साहित्य - तांबाटे (टोमॅटो उच्चारले तर फाऊल), फिश करी मसाला किंवा साधी मिरची पावडर, धना, बडीशेप, हळद, आलंलसूण पेस्ट, कोथींबीर, पुदिना, कांदा, खोबरे, तेल, लसूण आणि आमच्या कोकणची शान कोकम!
तांबाट्याचे सार - टोमॅटो सार !
सारभात आणि मासे
या लेखावर ईथे बरेच जणांनी साराची रेसिपी मागितली होती. जे साहजिकच होते. पण मला स्वयंपाकातले ज्ञान शून्य. मी मुख्यत्वे इथे नेत्रसुख घ्यायला येतो. खाद्यपदार्थांचे चमचमीत फोटो बघतो आणि तृप्त होतो. काही वाचायचे झाल्यास पाककृती सोडून इतर सारे वाचतो.
बरे आईला फोन करून विचारले पाककृती देशील का? तर ती माऊली बिचारी टेन्शनमध्ये आली. म्हणाली, बाबा मला ते प्रमाण वगैरे सांगता येणार नाही.. त्यापेक्षा तू ये, तू बघ, आणि तू लिही.
तर मी गेलो, मी बघितले, आणि जमेल तितके समजून घ्यायच्या भानगडीत न पडता पुरेसे फोटो काढून पाककृती सादर करत आहे.
स्थळ - आईचे घर आणि पुरुषाचे माहेर.
काळ - निवांत सुट्टी उपभोगायचा.
वेळ - कडकडून भूक लागायच्या जर्रा आधीची..
साहित्य - वर दिले आहे. आता पाकृ सुरू करूया
१) सर्वप्रथम फोटो क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे एका ताटात खोबरे, कांदा, कोथिंबीर, पुदिना, आले लसूण पेस्ट आणि फिश करी मसाला घ्यावा.
२) जर फिशचा मसाला असेल तर प्रश्नच मिटला. पण जर साधी मिरची पावडर असेल तर आई त्यात धना, बडीशेप, हळद टाकते.
संदर्भासाठी रेडीमेड फिश करी मसाल्याच्या पाकिटाचा फोटो टाकला आहे. त्यावर लिहिल्या प्रमाणे त्यात, Chilly, Turmeric, Coriander seeds, Fennel seeds, common salt हे Ingredients आहेत. आई हेच पदार्थ मराठीत टाकते.
३) आता हा सगळा मालमसाला मिक्सरमधून फिरवून आणावा. त्याचेही फोटो शेअर केले आहेत पण फोटोच्या रंगावर जाऊ नका. कारण मिक्सर राईडचे दोन राऊंड घ्यावे लागले. एकात मसाला कमी गेला आणि एकात जास्त. त्यामुळे एकात तांबडे फुटायच्या जस्ट आधीची शेड आली आहे तर दुसर्यात लाली पसरली आहे.
४) त्यानंतर आली फोडणी. टोपात तेल. तेलात लसूण आणि कडीपत्ता. तो तडतडला की त्यात मिक्सरमधील वाटण. मिक्सरचे भांडे पाणी घालून छान विसळून घ्यावे. मागाहून येईल मीठ.
५) हे सारे प्रकरण कढ येईपर्यंत शिजवले की झाले. चव घेऊन काही कमी जास्त असेल तर ऍडजस्ट करायचे आणि सार तय्यार.
.
.
.
.
.
.
.
.
.
१) फिश सार असेल तर तिखट जास्त. तांबाटे कमी. पण त्या जागी कोकम कम्पलसरी.
२) तांबाट्याच्या सारात कोकम गरजेनुसार. चव घेऊन तांबाट्यांचा आंबटपणा कितपत आहे यावर त्याचे प्रमाण ठरवावे.
३) फोटो जरा जास्त शेअर करतोय. याचे एक कारण म्हणजे प्रत्येक फोटोत रंग थोडा वेगवेगळा भासत होता. तुम्ही एवरेज काढाल.
४) दुसरे कारण म्हणजे माझ्या आईला रेसिपी सांगता येत नाही की मला ती लिहीता येत नाही. त्यामुळे सुज्ञ लोकं फोटो बघून गाळलेल्या जागा भरतील.
तसेही कोणीतरी म्हटलेच आहे. चित्र नव्हे मित्र.
५) कोणाची काही query असेल तर ती २४ तासांच्या आत काही resolve होणार नाही याची नोंद घ्यावी. कारण मला बारक्यातल्या बारक्या प्रश्नासाठी सुद्धा आईलाच फोन करावा लागणार. त्यामुळे प्रतिसादातच सर्वांनी एकमेकांना उत्तरे देता येईल का हे बघा.
