डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एअर ट्रॅफिक कंट्रोलर ATC पदांसाठी नोकरीच्या संधी.... निवृत्त लोकांना आवाहन.

आधी नोकरीवरून काढून टाका, नंतर (तथाकथित उच्च दर्जाचे) पुन्हा कामावर घ्या.

https://nypost.com/2025/02/27/business/elon-musk-begs-top-notch-air-traf...

हे ट्विटरसारखंच झालं की. ट्विटर मध्ये अंदाधुंद गोळीबार केला आणि मग त्याच लोकांना परत घेतलं.

अमेरिकेत अक्षरशः दररोज हवाईवाहतुक निगडीत दुर्घटना होते आहे किंवा अखेरच्या क्षणी टाळली जात आहे. सध्या अमेरिकेत हवाईप्रवास सुरक्षित तरी आहे का प्रश्न पडतो!

हवामान बदल दाखवणारी माहिती राजाने तडकाफडकी काढून टाकली. ह्या माहितीचा उपयोग शेतकरी दैनदिंन कामकाजाच्या नियोजनात करत होते. आपल्या बालबुद्धीला लगाम घालणं तर राजाला शक्यच नाही. आपलेच मतदार शेतकरी जाऊ दे ना का खड्डयात!
आता शेतकरी राजाला कोर्टात खेचत आहेत.

दृष्टीपूतं न्यसेत्पादम् , वस्त्रपूतं जलं पिबेत्।
शास्त्रपूतं वदेद्वाक्यम्, मन: पूतं समाचरेत्।।

>>ज्याच्या कडे ५ मिलिअन असतील तो मग इबी५ घेउनच येईल ना, १०पट पैसे फी म्हणून का भरेल? न्युटनच्या मांजरासाठी केलेल्या भिंतीतल्या भोकासारखे झाले हे. >>> हे सध्याचे इबी-५ रिप्लेस करणार असे वाचले.<< +१
ज्यांना अमेरिकेत यायचे आहे, ऐपत/कुवत आहे ते येतील. बाकिचे, इबी१-२-३ खेळ खेळत राहतील किंवा कॅनडा/मेक्सिको/भारतात जाउन ट्रंपच्या नांवाने बोटं मोडत बसतील..

झेलेंस्कि व्हाहा मधे आज येणार आहे. ट्रंपकडुन कुठल्याहि प्रकारची सिक्युरिटि गॅरंटि न घेता मिनर्ल्स डील साइन करणार आहे. आहे कि नाहि गंमत...

आहे कि नाहि गंमत... >> आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांनावर दादागिरी करण्यामधे कसली गंमत राज ? हिम्मत असेल तर रशियाला युक्रेनचा घेतलेला सगळा प्रदेश गुपचुप परत द्यायला लावून दाखवा किंवा चायनाला मकावचे सार्वभौमत्व मान्य करायला लावा की.

आज झेलेन्स्कीने राजाला आणि त्याच्या पिल्लाला त्याच्याच ऑफिसमधे बसून झाडले. झेलेन्क्सी म्हणाला राजाच्या कार्यकाळात पुतिन ने २५ वेळा प्रॉमिस मोडले. राजाला लगेच आपण पुतिन चे गुलाम आहोत हे आठवले आणि त्यानी आपल्या मालकाला डिफेंड करायचा प्रयत्न केला. पण झेलेन्स्की ने त्याला गप्प केले.

आजची झेलेन्स्की बरोबरची प्रेस् कॉन्फरंस बघा. बेस्ट वे टू स्टार्ट विकेंड विथ लॉट ऑफ लाफ्टर.

लॉग लिव्ह द किंग अँड हिज प्रेसिडेंट.

