मनाचे श्लोक – चित्रपटाच्या नावावरून चालू असलेला वाद

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2025 - 19:40

वादाची पार्श्वभूमी

मनाचे श्लोक नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नावाला काही संघटनांनी विरोध केला. त्याचा शो बंद पाडला. आता तो चित्रपट येत्या आठवड्यात नाव बदलून प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे. अश्या अर्थाने चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून समर्थ रामदासांचे मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तर यामागे केवळ कल्पकता आहे.

यावरून वाद उद्भवले आहेत ज्यात प्रामुख्याने दोन ते तीन गट तयार झाले आहेत.

१) या नावाला विरोध करणारे – ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२) या नावाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणारे – ज्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असे वाटत आहे.

३) ज्यांना हा निव्वळ मार्केटिंग फंडा वाटत आहे – म्हणजे मुद्दाम असे खोडसाळ नाव देऊन एका गटाच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि आपणच त्यात तेल ओतून वणवा पेटवायचा. जेणेकरून समोरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागरूक असलेला गट सक्रिय होईल आणि दोघांची छान जुंपेल. यातून जी चर्चा होईल त्याने चित्रपटाची आयती जाहिरात आणि मार्केटिंग होईल असे जे समजतात.

या तिसऱ्या गटात सुद्धा दोन उपगट आहेत.

३ अ) ज्यांचा अश्या प्रकाराच्या मार्केटींगला विरोध आहे. – कारण त्यांच्यामते यामुळे समाजात नाहक तेढ निर्माण होते आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडते.

३ ब) ज्यांना अशी मार्केटिंग पटते. – म्हणजे याकडे ते फक्त व्यवसाय म्हणून बघतात. याउपर एका मराठी चित्रपटाची चर्चा होत आहे तर चांगलेच आहे असे समजतात.

तुम्ही यापैकी कुठल्या गटात आहात? किंवा यापलीकडे काही विचार करता का? किंवा एकूणच या वादाकडे कुठल्या नजरेने बघता?

मी माझे मत सांगतो,
मी तिसऱ्या गटात आहे. पण या केस मध्ये ३ अ की ३ ब हे अजून तरी ठरवता आले नाहीये.

------------

(मराठी चित्रपट कसा वाटला या धाग्यावर चर्चा न करता इथे स्वतंत्र धाग्यात करता आली तर तिथे अवांतर पोस्ट टाळून इतर मराठी चित्रपट कसे वाटले यावरच बोलता येईल.)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा तो एक श्रीदेवीच्या मुलीचा असाच सिनेमा आहे ना - त्याचं आणि तिचं नाव जोडून हां परमसुंदरी Happy

सुशिला सुजीत तर चक्क अपवित्र आहे, ह्या नावाखाली सुद्धा त्यांनी च्यवनप्राशच भरवले असेल म्हणा - अशी तर नावं आजकाल. एका भावनेला दुसरीच हिंट देऊन ठेवतात. भलेही पिक्चर मधे दम नसो, आपल्याला नाव मात्र पवित्र आणि 'कॅची' हवं आहे, नाहीतर वादंग कसा माजवणार. अशाने तर शांतता नांदेल आणि आपला तो हेतू मुळातच नव्हता ! >>> Lol

भावार्थदीपिका Lol

पण सिरीअसली हे नाव माहित तरी असेल का त्यांना? त्यापेक्षा गीताभवन/भुवन (रत्नागिरीत इमारत आहे) वगैरे सोपं जाईल जरा.

