
तेलुगु पाककृतींच्या मालिकेत मागच्या वेळी राजस गुणाची गार-मधुर-मुलायम दुधी भोपळ्याची खीर पहिली होती. आज किंचीत तामस गुणाची गरम-तिखट उग्गानी पाकृ पाहूया.
हैद्राबादेहून बेंगळुरूला महामार्ग ४४ वरून जाताना कर्नुल हा जिल्हा आपले आंध्र प्रदेशात स्वागत करतो. आजची आपली पाककृती उग्गानी ही त्या कर्नुलचीच खासियत आहे. घरोघरी नुसती उग्गानीच करतात पण इथली रेस्टॉरंट्स उग्गानीसोबत मिरची भजेही देतात. म्हणून, जसा नांदेडला खिचडी-भजे असा एकत्र उल्लेख होतो तसाच इथे उग्गानी-बज्जी असा एकत्र उल्लेख होतो. सकाळी नऊ-साडेनऊ-दहा पर्यंत जर तुम्ही कर्नुल शहरात असाल तर उग्गानी-बज्जी चाखायला विसरू नका.
उग्गानी म्हणजे जसे आपण कांदेपोहे करतो तसा पण मुरमुऱ्याचा उपमा. उग्गानीला मराठवाडा-उत्तर कर्नाटक भागात सुशीला असेही म्हणतात. पण तिथली कृती या आंध्रा-रायलसीमा भागातील उग्गानीच्या कृतीपेक्षा वेगळी असते.
चला तर मग, सुरु करूया सर्वांना आवडेल असा, चटकमटक संपून जाणारा, आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ उग्गानी किंवा सुशीला किंवा मुरमुऱ्याचा उपमा.
साहित्य:
- मुरमुरे: २५० ग्राम (पाऊण पाकीट)
- कांदा: एक मध्यम, बारीक चिरून
- टोमॅटो: एक मध्यम, लहान फोडी करून
- हिरव्या मिरच्या: तीन-चार, चिरून
- शेंगदाणे: दोन चमचे / आवडीनुसार
उग्गानीच्या पिठासाठी
- दाळवं: चार चमचे
- वाळलेल्या लाल मिरच्या: चार-पाच, तुकडे करून
- लसूण: चार-पाच पाकळ्या
- कढीपत्ता: एक काडी
फोडणीसाठी
- तेल: एक-दीड चमचा
- मोहरी: अर्धा चमचा
- जिरे: अर्धा चमचा
- चणाडाळ: एक चमचा
- उडीदडाळ: एक चमचा
- कढीपत्ता: एक काडी
- हळद: अर्धा चमचा
- मीठ: एक-दीड चमचा / चवीनुसार
सजावटीसाठी
- कोथिंबीर:बारीक चिरून
- (ऐच्छिक) लिंबू: अर्धी फोड
एका मोठ्या भांड्यात मुरमुरे बुडतील इतके पाणी घाला. हातांनी हलवून सर्व मुरमुरे बुडतील हे पहा. दोन-तीन मिनिटे भिजत राहू द्या. त्यानंतर हातात थोडेथोडे मुरमुरे घेऊन दाबून त्यांतील पाणी काढून टाका व दुसऱ्या भांड्यात ठेवा.
एका कढईत एक-दीड चमचा तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी, जिरे, चणाडाळ, उडीदडाळ हे घाला.मोहरी तडतडू लागल्यावर शेंगदाणे व बारीक चिरलेला कांदा घाला. नीट हलवून घ्या. एक मिनिटाने त्यात चिरलेली हिरवी मिरची व कढीपत्ता घाला. मीठ व टोमॅटोच्या फोडी घाला. हळद घालून, गॅस मंद आचेवर करून झाकून ठेवा. दोन मिनिटांत सर्व शिजेल.
मिक्सरच्या जारमध्ये दाळवं, चार-पाच वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे, चार-पाच लसूण पाकळ्या व एक काडी कढीपत्ता यांचे पीठ करून घ्या. उग्गानीला तिची विशिष्ट चव येण्यासाठी हे पीठ महत्वाचे आहे.
आता कढईतील कांदा-टोमॅटो मऊ झाला असेल. एकदा हलवून घ्या. त्यात मिक्सरमधील दाळवांचे पीठ आणि भिजलेले मुरमुरे घाला. हळुवारपणे हलवून नीट एकत्र करून घ्या. चव पाहून हवे असेल तर मीठ घाला. गॅस बंद करा व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आवडत असेल तर अर्धे लिंबू पिळा.
एव्हाना अरेनं किंवा अगंनं ऑर्डर केलेली मिरची भजी आली असतीलच! 😜
प्लेटमध्ये गरमागरम उग्गानी-बज्जी वाढा आणि आस्वाद घ्या.
पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा. तुमच्या भागातही हा किंवा असा पदार्थ करत असतील तर तो कसा करतात, त्याला काय म्हणतात हे नक्की लिहा.
- मुरमुरे हे चोपडे हवेत, खरखरीत नकोत. नाहीतर खरोखरचाच उपमा होऊन बसेल! घेताना पाहून घ्या.
- मुरमुरे दोन-तीन मिनिटांपेक्षा जास्त भिजवू नका. तसेच ते भिजवल्यावर फोडणी वगैरे करायला फार वेळ लावू नका. झटपट करायला हवे म्हणजे मुरमुरे मोठ्याच आकाराचे राहतील. हवंतर पीठ आधी करून ठेवून मग पुढची कृती करा.
- मुरमुरे आधीच मिठाळ (salted) असतात. त्यामानाने नेहमीपेक्षा थोडे कमीच मीठ घाला. हवे तर शेवटच्या पायरीला अड्जस्ट करता येईल.
- वरील साहित्याच्या प्रमाणाने उग्गानी ही थोडी तिखटच होते. हवे असल्यास लाल व हिरव्या मिरच्या एक-एक कमी घ्या.
- बज्जी (मिरची भजी) चा उल्लेख हा कर्नुलला रेस्टॉरंटांत उग्गानी-बज्जी एकत्र मिळते त्या सवयीमुळे केलेला आहे. मिरची भजी हवीतच असे नाही. घरोघरी नुसती उग्गानीच करतात.
- तेलुगु पाक परंपरेत बहुतेक सगळ्या चटण्या, उपमा, चित्रान्न वगैरेंच्या फोडणीत जिरे, मोहरी, चणाडाळ, उडीदडाळ, कढीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या, हिंग वगैरे घटक असतात.
- अश्या फोडणींत शक्यतो गोटा उडीदडाळ वापरावी. वरील फोटोतही गोटा उडीदडाळ दिसते आहे.
- साहित्याच्या पहिल्या फोटोत कडुलिंबाची डहाळी उगीचच ठेवलेली आहे, पाकृशी तिचा संबंध नाही. 😜
यापूर्वी घरी व बाहेर काढलेले फोटो:
आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! 😜
रेसिपी आणि फोटो मस्त! मिर्ची
रेसिपी आणि फोटो मस्त! मिर्ची भजीसोबत खायला मस्त लागत असेल
तुमचे फोटो, लेखन यांनी
तुमचे फोटो, लेखन यांनी साध्याशा पदार्थाला ग्लॅमर मिळवून दिलं.
डाळव्याचं पीठ हा या पाककृतीतला गेमचेंजर वाटतो आहे.
फोटो परत परत बघतेय. तुमच्या
फोटो परत परत बघतेय. तुमच्या उत्साहाला मानायला हवे…
मी चाहती क्रमांक ८ होते. आता १५ आहेत म्हणजे माबोकरांनी तुमच्या उत्साहाला दाद दिलीय.
तुमचे फोटो, लेखन यांनी
तुमचे फोटो, लेखन यांनी साध्याशा पदार्थाला ग्लॅमर मिळवून दिलं >>>+10000
डाळव्याचं पीठ गेम चेंजर आहे.
मागे प्राचीने रेसिपी दिलेली , तेव्हा करून बघितला होता.
https://www.maayboli.com/node/86254
म्हटले तर बनवायला
म्हटले तर बनवायला साध्याश्याच पदार्थाचे किती भारी फोटो..
खालचे बटण दाबले
मस्त पाकृ आणि फोटो तर त्याहून
मस्त पाकृ आणि फोटो तर त्याहून ही भारी...
पीठ म्हटलंय तुम्ही पण ते जरा सरसरीत ठेवायचं की एकदम बारीक करायचं ?
आवडलं असेल तर खाली वामन राव यांचे चाहते व्हा! हे बटन दाबा! ह्याला मान दिला आहे.
मस्तच
मस्तच
मी भाजके पोहे आणुन चिवडा करते
मी भाजके पोहे आणुन चिवडा करते (थोडक्या तेलात होतात, तरीही चविष्ट लागतात). पावसाळ्याच्या शेवटी शेवटी आणलेल्यातले थोडे तसेच पडुन राहिले व नरम झाले. कढईत कुरकुरीत करण्यासाठी जास्त वेळ परतले तर आक्रसतात आणि चव बदलते. म्हणुन मी हल्ली पोह्यांसाठी त्यांना वापरुन संपवतेय. त्यांच्यावर हा प्रयोग करुन पाहते
उग्गानीसोबतच्या भज्यांची रेस्पी पण येऊदे.
