निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
साउथ आफ्रिकेची मदत रद्द
साउथ आफ्रिकेची मदत रद्द करण्याच्या मागे दिलेले कारण आणि आफ्रिकानर्स लोकांना असायलम देण्याची घोषणा धोक्याची घोषणा आहे. विशेषतः सर्व भारतीय ज्यांनी ट्रम्पला मतदान केले, पाठिंबा दिला.
आफ्रिकानर्सना असायलम देण्यामागे थेट ते कॉकेशियन वंशाचे गोरे आहेत म्हणून त्यांना असायलम देत आहेत हे दिसते आहे. गोर्यांनी पिढ्यान पिढ्या दक्षिण आफ्रिकेत जमिन मालमत्तेवर हक्क गाजवला. जमिनीचे पुनर्वाटप करताना ती मूळ निवासी ब्लॅक आफ्रिकनांना द्यायचे तिथल्या सरकारचे धोरण आहे जे न्याय्य आहे. ते कसे होत आहे, त्यात किती भ्रष्टाचार आहे या बाबी मान्य केल्या तरी केवळ तिथल्या गोर्या लोकांनी बेकायदेशीर रित्या राज्य करून बळकावलेली संपत्तिचे राखण करायला ट्रम्प तयार आहे. त्यांना असायलम द्यायला तयार आहे. आणि गरिबी, गुन्हेगारी इत्यादी पासून पळणार्या इतर देशातील लोकांना मात्र तो परत पाठवतो आहे. आणि त्याचे सर्व स्लो लर्नर गोर्या समर्थक याचे अगदी आनंदाने स्वागत करतील.
भारतियांविरुद्ध द्वेष
भारतियांविरुद्ध द्वेष नॉर्मलाईझ करा म्हणणार्या स्टाफरला मस्क ने एक्स वरती एक मजेशीर पोल चालवून, पोल मधे लोकांनी सांगितलं म्हणून त्या फक्त २५ वर्षांच्या नादान बालकाच्या चुका पोटात घालून परत डॉजी मधे घेतलं.
तो अजून एवढा लहान आहे की त्याचे सगळे रेसिस्ट स्टेटमेंट लोकांनी कानाडोळा करावे, पण ईतका पण लहान नाही की त्याला सगळ्या अमेरिकनांच्या सेंसिटीव डेटाला अक्सेस नाकारावा.
असो, तो त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एवढे घोटाळे बाहेर काढतोय, म्हणजे पोरात स्पार्क असला पाहीजे. आपल्याला काय कळतंय!!
टवणे सर, अजून एक गोष्ट नोटीस
टवणे सर, अजून एक गोष्ट नोटीस केलीत का? सगळे जे इल्लिगल मायग्रंट्स विमानं भरून परत पाठवले जातायेत, ते सगळे ब्राउन कातड्यांचे आहेत. बॉस्ट्न, न्युयॉर्क मधल्या काही ठरावीक नेबरहूड्स मधे जिथे बहुसंख्य आयरीश व इस्टर्न युरोपियन मायग्रंट्स रहातात तिथे आईस च्या धाडी पडल्याचं ऐकिवात नाही.
आता त्याचे स्लो लर्नर समर्थक म्हणतील त्या देशांमधून कोणीही इल्लिगल येत नाही. तसेच असेल कदाचीत, अन्यथा हे सरकार असं डिसक्रिमीनेशन करणं शक्यच नाही.
हा माझा दहा बारा
हा माझा दहा बारा वर्षांपूर्वीचा प्रत्यक्षदर्शी अनुभव: स्थळ - कॅलिफोर्नियातल्या हायवेला लागून असलेलं एक गाव. जेवायला म्हणून दुपारी उशिरा एका देशी रेस्टॉरंट मध्ये गेलो तर तिथे फक्त एक साधारण चाळीशीची सरदारीण मालकीण बाई होती. इतर एकही कस्टमर नव्हता. ऑर्डर घेता घेता बोलली की आज आमचे "हे" एक केटरिंग ची ऑर्डर पुरी करायला गेले आहेत. खरं तर मदतीसाठी माझा दीर इथे असला असता पण त्याला मेक्सिकोमधून बॉर्डर क्रॉस करून घुसताना पकडलंय . तो पंजाबमधून कुठल्या कुठल्या देशांतून जाऊन मेक्सिकोला पोहोचला आणि तिथून अमेरिकेत घुसताना पकडला गेला. आता पुढे काय म्हणून विचारल्यावर ती nonchalantly म्हणाली "लॉयर काम कर रहा है. अब उसका "पोल्टीकल" कर देंगे. दो हफतों मे इधर आ जायेगा."