>>आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांनावर दादागिरी करण्यामधे कसली गंमत राज ? <<
अरे, मूळात मुद्दा सबळ्/दुर्बळ हा नाहिच आहे. तुला आठवत असेल (फर्स्ट टर्म कँपेनिंग) ट्रंप सुरुवाती पासुन सांगतोय, वी डोंट वांट टु बी वर्ल्ड पुलिस. इफ यु नीड अवर सपोर्ट, इट विल्बी ऑन अवर टर्म्स अँड यु हॅव टु पे फॉर इट. झेलेंस्किबरोबर जे डील होणार होतं, त्याच्याहि टर्म्स याच बेसिसवर ठरल्या होत्या. त्या मान्य नव्हत्या तर झेलेंस्कि ऑल द वे फ्रॉम किइव वरुन व्हाहा ला आलाच कशाला? हि कुड हॅव सेव्ड द ट्रिप, बट इन्टेड मेड ए माकरि ऑफ हिमसेल्फ...

इट साउंड्स लाइक ए फिंचर थ्रिल्लर. आय कॅन सी टु थिग्स हॅपनिंग..
१. झेलेंस्कि विल गेट इदर फाय्र्ड ऑर विल स्टेप डाउन
२. हि विल कम बॅक अँड अ‍ॅक्सेप्ट मोर स्ट्रिंजंट टर्म्स फ्रॉम ट्रंप अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

बाय्दवे, मार्च ४चा काउंट डाउन हि सुरु झालेला आहे...

ट्रम्प आणि व्हान्स २ मिडलस्कूलर बुली असावेत तसे बोलत होते! आपण कोणत्या पोझिशन ला आहोत , कुठे बसून बोलतोय कसलाच काही डेकोरम म्हणून नाही. काय तो तमाशा Uhoh शेमफुल !

अशा प्रकारची हार्ड निगोशिएशन्स पडद्यामागे नेहमीच होत असतात पण एखाद्या देशाच्या नेत्याला मीडियासमोर मानहानीकारकरीत्या धारेवर धरणे, अशा चर्चांमधे माजी अमेरिकन अध्यक्षांची हेटाळणी - या सगळ्याचे ऑप्टिक्स बेकार आहेत.

पण हे ऑप्टिक्स एक मिनिट बाजूला ठेवले, तर मूळ अटींपैकी झेलेन्स्कीला नक्की काय मान्य नाहीत? - सुरक्षेच्या गॅरंटीशिवाय त्याला सीझफायर मंजूर नाही, की इव्हन मिनरल्स चे डील?
- अमेरिकन सपोर्टशिवाय तो सीझफायर करायला तयार नसेल तर समजू शकतो
- पण आर्थिक मदतीची मिनरल्सच्या रूपात परतफेडही करायला तयार नसेल तर आडमुठेपणा आहे, तितकी निगोशिएशनची "कार्ड्स" त्याच्याकडे नाहीत.

ट्रम्प त्याला सीझफायर व मिनरल्स पैकी नक्की कसला आग्रह करतोय व त्याला मंजूर नाही ते नीट समजले नाही.

सुरक्षेची गॅरंटी देत नाही.
आणि दिली तरी अमेरिकेच्या गॅरंटीवर ती देणाऱ्याचा ही विश्वास दुसऱ्या सेकंदाला नसेल. रशियन शिकायला लागा तुम्ही लोक!

ह्यात काही लॉजिक वाटतं का?
ह्युमिलिएट आणि पुश करुन करुन काय वाट्टेल ते साईन करुन घेऊ जातोय कुठे हा फक्त हेतू आहे. त्यात निगोसिएशन नाहीतच. प्रेसिडेंट बसलेला असताना, दुसर्‍या देशाच्या लीडरला तू सूट घालून नाही आलास का? तुला परवडत नाही का हे प्रश्न विचारले जातात. ते अर्थात स्टेज्ड आहेत. पब्लिक ह्युमिलिएशन करणे हाच अजेंडा आहे .
रिअल अमेरिकन प्रेसिंडेंटला कधी विचारलं आहे का? की टँजरिन मॅन च्या ओव्हल ऑफिस मध्ये तू प्रेस ब्रिफिंग ते ही सूट न घालता कसं बाबा घेतोस?

ते जाहीरपणे होणे बेकार आहेच. काही वाद नाही. पण पडद्यामागे सगळी निगोशिएशन्स अशीच होत असतील.

मला प्रश्न आहे ते निगोशिएशन मुळात सीझफायर बद्दल होते की फक्त मिनरल्स बद्दल.

