२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाल्झलाच निवडावा असे मलाही वाटत होते. मागच्या पानावर मी लिहीलेही होते. मस्त बोलतो तो. कोठेही आक्रस्ताळी न होता यांचे हल्ले परतवतो.

त्याच्या ४-५ क्लिप्स पाहिल्या आहेत. मुख्य म्हणजे डेम्स्/लिबरल साइडचे चे मुद्दे आहेत ते भोंगळपणे न मांडता सामान्य माणसाला समजतील असे मांडतो. शिक्षक, नॅशनल गार्ड मधे काम, फुटबॉल कोच, गव्हर्नर म्हणून अनुभव! बोलताना असे वाटेल की तुमच्या ऑफिसमधला एखादा तेथून काम करणारा माणूस बोलतोय.

टँपॉन टिम Happy

पण "नाइस ट्राय" म्हणून हसण्यापलीकडे त्यात काही नाही. त्यात वॉल्झ कडेही अशा टर्म्स व वन लाइनर्स भरपूर आहेत वार परतवायला.

मी २-३ आठवड्यांपूर्वी त्याची एक मुलाखत ऐकली तेव्हापासूनच वाटत होते की यालाच निवडावा. डेम्सच्या सभांमधे एकदम एक एनर्जी दिसायला लागली आहे.

फॉक्सने उषा व्हान्सची मुलाखत घेतली "लिबरल" लोक काय बोलत आहेत याबद्दल. अशीच एक मुलाखत मागावाले तिच्याबद्दल काय बोलत आहेत याबद्दलही घ्या म्हणावे Happy

बाकी तात्याला अजूनही "प्रेत" हॉण्ट करत आहे असे दिसते.

डेम्सच्या सभा बघत आहात का लोकहो? काय जबरदस्त एनर्जी आहे! मधल्या काळात डेम्सच्या सभा म्हणजे काहीतरी जडगंभीर, सामान्य माणसापासून फटकून असलेले मुद्दे वगैरे असे वाटायचे. यांच्या बोअरिंग राजकीय मेसेजपेक्षा त्यांच्या एण्टरटेनिंग थापा बघायला मजा येत असे Happy पण वॉल्झ जी लिबरल व्हिजन अगदी सोप्या शब्दांत मांडतो ते अफलातून आहे. त्यात सहज विनोदाची पेरणी. गावातील सर्वांना माहीत असलेला स्थानिक नेता ओळखीच्या लोकांशी बोलतोय अशा थाटात तो दहा दहा हजार लोकांना पूर्ण एंगेज करतोय. बघाच. ट्रम्प व व्हान्सला मस्त कोपरखळ्या मारतो.

कालचे अ‍ॅरिझोना मधले भाषण
https://www.youtube.com/watch?v=B9po-19rvd4

आणि तिकडे तात्या साहेब आपली सभा मार्टिन ल्यूथर किंग ज्यु पेक्षा कशी मोठी होती यावर पाच पाच मिनिटे घालवतात Happy

अमेरिकेतील निवडणुकांचा आणि माझा तसा काही अर्थाअर्थी सबंध नाही . पण आय एम मिसिंग शेंडेजी हिअर. त्यांचे प्रतिसाद वाचताना करमणूक होते . म्हातारबा काय , प्रेत काय ! मनोरंजनाची फुल गॅरेंटी ! Biggrin

बाकी तात्याला अजूनही "प्रेत" हॉण्ट करत आहे असे दिसते. >> Lol

तात्याच्या सगळ्या सभा 'जगबुडि येऊन राहिल्ये' ह्या थाटाच्या किंवा 'आमच्या गावाकडची सर नाही' ह्या मोडमधे असतात,. बाकी सगळा असंबंद्ध व्हर्बल डायरिया असतो.

