सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती.
अचानक ठेचकाळली, हवेतल्या हवेत तिने स्वतःला सावरलं पण कॉन्टेनरच झाकण तिच्या हातात राहिलं आणि तो गेला गडगडत.
काही कळायच्या आत कंटेनरने गटारात डुबकी मारलेली.
सगळी मेहनत त्या गटाराच्या पाण्यात गेलेली बघून जो काही धक्का बसला.
तेव्हढ्यात अवचित आलेल्या एका माणसाने क्षणाचाही विलंब न करता, खाली वाकून कंटेनर काढून तिच्या हातात दिले. पाठमोरा तो तसाच पुढे निघाला..
आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले त्याच वेळी डोळ्यातील एक अश्रू गालांवर ओघळला.
***
तळटीप:: ही एक सत्यघटनेवर आधारित आहे. त्या माणसाने माझ्या मैत्रिणीची कित्येक तासांची मेहनत वाचवली होती.
***
शब्दार्थ
ED - Engineering Drawing
कंटेनर - एक गोलाकार डबा ज्यात चित्राचे कागद गुंडाळून ठेवतात.

जीटी मारल्यावर शीट योग्य
जीटी मारल्यावर शीट योग्य ठिकाणी फाटवणे, मुद्दाम हून घाण करणे जेणेकरून ती पांढरीशुभ्र दिसू नये, काही ठिकाणी काही चुका मुद्दाम करणे अशा अनेक ट्रिक्स असत. काही मंडळी ब्रेडचा सुद्धा वापर करायची पण शेवटी त्या मुलाच्या मगदुरानुसार शीट किती भारी करायची हे ठरवावे लागे. अशा जजमेंट मधे माझा हातखंडा होता.
आमच्या इथे आंसर बुक असायचे इंटर्नल पेपर साठी.
एखादा मुलगा नापास झाला की माझ्याकडे यायचा मग मी ओरिजनल answer शीट मार्कांचे पान फाडून एखादे उत्तर पुन्हा अर्धवट लिही असे सांगत असे. म्हणजे २५ पैकी १० मार्कांचे किमान १४ किंवा १५ करता येतील इतपतच. महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना २० पर्यंत सुद्धा मी मार्क वाढवून दिले आहेत. मग त्या answer book मधे मार्क वाढवून शिक्षकाची सही करायची. पहिल्या पानावर पण तसेच अपडेट करायचे. समजा तर तसे करता येत नसेल तर अक्खी answer book नवीन घ्याची आणि तिला पूर्वलक्ष्यी प्रभावाने पुन्हा तयार करायची. आंसरबुक मधे स्टेपलरच्या पिना असत त्यामुळे जुनी पाने वापरता यायची.
मग हे वाढवलेले मार्क आणि आंसर शीट घेऊन काहिजण शिक्षकांकडे जात आणि तुमची काहीतरी मिस्टेक झाली आहे असे सांगत. अर्थात माझ्याकडे येणारी मंडळी सर्व वर्गातली सर्व ट्रेडची आणि सर्व इअर ची असायची. त्यामुळे अशा मिस्टकेस सहज खपून जात. सही आणि एकंदरीत स्टाईल ही इतकी तंतोतंत असे की कुणालाही हे आपण केले नाही असा अविश्वासच वाटत नसे. हे करताना शक्यतो शिक्षक कोणती पेन वापरतात (म्हणजे उदा. लेक्सीची लाल पेन) हे ठरवावे लागे. त्यात किती शाई आहे हे सुद्धा ठरवावे लागे कारण त्यानुसार सह्यांमध्ये येणारी अक्षरांची रुंदी वगैरे हे मॅच होईल. त्यासाठी माझ्याकडे २० एक पेन्स असायच्या.
आम्ही मग याचा पुढचा टप्पा गाठला. डिपार्टमेंट मधून दोन शिक्के चोरले. HOD चा एक होता. तसेच कॉलेजचे काही शिक्के आम्ही डुप्लिकेट करून घेतले. अत्यंत गरजू विद्यार्थ्याला आम्ही हवे ते कागद दिले.
माझ्या या कलेचा सर्वात मोठा उपयोग माझ्या एका मित्राला नव्या कंपनीत पॅकेज वाढवून घ्यायला झाला. त्याला आधीच्या पॅकेजवर ३० टक्के जास्त मिळणार होते म्हणून आधीचे पॅकेज वाढवणे गरजचे होते. त्यासाठी नवीन ऑफर लेटर करून, नवा शिक्का करून घेतला. म्हणजे हा मित्र गंडलेला होता असे नव्हे. तो मुळातच हुशार होता. माझ्यासारखाच पण कैम्पस वगैरे मधे सरधोपट मार्गांनी आम्ही जॉबला लागलो नाही त्यामुळे आमची पॅकेज कमीच होती.
आज हाच दोस्त फेसबुक मधून नुकताच मायक्रोसॉफ्ट मधे स्विच झाला आहे. आणि आमच्या कडे आधीच्या कागदपत्रांना किंवा डिग्रीला झा*ची, देखील किंमंत नसल्याने आणि ३० टक्के ४० टक्के असे भंगार रूल्स नसल्याने मी चांगल्या कंपन्या जॉइन करू शकलो.
