
तेलुगु खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांसमोर आधी मसालेदार पदार्थ येतात; पण या खाद्यसंस्कृतीत गोडाचेही अनेक अप्रतिम प्रकार आहेत. त्यातले काही तर फारच लोकप्रिय आहेत.
तेलंगाणातील पारंपरिक कद्दूची खीर हाही असाच एक खास पदार्थ! दूध, कद्दूचे मधुर मिश्रण आणि त्यावर सुकामेव्याची सजावट… विशेष प्रसंगी बनवली जाणारी ही खीर चवीला गोड आणि दिसायलाही देखणी असते!
चला तर मग, करायला सोपी आणि सर्वांच्या आवडेल अशी ही कद्दूची खीर करून पाहूया.
साहित्य:
- कद्दू बारीक किसून: अंदाजे २०० ग्राम
- साबुदाणा: २५ ग्राम
- दूध: १ लिटर
- साखर: १०० ग्राम
- सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता) - जाडीभरडी पूड करून: पन्नास ग्राम
- सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता) - सजावटीसाठी पातळ काप करून: पन्नास ग्राम
- चेरी - सजावटीसाठी पातळ काप करून: तीन-चार
- इलायची (बारीक पूड करून): पाच-सात नग
- केशर: आठ-दहा काड्या
- कंडेन्स्ड मिल्क (मिठाई मेट): ५० ग्राम
- कस्टर्ड पावडर: दीड-दोन चमचे
- पाणी: अंदाजे अर्धा लिटर (पाच-सहा वाट्या)
ऐच्छिक:
- खवा: १०० ग्राम
- टरबूज-खरबूज बिया - सजावटीसाठी: दहा ग्राम
- चारोळी - सजावटीसाठी: दहा ग्राम
- हिरवा रंग: तीन-चार थेंब
त्या वरच्या फोटोत साखर ठेवायची राहिली होती!
साबुदाणा दोन-तीन वाट्या पाणी घालून भिजायला ठेवा.कद्दूची साल काढून, तुकडे करून आतील गर काढून टाका. बारीक किसून घ्या.
एकीकडे एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत मंद आचेवर दूध तापवायला ठेवा. अधूनमधून हलवत रहा. शक्यतो साय धरायला नको हे पहा. दुधाला उकळी येईपर्यंत पुढची कृती करा.
दुसरीकडे पातेल्यात दोन वाट्या पाणी घालून कद्दू कीस शिजवायला ठेवा. अधूनमधून हलवत रहा. वीस मिनिटांत शिजून तयार होईल. बाजूला काढून ठेवा. अजून एका पातेल्यात तासभर भिजलेला साबुदाणा शिजवायला ठेवा. पंधरा-वीस मिनिटांत शिजून तयार होईल. बाजूला काढून ठेवा.
या तिन्ही क्रिया एकाच वेळी केल्यास वेळ वाचेल.
आता खीर करायला घ्या. दूध उकळत असेल. उकळत्या दुधात इलायची पूड व साखर घाला. पुन्हा उकळी येऊ लागल्यानंतर शिजलेला कद्दू कीस त्यातील शिल्लक पाण्यासहीत घाला. शिजलेला साबुदाणा घाला. हलवून घ्या. सुकामेव्याची पूड घाला. खिरीला घट्टपणा हवा असेल तर खवा बारीक फोडून घाला. नीट हलवून घ्या. पाच मिनिटे शिजू द्या.
कस्टर्ड पावडर वाटीभर पाण्यात कालवून घ्या. खीर ढवळत हळूहळू घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. आवडत असल्यास हिरवा रंग घाला व नीट हलवून घ्या. गॅस बंद करा. आता कंडेन्स्ड मिल्क घाला व एकसारखे करून घ्या. कक्ष तापमानाला आल्यावर फ्रिजमध्ये ठेवा.
चेरी व सुकामेव्याचे काप आणि आवडत असल्यास चारोळी, टरबूज-खरबूज बिया इ घालून, सुबक सजावट करून वाढा.
