्रपटांशी सुसंगत नक्कीच नाही. तो चालला कारण आमीरचा सिनेमा म्हणजे चांगला या डोळे झाकून विश्वास टाकण्याच्या प्रेक्षकाच्या सवयीने. >>> हे काही पटलं नाही.
मी शाखा चा पंखा असलो तरी माझ्या मते "रंगीला " हा DDLJ पेक्षा उजवा सिनेमा होता. त्याला film fair अवार्ड मिळाले नाही हे चूकच होते.
आमिरबद्दलची सर्वात पहिली आठवण
आमिरबद्दलची सर्वात पहिली आठवण अर्थातच 'कयामत से..' चीच. पण ती माझ्या बाबांच्या संदर्भातली.
या सिनेम्यात आमिर प्रेमबिम करतो ते ठीक आहे, पण बंडखोरी करतो हे फार झालं असं ते म्हणालेले. आमिर इतका नाजूक दिसत होता, की तो धाडस करून दोघाचौघांना लोळवेल (आणि पुढे जाऊन संसार थाटून जुहीला खाऊ पिऊ घालेल) हे अशक्य असल्यागत बाबा टीव्हीकडे बघायचे. 'काय ती बॉडी, आणि काय ती भाषा' म्हणत ते डोळे विस्फारून भयानक आश्चर्याने ते आमिरकडे बघायचे. त्यांचा तो चेहेरा अजून आठवतो.
माझा हिरो शाहरुख असला तरी आमिरच्या प्रत्येक सिनेम्याचा माझ्यावर लाँग लास्टिंग इंपॅक्ट आहे- हे मान्य केलं पाहिजे. कॉलेजच्या काळात तो वो छा गया था. सरफरोशचा गुलछबू दिसणारा माणूस एक डॅशिंग इंस्पेक्टर असू शकतो- हे कंव्हिंस करायची ताकद त्याच्यात आहे. इतर दोघा खानांना (आणि इतर अनेकांना) ते फार जमेल असं वाटत नाही. पार्ट्या, ग्लॅमर, अॅवार्ड्स, लाईमलाईट नाकारणारा नायक म्हणून मला तो आवडतो.
आवडायची इंटेंसिटी अर्थातच वयानुसार कमी झाली. ती होतेच. आता पुर्वीइतकं फॅनडम राहिलेलं नाही, मात्र त्याने एक काळ व्यापला होता, याची माझं आयुष्य आठवण ठेवेल, हे नक्की.
आमिरबद्दल अजून लिहायला पाहिजे. खूप आठवणे आहेत. डायरीच होईल..
आमिरने आपल्या कुत्र्याचं नाव
आमिरने आपल्या कुत्र्याचं नाव शाहरुख ठेवल्याची बातमी मागे एकदा आली होती ते बरोबर आहे का रे ऋन्मेष? लोक काय काहीही पसरवतात म्हणा..
आमिरने आपल्या कुत्र्याचं नाव
आमिरने आपल्या कुत्र्याचं नाव शाहरुख ठेवल्याची बातमी मागे एकदा आली होती ते बरोबर आहे का रे ऋन्मेष? लोक काय काहीही पसरवतात म्हणा..
>>>>>>>>
सचिनला 194 वर असताना डिक्लेअर केले ती जशी एक अक्षम्य घोडचूक घडली तशीच एक आगळीक आमिरकडून घडलेली. अक्कल थोड्या वेळासाठी गवत खायला गेली की अशा घटना घडतात.
नंतर रजत शर्माच्या जनता की अदालत मध्ये त्याने या प्रकरणाबद्दल माझा मस्करी करायचा हेतू होता पण कुस्करी झाली म्हणत माफी मागितली होती पण अश्या प्रकरणात गेलेली लाज परत येत नाही. त्या प्रकरणात कोणीही आमिरची बाजू घेतली नव्हती.
तेव्हाचा त्याचा हेतू नक्की काय होता कल्पना नाही. कदाचित असेलही खरेच हलक्या फुलक्या मस्करीचा हेतू. त्याबाबतीत त्याच्यात शाहरुखइतकी प्रतिभा नाही की कसे लाइटर मोडमध्ये मस्करी उडवावी.
पण आता तो किस्सा लोकांच्या विस्मरणात गेला असेल. तुम्ही इथे लिहिला म्हणून कित्येक वर्षांनी आठवला..
सरफरोशचा गुलछबू दिसणारा माणूस
सरफरोशचा गुलछबू दिसणारा माणूस एक डॅशिंग इंस्पेक्टर असू शकतो- हे कंव्हिंस करायची ताकद त्याच्यात आहे.