<<पण आय एम मिसिंग शेंडेजी हिअर. त्यांचे प्रतिसाद वाचताना करमणूक होते .>>
+१.
शेंडे, अहो या ना, तुमच्याशिवाय मजा नाही इथे.
पण त्यांना अजूनही "प्रेत" हॉण्ट करत आहे असे दिसते

ट्रंप च्या एक्स इन्टरव्ह्यूच्या वेळी DDOS attack हे आज फार मजेशीर प्रकरण झालेलं आहे. एकाच वेळि ट्रंप चा पोपट आणि इलॉन मस्क वर ह्यूमिलिएशन ची वेळ आली!! कुणी बरे केले असेल हे?! Proud

<< कुणी बरे केले असेल हे?! >>

------ कुठलाही पुरावा समोर नसतांना, छातीठोक पणे केवळ एकच व्यक्ती सांगू शकेल. Happy

उपराष्ट्रपती ( वर राष्ट्रपती शब्द आलेला आहे म्हणून हा चालावा) पदासाठीचे उमेदवार जाहिर झाल्यापासून शेंडे नक्षत्रांनी त्यांचे मौलिक विचार मांडलेले नाहीत. कमला बद्दल माहिती गोळा करत असतांना येथे कमालीची शांतता आता सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे. Happy

Musk चे आणि त्याच्या x चे रेकॉर्ड अबाधित. मिटबॉल रॉनने सुद्धा आपले प्रेसिडेंशियल कॅम्पेन X वर ट्विटर स्पेस वर घोषित केलेले . तिथेपण बोंब झालेली.

मिटबॉल रॉनने सुद्धा आपले प्रेसिडेंशियल कॅम्पेन X वर ट्विटर स्पेस वर घोषित केलेले . तिथेपण बोंब झालेली. >> नि तात्याने त्यावरून त्याची चेष्टा केली होती Lol

तात्याला मदत करायला फॉक्स वाले कमला बद्दल काय काय मुद्दे उकरायचा प्रयत्न करतात ते टोटल धमाल आहे. अजूनही काही सापडलेले दिसत नाही. एक दोघे तर तिचे वर्णन असे करत होते की त्यांना वाटत होते ते टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात डेम्स साइडच्या लोकांना ती स्तुती वाटेल Happy

आता निकी पासून ते बिल ओ रायली पर्यंत सगळे सांगत आहेत की सभांच्या साइज बद्दल बोलू नका, मुद्द्याचे बोला. तात्या ऐकतो का बघू.

त्यात त्याने (सॅन फ्रान्सिस्कोचा माजी मेयर, व ज्याच्याबरोबर कमला हॅरिस रिलेशनशिपमधे होती) विली ब्राउन च्या बरोबर एकदा हेलिकॉप्टर मधे काही ऐकले म्हणून एक टोटल फेक ष्टोरी तयार केली. नंतर पब्लिकने शोधल्यावर लक्षात आले की विली ब्राउन त्याच्याबरोबर कधीच हेलिकॉप्टर मधे नव्हता. (कॅलिफोर्नियाचा माजी गव्हर्नर) जेरी ब्राउन होता पण ती हेलिकॉप्टर ट्रिप वेगळी. मग लॉस एंजेलिस मधला एक नेट होल्डन नावाचा कोणीतरी पुढे आला व त्याने तो त्यावेळेस ट्रम्पबरोबर होता असा खुलासा केला. तात्याशी तेव्हा संबंधित असलेल्या लोकांनी ते कन्फर्म केले. त्याबद्दल त्या नेट होल्डनची कॉमेण्ट अफलातून धमाल आहे Happy

अर्थात कोणतेही वक्तव्य कधीही मागे घ्यायचे नाही या तात्यालॉजिक नुसार त्याने त्यावर डबल डाउन केले आहे आणि याबद्दल कोर्टात केस आणणार म्हणे. २०२० च्या निवडणुकीच्या केसेस सारखाच "सज्ज्ड" पुरावा असेल त्याच्याकडे.

सर्वात विनोदी पार्ट हा आहे की या सगळ्याचा संदर्भ इतकाच आहे की तेव्हा ट्रम्पला म्हणे विली ब्राउनने तिच्याबद्दल काय काय "टेरिबल" सांगितले होते Happy

Happy आणि फॉक्स वाले काल हे ही सांगत होते की डेम्स चे कॅम्पेन "लाइज" वर आधारित आहे Happy अगदी निर्विकारपणे सांगत होते Happy

एक दोघे तर तिचे वर्णन असे करत होते की त्यांना वाटत होते ते टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात डेम्स साइडच्या लोकांना ती स्तुती वाटे >> केलीयन कॉन्वे च्या बोलण्याचे जबरदस्त मीम्स तयार होऊन फिरत आहेत. ह्यांना कळत नाहिये का आपण बोलतो त्याचा अर्थ दोन्हीकडून लागू शकतो ?