- दूध हे फुल क्रीम / फुल फॅट घ्यावे, टोन्ड दूध शक्यतो घेऊ नये.
- कंडेन्स्ड मिल्क मध्ये साखर असते त्यानुसार साखर मर्यादित प्रमाणात घालावी.
- खीर थंड करूनच वाढायला हवी. त्यामुळे वाढायच्या आधी किमान पाच-सहा तास किंवा आदल्या दिवशी करून ठेवावी.
- फोटोत दिसणारा कद्दू एक किलोचा आहे. मी त्याचा एक तृतीयांश घेतला होता. बिया वगैरे काढून अंदाजे दोनशे ग्राम कीस झाला.
- खीर करण्यासाठी ही डेगची वापरली होती -
मायबोलीकरांसाठी तेलंगाणाची लोकप्रिय कद्दूची खीर तयार आहे!
चिडून लाल झाल्यामुळे असेल.
चिडून लाल झाल्यामुळे असेल. भोपळा नव्हे, वाचक.
कद्दूची खीर पाहून खूप
कद्दूची खीर पाहून खूप वर्षांपूर्वीचा किस्सा आठवला. मी आणि माझी इंदोर ची मैत्रीण , हैद्राबादच्या एका मैत्रिणीकडे , तिच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो होतो. आमची मुले अंगणात खेळत होती आणि आम्ही जेवण करत होतो. जेवणाचा मेनू हैद्राबादी बिर्याणी आणि कद्दूची खीर.
माझ्या इंदोरी मैत्रिणीने पहिल्यांदाच कद्दूची खीर खाल्ली होती आणि तिला खूप आवडली. त्यावेळी तिने ४-५ वाट्या तरी खाल्ली.
वाढदिवस संपल्यावर आम्ही दोघी आपली मुले घेऊन घरी जात होतो. रस्त्याने जाताना तिने सगळी खीर उलटी केली.
त्या प्रसंगानंतर मी स्वतः कधीच या खिरीचे नाव घेतले नाही. खीर छान लागते पण मी तरी कधी खाणार नाही आता.
इथे भोपळा म्हटलं की लाल भोपळा
इथे भोपळा म्हटलं की लाल भोपळा. लाल असं विशेषण नाही लावावं लागत. श्रीरामपूरला गेल्यावर मला समजलं की तिथे भोपळा म्हणजे दुधी आणि लाल भोपळ्याला डांगर म्हणतात. कोहळा खात नाहीत बरेच जण तिथे, घराला दृष्ट लागू नये म्हणून दारावर टांगतात. अर्थात मी जिथे रहात होते तिथलं आसपासचे लिहिलं, तिथेही वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात.
असंच तेलंगणात काही ठिकाणी लौकीला कददु म्हणत असतील ( माझ्या मोबाईलवर जोडाक्षर नाही येत याचं नीट)
आज ही रेसिपी ट्राय केली आहे.
आज ही रेसिपी ट्राय केली आहे. माझ्याकडे दुधी आणलेला होता, कस्टर्ड पावडर, कन्डेन्स्ड मिल्क , सुका मेवा (गुलाब पाकळ्या पण !)हे सगळे घरात होते. शिवाय परवा खिचडी केली होती तेव्हाचा थोडा उरलेला भिजवलेला साबुदाणा सुद्धा चक्क घरात होता. त्यामुळे रेसिपी वाचल्यापासून हे सगळे अक्षरशः हाकाच मारत होते, आम्हाला खिरीत सद्गती दे म्हणुन
आता फ्रीज मधे ठेवून आले आहे , संध्याकाळी मस्त थंड खाणार. चव छान आली आहे. आणि साबुदाण्यामुळे टेक्स्चर मस्त आले आहे. गेम चेन्जर. साबुदाण्याविना ही रेसिपी करू नका अजिबात.