>>>>>>>
चोकस आठवण
आमच्यात यावरून फार वाद व्हायचे. तो या भूमिकेला साजेसा होता की नाही यावरून
तेव्हा सगळा ग्रुप आमिर आणि शाहरुख मध्ये विभागला गेला होता. दोघात कोण सरस ठरवायला चढाओढ लागायची.
लाईटर मोड मधे ठिणगी उडते.
लाईटर मोड मधे ठिणगी उडते.
माझा हिरो शाहरुख असला तरी
माझा हिरो शाहरुख असला तरी आमिरच्या प्रत्येक सिनेम्याचा माझ्यावर लाँग लास्टिंग इंपॅक्ट आहे- हे मान्य केलं पाहिजे.
>>>
याला सुद्धा संपूर्ण अनुमोदन.. आय मीन सेम पिंच
माझे सुद्धा असेच होते.
फक्त त्या काळी मान्य करायची सोय नव्हती.
पण आमिरचे सरफरोश आणि गुलाम या दोन चित्रपटामुळे तेव्हा मानायचो त्याला
या जॉनरचे चित्रपट त्याच्यामुळेच पुन्हा पुन्हा बघू शकायचो.
गुलामची दस दस की दौड फेमस होती आमच्यात.. आम्ही तो स्टंट करायचो. एकाने त्यात तांगडे मोडून घेतले होते..
आणि सरफरोश मधील एक डायलॉग सगळा ग्रुप मारायचा..
क्या ठाकूर तेरे को कितनी बार बुलाया तू कभी आता नही..!
आमीरचा अजून एक सिनेमा मला
आमीरचा अजून एक सिनेमा मला भावलेला. तो म्हणजे तलाश आमीर करीना आणि राणी मुखर्जी. झोया अख्तरची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहित असेल.
तलाश मी का माहित नाही पण फार
तलाश मी का माहित नाही पण फार उशिरा ओटीटीवर पाहिला.
चांगला चित्रपट होता तेव्हा का नाही पाहिला असे वाटले.
पण त्यात खरोखरचे भूत होते ना.. मग तो कसा काय कोणाचा खरा अनुभव होईल. प्लीज आता भूत खरोखर असते म्हणू नका. नाहीतर धाग्याला वेगळेच वळण लागायचे
मी शाखा चा पंखा असलो तरी
मी शाखा चा पंखा असलो तरी माझ्या मते "रंगीला " हा DDLJ पेक्षा उजवा सिनेमा होता.
>>>>>
बिलकुल नाही
म्हणजे मला रंगीला चित्रपटाबद्दल आणि त्यातील अमीरच्या रोल बद्दल कमालीचा आदर आहे आणि तो ठेवूनच मी हे म्हणत आहे.
डीडीएलजे हा चित्रपट एक मैलाचा दगड होता. तिथून जी सुरुवात झाली ती पुढची सगळी पिढी त्या जॉनरच्या चित्रपटांच्या प्रभावाखली आली. एका युगाची सुरुवात म्हणू शकता. अजून हजार वर्षांनी सुद्धा तो चित्रपट अजरामर असेल. पण ते रंगीलाबाबत नाही म्हणू शकत.
पण याचा अर्थ रंगीला भारी नव्हता असे होते का? तर बिलकुल नाही. किंबहुना असे काही चित्रपट आमिरने आणि इतरांनी दिले आहेत. पण जर तेव्हा स्पर्धा शाहरुखच्या डीडीएलजे सोबत असेल तर आमिर खानने बेटर लक नेक्स्ट टाईम हे स्वीकारायला हवे होते.
मला डीटेल्स माहित नाहीत.
मला डीटेल्स माहित नाहीत. भूत वगैरे काही नाही. guilty conscious आणि त्याचे निराकरण वगैरे इशू असू शकतात.
डीडीएलजे आणि डर हे दोन
डीडीएलजे आणि डर हे दोन चित्रपट आमीर खानने नाकारले होते.
https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/4-films-that-aami...
त्यामुळं चोप्रा कँपची त्याच्यावर खप्पा मर्जी झाली होती. यातली डर ची भूमिका नकारात्मक असल्याने करीयर वर परिणाम होईल असं त्याला वाटत होतं. तो ऑलरेडी स्टार होता. त्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याचा विचार बरोबर होता.
डीडीएलजेची कथा त्याला आवडली नाही. आमीर तेव्हां खूपच चोखंदळ होता. बहुतेक त्याच्या स्क्रीप्ट मधे बदल करण्यावरून फिसकटलं होतं.
