Submitted by प्राचीन on 2 September, 2025 - 01:11
शशक १ – निवड – प्राचीन
ती सकाळपासून अस्वस्थ होती.
कोण तो गावचा पाहुणा, त्यानं तिला झिडकारलं होतं...
कडवट मनानं तिनं स्वतःला न्याहाळलं. “नसेन मी उजळ, पण म्ह्णून असं रंगावरून हिणवायचं की काय !
स्नेहमय साथ मिळाली, तर मीही उजळपणे मिरवू शकतेच की..” तिच्या मनाची ग्वाही.
नकळत ‘त्याचा’ हेवा वाटला.
“कसा बरं हा आबालवृद्धांचा लाडका! आहे खरा मनमिळाऊ, त्यामुळे उन्हांपावसांत त्याची सोबत हवीशी..
आपण मात्र उच्चभ्रू वातावरणात जास्त रमतो, रमवतो. पण आपले फार नखरे नाहीत, एखादा जायफळी वळसा पुरेसा. त्याला मात्र मसाल्यांचा सोस..”.
"आज लंघन करा. फक्त कोरी कॉफी घ्या.”डॉक्टरांनी सांगितलं.
गावचा पाहुणा चक्क उद्गारला, "बरं झालं ही घरी आहे!”
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे बघितले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात!! एकदम फ्रेश टेक ईन
मस्त मस्त!!क्या बात!! एकदम फ्रेश टेक ईन श्शक.
मस्तच
मस्तच
छान मस्त. समजली आहे असे वाटते
छान मस्त. समजली आहे असे वाटते आहे.
झकास!
झकास!
हायला! चहा कॉफीवर पण शशक.
हायला! चहा कॉफीवर पण शशक. कमाल हो आप __/\__
आवडली. जायफळी वळसा म्हटल्यावर
आवडली. जायफळी वळसा म्हटल्यावर समजलं.
नाही कळली. जायफळी वळसा?
नाही कळली.
जायफळी वळसा?
परत वाचल्यावर कळली. चहा व कॉफी संवाद.
मस्त मजेशीर आहे
मस्त मजेशीर आहे

ती कॉफी.. तो चहा.. ते दूध .. संवादामुळे जेंडर सुद्धा आले यांना
मस्तच जमली!
मस्तच जमली!
स्नेहमय साथ = साय/ घट्ट दूध.
स्नेहमय साथ = साय/ घट्ट दूध.
मस्त कथा आणि सुंदर शब्दकळा.
मस्त कथा आणि सुंदर शब्दकळा.
मस्त.
मस्त.
सुंदर आणि कल्पक! इतर
सुंदर आणि कल्पक! इतर कथांपेक्षा एकदम वेगळी.
वाह! छान जमलीये.
वाह! छान जमलीये.
मस्तच
मस्तच
मस्त जमलीय
मस्त जमलीय
आधी वाटले सावळी मुलगी आणि तो कृष्ण
मस्त! कल्पना आणि लेखन -
मस्त! कल्पना आणि लेखन - दोन्ही जमले आहे.
छान, मस्त जमली आहे.
छान, मस्त जमली आहे.
मनमिळाऊ तो मननिळाऊच! आवडलीच.
मनमिळाऊ तो मननिळाऊच!
आवडलीच.
मस्त! आवडली.
मस्त! आवडली.
मस्तच..
मस्तच..
व्वा व्वा... छान जमलीये!
व्वा व्वा... छान जमलीये!