अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदर्भ मराठवाडा भागात हीट जास्त असल्यामुळे तिखट खूप खाल्लं व पचलं जात. पण मृ म्हणते तसे gustatory facial sweating चे शिकार आम्ही खुद्द पण आहोत. लहाणपणी अर्धा वाटी ठेचा एका जेवणातही जायचा. आता १ चमचा खूप होतो. चवी पुरते तिखट खाणे बरे वाटते. नाहीतर आजकाल निव्वळ तिखट भाजीचा नुसता वास घेऊनही घाम यायला लागतो.

पुण्यात शिकायला आल्यावर माझेही चवीमुळे बेकार हाल झाले होते. सगळीकडे गुळ / साखर. राग यायचा. आता सवयीने तेचं बरं वाटतंय. Proud

शेवटी जिथली तिथली संस्कृती वेगळी. तर तुम्ही लोकं येउद्या अजून !

जाऊ द्या कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफ़ी मागतो सपशेल _/\_ ,

चला आता आपण परत खाईन खाईन करुयात Happy

खाद्य यात्रा एकदम झणझणीत
लैच तिखट खाता तुम्ही लोक्स, वाचुनच घाम आला आंगावर. कधी तरी खायला मलाही आवडेल.

आमच्या कंपनीतला एक सहकारी नागपुर ला ऑफिस कामासाठी गेला होता तेथे त्याने साहूजी मसाल्याचे नॉन्व्हेज खाल्ले सलग दोन तिन दिवस चवही आवडली त्याला. परत पुण्यात आल्यावर तिसर्‍या दिवशी अ‍ॅडमीट केला, डॉ. ने सांगीतले की अतड्याला अल्सर झाले आहे. त्या नंतर जेव्हा परत नागपुर ला गेला तेव्हा दुध / दहि भातावर दिवस काढायचा तो

नंदा खरेंच्या अंताजीची बखरमधे नागपुरी जेवणाबद्दल उल्लेख आहे. त्यात त्याने तिखट प्रचंड आणि मीठाचा पत्ताच नाही म्हणलंय.
समुद्रापासून मिळणारे मीठ नागपुरापर्यंत पोचताना चैनीची गोष्ट होत असेल कदाचित पूर्वीच्या काळात. मग ते कॉम्पेनसेट करायला तिखट. मग तीच पद्धत झाली.
हो का रे चिन्मय? असं असू शकेल?

उष्ण प्रदेशात मसाले आणि तिखट यांचा वापर होतो कारण त्यामुळे घाम येतो आणि शरीराला थंडावा मिळतो. दुसरं असं की भाज्यांची कमतरता. तिखटामुळे भाज्या कमी लागतात. राजस्थानातही म्हणून लाल मिरच्यांचा वापर अधिक. आणि म्हणूनच मुगवड्या, किंवा डाळढोकळी असे पदार्थ दोन्ही प्रांतांमध्ये होतात.

उष्ण प्रदेशात मसाले आणि तिखट यांचा वापर होतो कारण त्यामुळे घाम येतो आणि शरीराला थंडावा मिळतो. >> हे आंध्र प्रदेश व तेलंगणा मध्ये पण आहे. हैद्राबादेतही खानदेशी प्रभाव आहे. रायलसीमा
रुचुलू व तेलंगण स्पेशल जेवण तिखट व आंबट. आम्बाडी ची चटणी, गोंगुर मटन तिखट व आंबट असते विजयवाड्याकडेही जेवण तिखट जहाल. वर मग शुद्ध तुपातली मिठाई.

सोन्याबापू तुमच्या पोस्ट छान आहेत.

धागा वाचायला छान आहे.

जळगाव मधिल खादाडी बद्दल कुठे विचारायच.
बाकी खादाडी बाफ वाचताना मजा येते मात्र!कोण्याही गावचे असेनात. ती शेगाव कचोरी तरी शोधुन खायला हवी आता . पुण्यात त्यातल्या त्यात ऑथेन्टीक कुठे मिळेल.
खरतर तो जाज्वल्ल्य वगैरे अभिमान कमी अन मनाच्या कोपर्‍यात असलेल्या आठवणी जास्त असतात.
मस्त वाटत अस कोणाच्या तरी आठवणीत डोकावायला.

आमची अज्जी म्हणायची कष्ट करणार्‍याने तिखट-मिठ खावे माणुस दणकट राह्तो.म्ह्णुन कदाचित कष्टकरी जास्त तिखट मिठ खातात व बैठे काम करणारे कींवा तो समाज कमी तिखट खात असावा.

पुण्यात त्यातल्या त्यात ऑथेन्टीक कुठे मिळेल.>>>
इन्ना, डेक्कन मेन बस स्टॉपजवळा शेगाव कचोरी मिळते, ती चांगली असते.

वर्हाड - विदर्भातल्या लोकांना 'आमचं नाही बा जमत तिखटावाचून, तुमचा पुचाट स्वयंपाक ठेवा तुमच्यापाशी' असा एक अहंगंड असतो. ह्यात कुठेतरी पट्टीचं तिखट खाणं लै भारी अशी भावना असते>> हे जनरली सगळीकडेच असाव बहुतेक.
सातारकर असो वा कोल्हापुरकर अनुभव तरी असाच आहे.
ते एक सोडा.
आम्ही कोल्हापुर शहरात रहायचो.
आणि आमचं मुळ गाव तिथुन जेमतेम २५ किमी.
गावाला गेल्यावर आमची सख्खी आज्जी आम्हाला "तुमी काय आमच्यासारखं तिखट खाताय" अशा टोन मध्ये बोलायची.

