
करीब- करीब लाडू
सध्या चिकवावर आलेल्या 'करीब करीब सिंगल'च्या दंगलीला आणि इरफानच्या चाहत्यांना समर्पित.
मी खरेच सुक्यामेव्याचे लाडूच करणार होते, त्याचा पुरेसा गवगवाही केला होता पण अचानक मोदकाच्या साच्यात चेचून त्यांचे मोदक ऐनवेळी केले म्हणून 'करीब- करीब लाडू'. 
हे लाडू/ मोदक न भाजलेल्या सुक्यामेव्याला दळून करता येतात, सगळेच त्यातल्या त्यात पौष्टिक असल्याने एनर्जी बार सारखे खाता येतील.
पाककृतीचे घटक -
'पाऊंड केक' नावाचा एक केक असतो. त्यात प्रत्येक गोष्ट एक पाऊंड या प्रमाणात असते म्हणजे - एक पाऊंड मैदा, एक पाऊंड लोणी, एक पाऊंड साखर. हो, असेच असल्याने त्याचे नाव 'पाऊंड केक'. आपल्या प्रसादाच्या शिऱ्याचा अमेरिकन भाऊ!
तसेच ह्या लाडूतही प्रत्येकी एक वाटी बदाम, काजू, पिस्ता, साखर ( थोडी कमी) , किसमिस, एक वाटीपेक्षा कमी साजूक तूप, एक अखंड जायफळ अर्धे किसून, (अखंड असेल तर वास तितका उडालेला नसतो व घमघमते) , चिमूटभर केशर (ऐच्छिक)
१. 
असं सगळं मांडून नाही घेतलं तरी चालेल, हे स्पर्धेमुळे लाडात आले आहे. उगा भांडी वाढणार आता !
हे सगळं कच्चंच/ न भाजता, न भिजवता घेतलं आहे. काजू तुकडे आणले कारण नंतर पूडच करायची होती. सगळेच मिक्सर मधून 'घुरकावून' घेतले व टोपात टाकले. त्यातच तूप व पिठीसाखर घालून थोड्याशा पाण्यात भिजवलेले केशर घातले.
२. 
हे सगळं हाताने कालवून पुन्हा मिक्सर मधून काढून घेतलं. मिक्सरच्या उष्णतेने तूप पाघळून मिळून येते. तेवढीच 'चीटिंग' करता येते. आदिमानवाला आगीचा शोध लागल्यानंतर जेवढा झाला असेल तेवढाच आनंद मिक्सरची उष्णता वापरून चीट केल्याचा मला झाला. 
३. 

