
परवा ऋतुराज यांच्या भांड्याकुंड्यांच्या धाग्यावर माझ्या नवीन मित्राचा हा फोटो टाकला होता:
तिथे हल्ली क्रोशाचा छंद जडल्याचा उल्लेख केला होता. मग वाटलं तो 'पुराव्याने शाबित' करावा.
सहज मुलाबरोबर क्राफ्ट स्टोअरमध्ये गेले असताना खूप सवलतीच्या दरात दिसली म्हणून लोकर, सुई आणि हा मित्र घरी आला, आणि आता तोच लाडका विरंगुळा होऊन बसला आहे!
हे सगळं अगदी नवखं, 'चिमखडे बोल' पातळीवरचं काम आहे. 'क्राफ्ट' आत्मसात करते आहे, आर्टच्या लेव्हलला कधी जाईल, न जाईल, माहीत नाही.
सध्या निरनिराळे टाके समजून घेणं आणि यूट्यूबवरच्या तयार आज्ञावली पाहून छोट्या छोट्या गोष्टी तंतोतंत जमवायचा प्रयत्न करणं सुरू आहे.
पण मला फार मजा येते आहे! दिवसभराचं काम संपलं की हात सुई धरायला शिवशिवतात! टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं.
आय नो, आय नो, फार चीजी झालं. थांबते आणि फोटोंना बोलू देते.
छोटे प्राणी, सेल फोन पाउचेस आणि बुकमार्क्स मित्रमैत्रिणींना भेटींदाखल दिले - आपल्या हाताने केलेली छोटीशीसुद्धा वस्तू देताना छान वाटतं.
आता आरसे जडवलेले ग्रॅनी स्क्वेअर्स करायला शिकते आहे. मग त्यांच्या पर्सेस किंवा श्रग्ज वगैरे बडे ख्याल गाता येतात का पाहू!
हे कोस्टर्स आणि त्यांच्यासाठी छोटीशी बास्केट:
वा स्निग्धा सुंदर. छान
वा स्निग्धा सुंदर. छान एकसारखा हात आहे तुमचा.
स्निग्धा, सुंदर कलाकृती.
स्निग्धा, सुंदर कलाकृती.
किती निगुतीने केलंय.
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई,
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई, माधव, अवल ताई, ऋतुराज
(No subject)
हे दोन स्कार्फ आत्ता इतक्यात
हे दोन स्कार्फ आत्ता इतक्यात केलेत
आणि हे pillow covers
आणि हे pillow covers
(No subject)
स्निग्धा, काय सुबक काम आहे.
स्निग्धा, काय सुबक काम आहे. फारच सुरेख.
काय सुरेख दिसतोय लाल फ्रॉक.
काय सुरेख दिसतोय लाल फ्रॉक.
स्वाती आंबोळे > प्राणी
स्वाती आंबोळे > प्राणी खूपच क्यूट झालेत .
स्नेहा > वाह! सुरेख क्रोशाकाम .
मी पण आणू का माझं क्रोशे काम
मी पण आणू का माझं क्रोशे काम इथे? धाग्याला तीट लावायचं काम करते!!
(No subject)
.

.
.
निग च्या धाग्यावर अनिंद्यनी
निग च्या धाग्यावर अनिंद्यनी म्हंटल तस मलाही इथे खूप फोटो टाकल्याचा गिल्ट येतोय तरी आपण केलेलं काम दाखवल्याशिवाय रहावत पण नाही असं काही तरी झालं आहे.
किती छान स्वाती
किती छान स्वाती
अजून येऊ द्या, प्रतिसाद पण मस्तच आहेत सर्व, मला ते प्राणी बनवण्याची फार इच्छा आहे .
नाही नाही, अजिबात गिल्टी
नाही नाही, अजिबात गिल्टी वाटून घेऊ नका. तुमचं सुबक सुंदर काम म्हणजे माझ्यासारख्या नव्या शिकणार्यांसाठी इन्स्पिरेशनच आहे.
स्निग्धा, खूप सुंदर आहे सगळेच
स्निग्धा, खूप सुंदर आहे सगळेच.
ते टेबलरनर खूप चार्मिंग आहे, रंग- पोत- डिझाईन या सगळ्याचा एक नॉस्टॅल्जिक लूक आहे.
किती सुरेख काम आहे - स्वाती
किती सुरेख काम आहे - स्वाती आंबोळे आणि स्निग्धा तुम्हा दोघींचे ! खूप छान
खूप खूप thanks सगळ्यांना
खूप खूप thanks सगळ्यांना
किती सुरेख वस्तू /कलाकृती
किती सुरेख वस्तू /कलाकृती बनवल्या आहेस स्वाती !
स्निग्धा तुमचे क्रोशे काम पण एकदम भारी आहे. पांढरं कॉफी टेबल रनर तर एकदम उचलून खिशात घालून घरी नेण्याइतकं टेम्प्टिंग आहे
आहाहा सुरेख सर्वच.
आहाहा सुरेख सर्वच.
Pages