गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोकरांचा ववि वर्ल्डफेमस हाय राव. आपला पण ववि व्हायलाच हवा. आपण पण माबोकरच आहोत.

ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू, सिंबा, हॅरी, कोकोनट

IMG_20240909_174705.jpg

ऋतुराज Lol Lol

धातू रुपावली - इथे तु ऱ्हस्व आणि रू दीर्घ पाहिजे Wink

नोबिता एकसे एक बढकर सुचतायत तुम्हाला. लगे रहो. खूप सुंदर.

हपा खतरनाक Happy

सामी, ऋतुराज यांच्यावरचा पाहून खो खो हसते आहे.

ऋतुराज विपू पहाण्याची गर्दी Lol Lol

ओडीन, माऊई, ऑस्कर, फुंतरू, सिंबा, हॅरी, कोकोनट
हम सात सात और नाम सिर्फ छः ?

नाव वगळलेल्या खंडूचा प्रतिसाद.
सर्व माबोकरांचे (नोबिता१ नाव खोडून) धन्यवाद.

>>>>>>>>>>.ते मॅप घेऊन लेखन करणारा कोण?
ती रायगड Happy मस्त ऐतिहासिक फिक्शन लेख लिहीलाय त्यांनी

उफ, राहिला का कुणी भुभू. बोलवू त्यालाही.

टीव्ही वर पिक्चर बघणारे अस्मिता, फा आणि र आ.
(कृष्णधवल छायाचित्र म्हणजे
तिघांच्या मन:चक्षूसमोर असणारा अदृश्य टिव्ही )

IMG_20240909_183810.jpg

सर्व मिम्स डेंजर आहेत Happy
नोबिता धन्यवाद धन्यवाद प्रेमाच्या शब्दांबद्दल.
मांजराला कुत्री, तर कुत्रीला गाढविण वगैरे म्हणता येईल Happy

@सामी ...... Biggrin
तुमचा चकल्याचा मिम्सचा साचा द्या की मला.
@ हरपा
इथे तु ऱ्हस्व आणि रू दीर्घ पाहिजे>>>>> ते मुद्दाम लिहिलं आहे, तुम्ही पाहावं म्हणून Wink

@ नोबिता 1
पिसे वाला आवडला...भारीच

@ स्वरूप
IMG_20240909_192614.jpg

त्यासाठी ववि ला कशाला जायला पाहिजे, माबोचा अभ्यास कमी पडतोय.

Pages