मनाचे श्लोक हा चित्रपट आता 'तू बोल ना' या नव्या नावासह प्रदर्शित होत असून 16 ऑक्टोबर रोजी गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

प्रतिसादांवर धावती नजर टाकली. ज्या प्रकारे झुंडशाही करून चित्रपटाचे खेळ बंद पाडले, स्क्रीन फोडून टाकू अशी धमकी दिली त्याबद्दल काही लिहिलेलं दिसलं नाही. कोणी लिहिलं असल्यास सांगा . चर्चा अभिव्यक्तीस्वातंत्र्य , चित्रपटांची नावं कशी ठेवावीत यांभोवती फिरताना दिसली. हे लिहिताना आठवलं की माकडाच्या हाती शँपेन या नाटकाचं मूळ नाव मारुतीच्या हाती शँपेन असं होतं.
कंपन्यांच्या नावाबद्दल नियम आहेत, तसे नाटकसिनेमामालिकापुस्तकांच्या नावांबद्दल नियम करावेत. त्यात देवादिकांची , संतांची , धर्मग्रंथांची , छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी कसलीही नावे घ्यायला बंदी असावी. तसंच हिंदूच्या सणानिमित्त कार्यक्रम असेल तर त्याला उर्दू नाव असायला बंदी असावी. (हे पुढे वाढवून ज्या भाषेतला कार्यक्रम आहे, त्याच भाषेतलं नाव असं करता येईल.)

दुसरीकडे निदर्शने , मारहाण, तोडफोड , मॉब लिंचिंग करणार्‍यांनी देवाच्या नावाने घोषणा दिल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असा सध्या अलिखित असलेला नियम अधिकृत म्हणून प्रसिद्ध करावा.

पु ल, पाडगावकर आज असते तर त्यांनाही मारहाणीला सामोरं जावं लागलं नसतं, याची खात्री नाही. त्यांच्या काळात पुरेशी उत्क्रांती झाली नव्हती. पुलंवर अन्य कारणाने ऑनलाइन दगडफेक झाली आहे किंवा होतच असते. राम गणेश गडकरीसुद्धा सुटले नाहीत यातून. ते जिवंत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पुतळ्याचा बळी दिला.

पु ल, पाडगावकर आज असते तर त्यांनाही मारहाणीला सामोरं जावं लागलं नसतं, याची खात्री नाही.>>>
खरं आहे. आजच्या काळात गाळीव इतिहास, उदासबोध प्रकाशितच झाले नसते.
चि.वी. जोशी यांचे ओसाडवाडीचे देव, मिरासदार यांची शिवाजीचे हस्ताक्षर ही अफलातून कथा.. काहीच वाचायला मिळालं नसतं.
जाने भी दो यारो प्रदर्शितही झाला नसता. यदा कदाचित चे खेळ बंद पाडले असते.
काळानुसार समाज जास्त progressive झाला पाहिजे. इथे regressive होण्याच्या दिशेने प्रवास चालू आहे Sad

तुम्ही आणि मी मिळूनच समाज तयार होतो. आणि मला नाही वाटत समाज regressive वगैरे झाला आहे.
काही संघटना आणि काही चित्रपट निर्माते आपल्या फायद्यासाठी म्हणून स्टंट करतात त्याने आपण पूर्ण समाजालाच कसे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकतो?
बाकी भावना दुखावणे हा प्रकार म्हणाल तर हे वर्षानुवर्षे चालत आले आहे जेव्हा जेव्हा कोणीतरी आपल्या फायद्यासाठी बरोबर योग्य जागी पिन मारली आहे.
म्हणजे नव्वदीच्या दशकातले जसे मी दंगलीचे उदाहरण दिले तसेच याच्या त्याच्या पुतळ्याची विटंबना आणि समाज लगेच पेटून उठला अशाही बरेच घटना तेव्हा घडायच्या.
आणि माझ्या जन्माआधी तर अजून कर्मकांडे होती जी आमच्या पिढीत कोणाच्याही भावनांची पर्वा न करता मोडीत निघाली.
आता फक्त कांगावा जास्त होतो, बातमी होते,सोशलमिडियामुळे पसरते, म्हणून प्रमाण मोठे वाटते.

