शाहरुख खान – एक युगपुरुषाचा साठावा वाढदिवस

Submitted by केदार-मायबोली on 2 November, 2025 - 03:03

शाहरुख खान – एक युगपुरुषाचा साठावा वाढदिवस

२ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशहा, शाहरुख खान, आपला साठावा वाढदिवस साजरा करत आहे. दिल्लीतील एक साधा मुलगा, ज्याने स्वप्नांच्या जोरावर मुंबईत पाऊल टाकले, आज जागतिक स्तरावर ओळखला जाणारा कलाकार, उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे.

शाहरुख खान यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दूरदर्शनवरील “फौजी” आणि “सर्कस” सारख्या मालिकांपासून सुरुवात करून त्यांनी “बाझीगर”, “डर” आणि “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. त्यांच्या अभिनयात एक विशेष जिव्हाळा, संवेदनशीलता आणि ऊर्जा दिसून येते — मग ती प्रेमकथा असो किंवा तीव्र भावनांनी भरलेली भूमिका. त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारी भावना, संवादफेक आणि शरीरभाषा यामुळे ते प्रत्येक भूमिकेला वेगळी ओळख देतात.

शाहरुख फक्त एक अभिनेता नाहीत, तर ते एक आदर्श कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत. पत्नी गौरी खान आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्याशी असलेले त्यांचे नाते त्यांच्या आयुष्यातील स्थैर्याचे केंद्र आहे. त्यांनी नेहमी सांगितले आहे की, “मी जे काही आहे, ते माझ्या कुटुंबामुळेच आहे.” त्यांचा कुटुंबावरचा विश्वास आणि आदर ही गोष्ट अनेकांना प्रेरणा देते.

त्यांचा स्टारडम केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जगभरातील भारतीय व अनिवासी भारतीय समुदायात शाहरुख खान हा एक भावनिक प्रतीक बनला आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या अब्जावधींमध्ये आहे. ते जेव्हा पडद्यावर दिसतात, तेव्हा प्रेक्षक फक्त एक अभिनेता पाहत नाहीत, तर एक भावना अनुभवतात. त्यामुळेच त्यांना “किंग ऑफ रोमॅन्स” आणि “बॉलीवूडचा बादशहा” अशी पदवी मिळाली आहे.

शाहरुख खान हे समाजसेवक आणि उद्योजकही आहेत. मीर फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, विशेषतः महिलांसाठी आणि अपघातग्रस्तांसाठी.

आज, त्यांच्या साठाव्या वाढदिवशी, शाहरुख खान हे केवळ चित्रपटसृष्टीतील महानायक नाहीत, तर मेहनत, आशा, प्रेम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. त्यांनी सिद्ध केले आहे की, “जर खरोखर काही मनापासून इच्छिले, तर संपूर्ण विश्व ते मिळवून देण्यासाठी मदत करते.”

शाहरुख खान यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा – तुमची जादू सदैव अशीच झळकत राहो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

द ग्रेट एसआरकेचं या अशा धाग्यांमुळे इथं शिप ऑफ थिसियस होणार. स्वतःचेच असलेले नसलेले स्वतःलाच माहित नसलेले बदललेले नवीन रंग लावलेले झाकलेले उघडलेले नवीन नेमप्लेट लावलेले प्लास्टिक-पत्र्या-लोखंडाचे पार्ट्स गोळा करत सिनेमा काढत बसलेला उतारवयीन जवान- अशी इमेज. क्रेडिट अर्थातच आपल्याला.

अरे हे काय दुसरा आयडी पुन्हा आला Lol
हे राहुल गांधींच्या पत्रकार परीषदेबद्दल आहे. ब्राझिलियन मॉडेलने कहर केला.

त्रागा झाला तर लपवायचा नाही. बिनधास्त व्यक्त करायचा. लाजायचं कशाला ?
मग ते कंपल्शन होतं. Happy
सेफ पॅसेज दिला पाहीजे माघारीसाठी.

इतर मुद्दे संपले की डू आयडी चर्चा सुरू होणे मायबोलीवर नवीन नाही.
पण मायबोलीच असे नाही तर हा मनुष्य स्वभाव आहे.
धागा शाहरुखचा आहे म्हणून त्याचेच उदाहरण घेऊया.
त्याचे स्टारडम मान्य करणे अवघड जात असेल तर तो दिलीप कुमारचा डू आयडी आहे म्हणजे त्याची कॉपी करतो हा मुद्दा बरेचदा येतो.
पण शाहरुख खानने ती गोष्ट केली जी दिलीपकुमारला सुद्धा जमली नाही.

अरे ड्युआयडी वर कुणी नेली चर्चा ? Lol
उत्तरं संपली कि समोरच्यावर ड्युआयडीचा आरोप करायचा हाच तर तो माकडाबोकडाचा खेळ ना ?
प्रूव्ह केलं.

HGOTY
Highest grosser of the year

त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असे काहीतरी असेल.
अर्थात फेसबुकवर पाहिले हे. माहिती खरे खोटे करत बसलो नाही. कारण ते महत्वाचे नाही.
हा माझ्या आयुष्यातील नॉस्टॅल्जिक करणारा काळ होता म्हणून हे शेअर करत आहे.