६) तपशीलवार मोजमापासह पाककृती देता आली नाही याबद्दल दिलगीर आहे. पण या बदल्यात मी एक करू शकतो. तुम्ही जेव्हा सारभात बनवाल तेव्हा तुमच्या घरी येऊन चव चाखून ते कसे झाले आहे हे सांगू शकतो. आणि याबद्दल मी कुठलेही व्हिजिटिंग चार्ज घेणार नाही. फक्त तोंडी लावायला माश्याच्या दोन तुकड्या तेवढ्या तळा. शाकाहारी असाल तर कांदाबटाटा भजी आणि अंडाहारी असाल तर आम्लेट चालेल.
टीपा थोड्या लांबलेल्या आहेत. पण त्यात टेपा मारलेल्या नाही आहेत.
तुमचा श्रावण देखील गणपतीपर्यंत लांबणार असेल तर तांबाट्याचे सार करून बघायला हरकत नाही
धन्यवाद,
तुमचा अभिषेक
फोटो आणी क्रुती दोन्ही छान
फोटो आणी क्रुती दोन्ही छान आहेत...झणझणीत होत असणार हे सार.
शेवटचा तळलेल्या तुकडि बरोबरचा फोटो एकदम टेम्टिन्ग
कृती काही समजत नाहीये नीट!
कृती काही समजत नाहीये नीट!
कोकम कधी टाकायचे? आणि तांबाटे उकडून घ्यायचे की कसे..काहीच लिहिले नाही!
छान आहे कृती... आई ही छान
छान आहे कृती... आई ही छान दिसतेय तुझी ऋ ...
होय आईंचा फोटो सुंदर आलाय.
होय आईंचा फोटो सुंदर आलाय. छान दिसतायत त्या.
प्राजक्ता, ममोताई धन्यवाद.
प्राजक्ता, ममोताई धन्यवाद.
प्राजक्ता हो, झणझणीत आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आणि ते सूट होते याच्या चवीला.
सामो धन्यवाद आणि हो, आई तिच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील हिरोईन सारखी होती जे फेसबूक लिस्टीत असतील त्यांनी पाहिला असावा फोटो.
प्राजक्ता, ममोताई धन्यवाद.
@ छल्ला, हो पाकृ लिहायचा अनुभव नाही. तरी जमेल तशी उत्तरे देतो.
तांबाटे मिक्सरमध्येच सर्व मालमसाल्या सोबत जातील. कोकम बहुधा उकळी यायच्या वेळी टाकले जात असावेत. वरच्या सारात आहेत आणि मी ते आईला टाकताना पाहिले नाही. म्हणजे तिने नंतर टाकले असावेत. माझे फोटो सेशन उरकल्यावर. इथे कोणी इतरांनी कन्फर्म करावे किंवा मी उद्या आईला विचारून कळवतो नक्की
फोटो छान आहे.
फोटो छान आहे.
>>>>>.सामो धन्यवाद आणि हो, आई
>>>>>.सामो धन्यवाद आणि हो, आई तिच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील हिरोईन सारखी होती
माय मॉम टु
(No subject)
आई हेच पदार्थ मराठीत टाकते.>>
आई हेच पदार्थ मराठीत टाकते.>>>>
छान लिहिले आहे ऋ, फोटोही एकापेक्षा एक आहेत. पाककृती मस्तच आहे. फिश करी मसाला आणून करून बघणार नक्की.
आईंना /\
आई हेच पदार्थ मराठीत टाकते.>>
आई हेच पदार्थ मराठीत टाकते.>>> हे खूप आवडलं
कृती टाकल्याबद्दल तुला आणि सांगितल्याबद्दल काकूंना धन्यवाद! घरात मालवणी फिश करी मसाला आहे एक, तो घालून करून सार पाहण्यात येईल.
मस्त लिहिली आहे पाकृ.
मस्त लिहिली आहे पाकृ.
काकू किती cute आहेत.
लाळेने भिजलेला कीबोर्ड ...
लाळेने भिजलेला कीबोर्ड ... त्या फीश मसाल्यामुळे झण्झणीत टेस्ट येत असणार. तुकड्या & भज्जी पण मस्त दिसत आहेत. यम्म्म.
आम्ही टोमॅटो हाफ उकडून घेतो, वर ह्या कृतीत टो. कच्चा बारीक कापलेला दिसत आहे, मग मिक्सर मधे सर्व टाकले असावे.
धन्यवाद, अस्मिता, रमड, किल्ली
धन्यवाद, अस्मिता, रमड, किल्ली आशू
नक्की करून बघा. या रविवारी सकाळी रेसिपी लिहिली आणि त्याच दिवशी दोन जणांनी आणि काल अजून एकानी या पद्धतीने करून चांगले फीडबॅक सुद्धा दिले. खाली त्यातला एक शेअर करतो. धागा माझा असला तरी रेसिपी आईची आहे. करून बघणे सेफ आहे
पहिल्यांदा मी लेखापलीकडे जाऊन पाककृती म्हणून काही शेअर केले आणि ते कोणी करून बघतेय याचेच फार छान वाटतेय
छान दिसते आहे. टोमेटो सूप
छान दिसते आहे. टोमेटो सूप जमते करायला तर हे सार जमेल असे वाटते.