खरं आहे. आजच्या काळात गाळीव इतिहास, उदासबोध प्रकाशितच झाले नसते.
जाने भी दो यारो प्रदर्शितही झाला नसता. यदा कदाचित चे खेळ बंद पाडले असते. >>खरं आहे.
मला तर वाटायला लागलंय की आताच्या काळात वरिजिनल वाल्मिकींवर पण बहिष्कार टाकला गेला असता. सीतेचे अपहरण दाखवतात म्हंजे काय !! Happy

सीताच कशाला मध्यंतरी आदीपुरुष आलेला त्यातील रावणाला बघून सुद्धा लोक नाराज झाले होते. रावण विद्वान असल्याने त्याला राक्षसासारखे दाखवल्याने चिडले होते.

तुम्ही आणि मी मिळूनच समाज तयार होतो. आणि मला नाही वाटत समाज regressive वगैरे झाला आहे.??? काय बोलता आहात सर! जरा बाहेर डोळे उघडून बघा सर. मी असे ऐकले आहे की Indian Science Congress मध्ये काय धमाल चालली असते. आणि तुम्हाला जर कोणी पत्रिका न बघता आपल्या मुलाचे/ मुलीचे लग्न जमवणारा भेटला तर त्याला माझ्या वतीने स्पेशल चहा पाजा, गोमुत्र आणि गोमय संशोधनासाठी आता मंत्रालय उघडले आहे.

खरं आहे. आजच्या काळात गाळीव इतिहास, उदासबोध प्रकाशितच झाले नसते.
जाने भी दो यारो प्रदर्शितही झाला नसता. यदा कदाचित चे खेळ बंद पाडले असते. > >> +१ फुकट सोशल मिडीयाचे साधन हाती आल्यामूळे प्रत्येक येरा गबाळ्याचे साधले आहे.

तुम्हाला जर कोणी पत्रिका न बघता आपल्या मुलाचे/ मुलीचे लग्न जमवणारा भेटला तर...
>>>>

आमच्याच फार काही आधुनिक नसलेल्या घराण्यात पत्रिका न बघता लग्न, किंवा पत्रिका बघून ती न जुळताही फाट्यावर मारून लग्न, कित्येक आंतरजातीय लग्न (so called वरचीखालची), आंतरधर्मीय (ते देखील हिंदू मुस्लिम), आंतरप्रांतीय (गुजराती, सिंधी, साऊथ इंडियन), डिव्होर्स झालेल्या व्यक्तीशी लग्न, तसेच स्वतः डिव्होर्स घेऊन नंतर आता लग्न नको म्हणून लिव्ह इन मध्ये राहणे, इतके विविध प्रकार झाले आहेत.. पेन पेन्सिल घेऊन बसलो तर अजून आठवतील.. कोण पत्रिकेत अडकलेला नाहीये. लोकं ती प्रेमविवाहात देखील सवयीने बघतात. पण नाही जुळली तरी करायचे त्या व्यक्तीशी लग्न करतातच.

व्वा, मग त्या सगळ्याना माझे , दंडवत, पण तुमच्या पलीकडे जे जग आहे त्याची गोष्ट करत आहे, आपण समाजाची गोष्ट् करत आहोत.

तुमच्या काही फार आधुनिक नसलेल्या घराण्यांच्या व्यतिरिक्त बाहेर फार मोठी दुनिया आहे, आणि तुमच्या फार आधुनिक नसलेल्या घराण्यांना त्याची हवाही नाही अशी शक्यता असू शकते रे बाबा. आपण तोड बंद ठेऊन कान आणि डोळे उघडे ठेवले तर बरंच काही दिसू शकतं, पण तुला प्रत्येकाला उत्तर द्यायचं असतं. वयानुसार हे बंद होईल अशी शक्यता वाटत होती, पण तीही आता राहिली नाही.
---
आजकाल घरात (सो-कॉल्ड) प्रोग्रेस्सिव वागायचं आणि दाखवायचं असतं, आणि सोशल डोमेनमध्ये पब्लिक शोमध्ये रिग्रेसिव्ह असल्याचं दाखवायचं असतं असं दिसतं आहे. बरं प्रोग्रेसिव्ह असल्याचं दाखवायच्या तर्‍हांपेक्षा परंपरावादी असल्याचं दाखवायच्या तर्‍हांमध्ये प्रचंड व्हरायटी.