आता लाडूचेच ठरल्यामुळे लाडू वळून घेतले. काही किसमिस धसमुसळेपणा करत लाडूतून बाहेर येत होते, लाडू बघून झॉम्बीज आठवू नयेत म्हणून फार मोठे किसमिस बाहेर काढून मऊ, लहान व वळणारे तेवढे राहू दिले.
४. 
सगळे लाडू झाल्यावर मला सुचले की हे मोदकाच्या साच्यात घालून वळले तर औचित्यपूर्ण का काय होईल व देखणेही दिसेल. शेवटी रूपावर फार काही अवलंबून असते, नुसतं गुणी राहून उपयोग नाही. पाहून 'तोंपासू' व्हायला हवं. शिवाय तुम्हाला कुठे खाता येणार, तुम्ही रूप बघूनच 'वाह, वाह' म्हणणार, त्यामुळे हे करणं भाग होतं. आता झालेतच मोदक अचानक तर 'मौकेका फायदा' घेऊन 'करीब-करीब लाडू' असं नाव दिलं. तुम्ही सुकामेव्याचे लाडूही म्हणू शकता. लाडू मोडून मी प्रत्यक्ष कृतीही एडिट करून 'धन्य- धन्य' झाले, इथलं लेखन एडिटनं पुरेसे नव्हतं. लाडवाचे येथे पुन्हा- पुन्हा दिसणाऱ्या '१ नवीन' च्या मोहाला बळी पडणाऱ्यासारखे झाले. 
नंतर अजून एक आयडिया आली, हे तयार मोदक मफिन लायनरमधे ठेवून अजून 'प्रो' दिसतील. पण त्यासाठी ओव्हन खालच्या ड्रॉवरच्या महासागरातील मफिन लायनर शोधले, दुसरं काहीबाही सापडत जुनाट, चपटे झालेले मोठ्या मफिनच्या आकाराचे लायनर सापडून मोदक 'अंगापेक्षा पोंगा' दिसू लागला. ड्रेस कसा फिटिंगचा हवा, उठून दिसतो. त्यामुळे तेही रद्द.
फॅशन सेन्स म्हणजे फॅशन सेन्स!
५. 
नंतर सगळे एकेक करत लाडू फोडून, दाबून मोदकाच्या साच्यात दाबून भरले व एकेक मोदक केले.
६. 
मोदकाची बहिण करंजी आणि करंजीचा भाऊ मोदक- असं आई म्हणायची, ती परंपराच होती आणि बहिण-भाऊ क्यूट वाटतात म्हणून एक छोटीशी करंजी केली. शिवाय भावाला लहानपणी छळून आयुष्यासाठी व जगासाठी 'तयार' करणारी एक तरी बहिण हवीच. मान आहे तो ! 
७. 
८. 
ही पाककृती खूप चवदार व जवळजवळ डिंकाच्या लाडू सारखी वाटते. मी कधी सुकं खोबरं किंवा खारकेची पूड घातली नाही मी हे अगदी असेच करते. पिस्ते हवेतच. भाजून घेतल्याने चव बदलते, चुकूनही ते रोस्टेड सॉल्टेड नट्स वापरू नका.
मागच्या वर्षीच्या 'तो बोल मंद हळवासा'चा आज वाढदिवस आहे, तुम्हाला तो अजूनही आठवतोय म्हणून त्याच्यासोबत एक फोटो. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ! 
१०. 
हे सगळं जॅझ म्युझिक ऐकत करा व झाल्यावर पोटभरेपर्यंत खा नाही तर माझी प्रवेशिका बाद व्हायची. जबरदस्तीने भरवतेय!
सर्व माबोकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया ! 
अस्मिता
अस्मिता
भन्नाट दिसत आहेत 'लाडक'
मिक्सर मधून फिरवून मिश्रण गरम करण्याची आयडिया आवडली. 
लाडक
लाडक
आमच्या मातोश्रीपण बेसनाचे इ.
आमच्या मातोश्रीपण बेसनाचे इ. लाडू मिस्कर मधुन काढतात. की कमी तुपात जास्त तुकतुकी येते.
हो, आणि वळायलाही सोपे जातात.
मस्त लाडु-कम-मोदक!
मस्त लाडु-कम-मोदक!
मी जेव्हा पौष्टीक लाडू करते तेव्हा भाजलेलं मिश्रणसुद्धा गार करून मिक्सरातून घिरटवून घेते. मस्त तुकतुकीत, एकसंध होतात लाडू.
मस्त लिहीले आहे! टीआरपीखेचक
मस्त लिहीले आहे!
टीआरपीखेचक नाव असल्याने लगेच उघडला होता (अस्मिताला लोकसत्ता वेब एडिशन मधे उज्ज्वल भवितव्य आहे) आणि इरफानच्या चाहत्यांना समर्पित असल्याने म्हंटले पाकृ असली तरी वाचू. त्यामुळे आधीच वाचला पण प्रतिक्रिया आज देतोय. मोदकांचे फोटो फार मस्त आहेत. चवीलाही भारी असतील. एनर्जी बारचा संदर्भ चपखल आहे. लिहायच्या स्टाइलमुळे विषयात फार माहिती नसलेल्यांनाही वाचायला मजा येते 
पिस्ते बदाम ई ठेवलेली प्लेट/ट्रे मेक्सिकन स्टाइल आहे का? सोंब्रेरो , एखादे मेक्सिकन लोकनृत्य वगैरेचे मोटिफ्स वाटतात ते रंग पाहिले की. मेक्सिकन ट्रे वर केशर फिट्ट बसले, तरी पिस्ते, साजूक तूप वगैरेंमुळे एकदम जागतिक कुलीनरी फ्यूजन वाटते. खालच्या रंगसंगतीवर वरचे अमेरिकन नॉन-हळवे बोल सुद्धा तसाच फील देतात.
लाडू मोडून मी प्रत्यक्ष कृतीही एडिट करून 'धन्य- धन्य' झाले, इथलं लेखन एडिटनं पुरेसे नव्हतं >>>
हे भारी आहे.
लाडू बघून झॉम्बीज आठवू नयेत म्हणून फार मोठे किसमिस बाहेर काढून मऊ, लहान व वळणारे तेवढे राहू दिले. >>>
मस्त दिसत आहेत लाडू.
मस्त दिसत आहेत लाडू.
मस्त लिहिलीये रेसिपी. भन्नाट.
मस्त लिहिलीये रेसिपी.
भन्नाट.
म्हंटले पाकृ असली तरी वाचू. >
म्हंटले पाकृ असली तरी वाचू. >>> धन्यवाद.