अरे मदे मदे चकवा लागला होता वाट्टे धाग्याले Proud

झकासराव,
इकडं पन खेड्यात हाच प्रकार चालतो..
तुमी का खासान आमच्यावाल्या भाज्या..हा हु कराले लागता न बाप्पा उल्लीस तिखट खाल्ल का.. Biggrin

ओ विदर्भवाले तुम्ही बोलत र्‍हा हो खादाडीबद्दल. तुमचं जेवान तिखट असू द्यात पण वाचायला ग्वाड लागतंय

आमच्याकडे कम्फर्ट फ़ूड म्हणुन शेंगोळे नावाचा एक प्रकार असतो, वरणफळाचं एक वर्शन समजा फ़क्त चकोल्यांचे चौकोन असतात त्याच्याजागी गोल गोल रिंग्स करतात पिठाच्या अगदीच पोटाला सौम्य खायचे असल्यास हेच शेंगोळे साध्या वरणात सोडतात व भरपुर जास्त तूप सोडुन खातात, पावसाळी संध्याकाळी किंवा ऐन डिसेम्बर च्या थंडीत हिट आइटम असतो हा घरो घरी, आमच्या आई चे माहेर सांगली जिल्ह्यातले आजोळी साधेवरण हा फ़क्त सणवाराला असलेला आइटम एरवी आमटी रोजच्या जेवणात असते (तसे आजकाल सगळीकड़े सगळे असते म्हणा) पण गुळाचा खड़ा सोडलेले साधे वरण अकोल्यात अन इन जनरल विदर्भात रोजच्या जेवणात मस्ट असलेली डिश आहे (आमचा जिल्हा भारतात सर्वाधिक तुरीचा पेरा अन उत्पादन असलेला जिल्हा आहे म्हणुन तसा आहार मुबलक तुरीमुळे डेवलप झाला असावा)

कम्फर्ट फ़ूड म्हणुन शेंगोळे नावाचा एक प्रकार असतो<< शंगोळे इथे हुलग्याच्या पिठाच्या करतात
माझा १ नं आवडता पदार्थ

शेंगोळे..
पावसाळी संध्याकाळी किंवा ऐन डिसेम्बर च्या थंडीत >> परफेक्ट.. माझ्याकडं बी शेम Proud
अरे व्वा..वरणात नै करत पण आम्ही..रश्श्यात करतो..पाकृ टाकावी का ?

शेंगोळ्यांची कृती आहे मायबोलीवर ऑलरेडी.

आद्य विळदघाटवासिनींनी लिहिलेली आहे बहुतेक.

पुण्यात त्यातल्या त्यात ऑथेन्टीक कुठे मिळेल.>>>
डेक्कन बस स्टॉपहून एक बारीक गल्ली नदीकडे जाते … त्या गल्लीत आहे. बार्बेक्यू नेशनच्या अपोझिट.

काय रसभरित झणझणीत चर्चा आहे.
सोन्याबापू आणि टीना आल्यापासून विदर्भाचा अनुशेष मायबोलीवर भरून निघालाय.
तुमची भाषा आणि पदार्थही वाचायला मस्तं वाटतायत.

वर्‍हाडी तिखटाची काय पाकृ असेल तर येऊ द्या.
सावजी तिखटाची आहे वाटतं माबोवर.

खानदेश ना जेवनाची खुप वैरायटी शे ना इन्ना जी?? लै सारे पदार्थ शे बिबड़े, भरीत, पोपटी , अजुन एक प्रसिद्ध डाळ बी शे ना (मामलेदाराची डाळ का फौजदार डाळ) त्येची रेसिपी टाका न!

आणि ती तुरीच्या कच्च्या (हिरव्या) दान्याची भाजी विसरले का बाप्पा!
मस्त टिपिकल भाषेत गप्पा आईकायले मिळून रहायला...

वत्सला,
तुरीचे बहोत व्हेरिव्शन आहेत नं Wink
तुरीच्या सोलाची आमटी ( हो इकडे फक्त या एकाच प्रकाराला आमटी म्हणतात ),
तुरीची कच्च्या दान्याची चटणी हिरवी मिरची लसुण टाकलेली,
उकळलेल्या शेंगा,
उकळलेल्या शेंगामधले दाणे काढून खलबत्त्यात कुटुन केलेली,
सोले वांगे,
सोले भात,
इत्यादी..

सावजी तिखटाची आहे वाटतं माबोवर.>>>

ह्या महिना अखेरीस नागपुरला जाणार आहे. तर मैत्रीण (मराठा) म्हणाली की येताना सावजीचे मसाले आणूया. मी (कोब्रा) म्हणाले की नको, आम्ही नॉन व्हेजमधे चिंच गुळ घालत नाही म्हणून नाहीतर त्यांचा तिखटपणाही तितपतच असतो Lol

क्रुपया कंसातल्या जातीवचक शब्दांना मजेतच घ्या.

हो ग यातले बरेच प्रकार खाल्ले आहेत आणि तिकडे अवांतर: तू उल्लेख केलेली बोंड आठवून तर एकदा रडूच आल होतं Lol मग पूर्वी (भारतात) शेजारी रहाणाऱ्या एका काकुन्ना फोन केला तर आधी माझा फोन एव्हध्या दिवसांनी आणि लांबुन आला म्हणून काकू ना रडू आवरेना..(या काकू आता रसुलाबादला असतात आणि आम्ही लहान असताना त्यांनी खुप माया लावली आहे.)

Pages