विकास दिव्यकिर्तींच्या उल्लेखाबद्दल थँक्स रानभुली. एके टिकाणी ते म्हणतात हजारो वर्षांपासूनच- समाज खूद बॅलंस कर लेता है, इक्विलिब्रियम पे आ जाता है.
तब तक अपनी जान चली जायेगी इतकं त्यांनी सांगितलं नाही.
---
ऋन्मेष तू जरा पटरीपे राहत जा रे बाबा. हे किती अवांतर झालं आता. असंही मूळ विषयाबद्दल बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणा. पण मग तू मानववंशशास्त्र, आर्टिकल अमुक तमुक, थिऑलोजी, सोशल स्ट्रक्चर, सोशालॉजी यांवर असा अधिकारवाणीने बोलू लागलास की डोळे चमकतात. हे काय आक्रित असं होऊन जातं.

साजिरा त्याचा काही उपयोग नाही, आपल्या पूर्वजांना
== प्लास्टिक सर्जरी माहित होती
---- डार्विन साला थापा मारतो. माकडाचा माणूस होताना कुणी पाहिला आहे का?
--- आपल्याला विमान विद्या माहित होती
-- आपल्याकडे inter नेट आणि टीवी होते
ही त्याने ऐकले असणारच तरीही
"तुम्ही आणि मी मिळूनच समाज तयार होतो. आणि मला नाही वाटत समाज regressive वगैरे झाला आहे."" असे म्हणून सरांनी आपल्यालाही त्यात पार्टी केले आहे.

बदलले मूवीचे नाव. कशाला इतका फुक्कट गोंधळ.
चित्रपट म्हणजे व्यवसाय आहे. आणि त्याचा प्रसार कसा करावा वगैरे बर्‍याच गणितांवर (आणि त्यात दुर्दैवाने वा कशाने अश्या पैसा, लोकांच्या भावना, समज/ गैरसमज, सामाजिक परीस्थिती ?वगैरे) अवलंबून राहिला आहे समजुन सोडुन द्यावं( इति एक शास्त्र)

"यदा कदाचित चे खेळ बंद पाडले असते" - मिड-९०'ज मधे कधीतरी, पुण्यात सोहम नावाची प्रायोगिल एकांकिका स्पर्धा व्हायची. त्यात 'यदा-कदाचित' च्या धरतीवर एक महाभरताचा विडंबनाचा फार्स सादर झाला होता. दुसर्या दिवशी, एका प्रसिद्ध युवा(?) संघटनेनं त्या दिग्दर्शकाच्या तोंडाला स्टेजवर (तोंडातला गुटखा तिथेच थुंकत) काळं फासणं, स्क्रिप्ट फाडणं, बळजबरीनं माफी मागायला लावणं हे सगळे प्रकार केले होते. त्यापुढच्या वर्षी झाल्या प्रकाराचा निषेध म्हणून संयोजकांनी स्पर्धा कॅन्सल केली होती.

साजिरा, तुम्ही माझं कौतुक करता की टोमणे मारता हे मला कधी कळतच नाही. चांगली गोष्ट एकच की मी अश्यावेळी त्याला कौतुकच समजतो आणि फक्त कौतुकच मनावर घेतो.

केशव कुल तुम्ही कोणी अमुकतमुक करणारा भेटला तर असे म्हटले म्हणून मी जवळपास शे सव्वाशे लोकसंख्या असलेल्या आमच्या घराण्याचे उदाहरण दिले. त्यापलीकडे शे सव्वाशे करोड चे जग आहे याची कल्पना आहे. पण जर आमच्या सर्वसाधारण घरात जी गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणात होत असेल ती त्या पलीकडच्या जगात सुद्धा बरेपैकी प्रमाणात होतच असेल.

