एक धागा सुखाचा

Submitted by स्वाती_आंबोळे on 19 May, 2025 - 14:00

परवा ऋतुराज यांच्या भांड्याकुंड्यांच्या धाग्यावर माझ्या नवीन मित्राचा हा फोटो टाकला होता:

ff965c60-c378-477c-b1c6-684104ded27f_0.jpeg

तिथे हल्ली क्रोशाचा छंद जडल्याचा उल्लेख केला होता. मग वाटलं तो 'पुराव्याने शाबित' करावा.

सहज मुलाबरोबर क्राफ्ट स्टोअरमध्ये गेले असताना खूप सवलतीच्या दरात दिसली म्हणून लोकर, सुई आणि हा मित्र घरी आला, आणि आता तोच लाडका विरंगुळा होऊन बसला आहे!
हे सगळं अगदी नवखं, 'चिमखडे बोल' पातळीवरचं काम आहे. 'क्राफ्ट' आत्मसात करते आहे, आर्टच्या लेव्हलला कधी जाईल, न जाईल, माहीत नाही.
सध्या निरनिराळे टाके समजून घेणं आणि यूट्यूबवरच्या तयार आज्ञावली पाहून छोट्या छोट्या गोष्टी तंतोतंत जमवायचा प्रयत्न करणं सुरू आहे.

पण मला फार मजा येते आहे! दिवसभराचं काम संपलं की हात सुई धरायला शिवशिवतात! टाके विणले जातात तशा मनाच्या गाठी सुटत जातातसं वाटतं.
आय नो, आय नो, फार चीजी झालं. थांबते आणि फोटोंना बोलू देते.

1CA88358-154A-4F8E-B667-EC6453ECA621.jpeg7434c731-28d6-43f5-a5a1-32f123917f6c.jpegccfd73f5-38d8-4423-a1e3-0f24a7f27a87.jpegf4687bc1-28cd-4547-8cb9-8b563df7d40c.jpeg097d1a7c-d95e-4a2d-84e9-7509b0c4952a.jpeg

छोटे प्राणी, सेल फोन पाउचेस आणि बुकमार्क्स मित्रमैत्रिणींना भेटींदाखल दिले - आपल्या हाताने केलेली छोटीशीसुद्धा वस्तू देताना छान वाटतं.

आता आरसे जडवलेले ग्रॅनी स्क्वेअर्स करायला शिकते आहे. मग त्यांच्या पर्सेस किंवा श्रग्ज वगैरे बडे ख्याल गाता येतात का पाहू! Happy

0B19BAA4-0773-43B4-83C3-05F789A7011D_1_201_a.jpeg

हे कोस्टर्स आणि त्यांच्यासाठी छोटीशी बास्केट:
58e4fb55-1a30-4af4-9dc9-1d9aaf336a68.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा. छान छान दिसतय सगळंच. मी पण करते क्रोशा. पण असे प्राणी नाही केले अजून. बाकी बेबी फ्रॉक, स्वेटर्सस, टोप्या, बूट, स्कार्फ, दुपटी, टेबल रनर, रुमाल वगैरे बरंच काही करते. आणि वर बर्‍याच जणांनी म्हंटल तस वेगळ मेडिटेशन करायची गरज पडत नाही. हात आणि मन दोन्ही शिवशिवतात. आपल्या सुया दोरे आपण आणि गाणी..... बाकी काही लागत नाही

मला पुर्वी वाटायच की हॅ हे काय वेस्टेज ऑफ टाईम? ज्या वस्तु बाजारात सहजपणे कमी किमतीत मिळतात त्यासाठी का आपण आपला वेळ व श्रम खर्च करायचे? त्या ऐवजी तो वेळ अन्य उत्पादक कामासाठी घालवावा. काही विधायक तरी घडेल.
अलिकडे मी माझे मत बदलले आहे. निर्मितीचा आनंद जो आहे त्याची किंमत कशी करणार? मानसिक स्वास्थ्यासाठी अशा बाबी अत्यंत आवश्यक असतात. तुमच्या उर्जा वाढवतात. काही मानसशास्त्रज्ञ तर असे सांगतात की चक्क निरर्थक गोष्टी करा. तुमच्या मेंदुची न्युरोप्लास्टिसिटी वाढते.

सर्व नवीन प्रतिसादकांचे अनेक आभार. Happy
त्या बोलच्या त्या नेढ्यातून लोकर ओढत राहिलं की गुंडा पडून इतस्ततः होत नाही - जितका देखणा आहे तितकाच उपयुक्त आहे तो! म्हणून तर इन्स्टन्ट मैत्री झाली आमची! Happy

स्निग्धा, तुमच्याही कलाकृतींचे फोटो असतील तर बघायला आवडतील, नक्की पोस्ट करा.

प्र.घा., कलासक्ती /सौंदर्यासक्ती हीच माणसाला माणूस बनवते, नाही का? आपण काय मशीन्स आहोत का नुसती उत्पादक कामं करायला?
अन्नाने पोट भरतं, पण रंग-रस-गंध-श्रवण आणि स्पर्शाने पंचेंद्रियं सुखावतात - पदार्थ खाऊन संपला तरी ते सुख स्मरणात जिवंत राहातं.
साधा सेलफोन नुसता फन्क्शनल असून भागत नाही - तो देखणा दिसावा म्हणूनही इंजिनिअर्स झटतात, ते काय उगाच?!

तो बोल कुठून घेतला ?खूप मस्त आहे.
अमेझॉन वर बॅग्स पण छान मिळतात, छिद्रे असतात त्यांना त्यामुळे आत ठेवलेली लोकर बाहेर सुई वर ओढता येते.
https://a.co/d/8s48Vz8

वाह..मस्त आहे सुखाचा धागा Happy
स्वाती आणि स्निग्धा फार गोड आहेत सगळ्याच कलाकृती....इथे शेअर करत रहा..छान वाटतं बघायला

स्वाती आणि स्निग्धा दोघींच्याही कलाकृती फार सुंदर झाल्या आहेत. अगदी देखण्या.

स्वाती, खूप छान आहेत सगळ्याच कलाकृती. बुकमार्क आणि ते सुरवातीचे प्राणी किती क्यूट आहेत. क्रोश्याच्या अशा छोट्या छोट्या वस्तू फार आवडतात मला. मागे एका मैत्रिणीकडून प्राजक्ताची छोटी फुलं असलेली चष्म्याला लावायची दोरी बनवून घेतली होती मी.

तो यार्न बॉल ठेवायचा बोल खूप आवडला.
स्निग्धा, तुमचे काम तर एकदम प्रोफेशनल दिसतय.

सर्व नवीन प्रतिसादकांचे अनेक आभार. Happy

>>> स्निग्धा, तुमचे काम तर एकदम प्रोफेशनल दिसतय.
अगदी!! इथे फोटो दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

खुशाल हायजॅक करा - हा धागा (पन इन्टेन्डेड!) त्यासाठीच आहे! Happy

आपण हा 'स्टडी ग्रूप'सारखाही वापरू शकतो - आयडियाज, अनुभवातून शिकलेल्या ट्रिक्स, पॅटर्न शेअरिंग वगैरे. Happy

Pages