छान आहे पाक कृती .
छान आहे पाक कृती .
मी ही अश्याच पद्धतीने करते . फक्त टोमॅटो आधी उकडून घेते . आणि फोडणीत राई टाकते .
माझ्या गणितच्या सरानी फोडणीत त्रिफळ टाकायला सांगितलेले. ते पण एकदा करुन बघितले . तेव्हापासून ते ही फोडणीसाठी वापरतेच
मला वाटते टोमॅटोचे सार हा कोकणवासीयाच्या घरातील कॉमन फॅक्टर असावा
फोटो आणि पाककृती दोन्ही छान.
फोटो आणि पाककृती दोन्ही छान.
त्रिफळ की तिरफळ
त्रिफळ की तिरफळ
मस्त दिसतेय सार. लवकरच करुन
मस्त दिसतेय सार. लवकरच करुन बघेन (कदाचित आजच. सगळे घटक पदार्थ आहेतच घरी. तुला व्हॉट्स अॅप करेन जर बरे जमले तर )
ऋ, पाकृ छान दिसतेय. लेकासाठी
ऋ, पाकृ छान दिसतेय. लेकासाठी खास त्याच्या आवडीचा पदार्थ करतानाची तन्मयता खूप भावली. ताईंना माझा नमस्कार पोचव.
मस्त रेसिपी. माझ्याकडे काल
मस्त रेसिपी. माझ्याकडे काल गॅस लागला आहे. झेप्टे वर सर्च करते मालवणी फिश मसाला. करु पाहीन. मम्मी फारच क्युट. त्यांच्या रेसीपी टाकून त्याची एक सिरीज करा.
धन्यवाद आणि आभार सर्व नवीन
धन्यवाद आणि आभार सर्व नवीन प्रतिसाद!
मंजूताई.. पोहोचवतो _/\_
कविन, तुला व्हॉट्स अॅप करेन जर बरे जमले तर .... आणि नाही जमले तर तोच टोप घेऊन घरीच जा माझ्या आणि विचारा आईलाच यात काय चुकले ते
अमा, सिरीजची कल्पना छान. जरूर विचार करतो यावर. निदान तिच्या हातचे माझ्या आवडीचे पदार्थ तरी घेतो. माझा सगळीकडून फायदाच आहे यात
आणि नाही जमले तर तोच टोप घेऊन
आणि नाही जमले तर तोच टोप घेऊन घरीच जा माझ्या आणि विचारा आईलाच यात काय चुकले ते Proud>> हि आयडीया चांगली आहे. तुझ्या आईचाच नंबर दे. ही रेसिपी तर जमली आज मला पण फिशची व्हरायटी त्यांच्याकडून शिकायला आवडेल मला.
हो नंबर देतो.. कधी मी तिथे
हो नंबर देतो.. कधी मी तिथे असताना घरी या, म्हणजे भेटही घालून देतो
छान पाकृ आणि फोटो!
छान पाकृ आणि फोटो!
ऋन्मेष, तुमच्या आईंचा फोटो खूप आवडला. त्यांना धन्यवाद कळवा पाकृबद्दल.
सिरीजची कल्पना छान. जरूर
सिरीजची कल्पना छान. जरूर विचार करतो यावर.>>> आजकाल मध्य पिढी आपल्या आई/आजी च्या हातचे पदार्थ नामशेष होऊ नयेत या साठी युट्युब चॅनल काढून त्यावर त्या पाकृ टाकून ठेवतात. व्ह्युवर & लाईक मधून इनकम पण होते आणि पदार्थ ४ लोकांपर्यंत पोहोचतो पण.
एक उदाहरण म्हणून घरचा स्वाद चॅनल बघ. त्या काकी पण मस्त कालवण, फीश फ्राय, बोंबील, सुक्क चिकन वगैरे करतात. हातात हिरवा चुडा घालून मी नेहमी फॉलो करते काही कोकणी व्हेज्/नॉनव्हेज बनवायचे असले तर.
पाककृती छान. करून पाहीन. फोटो
पाककृती छान. करून पाहीन. फोटो पण मस्त आहेत
भन्नाट पाककृती आहे. नक्की
भन्नाट पाककृती आहे. नक्की करून बघणार
स्वाती, ऋतुराज, धनि धन्यवाद
स्वाती, ऋतुराज, धनि धन्यवाद
आशू ओके.. चेक करतो
Gharcha swad is awesome
Gharcha swad is awesome channel. Very complex and authentic recipes. Bombil rolls and stuffed squid very yummy
Pages