चला एक प्रयोग करा सर्वांनी.
उद्या आपापल्या ऑफिस मध्ये जा आणि आपल्या सहकर्मचाऱ्यांना विचारा की मनाचे श्लोक या नावाने त्यांच्या भावना दुखावल्या की नाही.

सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या श्रद्धास्थानाबद्दल आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे कोणी काही केले की राग येतो, अपमान वाटतो. तो खरा, स्वाभाविक असतो. भले तो चुकीचा असेल. हा राग येणे सार्वत्रिक आहे. त्याचा शिक्षणाशी, सामाजिक स्थानाशी संबंध नाही.>>>
यातून एकच गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे या देशात इमोशनल कोशंटचा तर विषयच सोडा, बहूसंख्य जनतेच्या बुद्ध्यांकाचा विकासही यथातथाच राहीला आहे, हे सार्वत्रिक दिसून येणारं वास्तव आहे.

img_2_1760620353599.jpgimg_4_1760620371342.jpgimg_5_1760620384171.jpg

जनार्दन वाघमारेंचा हा उतारा अगदीच सुपरफिशियल आहे. काळाच्या कसोट्या लावलेल्या नाहीत. यात कोणताही सखोल विचार नाही. त्यांनी शाबासकीसाठी लिखाण केलंय असं वाटतं. विचारवंत म्हणावं असं काहीही नाही त्यात.

संतांची मुलं संत झाली नाहीत. कबीराचे अनुयायी कबीर होऊ शकले नाहीत, महात्मा गांधींचे अनुयायी दुसरे गांधी बनू शकले नाहीत, विवेकानंदांचे अनुयायी दुसरे विवेकानंद बनू शकले नाहीत. का ? अलौकिक हा शब्द वापरायचा मोह होतो पण शब्दांचा कीस पाडण्यात माहीर अस्णारे सुतावरून स्वर्गाला पोहोचतील. महापुरूष मार्गदर्शक असतात. ते एका काळाच्या फ्रेममधे विचार, सोल्युशन देऊ शकतात. ते जनतेला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढतात तेव्हां त्यांनाही त्या परिस्थितीचा सामना करावा लागलेला असतो. तरीही ते वेगळा विचार करून महापुरूष का झाले याचा विचार यात अजिबात नाही.

छ. शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांच्या अनुयायांनी युद्धे लढावीत का ? साडेतीनशे वर्षांपूर्वीप्रमाणे आता परिस्थिती नाही. आता गनिमी कावा कुणाविरूद्ध करायचा ? आज अनुयायांना आजच्या परिस्थितीनुसार वागावे लागणार ना ? म्हणजे राजांचा पराभव होतो का ?

महात्मा फुले ब्रिटीशांच्या शाळेत शिकले. तेव्हां त्यांना त्यांच्यात भेदाभेद नाही हे जाणवले. समतेचा विचार आढळला. फुले स्वतः गडगंज श्रीमंत होते. त्या काळी टाटांपेक्षा श्रीमंत असलेले उद्योगपती होते. त्यामुळे त्यांचं एक्स्पोजर हे सर्वसामान्य जनतेपेक्षा जास्त होतं. याच कारणाने त्यांना त्या वेळच्या सनातन्यांची भीती नव्हती.