"पोल्टीकल" = पोलिटिकल असायलम. आमच्यावर भारतात धार्मिक/सामाजिक/राजकीय अत्याचार होताहेत म्हणून आम्हाला इथे आश्रय द्या.
आमच्यावर भारतात धार्मिक
आमच्यावर भारतात धार्मिक/सामाजिक/राजकीय अत्याचार होताहेत म्हणून आम्हाला इथे आश्रय द्या. >>>>>
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
आमच्यावर भारतात धार्मिक
आमच्यावर भारतात धार्मिक/सामाजिक/राजकीय अत्याचार होताहेत म्हणून आम्हाला इथे आश्रय द्या.>>> असे चाळीस हजार applications आहेत आणि त्यातील अर्धे गुजरात्यांचे आहेत.
४१३३० भारतीयांनी अमेरिकेत
४१३३० भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मागितला होता. ५० % अर्जदार ( २०००० अधिक ) भारतातल्या गुजरात मधून आहे.
४१०००, कोणत्याही परिस्थितीत, संख्या खूप जास्त आहे.
पण गुजरातेत तर रामराज्य आहे
पण गुजरातेत तर रामराज्य आहे ना केव्हाचं?
धन्यवाद उदय
धन्यवाद उदय
इथे ही तोच प्रकार आहे.
इथे ही तोच प्रकार आहे. स्टुडंट म्हणून येतात आणि मग असायलमच्या रांगेत उभे रहातात. पोकळ बांबूचे फटके मारुन परत पाठवलं पाहिजे ह्या गुज्जू आणि सरदार लोकांना. चांगुलपणाचा फायदा घेण्यात देसी लोक ही पुढे असतात.
बाकी भारतातच रामराज्य आहे ना. भारताला सेफ नेशन का करत नाहीत?
आम्ही अमेरिकेला सेफ नेशनच्या यादीतून काढायचे नारे देणे चालू केले आहे ते अलाहिदा!
Gulf of Mexico चे Gulf of
Gulf of Mexico चे Gulf of America झाले? गुगल मॅप्सवर दिसतंय.
तुमच्या साठी झाले. आम्हाला
तुमच्या साठी झाले. आम्हाला गल्फ ऑफ मेक्सिको कंसात गल्फ ऑफ अमेरिका झालंय.
आम्हांला असं काही दिसेना गल्फ
गुगलमध्ये दिसतंय अमितव म्हणतोय तसं दिसतंय खरं. पण मॅप्स ऑफ वर्ल्डमध्ये असं काही दिसेना. उलट ग्रीनलँडच्या नावाखाली ठळक अक्षरात डेन्मार्क मात्र दिसायला लागलंय.
गूगल ने ब्लॅक हिस्ट्री मंथ,
गूगल ने ब्लॅक हिस्ट्री मंथ, प्राइड मंथ ह्याच्या नोंदी ही काढून टाकल्या. ते म्हणतात की हे आम्ही काय दोन चार सहा महिन्यापूर्वीच काढलं. कारण सांगत आहेत की हे सगळं हाताने करायला लागतं, एक माणूस बसवून कधी कुठला मंथ लिहावं लागतं.... फार काम वाढतं. ही दोन्ही वरची उदाहरणं स्टँडर्ड आणि गेली कित्येक वर्षे तशीच आहेत... त्यामुळे काय काम वाढतं ते सुंदर पिचाई जाणो.
आपण ताकभात खाऊ झालं.
>>> गूगल ने ब्लॅक हिस्ट्री
>>> गूगल ने ब्लॅक हिस्ट्री मंथ, प्राइड मंथ ह्याच्या नोंदी ही काढून टाकल्या
हो! मला आता 'हॅन्डमेड्स टेल्स'सारख्या सगळ्या डिस्टोपियन नॉव्हेल्स आठवायला लागल्यात... क्रेझी!
त्यामुळे काय काम वाढतं ते
त्यामुळे काय काम वाढतं ते सुंदर पिचाई जाणो. > तोच करत असेल बसून बापडा हि कामे
सगळा मूर्खांचा बाजार आहे. अमेरिका फर्स्ट च्या बोंबा मारताना गाझात जाऊन बसायच्या गोष्टी सुरू झाल्या. मूळात गाझाचा प्रश्न निर्माण करणारे पण हेच (अमेरिका - ब्रिटन) होते हा भाग आपण सोयीस्करपणे विसरून जायचा.
आज लोकसत्तेत आलेला लेख.https:
आज लोकसत्तेत आलेला लेख.
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/delhi-election-bjp-budget-fi...
अमेरिका बेकायदेशीर भारतीयांना
अमेरिका बेकायदेशीर भारतीयांना कोस्टा रिका आणि ग्वाटेमाला येथे पाठवेल --- पण आता नागरी विमानाने.
https://timesofindia.indiatimes.com/world/us/costa-rica-offers-to-receiv...