डीडीएलजे गाण्यांच्या जोरावर चालला.
केशवकुल ओके, तसे असू शकेल.
केशवकुल ओके, तसे असू शकेल. बरेच पदर आहेत कथेला. किंबहुना म्हणूनच चित्रपट मस्त आहे. बहुदा मी त्यात खरोखर भूत दाखवले आहे म्हणून पाहिला नव्हता. भुताची भीती वाटते म्हणून असे नाही तर सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात भूत वगैरे दाखवले तर लॉजिक गंडते आणि चित्रपट बघायची मजा जाते असे मला वाटते.. किंवा वाटायचे. पण तरीही तलाश आवडला.
तलाश चा शेवट नव्हता झेपला.
तलाश चा शेवट नव्हता झेपला. संपूर्ण चित्रपटाची ट्रीटमेंट जर तशी असती तर आवडला असता.
डीडीएलजे गाण्यांच्या जोरावर
डीडीएलजे गाण्यांच्या जोरावर चालला.
>>>>>>>>>
गाण्यांच्या जीवावर कुठलाही चित्रपट इतका चालत नाही. गाणी कुठेही ऐकता बघता येतात. डी डी एल जे मध्ये शाहरुखच्या कॅरेक्टरचा जो ग्राफ होता तो कमालीचा होता आणि त्याने अफलातून साकार केला होता. जर तो पिक्चर आमिरने नाकारला असेल तर त्याने बॉलीवूडवर फार मोठे उपकार केले. बॉलीवूडला त्याचा राज राहुल आर्यन मिळाला. चित्रपट तो आमिरसोबत सुद्धा सुपरहिट गेला असता, पण आयकॉनिक झाला नसता.
नाहीतर धाग्याला वेगळेच वळण
नाहीतर धाग्याला वेगळेच वळण लागायचे
>>> look who is talking.
DDLJ is milestone. शंकाच नाही. सगळे मूर्ख बनायला तेव्हापासून तर सुरुवात झाली. प्रभाव मान्य केलाच पाहिजे. अजूनही आहे माझ्यावर.
DDLJ मुळे तर आमिर थोडा माझ्या दाराबाहेर गेला होता. पण नंतर सरफरोश रंगीला लगान रंग दे दिल चाहता है ने आमिर परत आला माझ्याकडे.
आपण आमीर खान बद्दलच बोलूयात.
आपण आमीर खान बद्दलच बोलूयात. त्याने चित्रपट नाकारला हे आमीर खान बद्दल आहे. त्याने सोडलेला चित्रपट आमीरखान बद्दलच आहे.
त्याने सोडलेला चित्रपट चालला तो गाण्यांमुळे हे ही आमीरचा निर्णय चुकीचा नव्हता याबद्दलच आहे.
साजिरा
रृ च्या वरच्या पोस्टला
रृ च्या वरच्या पोस्टला अनुमोदन
पण आमिरचा धागा आहे बाळा. शारूक बास
अरे दिल चाहता है तर मी गेल्या
अरे दिल चाहता है तर मी गेल्या महिन्यात कितव्यांदा तरी बघितला. लेकीला सुद्धा दाखवला.
जेव्हा आलेला तेव्हा अक्षय खन्ना ची लव्हस्टोरी झेपली नव्हती. कारण ते समजायचे वय नव्हते.
सैफ अली खान ची स्टोरी मस्त होती पण सोनाली कुलकर्णी बोर प्रकरण होते.
पण आमिरची स्टोरी एव्हरग्रीन.
म्हणजे मला त्या तिघांच्या मैत्रीच्या ट्रॅक पेक्षाही आमिरची लव स्टोरी जास्त आवडते त्या चित्रपटात.
एकेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत आमिरने वेगवेगळ्या जॉनर मध्ये..
शाहरुख तर अध्येमध्ये राहणार.
शाहरुख तर अध्येमध्ये राहणार.. रोहित शर्मा विराट कोहली यांची चर्चा एकत्रच चालते थोडेफार तसेच आहे हे.
आता वरची पोस्ट लिहिली आहेच पूर्णपणे दिल चाहता है वर.. धागा आमिरचाच आहे. शाहरुख आला तर त्या अनुषंगानेच येणार. आमिरने नाकारलेला चित्रपट असे कोणी म्हटल्यानेच डीडीएलचे पोस्ट आली
बाकी डर सुद्धा आमिरने नाकारला असे वर म्हटले आहे. त्याबद्दल तर बोलायलाच नको. सनी देओलला सुद्धा त्याबद्दल बोललेले आवडणार नाही
Pages