छत्रपती शाहू महाराज हे स्वतःच संस्थानिक होते. त्यांचे विदेशी संबंध होते. ते स्वतः सक्षम होते. काही प्रसंगांमुळे त्यांना वेगळा विचार करावा आगला आणि लढा देताना त्यांना अडचण आली नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यात असल्याने आणि थोडेसे एक्स्पोजर असल्याने त्यांनी पुस्तकं वाचायची आवड त्यांच्यात निर्माण केली. शिक्षण दिलं. शिक्षणाचं महत्व सांगितलं. सैन्याच्या नोकरीमुळे भेदभाव वाट्याला कमी आला. तरीही काही प्रसंगांमुळे ते पेटून उठले पेटून तोच उठून शकतो ज्याला भेदाभेदाला रोज तोंड द्यावे लागत नाही. रोज ज्यांना तोंड द्यावे लागते ते युज्ड टू होत असतात. त्यांच्यातून बंड होत नसते.

पुढे बाबासाहेबांचे शिक्षण विदेशात झाल्याने बुद्धीला आणि विचारांना धार आली. लोकांना नेता हवा असतो. नेत्यावर ते विश्वास ठेवून लढ्यात सामील होतात. ते त्या लेव्हलचा लढा स्वतः उभारू शकत नाहीत. त्या वेळच्या लोकांची परिस्थिती आणि एक्स्पोजर पाहता ते त्यांच्या लेव्हलला कधी जातील ?

तोपर्यंत "पोथ्या" सांभाळून ठेवल्या तरी पुरे असतात. विस्मरण होणे हा पराभव आहे माझ्या मते तरी.

मृत लोक इतिहासात राज्य करतात, वर्तमानात जिवंत लोकांनी राज्य करावं. आजच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी इतिहासाचा संदर्भ म्हणून वापर करावा पण जगावं वर्तमानात. त्यासाठी पिढ्या तेव्हढ्या प्रगल्भ व्हायला हव्यात. तेव्हढं एक्स्पोजर मिळायला हवं आणि घुसळण व्हायला हवी. ती घुसळण झालेली नाही.

या अशा चमको वाक्यांवर रिअ‍ॅक्ट व्हायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. हे राजकीय स्टेटमेण्ट असल्याने ते असंच वरचे वर आहे.

पेटून तोच उठून शकतो ज्याला भेदाभेदाला रोज तोंड द्यावे लागत नाही. रोज ज्यांना तोंड द्यावे लागते ते युज्ड टू होत असतात. त्यांच्यातून बंड होत नसते. >> हा काही तरी एक नविन आणि इंटरेस्टिंग आणि एकदम मर्मभेदी वगैरे विचार आहे. आणखी विचार करतोय! Happy
>> वर्तमानात जिवंत लोकांनी राज्य करावं.>> +१ याबद्दल शंकाच नाही. पूर्वी शिवाजी, गांधी, आंबेडकर, सावरकर, फुले, टिळक, नेहरू, एमएलकेज्यु कोण असतील ते झाले. त्याबद्दल कृतज्ञ आहे. बास! त्याच्यापुढे काय ते आजचं आज ठरवावं.

छ. शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांच्या अनुयायांनी युद्धे लढावीत का ? साडेतीनशे वर्षांपूर्वीप्रमाणे आता परिस्थिती नाही. आता गनिमी कावा कुणाविरूद्ध करायचा ? आज अनुयायांना आजच्या परिस्थितीनुसार वागावे लागणार ना ? म्हणजे राजांचा पराभव होतो का ? >>> हे तुम्ही उपरोधाने लिहीलं आहे की गांभीर्यपूर्वक??

माझ्या मते पोथीवादाशी मिळती जुळती एक ॲनॉलॉजी आज दिसते ती म्हणजे परिक्षार्थी झालेली शिक्षणव्यवस्था....दोहोंकडे अंतीम वास्तव एकचं उरतं ते म्हणजे, "सगळं मुसळ केरात".

