गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:12

नमस्कार मंडळी,

कसे काय? मजेत आहात ना सगळे?

तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.

पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!

चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अ‍ॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)

मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.

१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Short Form.jpg

मायबोलीवर नियमितपणे वापरली जाणारी लघुरूपे. तीन खंडात सवलतीत उपलब्ध (अर्थासहित): त्वरा करा

काय जबरदस्त मिम्स आहेत!! सृजनशीलतेला बहर आला आहे.हे वाक्य लिहिताना गुगल ने इतके ऑटो करेक्ट केले की काहीतरी अर्थाचा अनर्थ होणार होता.

ऋतुराजने टाकलेला आणि सामीने ऋतुराजवर टाकलेला…..

दोन्ही मीम्स मस्त जमलेत….

असाच मीम सांसच्या वेळेसचा ऋतुराज व रेन डान्सच्या वेळेसचा ऋतुराज चा पण बनवता येईल….०

@ स्वरूप, भारीच. धादांत खोटे.
@ कविन - जबरी, कोणी आले नाही तर आहेच मी Biggrin
@ सामी,
आवडलं, भारी आहेत फोटो Wink

असाच मीम सांसच्या वेळेसचा ऋतुराज व रेन डान्सच्या वेळेसचा ऋतुराज चा पण बनवता येईल>>>> हे बनवण्याचे कष्ट घ्या.

नंतर आलेले मीम्स पण भारी Lol
मोदक वाला एकदम सही. Rofl

चुरचुरीत लेखा वरून एकच माबोकर/ईण आठवला/ली. मांजरांवरून काही ट्यूब नाही लागली.

OIG1_0.jpg

images (7).jpeg

सगळी meems धम्माल.
हे मीम माझ्या आवडत्या लेखिकेसाठी. Light 1 घ्यालच.
IMG_20240909_173029.jpg

असाच मीम सांसच्या वेळेसचा ऋतुराज व रेन डान्सच्या वेळेसचा ऋतुराज चा पण बनवता येईल>>>> हे बनवण्याचे कष्ट घ्या. >>>> नेकी और पूछ पूछ

सांस्कृतिक कार्यक्रमात पटापट उत्तर देणारा ऋतुराज
rutu-smart.gif

रेन डान्सच्या वेळेसचा ऋतुराज
rutu-raindance.gif

Pages