अरे कोण बघतय का डेमोक्रॅटिक कन्व्हेन्शन?

आतापर्यंत मला मंगळवारी मिशेल ओबामा व काल बुधवारी बिल क्लिंटन, ऑप्रा विनफ्री व पिट ब्युट्डेजज यांचे स्पिच आवडले. मिशेल ओबामाचे स्पिच बराक ओबामापेक्षा सरस होते.

पण या सगळ्यांना कमला हॅरीसचे एवढे कौतुक करताना पाहुन तिचे हे सगळे कर्तुत्व मी कसे काय बरे मिसले या मुद्द्यावर विचार करत होतो.

पण एक गोष्ट मात्र खरी की बायडन रेसमधुन बाहेर पडल्यापासुन अचानक डेमोक्रॅटिक सपोर्टर्सच्या शिडात जोमाने वारे भरुन
डेमॉक्रेटिक पक्षाच्या नावेला प्रचंड संवेग( मोमेंटम) मिळाला आहे .गेल्या ८-९ महिन्यापासुन बायडनच्या वयामुळे पक्षात आलेली मरगळ दुर झाली आहे हे स्पष्ट झाले आहे.

हे इतक्या वेगाने घडले की ट्रंप व त्याच्या स्ट्रॅटीजिस्टना आता काय करायचे हेच सुचत नाही आता. तिकडे ट्रंप त्याच्या कोण जास्त सुंदर दिसतो, कोणाचा क्राउड मोठा आहे असल्या फक्त त्यालाच शोभतील अश्या तद्दन फाल्तु मुद्द्यांवरच अडकुन पडला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात सगळ्या पोल्समधे मोठ्या आघाडीवर असलेला ट्रंप बायडन रेसमधुन बाहेर पडल्यावर आता चक्क ५-६ पॉइंट्सनी बहुतेक सगळ्या स्विंग स्टेट्समधे मागे पडला आहे.

इकडे कमला हॅरीसचा व्हाइस प्रेसिडेंशिअल कँडिडेट टिम वॉल्झ त्याच्या लाइकेबल पर्सनॅलीटीमुळे दिवसेगणीक राइट रिझन्स साठी लोकप्रिय होत असताना तिकडे ट्रंपचा ( विअर्ड?) व्हाइस प्रेसिडेंशिअल कँडिडेट जे डी व्हांस त्याच्या काइच्या काइ व मुर्ख कॉमेंट्समुळे इज शुटींग हिमसेल्फ इन द फुट! उदा. मुल नसलेल्या कॅट लेडीज व मुल नसलेल्या कपल्सना मतदानाचा हक्क देउ नये, मेनोपॉज झालेल्या सर्व बायकांनी उर्वरीत आयुष्य नातवंड सांभाळण्यात घालवावी, रेप म्हणजे मायनर इनकन्व्हिनिअंस असतो व रेप झालेल्या मुलींनी त्यांचा गर्भ गर्भपात न करता प्रेमाने वाढवावा इ. इ.!

ट्रंपसारखा कँडिडेट निवडुन द्या असा जोगवा मागणे कमी पडतय की काय अस वाटुन या जे डी व्हान्स सारख्या प्रचंड घ्रुणास्पद मानसिक वृत्तीच्या माणसाला त्याच्याबरोबर निवडुन आणायचे आवाहन रिपब्लिकन पक्ष करत आहे? वॉव! त्यापेक्षाही दुर्दैवाची बाब म्हणजे असल्या विअर्ड ड्युओला (ट्रंपसारख्या कॉन आर्टिस्टच्या जाळ्यात फसुन) निवडुन आणुन “अमेरिका ग्रेट अगेन” होइल अशी स्वप्ने बाळगणारी कमीत कमी ५० मिलिअन तरी अमेरिकन माणसे आहेत! गो फिगर!

कमला हॅरीस व टिम वॉल्झचा हा मोमेंटम असाच चालु राहीला तर अमेरिकेची पहीली बाइ अध्यक्ष म्हणुन निवडुन येउन कमला हॅरीस एक इतिहास करेल का? तुम्हाला काय वाटते?