वर पनामा लिहायाचे राहिले होते
वर पनामा लिहायाचे राहिले होते.
"HELP"
https://www.tribuneindia.com/news/diaspora/help-messages-from-windows-in...
चांगली बातमी. आता त्यांना
चांगली बातमी. आता त्यांना हातापायात बेड्या न बांधता, थाटात घरी जाता येईल किंवा शक्य झाले तर दक्षिण अमेरिकेत फरार होता येईल.
>>आज लोकसत्तेत आलेला लेख.<<
>>आज लोकसत्तेत आलेला लेख.<<
अतिशय विनोदि लेख. एखाद्या गोष्टिचा काँटेक्स्ट किंवा त्यामागची पार्श्वभूमी जाणुन न घेता मत व्यक्त केलं कि विनोदनिर्मिती होते. लोकसत्तेच्याच कुबेरांनी याचा पायंडा पाडलेला आहे. असो...
ज्या गोष्टीची भिती होती तेच
ज्या गोष्टीची भिती होती तेच होतंय. भगवंत मान यांनी डिक्लेअर केलं की यातील योग्य व्यक्तींना सरकारी नोकरीत सामावून घेतलं जाईल, जसं काय भारतात सुयोग्य व कुठलाही गुन्हा न करणाऱ्या, अवैध मार्ग न चोखाळणाऱ्या लोकांचा तुटवडा पडलाय.
अखिलेश यादवांनी मागणी केलीय
अखिलेश यादवांनी मागणी केलीय की, त्या लोकांना सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे.
मज्जा!
आज लोकसत्तेत आलेला लेख.https:
आज लोकसत्तेत आलेला लेख.
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/delhi-election-bjp-budget-fi...>>>>>>लेखाच्या लेखकामते बेड्या घालून पाठवले जाणारे भारतीय कायदा मोडून अमेरिकेत गेले असले, तरी त्यामागील त्यांची प्रेरणा आपल्यासारखीच आर्थिक समृद्धीची आहे याची जाणीव या लोकांना का नसावी>>>> हे कितपत तार्किक कसोटीवर उतरतेय?? या जगात प्रत्येक गुन्हेगार जो जो गुन्हा करतो, तो तो मुलत: आर्थिक समृद्धीच्याच प्रेरणेतून केलेला असतो....या न्यायाने जगात एकही गुन्हेगार शोधूनही सापडणार नाही आणि जे तिथे या प्रेरणेतून अनधिकृतरित्या गेले त्याच्या कितीतरी पट येथे भारतात आहेत, उद्या जर त्यासर्वांनीही तोच मार्ग अवलंबला तर ते समर्थनीय असणार आहे का?? बाकी अभिजनवादाचा मुद्दा काही प्रमाणात बरोबर आहे परंतू या वर्गांतील खालच्या आर्थिक स्तरातील लोकांवर पडणाऱ्या कराच्या बोज्याचा आणि त्यांना त्या बदल्यात मिळणाऱ्या नागरी सुविधांच्या गुणोत्तराचा सरसकट काहीच विचार न करणे अथवा त्या वचे भाष्य सोईस्कर रित्या टाळणे हे कितपत नैसर्गिक न्यायल धरुन आहे??
अतिशय विनोदि लेख. एखाद्या
अतिशय विनोदि लेख. एखाद्या गोष्टिचा काँटेक्स्ट किंवा त्यामागची पार्श्वभूमी जाणुन न घेता मत व्यक्त केलं कि विनोदनिर्मिती होते. >> + १
नॅशनल पार्क आता हळूहळू बंदच
नॅशनल पार्क आता हळूहळू बंदच होणार!
ऑईल अॅड गॅससाठी खड्डे खणायला रान मोकळं.
उगा समरला तिकिटं बुक करू नका.
आजची गंमत!
आजची गंमत!
“CONGESTION PRICING IS DEAD. Manhattan, and all of New York, is SAVED. LONG LIVE THE KING!” Trump posted on social media.
पण अमरीका के सब से बडे पेपर
पण अमरीका के सब से बडे पेपर न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार कन्जेशन प्राइसिंग डेड झालेलं नाही अजून.
होचुलने नम्रपणे कोर्टात भेटू म्हटलंय किंगला.
तात्याराजेंचे ट्वीट्स कोण लिहितं हल्ली बाकी? कवाफी कुठे गेल्या?
नम्रपणे कोर्टात भेटू >>
नम्रपणे कोर्टात भेटू >> नम्रपणे! ऑरेंज किंग! ह्म्म्म!
Pages