खालच्या रंगसंगतीवर वरचे अमेरिकन नॉन-हळवे बोल सुद्धा तसाच फील देतात.>>>
सॉम्ब्रेरो
, तशी हॅट "काईट" सिनेमात हृतिकनेही घातली होती. हा ट्रे मेक्सिकनच आहे, त्या माझ्या हातचे ढोकळे खाऊन झाल्यावर "I have been adventurous today, dear !" म्हणणाऱ्या टेक्सन काकूंनीच ह्यात केक आणून दिला होता.
चपखल निरीक्षण आहे.
लोकसत्ता सारखेच व्याकरणही आहे माझे.
अवतरण चिन्हं वापरून वाचक गोळा करायचे. बघा तिने 'असे' काय केले आणि व्हा दंग. गुंग नाही दंग. 
धन्यवाद लंपन, किल्ली आणि प्रज्ञा.

अतिशय सोपे आहेत करून पाहा.
(No subject)
सामो
सामो
अगं खरच सगळ्या सुग्रिणींच्या
अगं खरच सगळ्या सुग्रिणींच्या नवर्यांचा, मुलांचा नुसता हेवा वाटतो
छान रेसिपी
छान रेसिपी
तुझ्या स्टाइलने लिहलेल वाचायला मजा आली.
नेहमीप्रमाणे धमाल लिहिलंय.
नेहमीप्रमाणे धमाल लिहिलंय.
करीब करीब लाडू आवडले! तो बोल
करीब करीब लाडू आवडले! तो बोल मंद हळवासा मागच्याच वेळपासून आवडलाय
अस्मिता,
अस्मिता,
करीब- करीब लाडू कम मोदक मस्तच दिसतायेत.
चवीलाही छानच झाले असणार.
फोटो आणि लेखन दोन्ही मस्तच.
धन्यवाद सर्वांना, पुन्हा एकदा
धन्यवाद सर्वांना, पुन्हा एकदा.

मॅगी, लॉंग टाईम नो सी
मस्त खुसखुशीत लिखाण
मस्त खुसखुशीत लिखाण
आणि मोदक लाडू तर अप्रतिम
फारच छान लाडू आणि तसेच छान
फारच छान लाडू आणि तसेच छान लेखन. दोन्ही आवडले.
ऐका, ऐका, ऐका !
ऐका, ऐका, ऐका !
बोल हळवा होता पण आम्ही टणक, पुढच्या गणेशोत्सवात नवा आणेन. हाकानाका. 
तो 'बोल मंद हळवासा' काल फ्रिझमधून पडून फुटला. अलिकडे ठेवला होता व दुसरं काही तरी काढताना माझाच धक्का लागला. चमचाभर कोशिंबीर कशाला ठेवायची व शिळी खायची - त्यामुळे खरी कल्पकता दोष देण्यात आहे.
तुकडे जपून ठेवणे आलेच न पण
तुकडे जपून ठेवणे आलेच न पण ह्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस मिळाल्यास आठवण म्हणून
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥
तू पण गोड, तुझी प्रवेशिका पण
तू पण गोड, तुझी प्रवेशिका पण गोड, करीब लाडू ही गोड आणि कोकोनट पण गोड
किती क्युट लिहिलेयस.
तो 'बोल मंद हळवासा' काल
तो 'बोल मंद हळवासा' काल फ्रिझमधून पडून फुटला. >>>>
नजर लागली
सुंदर लाडू आणि नेहमीच असतं
सुंदर लाडू आणि नेहमीच असतं तसं (लाडू असल्याने खुसखुशीत न म्हणता) हरवाळ लिखाण.
करीब करीब लाडू मस्तच एकदम
करीब करीब लाडू मस्तच एकदम
बोल हळवासा दोन वर्ष सेवा देऊन धारातिर्थी पडला बिचारा. जाऊद्या नवीन हळवासा दणकट बोल लवकरच मिळेल
बराच टिकला!
बराच टिकला!
करीब करीब बोल झाला म्हणजे
अर्र, आता हळवासा नकोच. एक
अर्र, आता हळवासा नकोच. एक दणकट जाडजूड ठमाबाई बोल आण
सर्व नवीन अभिप्रायांसाठी
सर्व नवीन गोड अभिप्रायांसाठी थँक्यू, गर्ल्स अँड बॉयज !

बोल फुटल्याबरोबर वाईट वाटण्यापेक्षा 'अरे, आता माबोवर कळवावे लागणार कारण माबोकरांचे आयुष्य स्पर्शुनी गेलाय शेवटी' असे मनात आले. हळवाच होता बहुतेक, म्हणजे ओतीव. हो, नवीन बोल आणेन, पुढच्या वर्षी सिक्वेल.
>>>>जाडजूड ठमाबाई बोल आण
>>>>जाडजूड ठमाबाई बोल आण Happy
गेंड्याच्या कातडीचा
Pages