मिशेल वॉज फायर! ती प्रचंड हुशार आहे. एकेक शब्द काय क्रिस्प लिहिलेला आणि तिने काय पॅशनेटली डीलीवर केला!
बाकी डेमस नी आता कंपलेसंट न होता नैया पार होई तो रात्र वैऱ्याची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

>>>>>>>उदा. मुल नसलेल्या कॅट लेडीज व मुल नसलेल्या कपल्सना मतदानाचा हक्क देउ नये, मेनोपॉज झालेल्या सर्व बायकांनी उर्वरीत आयुष्य नातवंड सांभाळण्यात घालवावी, रेप म्हणजे मायनर इनकन्व्हिनिअंस असतो व रेप झालेल्या मुलींनी त्यांचा गर्भ गर्भपात न करता प्रेमाने वाढवावा इ. इ.!

व्हान्स छुपा डेम्स असावा व ट्रंपला पाडण्याकरता, असा गनिमी कावा खेळत असावा Wink

<<<आता निकी पासून ते बिल ओ रायली पर्यंत सगळे सांगत आहेत की सभांच्या साइज बद्दल बोलू नका, मुद्द्याचे बोला. तात्या ऐकतो का बघू.>>>
तात्या कुणाचेहि ऐकत नाही. तो व्हान्स, तो फरच फालतू आहे.
आता इतर रिपब्लिकन लोकांनी प्रचाराची सूत्रे हाती घेऊन काही तरी सकारात्मक प्रचार केला पाहिजे. तात्या नि त्याचा पित्तू काही पण बरळू देत.
शिवाय डेमोक्रॅटिक पक्षाच्या एखद्या गटाने दिवसभर तात्याला विअर्ड, मूर्ख अश्या काय काट्टेल त्या शिव्या द्याव्यात. तात्या त्यातच गुंतुन पडेल नि शेवटी लोक त्याच्या रडगाण्यांना नि इतरांना दिलेल्या शिव्यांना कंटाळतील नि कमलाला मते देतील.

अमितशी सहमत. मिशेल ओबामाचे स्पिच बघताना राहुन राहुन वाटत होत की ती का नाही नॉमीनी? काय जबरदस्त इंटलेक्ट, इंटलिजन्स, जेन्युइन पॅशन, पॉइज , ग्रेस व सबस्टंस आहे तिच्यात! तिच्या नखाएवढीही सर ट्रंप मधे नाही! बराक ओबामा व बिल क्लिंटन हे दोघेही ऑल टाइम ग्रेट मोटिव्हेटर्स व स्पिकर्समधे गणले जातात यात वादच नाही पण परवाचे मिशेल ओबामाचे स्पिच त्या दोघांच्या स्पिचच्या ताकदीचे ( किंबहुना त्या दिवशीतरी.. काकणभर सरसच!) होते!

हा टिम वॉल्झ खरच एक जेन्युइन व लाइकेबल/ रिलेटेबल पॉलिटिशिअन आहे.कालच्या त्याच्या एक्सेप्टन्स स्पिचच्या दरम्यान त्याच्यात व त्याच्या फॅमीलीत जे कम्युनिकेशन व जेन्युइन प्रेम आहे ते सगळ्या जगाला दिसले व रिलेटेबल वाटले! त्याचा १७ वर्षांचा लर्निंग डिसॅबिलीटी असलेला मुलगा गस वॉल्झ हा त्याच्या वडिलांच्या “ यु आर माय होल वर्ल्ड“ या त्याला, त्याच्या बहीणीला व त्याच्या आइला उद्देशुन म्हटलेले वाक्य जेव्हा ऐकतो जेव्हा आनंदाने व गर्वाने हमसुन हमसुन रडत टाळ्या वाजवत राहतो व मागे कन्व्हेन्शन्मधे उपस्थित असलेल्या २५,००० डेलिगेट्सना सांगतो “ दॅट्स माय डॅड आउट देअर, दॅट्स माय डॅड आउट देअर!” हे बघत असताना प्रत्येकाला वाटत राहते.. दॅट कुड मी माय फॅमीली! इट वॉज द मोमेंट ऑफ द कन्व्हेन्शन सो फार!