बायदवे खूप अति घट्ट नाही होत खीर , कारण साबुदाण्यात थोडे पाणी राहतेच आणि दुधीमधे पण राहते.
छानच रेसिपी...
छानच रेसिपी...
साबुदाण्यामुळे थोडे बोबा टाइप
साबुदाण्यामुळे थोडे बोबा टाइप टेक्सचर /लुक येत असेल असे वाटतय
ही खीर गरमगरम पण चांगली लागेल
ही खीर गरमगरम पण चांगली लागेल ना? सध्याच्या धो धो पावसामधे गार नको असे वाटतेय.
>>> मग लाल भोपऴ्याला काय
>>> मग लाल भोपऴ्याला काय म्हणतात?
मराठवाड्यात लाल भोपळ्याला काशीफळ म्हणतात.
>>> चिडून लाल झाल्यामुळे असेल. भोपळा नव्हे, वाचक.
>>> आज ही रेसिपी ट्राय केली आहे.
चवीला कशी लागली? फोटो टाका की!
>>> ही खीर गरमगरम पण चांगली लागेल ना?
गोड पदार्थ, विशेषतः क्रीमी टेक्स्चर असलेले गोड पदार्थ थंडच चांगले लागतात आणि तिखट पदार्थ गरमच चांगले लागतात असे मला वाटते. अर्थात काही अपवाद असतील. एकदा ट्राइ करून बघायला हवी.
खाली भोपळ्याशी संबंधित
खाली pumpkin व gourd वर्गातील मराठवाड्यातील काही भाज्यांची चित्रे व नावे देत आहे.
१. कद्दू - हा लांबट, हिरवा असतो. सर्वत्र आढळून येतो.
२. कद्दू - हा पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा असतो. हाही कद्दूच, पण कमी प्रमाणात बाजारात येतो.
३. काशीफळ - आम्ही हे फोडी करून, वाफवून, दूध साखर घालतो. ओडिशात याचा "दालमा" नावाचा पदार्थ करतात.
४. काशीफळ - हेही काशीफळच.
५. देवडांगर - आम्ही हे महालक्ष्मीच्या पूजेला ठेवतो. भाजीही असते. आंध्र-तेलंगणात शुभ कार्य प्रसंगी दोन तुकड्यांत फोडून, हळद कुंकू घालून, दोन दिशांना ठेवतात. याचा बळी देऊन पुढे येऊ शकणारे विघ्न टाळले जाते.
६. कोहळा - याच्या अंगाला पांढरी पूड असते. आम्ही कीसाचे वडे करून, वाळवून, तळतो. आंध्र-तेलंगणात घराच्या प्रवेश द्वाराबाहेर छताला टांगून ठेवतात. घरी येणाऱ्या लोकांनी याखालून येणे अपेक्षित असते. हे लावले तर घराला दृष्ट लागत नाही.
७. दोडके - सर्वत्र आढळून येतात. एरवी दोडके असेच म्हणतात पण खालील पारशी दोडक्यांपेक्षा वेगळे दाखविण्यासाठी शीर दोडके म्हणतात.
हे सर्व शब्द मराठी आहेत.
८. पारशी दोडके - कमी प्रमाणात बाजारात येतात. चकत्या करून भजे तळतात.
९. पडवळ - मुख्यतः दह्याच्या कढीत चकत्या घालतात. महालक्ष्मीच्या पूजेत याची भाजी असते.
हे सर्व शब्द मराठी आहेत.
हो, फोटो टाकायचा राहिला काल :
हो, फोटो टाकायचा राहिला काल : मस्तच झाली होती खीर, सगळ्यांना आवडली घरात.

>>>सगळं दुधी भोपळ्याबद्दल
>>>सगळं दुधी भोपळ्याबद्दल चाललय हे आत्ता प्रतिसाद वाचून कळलं. बघा, कद्दू न समजल्याने मी लाल भोपळ्याची खीर केली असती ! >>>>> काही बिघडणार नाही.. विदर्भातील गूळशेळ झालं असतं!