आमच्या कॉलेज ने इंटरनल चे
आमच्या कॉलेज ने इंटरनल चे मार्क वाढावेत म्हणून एक टूम काढली. २५ मार्कांपैकी पाच मार्क हे एक्स्ट्रा curricular एक्टिविटी साठी राखून ठेवले.
म्हणजे समजा तुम्ही एका पेपर प्रेझेंटेशन मधे भाग घेतला त्याचे सर्टिफिकेट दिले तर १ मार्क. मग उत्तेजनार्थ पासून प्रथम क्रमांक मिळवला तर २, ३, ४ आणि ५ असे मार्क मिळवायचे.
या मार्कांचा ओव्हरॉल मार्कांमध्ये आणि एकूण पर्सेंटेज मधे कमालीचा फरक पडणार होता आणि एकंदरीत एकाद्या विद्यार्थ्याला कटऑफ न मिळण्यापासून किंवा yd होण्यापासून रोखण्यात, म्हणजे अतिशय महत्त्वाचा फायदा झाला असता.
आम्ही आमच्या मित्रांच्या ग्रुप साठी एक नवीनच आयडिया तयार केली. आमच्या हॉस्टल वरच्या एका मुलाला शॉर्ट फिल्म वगैरे करण्यात प्रचंड रस होता. त्याने एक लहानशी गावठी एक्टिंग असलेली शॉर्ट फिल्म बनवली होती. सध्या कॅम कोडर वर. तिचे राइट्स आम्ही विकत घेतले LOL .
आमचे कॉलेज कोल्हापूरचे. मग एका फिक्शनल फिल्म सोसायटीचे नाव वापरून खोटे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन उभे केले. तिच्यात आमच्या शॉर्ट फिल्मचा पहिला नंबर काढला. आणि आमच्या ग्रुपच्या सगळ्या सदस्यांना डायरेक्टर, एडिटर, म्यूजिकवाला अशी बक्षिसे दिली.
त्याची एक रात्रीत अतिशय सुंदर अशी सर्टिफिकेट तयार केली. नंतर ती ग्लॉसी पेपरवर छापून आणली.
आणि प्रत्येक विषयात पाच पाच मार्क वाढवून घेतले.
एका बाईने (गंगापुरे हे नाव) तुमची शॉर्ट फिल्म बघायची इच्छा असे असे सांगितले. लोल. नशिबाने आम्ही तिही तयार ठेवली होती आणि ती अत्यंत टुकार शॉर्ट फिल्म आम्ही तिला दाखवली. तिला त्यातला कन्सेप्ट खूपच आवडला. आणि तिने डिपार्टमेंट मधे स्क्रीनिंग ठेवले.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर मात्र आम्हाला नानाविध स्पर्धांची कामे आली.
शेवटी १०० रुपये एका सर्टिफिकेटचे असा रेट लावावा लागला कारण काम वेळखाऊ होतेच शिवाय सर्व विषयात मार्क वाढणार होते.
एकाने आम्हाला श्रीलंकेतल्या एका पेपर प्रेजेंटेशनचे सर्टिफिकेट मागितले. आमचा हॅक असा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय झाल्याने डोळे पाणावले.
आमचा ग्रुप होता बोकड्स असा.
आमचा ग्रुप होता बोकड्स असा.
B : बिरुदेव (सध्या आटपाडी येथे प्रगतिशील शेतकरी)
O : ओंकार (सध्या डेट्रॉईट येथे मोठ्या कंपनीत)
K: कमलाकर (सध्या मायक्रोसॉफ्ट मधे डिरेक्टर/मॅनेजर)
A : अमित (सध्या एका मोठ्या जपानी कंपनीत डोमेन आर्किटेक्ट)
D : दिग्विजय (सध्या युरोप मधे डायरेक्टर)
S : मी (सध्या युरोप मधे एंटरप्राइझ आर्किटेक्ट)
आज आम्ही सर्वजण आयुष्यात कुठेतरी पोचलो. जुने दिवस आठवले की आता वाटते, कहांसे कहां आगये हम. आमच्यापैकी एकही बोर्डा-बिरडात आला नाही, दोघे तर चक्क तीन तीन बॅकलॉग वाले, सगळे बॅक बेंचर्स. वाया गेलेली असे म्हणावीत अशी कार्टी.
सुरेख शशक. खरंच देवमाणूस
सुरेख शशक. खरंच देवमाणूस भेटला.
छान कथा!
छान कथा!
ED युद्धच वाटायचं ED च्या सरांबरोबरच!
>>>>> +१
सव्वा mm ने line शिफ्ट झालीय अस सांगणाऱ्या सरांचा विद्यार्थी
अरे बापरे
अरे बापरे
आबा आणि अंजू धन्यवाद!
आबा आणि अंजू धन्यवाद!
सव्वा mm ने line शिफ्ट झालीय अस सांगणाऱ्या सरांचा विद्यार्थी >>
सव्वा mm
Pages