शशक १ २ ३ - एक क्षण अभिमानाचा - रीया

Submitted by रीया on 30 August, 2025 - 05:38

त्याने चिडून धाडकन लॅपटॉप बंद केला आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले
“हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?” तिच्याकडे बघत तो वैतागाने म्हणाला . “इन मिन १०० शब्दांची कथा , त्यातले पाचापेक्षा जास्त शब्द तर त्यांनीच खाल्लेत. कसे पुरतील मला एवढेसे शब्द माझी सगळी गोष्ट सांगायला?”
“मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील. स्पेशली तुझ्यासाठीच आहे असं वाटावा असा सुद्धा एक उपक्रम ठेवलाय ना त्यांनी ? ”
डोळे मिचकावत अर्चना म्हणताच त्याचे डोळे चमकले. आलेला राग कुठल्या कुठे पळाला. किती काय काय लिहिता येईल याचा विचार करत आपली कूल इमेज सांभाळत पटकन मायबोली उघडून अंड्या लिहिता झाला -
एक क्षण अभिमानाचा- ऋन्मेष -१ !

Group content visibility: 
Use group defaults

अजिबात दिवे न देता अभिषेक च्या परवानगीने इथे ही प्रवेशिका देते आहे.
कसं होतं ना की सगळं हलक्यात घेणार्‍याला नेहमीच गृहित धरलं जातं. तसं होऊ नये म्हणुन आवर्जुन त्याची परवानगी घेतली. त्याने खेळीमेळीत परवानगी दिल्या बद्दल त्याचे आभार!

मस्त शशक !
रीतसर परवानगी घेतली हे छानच केलस.

आपल्यावरच्या शशकचे काय कौतुक करावे....पण मस्त! Happy

संयोजक ही एन्ट्री घेणार कुठे पण ? त्यांना हे क्लिअर करावे लागेल असे वाटते

तीन स्पर्धांत मिळून एक कल्पक प्रवेशिका. शिवाय त्यांचा वापर ओढून ताणून वाटला नाही. परवानगी घेऊन लिहिली ही पण एक कौतुकाची बाब.

>>>>>कसं होतं ना की सगळं हलक्यात घेणार्‍याला नेहमीच गृहित धरलं जातं.
हे मीही काल केले कारण ऋन्मेष बर्‍यापैकी असे ओळखीचे मित्र असल्यासारखे वाटतात. इतर लोकां बद्दल वाटणारं अंतर थोडं कमी वाटतं असो. पण मी हेही जाणून आहे की मग जर असे अंतर कमी वाटत असेल तर त्यांना प्रोत्साहन देण्यात त्यांची बाजू घेण्यात आपण कमी पडता कामा नये.
.
पण इथल त्यांच्याविरोधातील गट बर्‍यापैकी विशिअस आहे. त्यामुळे मी बाजू घेत नाही कारण व्हिशिअसनेस. पण त्यांच्या उत्तम लेखांवर कमेन्ट जरुर करते.

सामो धन्यवाद,
इथे खरे तर चर्चा नको आहे माझ्यावर, तिच्या कथेला प्रतिसाद येऊ द्या.

पण तुमची पोस्ट आलीच आहे तर त्यातील एका मुद्द्यावर उत्तर देऊन विषय संपवून टाकतो.

मला कोणी माझा विरोधी गट वाटत नाही. बहुतांश जण माझ्या काही सवयींवर किंवा काही मुद्द्यांवर भांडतात पण सगळीकडे तेच करत बसतात असे नाही. फार क्वचित अगदी एखाद दुसरा अपवाद असेल अन्यथा मायबोलीवरचा सगळा क्राउड असाच असल्याने इथे आनंदात रमतो.

तसेच मी कुठला कंपू बनवत नाही. दहा धाग्यावर कोणी मला चांगला प्रतिसाद दिला पण अकराव्या धाग्यावर त्याच्याशी वाद घालायची संधी आली तर सोडत नाही. कोणाच्या गुडबुक मध्ये राहण्याचा प्रयत्न करत नाही Happy आणि व्हायसेवरसा सुद्धा करतो.

जिने वरची कथा लिहिली आहे तिच्याशी सुद्धा कैक मुद्द्यांवर वाद घालून झाला आहे. तरी सुद्धा ती हे लिहायचा विचार करू शकते हीच आपली खरी मायबोली Happy

मस्तच.. रिया अभिनंदन . छान लिहिली आहेस शशक..
ऋ , तुझे उत्तर ही आवडले, तुझ्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसे...

छान आहे! आवडली Happy
ऋन्मेऽऽष नी खिलाडू पणे घेतलं, (बहुतेक) त्यांच्या मूळ स्वभावाला धरून असणार अस वाटलं Happy
मी कुठला कंपू बनवत नाही>> तेही लक्षात येतं

@ छन्दिफन्दि ,
तुम्ही कंसात लिहिलेले (बहुतेक) हे कंसाच्या आधीच्या वाक्यासाठी आहे की नंतरच्या वाक्यासाठी? Wink

हो आता बरोबर आहे.. आणि तसेच असणे अपेक्षित होते. पहिल्या वाक्यालाच बहुतेक लिहिले असते तर पुढचे वाक्य सुद्धा हवेत लटकले असते. Happy

@ सामी, अर्चना सरकार म्हणून एक आयडी होता. आता तो शोधणे मुश्किल. मी माझे सगळे आयडी ऋन्मेऽऽष फोटो १ २ ३ वगैरे नावात बदलून फोटो अपलोड करायला वापरले आहेत Happy

>>>>>हि अर्चना कोण पण .... आम्हाला अ -- माहित आहे Happy
हा पण ID होता का???
maayboli.com/node/60873

Happy