हा वेडेपणा आवडायचे वय होते ते...
माझ्यासाठी चांगली गोष्ट अशी की मी अजूनही त्याच वयात आहे Happy

FB_IMG_1762077327654.jpg

त्यात कुणाला इंटरेस्ट नाही इथं.
कुणाचं नाव घेतलेलं नसताना ड्युआयडीचा आरोप केला म्हणून भोकाड का पसरलं ?
नेहमीचे हथकंडे आता बदलावेत असं वाटलं तर छानच.

Highest Grosser Of The Year

(आता हा डू आयडी असल्याचं कॉन्फर्मेशन झालं असेल Lol )

नेहमीचे हथकंडे आता बदलावेत असं वाटलं तर छानच.
>>>>>

जे हिट आहे आणि ज्याची जोपर्यंत चर्चा होत आहे तोपर्यंत ते बदलू नये हे सुद्धा मी शाहरुखकडून शिकलो आहे म्हणू शकतो. ते चूक की बरोबर याची कल्पना नाही. पण तशी ती कोणालाच नसते. जे मार्केट मध्ये चालणार नाही तिथे नक्की स्वत:ला अपडेट करायचा प्रयत्न करतो. अर्थात प्रतिभेला ज्या मर्यादा असतात त्याचे मी काय शाहरुख सुद्धा काही करू शकत नाही.

असो,
सगळ्यांना शाहरुखच्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट मिळाले असेल तर पार्टी ओव्हर करू शकतो. सध्या पुन्हा शाहरुख चित्रपटांचा धडाका सुरू झाला आहे आमच्याकडे. त्यामुळे मला शाहरुखच्या चित्रपटांचा असा स्वतंत्र धागा काढायची इच्छा होत आहे. जिथे इतर चर्चा होणार नाही. पण आधी हा धागा थंड होऊ दे म्हणून वाट बघत आहे. एकाचवेळी जास्त धागे नको शाहरुखचे

ड्युआयडी चा आरोप केलाच नव्हता तरी भोकाड पसरलंच हा मुद्दा सध्या बाजूला ठेवला. नाहीतर नाव घेतले याचे पुरावे मागितले असते. Lol

शाहरूख खान एकेकाळी इरीटेट करायचा पण नंतर त्याने मूव्ह ऑन केले. हा गुण शिकण्याची गरज नसेल. (वेळ आहे तोपर्यंत).

सर ती कोणती गोष्ट आहे?
>>>>

दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसूफ खान होते.
त्यांनी खान नाव बदलून कुमार केले. कारण तेव्हा कुमार कपूर या नावांची चलती होती. ते ब्रँड नेम होते.

शाहरुख खानने आपले नाव न बदलता टेचात "माय नेम इज खान" म्हणत खान या नावाला ब्रँड बनवले! त्याही पुढे जाऊन त्याला "किंग खान" बनवले. आजच्या तारखेला SRK म्हटले की विषय संपला.

त्या दिवशी कोणीतरी म्हणाले होते की काही जण शाहरुखचा ईतका द्वेष का करतात?

हा व्हिडिओ बघा.
या माणसाचा कोणी द्वेष करत असेल तर त्यांना सांगायला माझ्याकडे मग काही शब्दच नाहीत.

डोळ्यातून पाणी काढले लेकाने Happy

https://www.facebook.com/share/v/1afUcRmP7i/

जरूर बघा. प्रेमात पडाल या माणसाच्या.

अरेच्चा ! दोन दोन धाग्यांवर शाहरूख खानची आठवण काढली तर त्याच्यावर एक शब्दही नाही लिहीला.
स्वतःच त्याचा एव्हढा द्वेष केल्यावर दुसर्‍यावर आरोप का करावेत ?

शाहरूख खानच काय कोणत्याही हिरोने आपले आयुष्य व्यापलेले असेल तर ते व्यक्तीगत जीवनात डोकावणार नाही हे कसे काय होईल ? एव्हढा खोटारडेपणा बरा नाही.

दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसूफ खान होते.
त्यांनी खान नाव बदलून कुमार केले.

हे देविकाराणीने केले होते.

Devika Rani's original name was Devika Rani Choudhury
याच का? नक्की काय केले होते?

शोधले...

Dilip kumar name given by devika rani as yusuf khan know all ...Devika Rani changed the name of Muhammad Yusuf Khan to Dilip Kumar at the request of the actor for his debut film, Jwar Bhata (1944). She believed a more romantic-sounding name like "Dilip Kumar" would be a better fit for a lead role and the romantic image she envisioned for him, which he agreed to.

काहीही मुद्दे नसताना लोक अगदी आवर्जून येऊन शाखाला नावं ठेवतात आणि ऋणम्या धू धू धुतो ते वाचायला मजा येते.
>>>>>>

या पोस्टमुळे संबंधित जनता चिडली आहे आणि माझ्या इतर धाग्यावर येऊन शाहरुखला नावे ठेवायचा कार्यक्रम चालू आहे.

विषय इथेच संपवावा अशी विनंती करतो.