🧠 #5Whys

हे तुम्ही उपरोधाने लिहीलं आहे की गांभीर्यपूर्वक?? >>> आख्खा प्रतिसाद सोडून एखादे वाक्य कोट करण्याचा तुमचा अधिकार आहेच. पण हेच दोन ऑप्शन आहेत ? समजा उपरोधाने म्हटले तर तुमचे काय उत्तर तयार आहे ?
गांभीर्यपूर्वक म्हटले तर काय उत्तर आहे ? जो उतारा तुम्ही डकवला आहे तो तुम्ही वाचला असेल तर हा प्रश्न अजिबात पडणार नाही हे माझे उत्तर आहे.

इमोशनल कोशंट हे माझ्या पूर्वीच्या प्रतिसादात आले आहे, त्याचा सोशल स्टडी असलेल्या हजारो वेबसाईट्स सर्च केल्या तर सापडतील. तुमच्या प्रतिसादात इमोशनल कोशंट तर सोडा... हे काय विचाराने लिहीले आहे हे मला विचारावेसे वाटले नाही.

समजा उपरोधाने म्हटले तर तुमचे काय उत्तर तयार आहे ?>> उपरोधाने म्हणाला असाल तर मला काही म्हणायचे नाही.

गांभीर्यपूर्वक म्हटले तर काय उत्तर आहे ? जो उतारा तुम्ही डकवला आहे तो तुम्ही वाचला असेल तर हा प्रश्न अजिबात पडणार नाही हे माझे उत्तर आहे.>>> जर गांभीर्याने म्हणाला असाल तर, तो उतारा तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा (मुख्यतः शेवटचा परिच्छेद ) ही विनंती करेन. उतारा वाचूनही मला तुमच्या प्रतिसादावर हा प्रश्न का पडला याचे उत्तर तुम्हाला तिथे मिळेल असं मला वाटतं.

तुमच्या प्रतिसादात इमोशनल कोशंट तर सोडा... हे काय विचाराने लिहीले आहे हे मला विचारावेसे वाटले नाही.>>>तुम्हाला ते तसे विचारावे वाटले नाही, ते तसे का? याचे उत्तर मला देता येणार नाही, पण "इमोशनल कोशंट तर सोडा" हे मी या साठी म्हणालो, कारण इमोशनल कोशंटच अस्तित्व समजून येण्यासाठी आधी एक बेअर मिनिमम बुद्ध्यांक असावा लागतो. इमोशनल कोशंट ही अब्स्ट्रॅक संकल्पना आहे, आणि कोणतीही अब्स्ट्रॅक संकल्पना समजण्यासाठी उमजण्यासाठी विकसित बुद्ध्यांकाची आधी आवश्यकता असते ज्याचीच मुळात वानवा आहे, असे माझे म्हणणे होते ..

कारण इमोशनल कोशंटच अस्तित्व समजून येण्यासाठी आधी एक बेअर मिनिमम बुद्ध्यांक असावा लागतो. >> हे समजावून सांगा. कुठे संदर्भ घेतलाय ते सांगितले तर बरे होईल.
तुमच्या इतर प्रतिसादावर मला काहीही म्हणायचे नाही. ते तुमचे विचार आहेत.

हे समजावून सांगा. कुठे संदर्भ घेतलाय ते सांगितले तर बरे होईल.>>> Capture01.JPG
आपण ज्या सिनारिओ बद्दल बोलतो आहे त्यत आपण इमोशनल फूल बनवले जातोय याची उमज होण्यासाठी आधी एक Conscious IQ असणे गरजेचे आहे. जिथे कोण नक्की काय बोलत/ लिहीत आहे आणि काय हेतूने बोलत आहे हे आधी समजून घेणं (कॉग्निटिव्ह ऍबिलिटी) आवश्यक आहे आणि त्यासाठी एक विकसित बुद्धयांक असणे गरजेचे आहे नाहीतर अशा परिस्थितीत एका अविकसित बुद्धयांकाची अक्षमता एक भावनिक वादळ ट्रिगर करणारच (Failure of Emotional Quotient) , जे सद्य परिस्थितीत सर्वत्र होताना दिसत आहे.

Pages