खीर छान दिसतेय मैची पण!
वा, मस्तच दिसतेय खीर मै.
वा, मस्तच दिसतेय खीर मै.
मस्त क्लरफुल दिसतेय खीर,
मस्त क्लरफुल दिसतेय खीर, मैत्रेयी.
पारशी दोडके का, कोकणात पारोसे
पारशी दोडके का, कोकणात पारोसे म्हणतात, बाबांच्या तोंडी हा शब्द असायचा, मी घोसाळे म्हणते.
मी तेच विचारणार होते की पारशी
मी तेच विचारणार होते की पारशी दोडके म्हणजेच घोसाळी का?
मैत्रेयी, खीरीचा रंग एकदम
मैत्रेयी, खीरीचा रंग एकदम royal आलाय.
दोघांच्या (वामनराव व मै) खीरी
दोघांच्या (वामनराव व मै) खीरी काय सुंदर दिसतायत.
मी पण आज ही खीर करुन पाहिली.
मी पण आज ही खीर करुन पाहिली. मस्त वेगळाच प्रकार आणि चव आहे. मैत्रेयी म्हणाली तसं साबुदाणा हा गेम चेंजर आहे. बोब्बासारखं टेक्श्चर आलं आहे. मी कडेन्स्ड मिल्क घातलं नाही. बाकी खवा किसून घातला. खीर नटवायचे कष्ट न घेतल्याने जरा गरीब दिसतेय. ते चालवून घ्या.
मराठवाड्यातले शब्द : वामनराव
मराठवाड्यातले शब्द : वामनराव +१११
एकदम बरोबर
.
पाकृ फारच सुरेख आहे
आज आणलाय कद्दू
बघू उद्या होतेय का
मस्त पाकृ!
मस्त पाकृ!
मी खाल्ली की नाही माहीत नाही, असं जे खाल्लं त्यात कद्दु होता की नाही माहीत नाही. (आम्ही पण कद्दु म्हणतो दूधीला.)
^^बघू उद्या होतेय का Happy
^^बघू उद्या होतेय का Happy
Submitted by किल्ली ^^
मी पण उद्या येते बघायला तुझ्याकडे खीर झाली का ते...
maitreyee व सायो, खिरी मस्त
maitreyee व सायो, खिरी मस्त दिसत आहेत! चवीलाही छानच झाल्या असतील.
>>>खीर नटवायचे कष्ट न घेतल्याने जरा गरीब दिसतेय. ते चालवून घ्या.
हे वाक्य आवडलं.
>>> कस्टर्ड घालुन शिजवल्यावर
>>> कस्टर्ड घालुन शिजवल्यावर घट्ट होईल असे वाटतेय.
हे महत्वाचे आहे. तेंव्हा उत्तर लिहायचं राहून गेलं होतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, कस्टर्ड घालून दूध शिजवत राहिले तर घट्ट घट्ट होत जाते.
कृतीमधला शेवटचा भाग पहा. कस्टर्ड घातल्यावर शिजवायचे नाहीये. नीट हलवून लगेच गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करुन कस्टर्ड घातले तरीही चालेल.
वामन राव धन्यवाद. कित्येकदा
वामन राव धन्यवाद. कित्येकदा पाकृ मध्ये जे लिहिलेय त्यामागचे लॉजिक माहित नसते आणि आमच्यासारखे लोक स्वतःचे डोके चालवुन सगळी वाट लावतात. तुम्ही माहिती दिली नसती तर मी नक्कीच कस्टर्ड घातल्यावर खीर थोडी उकळली असते.
मी कस्टर्ड घातल्यावर खीर
मी कस्टर्ड घातल्यावर खीर उकळली. खूप घट्ट वगैरे त्यावेळी तरी झाली नाही. आता फ्रीजमध्ये ठेवल्यावर जरा झाली आहे पण घरी सगळ्यांना तशी आवडली. गारेगार खीर खायला स्वर्गीय लागतेय.
Pages