दाळवे म्हणजे फुटाण्याच्या
दाळवे म्हणजे फुटाण्याच्या पिठाने थोडा कोरडेपणा येतो..एकदम गिचका होत नाही चुरमुर्याचा..
पण खरतर सुशीला थोडा तिखटच चांगला लागतो. परवा ही पोस्ट वाचली अन काल भरपूर सुशीला केला आणी खाल्ला.
>>> मिर्ची भजीसोबत खायला मस्त
>>> मिर्ची भजीसोबत खायला मस्त लागत असेल
अगदी अगदी. म्हणून कर्नुलचे रेस्टॉरंटवाले उग्गानी बरोबर मिरची भजी देतातच. पण मला हैद्राबादला कुठे उग्गानी दिसली नाही. कुणाला दिसली तर सांगा.
>>> डाळव्याचं पीठ हा या पाककृतीतला गेमचेंजर वाटतो आहे.
>>> डाळव्याचं पीठ गेम चेंजर आहे.
बरोबर आहे. 👉 दाळवे म्हणजे फुटाण्याच्या पिठाने थोडा कोरडेपणा येतो..एकदम गिचका होत नाही चुरमुर्याचा.
>>> पीठ म्हटलंय तुम्ही पण ते जरा सरसरीत ठेवायचं की एकदम बारीक करायचं ?
आम्ही भाकरी करण्यासाठी ज्वारीच्या पिठासारखे बारीकच करतो.
>>> मी भाजके पोहे आणुन चिवडा करते (थोडक्या तेलात होतात, तरीही चविष्ट लागतात)
आम्ही भाजक्या पोह्यांचा डीप फ्राय तळून चिवडा करतो. कमी तेलात कसा करायचा? कोरडा-कोरडा होणार नाही का?
>>> सुशीला थोडा तिखटच चांगला लागतो.
बरोबर आहे. तिखट-तिखट जास्त खाल्ला जातो असा अनुभव आहे.
>>> उग्गानीसोबतच्या भज्यांची रेस्पी पण येऊदे.
घराजवळच चांगली मिरची भजी मिळतात. आम्ही तीच आणतो. मी स्वतः मिरची भजी कधी केले नाहीत. एकदा करून रेसिपी टाकीन.
हा मी बनवेलला उग्गानी.. डाएट
>>> ...ज्वारीचा कुरमुरा
>>> ...ज्वारीचा कुरमुरा
मस्त प्रयोग दिसतोय! 👌
व्वा व्वा...
व्वा व्वा...
काय लिहिलंय आणि काय ते फोटो.
सुशीला खाल्ली आहे. पण ह्यात जे डाळव्याचे पीठ आहे ते खरे गेम चेंजर आहे वर म्हंटल्याप्रमाणे.
नक्कीच करून बघणार. फोटो एक नंबर. नेहमीप्रमाणे.
श्रवुच्या उग्गानी मुळे घरी
श्रवुच्या उग्गानी मुळे घरी असलेली पोडी वापरून आपणही उग्गानी करून पहावी असा एक धाडसी प्लॅन डोक्यात शिजत आहे
रमडला मम.
रमडला मम.
अरे! झकास!. फोटो तर तोंपासु!
अरे! झकास!. फोटो तर तोंपासु!
मला पण आत्ताच खावा वाटू लागलंय. एमटीआरची गन पावडर आहे, पण त्याने जाम तिखट होईल का? डाळं सापडलं तर ते नाही तर गन पावडर.
मला भेळेला ते चिकनेचोपडे चुरमुरे आवडत नाहीत त्यामुळे घरात ते खरखरीतच असण्याची शक्यता आहे. पाणी घालून एकदम झटकन काढून टाकेन. पण आता करणार म्हणजे करणारच!
भज्यांच्या ऐवजी फ्रोजन पात्रा (अळुवड्या) आहेत, कदाचित फ्रोजन कांदाभजी ही सापडतील, किंवा कांदाभजी पटकन करता ही येतील.
भारी
भारी
आमच्याकडे चान्गले मुरमुरेच
आमच्याकडे चान्गले मुरमुरेच मिळत नाहित. बहुधा ताजे नसल्याने का काय उघडल्यावर त्याना एक दबकट वास येतो.भारतात मुरमुरेवाला घरी घेवुन यायचा.दारोदार फिरायचा पण एकदम क्रिस्प आणी ताजे लागायचे मुरमुर.
ताजे गरम मुरमुरे त्यावर तेल-तिखट-मिठ की झाल.ताजेपणाने असेल भन्नाट लागायच.