तसच कालच्याच वॉल्झच्या एक्सेप्टन्स स्पिचच्या आधी कोच वॉल्झची अख्खी हायस्कुल टिम (ज्यातले सगळे प्लेयर्स जे आता मिडल एज्ड माणसे झाली आहेत) त्याला सपोर्ट करायला स्टेजवर आली. ती सगळी टीम कॉकेशिअन होती! अकरा मिडल एज्ड व्हाइट माणसे जी डेमोक्रॅटिक टीम वॉल्झ ला एकमुखाने स्टेजवर सपोर्ट व एंडॉर्स करत आहेत हे कालचे गस वॉल्झ सारखेच एक पॉवरफुल व्हिज्युअल होते! पेनसिल्व्हॅनिया, मिशिगन व विस्कॉन्सिन ही जी स्विंग स्टेट्स आहेत व जिथे दोन्ही पार्टीज व्हाइट मिडल क्लास मेन्सची मत चुचकारत आहेत तिथे या व्हिज्युअल चे पडसाद नक्कीच उमटल्याशिवाय राहणार नाहीत!

हे इथे असे बघत असताना राहुन राहुनअसे वाटत होते की कुठे हे मिलिअनर्स, सदैव निगेटिव्ह/ कमालीचे डिव्हायझिव्ह/कायमचे हेटफुल वागणारे, बोलणारे फिअर माँगरींग आउट ऑफ टच असे ट्रंप/जे डी व्हांस व कुठे कमालीचा जेन्युइन, नाइस मिडल क्लास शिक्षक व कोच टिम वॉल्झ! तो त्यांच्यातला स्टार्क कॉन्ट्रास्ट सगळ्या जगासमोर काल जाहीरपणे दिसत होता! देअर इज नो कंपॅरिझन!

मुकुंद - सहमत. दुसर्‍या पोस्टमधले प्रत्येक वाक्य आवडले.

टिम वॉल्झ किती साधेपणा, आपल्यातलाच वाटतो. ऑप्राने कमालीचे भाषण केले. दोन विचारांतला फरक छान मांडला आहे.

मुकुंद - सहमत. दुसर्‍या पोस्टमधले प्रत्येक वाक्य आवडले. >> +१

मिशेल ओबामाचे स्पिच बघताना राहुन राहुन वाटत होत की ती का नाही नॉमीनी? >> वो दिन भी आयेगा. ! बराकचा तिच्या स्पीचनंतर स्पीच देताना जातानाच रीमार्क कसला चपखल होता. Happy

“Whose gonna tell him the job he’s currently seeking might be one of those black jobs” Lol कसलं चार्जड वाक्य आहे. गेल्या वेळचे व्हेन दे गो लो वुई गो हाय... आणि हे. मिशेल आणि तिची स्पीचेस कोण लिहितं ते! _/\_

हे मुकुंद, आय अंडरस्टँड योर पॅशन फॉर डेम्स अँड आय नो अनलाइक अदर्स यु डोंट सपोर्ट डेम्स फॉर द शो (नॉट हॅविंग ए एफिंग क्लु अबौट द ग्राउंड रिअ‍ॅलिटि). हॅविंग सेड दॅट - मला दोन प्रश्न विचारायचे आहेत.
१. बाय्डन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकन इकानमीची वाट लावली. विल यु बेट योर डाइम ऑन हॅरिस-वॉल्झ टिकिट टु ब्रिंग बॅक ग्लोरी डेज? (लो इन्फ्लेशन, लो अनएंप्लॉयमेंट रेट, एट्सेट्रा). इफ सो, हौ?
२. वि आर (लिगल) इमिग्रंट्स इन धिस कंट्रि; अँड आय प्राउडली से - वि अर्न्ड इट. वॉट इज योर ओपिनियन अबौट डेम्स पॉलिसी ऑन इल्लिगल्/अनडॉकुमेंटेड इमिग्रंट्स? आर यु गुड विथ इट?

मी पोलिटिकल कन्वेंशन्स रिलिजसली फॉलो करत नाहि. पण वाचनांत आलं कि, डिएन्सी क्न्वेंशन मधे ओबामा म्हणाला - बाय्डन इन्हेरिटेड बॅड इकानमी..

