
परवा ऋतुराज यांच्या भांड्याकुंड्यांच्या धाग्यावर माझ्या नवीन मित्राचा हा फोटो टाकला होता:

तिथे हल्ली क्रोशाचा छंद जडल्याचा उल्लेख केला होता. मग वाटलं तो 'पुराव्याने शाबित' करावा.
सहज मुलाबरोबर क्राफ्ट स्टोअरमध्ये गेले असताना खूप सवलतीच्या दरात दिसली म्हणून लोकर, सुई आणि हा मित्र घरी आला, आणि आता तोच लाडका विरंगुळा होऊन बसला आहे!
हे सगळं अगदी नवखं, 'चिमखडे बोल' पातळीवरचं काम आहे. 'क्राफ्ट' आत्मसात करते आहे, आर्टच्या लेव्हलला कधी जाईल, न जाईल, माहीत नाही.
सध्या निरनिराळे टाके समजून घेणं आणि यूट्यूबवरच्या तयार आज्ञावली पाहून छोट्या छोट्या गोष्टी तंतोतंत जमवायचा प्रयत्न करणं सुरू आहे.
पण मला फार मजा येते आहे! दिवसभराचं काम संपलं की हात सुई धरायला शिवशिवतात! टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं.
आय नो, आय नो, फार चीजी झालं. थांबते आणि फोटोंना बोलू देते.





छोटे प्राणी, सेल फोन पाउचेस आणि बुकमार्क्स मित्रमैत्रिणींना भेटींदाखल दिले - आपल्या हाताने केलेली छोटीशीसुद्धा वस्तू देताना छान वाटतं.
आता आरसे जडवलेले ग्रॅनी स्क्वेअर्स करायला शिकते आहे. मग त्यांच्या पर्सेस किंवा श्रग्ज वगैरे बडे ख्याल गाता येतात का पाहू! 

हे कोस्टर्स आणि त्यांच्यासाठी छोटीशी बास्केट:
जादू आहे हातात
जादू आहे हातात
स्वाती, तू कुठल्या व्हिडिओ
स्वाती, तू कुठल्या व्हिडिओ पासून सुरुवात केली होतीस?
प्लीज लिंक टाक ना.
मलाही शिकायचे आहे. मी सगळे समान आणून ठेवले आहे.
हा एक अगदी सुरुवातीला केलेला
हा एक अगदी सुरुवातीला केलेला अमिगुरुमी फ्रॉग.
यूट्यूबवर ‘क्रोशे फॉर बिगिनर्स’ असं शोधलं तर असे बरेच व्हिडिओ मिळतील.
Pages