आणि दिली तरी अमेरिकेच्या गॅरंटीवर ती देणाऱ्याचा ही विश्वास दुसऱ्या सेकंदाला नसेल >>> Happy तू एकदम बनाना रिपब्लिकच करतोयस Happy नेटोच्या सदस्य देशांवर असे किती हल्ले झालेत? ट्रम्पवरचा राग ठीक आहे. पण अमेरिकेला एक लाइक बनतोच Wink

<<<अशा प्रकारची हार्ड निगोशिएशन्स पडद्यामागे नेहमीच होत असतात पण एखाद्या देशाच्या नेत्याला मीडियासमोर मानहानीकारकरीत्या धारेवर धरणे, अशा चर्चांमधे माजी अमेरिकन अध्यक्षांची हेटाळणी - या सगळ्याचे ऑप्टिक्स बेकार आहेत.>>>

+१

<<< पण आर्थिक मदतीची मिनरल्सच्या रूपात परतफेडही करायला तयार नसेल तर आडमुठेपणा आहे, तितकी निगोशिएशनची "कार्ड्स" त्याच्याकडे नाहीत.>>>>
हे नसावे कारण बेसिक गोष्टी दोन्ही बाजूंनी मान्य झाल्यावरच दौरा ठरला होता. मुद्दा सिक्युरिटीचाच असावा कारण मॅक्रॉ आणि स्टार्टर पण येऊन गेले.
झेलेंस्कि कडे निगोशिएटिंग पावर नाही त्यामुळे डील मध्ये तात्यांना झुकते माप मिळणार हे उघडच होतं पण त्याला साधी डिग्निटी मेन्टेन करता येईल इतकीही संधी न देऊन तात्यांनी नक्की काय मुत्सद्देगिरी साधली त्यांचं त्यांनाच ठाऊक.

USMCA ज्याने साईन केले तोच माणूस त्यातील टर्म्स लाथाडून हे वर ४ मार्च बुलिंग आहे ना ते करतोय. बाकी ट्रम्प बनाना असेल तर अमेरिका बनाना रिपब्लिक होईलच की. चेक्स आणि बॅलनसेस गळून पडले आता.

पुतीनची बाजू घ्यायला केलेला प्लॉट आहे. दुसरं काही नाही.
उदय, ओन्ली वन मॅन इन दि रूम. झेलेन्स्की!
सार्वभौम देशावर युद्ध लादलं, लचके तोडले, त्याचीं माणसं मारताहेत, तो त्याच्या देशासाठी लढतोय आणि या @#$ ला काय दिसतंय तर त्याचा सूट! आणि ट्रम्प आणि व्हॅन्स हसत आहेत! लाजिरवाणे आहे.

अमेरिकेची सॉफ्ट पॉवर रसातळाला नेण्याचा चंगच बांधल्यासारखे तात्याचे वर्तन आहे. फारेंड म्हणताहेत ते पटले. अमेरिकेने ट्रान्सॅक्शनल डिप्लोमसी वापरून युक्रेनकडून फायदे मिळवणे गैर नाही पण झेलेन्स्कीला असे चारचौघात अपमानीत करून काय साधले कळत नाही.

झेलेन्स्कीचा आक्षेप हा आहे की रशिया आणि अमेरिका एकत्र येऊन रशिया -युक्रेन युद्ध बद्दल वाटाघाटी करत आहेत, ज्या युक्रेनवर लादल्या जातील. हे कुठल्याही सार्वभौम देशाला मान्य होणार. भारत देखील काश्मीर प्रश्न इतर कुठल्या देशाच्या मध्यस्तीशिवाय सोडवण्याच्या बाजूने आहे.

ट्रम्प आणि व्हान्स २ मिडलस्कूलर बुली असावेत तसे बोलत होते! आपण कोणत्या पोझिशन ला आहोत , कुठे बसून बोलतोय कसलाच काही डेकोरम म्हणून नाही. काय तो तमाशा Uhoh शेमफुल !>> +१

वरती कीबोर्ड बडवायला धावलेल्यांपैकी किती जणांनी ती प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पहायची तसदी घेतली आहे?
पटापट आणि खरं खरं सांगा.

Pages