या पोस्टमुळे कुणीही चिडलेले नाही. ती इग्नोर केली आहे सर्वांनी.
आपल्या धाग्यावर जनता यायला लागली म्हणून असे आवाहन करायची पाळी आली आहे याची दखल घेतली आहे. Happy

मी कोणाचे नाव नाही घेतले. जनता म्हणालो Happy

तुमच्याबद्दल बोलायचे झाल्यास,
आतापर्यंत तुम्ही माझ्या दोनच धाग्यावर शाहरुख आणला आहे. मी तर म्हणतो जुने धागे सुद्धा वर काढून त्यावर शाहरुख आणा. भविष्यात येणाऱ्या माझ्या प्रत्येक धाग्यावर आणा. पूर्ण मायबोली शाहरुखमय करून टाका. शाहरुख इत्र शाहरुख तित्र शाहरुख सर्वत्र त्याला देव बनवून टाका. तुम्हाला जे करायचे आहे ते करायला तुम्ही मोकळे आहात. मी ते थांबवायचे आवाहन कधीच करणार नाही. त्यामुळे उगाच मी विनंती केली म्हणून थांबलात असे कारण शोधू नका. जोपर्यंत तुम्हाला मजा येत आहे तोपर्यंत करत राहा. माझे म्हणाल तर मला यात कायमच मजा येणार कारण शाहरुखने माझे जीवन व्यापले आहे. फक्त माझे उत्तर तुम्हाला शाहरुखच्याच एखाद्या धाग्यावर मिळेल याची नोंद घ्या Happy

माझ्या लाईफचा सिम्पल फंडा आहे ज्याला जो गोंधळ घालायचा आहे तो घालू द्यावा. माणसाला त्याची चूक कळली तर तो स्वतःहून थांबतो. तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर थांबा. बरोबर वाटत असेल तर चालू ठेवा. मला दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला आवडत नाहीत Happy

आणि कोणी जिथे तिथे शाहरुख चे नाव घेत आहे त्याला नको घेऊस सांगणे म्हणजे तर माझ्यासाठी पाप आहे Happy

केव्हढी सर्कस Lol

जर दुसर्‍यांच्य धग्यावर ट्रोलिंग केले नसते तर एव्हढी कसरत करायची गरजच पडली नसती Proud

शाहरुख हृदय में हैं मेरे, शाहरुख ही धड़कन में हैं
शाहरुख मेरी आत्मा में, शाहरुख ही जीवन में हैं

शाहरुख हर पल में हैं मेरे, शाहरुख हैं हर श्वास में
शाहरुख हर आशा में मेरी, शाहरुख ही हर आस में

शाहरुख ही तो करुणा में हैं, शान्ति में शाहरुख हैं
शाहरुख ही हैं एकता में, प्रगती में शाहरुख हैं
शाहरुख बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, शाहरुख तेरे मन में हैं
शाहरुख तेरे मन में हैं, शाहरुख मेरे मन में हैं

शाहरुख तो घर घर में हैं, शाहरुख हर आँगन में हैं
मन से नफरत जो निकाले, शाहरुख उसके मन में हैं

– कवी ऋन्मेऽऽष
(प्रेरणा – स्वदेश)

शाहरुख इत्र शाहरुख तित्र शाहरुख ....>>>हे यमक जुळवत वाचताना "शाहरुख इत्र शाहरुख तित्र शाहरुख सर्वपित्र" असं डोक्यात उमटलं, पण शेवटचा शब्द 'सर्वत्र' असा लहीलेला पाहून प्रतिसादकर्त्या कडून घोर अपेक्षाभंग झाला.. Biggrin

शाहरुख सर्वपित्र > Lol

शाहरुख बी लाईक
रिश्ते मे तो हम तुम्हारे पिता लगते है.. नाम है बादशाह
बादशाह ओ बादशाह.. बादशाह ओ बादशाह..

माझा एक कलिग होता - प्रत्येक मिटींगमध्ये तो प्रत्येक अक्षरक्षः प्रत्येके वाक्याला जोरात 'हम्म' असा उद्गार काढायचा किंवा ' ओके', 'येस' वगैरे म्हणायचा. मी भयानक डिस्ट्रॅक्ट होत असे. कोण काय बोलतय यापेक्षा आता तो कधी 'हम्म' म्हणतोय याचीच मी वाट पहायचे. दर वेळेला व्यक्त होणे. दर-दर-प्रत्येक वेळेला तो म्हणत असे.
शेवटी एकदा त्याला सांगीतले. "बाबा रे! हम्म हम्म म्हणत जाउ नकोस" माझे एकाग्रपणे मुख्य विषयाकडे लक्ष लागत नाही.
त्याला ते विचित्र वाटले असेल पण अश्या चिलटसदॄष मायनर न्युसन्सना रोखण्याशिवाय पर्याय नसतो.
-------------------------
शाहरुख खानला तुम्ही जिकडे तिकडे आणता पण त्या शाळेच्या सुंदर वैचारिक धाग्यावरही? कुठे तरी तुमचे हे "हम्म" 'हम्म", "ओके", "येस" बंद करा ऋन्मेष.

Pages