सुशिला खाल्लाय मी एकदाच पण बहुधा बनवणारे प्रो नसल्याने का काय असेल ते कारण पण ते प्रकरण खुपच चिवट्/चामट लागत होत..
मी पण धनी सारख पोह्यावरच प्रयोग करुन पाहिल.
सुशिला मीही बनवला होता पण
सुशिला मीही बनवला होता पण चुकीचे कुरमुरे असणार.
असो. काल डाळे व योग्य कुरमुरे घरी आलेले आहेत. आज करणार संध्याकाळी.
( ता. क. आताच करणार होते पण एका मैत्रिणीने नाश्त्याला बोलावलेय. ती आहे कोब्रा. तिच्याकडे नाश्त्याला जायचे म्हणजे घरुन काहीतरी खावुन जायचे. पण उग्गानीइतकेही नको खायला म्हणुन संध्याकाळी करणार.)
(( अ. ता.क. बेळगावी आले पाकात पण कसलेतरी गोळे करुन देतात. तीही रेसिपी काढुन बघायला हवी. माबोवर आहे)
श्रवु डायेट पण म्हणतेयस आणि
श्रवु डायेट पण म्हणतेयस आणि फोटोत ते कायतरी शेवसदृष्यही दिसतेय.
पण फोटो कातिल आहे हा…
साधना तो शेव आहे.. पण अहोच्या
साधना तो शेव आहे.. पण अहोच्या प्लेटमध्ये खास फोटोसाठी थोडासा घातला.. माझ्या प्लेटमध्ये शेंगदाणे पण नव्हते.. म्हणजे आधीच वेचून त्याला देऊन टाकले..
माझ्याकडची गन पावडर मी घरी
माझ्याकडची गन पावडर मी घरी केलेली होती.. त्यामुळे कमीच तिखट होती.. तुमच्याकडची फार तिखट होईल असे वाटत असेल तर हिरवी मिरची घालू नका..
अमितव तुम्ही पाण्यात कुरमुरे
अमितव तुम्ही पाण्यात कुरमुरे घालू नका.. कढईत कांद्यावर असेच टाका कुरमुरे आणि वरून नुसता पाण्याचा हबका मारा..
काल पाण्यात कुरमुरे घालून आणि
काल पाण्यात कुरमुरे घालून आणि डाळं वापरुन हे केले. कुरमुरे लगदा वगैरे अजिबात झाले नाहीत. छान मोकळेच राहिले. त्यामुळे घरी जे काही कुरमुरे आहेत तेच चालतील.
किंवा माझ्या पाककौशल्यात तरी तसे झाले नाहीत.
लाल मिरची + हिरवी मिरची दोन्ही असल्याने भयाण तिखट झाले. खाण्याची मजा घ्यायची तर पुढच्याखेपेला यापेक्षा कमी तिखट करेन. खायला बरे होते काही दुसरं करायचा कंटाळा आणि झटकन होणारं काही हवं असेल तर ठीक आहेत. फार आउटऑफदवर्ल्ड वगैरे नाहीत.
मस्त रेसिपी आणि फोटो !!
मस्त रेसिपी आणि फोटो !!
>>> फार आउटऑफदवर्ल्ड वगैरे
>>> फार आउटऑफदवर्ल्ड वगैरे नाहीत. किंवा माझ्या पाककौशल्यात तरी तसे झाले नाहीत.
म्हणूनच 'कहते हैं कि गा़लिब का है अंदाज़-ए-बयाँ और'!
मीही केले. कुरमुरे चोपडे
मीही केले. कुरमुरे चोपडे होते पण चवीला यथातथा. त्यामुळे उग्गानी मला फारशी आवडली नसली तरी आजर्याबरुन कुरमुरे आणले तर छान लागेलसे वाटले. सकाळची मैत्रिण संध्याकाळी डोकळा घेऊन आली होती. तिला आवडले. लगे हाथ रेसिपी शेअर केली.
फार आउट ऑफ द वर्ल्ड वगैरे
फार आउट ऑफ द वर्ल्ड वगैरे नाहीत..हे वरील प्रांजळ मत वाचून छान वाटले!
त्यापेक्षा पोहे काय वाईट?
चुरमुऱ्यांचा यूएसपी हा त्यांचा कुरकुरीतपणा आहे. तो का घालवायचा?
त्यापेक्षा ते भेळीत, चिवड्यात बेस्ट !
मग ओली भेळ खातच नसाल.
मग ओली भेळ खातच नसाल.
भारत, ओल्या भेळेत आपण चुरमुरे
भारत, ओल्या भेळेत आपण चुरमुरे इतके भिजवून पुन्हा शिजवत नसतो! त्यांचा कुरकुरीतपणा कायम राहतो...लगेच कालवून खाल्ली तर...
Pages