पाककृती स्पर्धा क्रमांक १ - वरणभात सजावट - हर्पेन

Submitted by हर्पेन on 2 September, 2025 - 11:54

चिनी तत्वज्ञानानुसार यिन आणि यांग ह्या दोन विरोधी गोष्टी परस्परपुरक प्रकारे एकत्र येऊन एक संपूर्ण गोष्ट बनवतात ज्यामुळे विश्वात संतुलन आणि सुसंवाद निर्माण व्हायला मदत होते.

कर्बोदक आणि प्रथीने एकत्र येऊन बनते एक परिपूर्ण जेवण ज्यावर तूप मीठ लिंबू आणि तुळशीपत्र ह्यांनी चार चांद लावले की जे सात्विक प्रसादाचे पान तयार होते त्याने भूक खवळलीच पाहिजे आणि हे खाल्ल्यावर घरातही संतुलन आणि सुसंवाद निर्माण झालाच म्हणून समजा.

IMG-20250902-WA0116.jpg

खूप गरम वाफाळता भात वरणासोबत एकेक घास कालवत कालवत खायचा... थंडी पावसाच्या दिवसातले कॉम्फर्ट फूड

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही सम प्रमाणात एकत्र आले की समतोल / परिपूर्णता साधता येते.
>>>>>
म्हणजे ज्यात स्त्री पुरुष दोन्ही तत्वे समप्रमाणात असतात तोच खरा परिपूर्ण.
Noted!
माझा नेहमी हाच प्रयत्न राहतो घरी. यावर तरी कधीतरी धागा नक्की काढेनच आता...

अरे आज सकाळी चपात्या करताना विचार करत होते की अजून कोणी दूरदर्शनच्या लोगो कसा वापरला नाही. यांग यिन लक्षात आले नाही
आणि मग तुमची प्रवेशिका दिसली.दिल garden garden ho गया.छानच सजावट.

मस्तच कल्पना...
आकार पण खूप छान जमलेत. सुबक झालेत.

Pages