आर यु एफिंग किडिंग मी? ओबामा हॅज बिन ए क्राय बेबी इवन इन हिज ओन प्रेसिडेंसी, इफ यु डोंट बिलिव वॉच धिस ट्रेलर, विल ब्रिंग द होल एफिंग मुवि इफ यु आर इंटरेस्टेड...

राजला पडलेले दोन्ही प्रश्न मलाही पडले आहेत आणी खरतर या मुद्द्यावर रिपब्लिकन कडे इतक काही आहे बोलायला पण दोन्ही कॅन्डिडेट( तात्या आणी भाचा) नाहि ते बालिश आणी प्रक्षोभक विधान करत सुटलेत.
तात्याची ४ वर्श बघुनही बरा उमेदवार रिपब्लिकनला पार्टीला मिळु नये?? बाकी पार्टीची अ‍ॅबॉर्शन राइट आणी इतर महिला विषयची रिग्रेसिव्ह विचारसरणी अजिबात पटत नाही..
गेल्या २ दशकात एकाही पक्षाने गन कन्ट्रोल केलेला नाही जो माझ्यासाठी वोट करताना खरतर मेन मुद्दा आहे, दोघानाही तो करायचा नाहि आणी का करायचा नाही हेहि स्पष्ट आहे..यासाठी बाय पार्टिझम नकोच. ४ नाहितर ८ वर्शानी आपली पार्टी आहेच...नो स्ट्रगल
मी कुठल्याही साइडला नाही मला बायडेन नको होता कारण त्याच वय, विसराळुपणा, गेल्या ४ वर्शात वाढलेले इन्फेलेशन....पण त्याची बदली म्हणून कमला आलिये म्हणून ती लगेच ग्रेट वाटत नाहिचे, इन्फलेशन कस कमी करणार यावर तिला २ वर्शापुर्वी उत्तर देता आल नाही.
https://www.youtube.com/watch?v=ywQZVOgYlk0
यावर रिससेन्टली तिच मत मला दिसल नाहिये...बायडेन म्हातारा असला तरी ओव्हरऑल हुशार आहे (त्याच्यावर जे आक्षेप आले ते वयोमानाने होणार्‍या चुकावरच होते )पण ती चुणुक अजिबातच दिसत नाही..
मिशेलच स्पिच चान्गल झाल पण दुदैवाने ती कॅन्डिडेट नाहीये..( जेवायला गेल्यावर जेवणच चान्गल हव वाढपी कसा स्मार्ट होता हे चालणार नाही )
तस्मात डेमोक्रॅटिक कन्वेशन झाल तरी रेस टफ आहे आणी सध्या तरी डेम्सची जोरदार हवा आहे अस दिसतय्,वाटतय किवा भासवल तरी जातय.

माझे मत ट्रम्प ला !
बाकीचा कोंडा आणी कमला चा उदो उदो बाजूला ठेवून कमला हॅरीस यांनी धोरण विषयक ज्या दोनतीनच गोष्टीं बोलल्या आहेत त्या पाहूत.
१ किराणा मालावर प्राईस कंट्रोल ! प्राईस कंट्रोल चा प्रयोग जगात कुठेही यशस्वी झालेला नाही. ग्रोसरी चे मार्जिन ३% पेक्षा जास्त नसते. किमतीवर नियंत्रण आले तर ग्रोसरी चेन्स सप्लायर्स ना किमती कमी करायला लावणार, सप्लायर्स आपल्या सप्लायर्स ना. शेवटी टंचाई , काळाबाजार !
२ नवीन घर खरेदीवर २५,०० डोलर्स सबसिडी !
३ अनरियलाईझड कॅपिटल गेन्स टॅक्स.

बायडेन कॅलिफोर्नियाला विश्रांती साठी गेले आहेत, मग कारभार कोण पाहतय ? ओबामा ? बायडेन नॉमिनी असणार नाही हा विवेक रामास्वामीचा अंदाज खरा निघाला ! आत तो म्हणतोय की बायडेन राजिनामा देणार !

गस बद्दल Ann Coulter आणि अनेक थेरडा आणि प्रेत कल्चर ट्रम्प सपोर्टर किती गलिच्छ भाषेत लिहीत आहेत. ट्रम्पने न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टरला असेच शेलके शब्द वापरले होते.

Pages