२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हेतीचे लोक इलीगल ईमिंग्रंट नाहीयेत. ते रेफ्युजी आहेत. हेतीची अवस्था कशी वाईट आहे हे रिपब्लिकन लोक वर्णन करून करून सांगतात, थकत नाहीत. पण तरीही कुठेही इतरांबद्दल कणव वैगेरे नाहीये ह्यांना. मरतायत ना मग मरूदेत तिथे हेती मध्ये, इथये फिरकू नका, असा अटीट्युड असतो. मग उगाच खोट्या नाट्या श्टोऱ्या बनवून पसरवायच्या.

तिथल्या पोलिसांनी देखील कोणतेही क्राईम स्पाईक इत्यादी हया रेफ्युजिंमुळे झाले नाहीये असे सांगितले आहे.

एखाद्या लहानशा गावात प्रचंड संख्येने हेतीसारख्या प्रचंड वाईट स्थितीतले लोक आयात केले जातात. त्यांची पार्श्वभूमी न तपासता केवळ कुठल्याशा अजेंड्यासाठी त्यांना प्रचंड संख्येने आयात केले जाते तेव्हा दुष्परिणाम होणारच. सार्वजनिक, शिस्त, शांतता, नियम पाळणे ह्यातील सगळे धाब्यावर बसवून मूळ रहिवाशांच्या नाकी नऊ येणार हे उघड आहे. हे अशिक्षित, अर्धशिक्षित, इंग्रजी न येणारे, कुठलीशी क्रियोल भाषा बोलणारे लोक येऊन त्या लहानशा खेड्याचा उद्धार करणार का? त्या लहानशा गावाला निरक्षर, इंग्रजीचा गंध नसलेले, अंगमेहनत वगैरे करणारे इतक्या प्रचंड संख्येने लागणार आहेत अशी काही आकडेवारी आहे का?
जगातल्या सगळ्यात बरबादहून बरबाद देशांच्या उद्धाराचा जिम्मा ह्या लहानशा गावाच्या डोसक्यावर मारताना तिथल्या लोकांचे सार्वमत घेतले का?
प्रत्येक बाबतीत सरकारी अधिकार्यांचे मत का ग्राह्य मानायचे? ते सरकारी अधिकारी ज्यांचे नोकर आहेत त्या सामान्य लोकांच्या व्यथा दुर्लक्षित करून ह्या ढुढ्ढचार्य बनलेल्या महापौर आणि अन्य उच्चपदस्थ अधिकारी (ज्यांना मिळणारे सरकारी मलिदे कदाचित ह्या बेछूट आयातीवर अवलंबून असतील) अशांचीच मते शिरसावंद्य का मानायची? कॉमन सेन्स वगैरे काही वापरायचा का नाही?

मूळ मुद्दा हाच आहे की अमेरिकेतील कानाकोपर्यात लाखो बेकायदा किंवा ओढून ताणून कायदेशीर ठरवलेले लोक कुठलाही विचार न करता प्रचंड संख्येने आणून ठेवले आहेत. त्यातून अनेक सामाजिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
आता ते नक्की किती बदके, किती मांजरी, किती कुत्रे खातात हा गौण मुद्दा आहे. तरी केवळ तोच मुद्दा केंद्रस्थानी आणून ट्रंप आणि व्हान्सला धोपटून काढणे चूक आहे.
एका आगाऊ पत्रकाराने तर असाही सूर आळवला की कुत्र्या मांजराचा विषय आणून हेती नामक महान राष्ट्राचा आणि तिथल्या लोकांचा अपमान केला म्हणून ट्रंपला ठार मारण्यचा प्रयत्न केला तर समजण्यासारखे आहे. धन्य आहेत लोक! हेती नामक थोर देशासाठी आपल्या देशाच्या नागरिकाचा बळी जाणे योग्य मानत आहेत. वा! किती विशाल दृष्टी आहे!

<< एका आगाऊ पत्रकाराने तर असाही सूर आळवला की >>
----- असे म्हणणारा एखादा पत्रकार खरोखरच अस्तित्वात आहे का? ट्रम्पनेच स्टेज मॅनेज करुन या पत्रकाराला पढवलेले असू शकते. निवडणूका आहेत. जिंकण्यासाठी ट्रम्प काहीही करु शकतो.

पुतिनला क्लिंटनचे ईमेल डिग/ डिग करायला ( सर्वजनिकरित्या ) सांगणारा ट्रम्प. कमला हॅरिसला एंडोर्स कर असे का नाही सुचविणार. पुतिनसाठी ट्रम्पला मॅनेज करणे डाव्या हाताचा मळ आहे.

हेती ईमिंग्रंट खरच मोठ्या प्रमाणात उपद्रवी किंवा शांतता सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत असते तर कुत्रे मांजरं खाण्याच्या खोट्या गोष्टी रचायला लागल्याच नसत्या.

आणि हेती मधले लोक ना बेकायदा आहेत ना ओढून ताणून कायदेशीर. रेफ्युजी स्टेटस कायदेशीर आहे. आणि हेती मधली परिस्थिती पाहता तिथले लोक शंभर टक्के पात्र आहेत रेफ्युजी म्हणून.

<<एखाद्या लहानशा गावात प्रचंड संख्येने हेतीसारख्या प्रचंड वाईट स्थितीतले लोक आयात केले जातात.>>

त्याचे काय झाले - त्रंप्याच्या कारकिर्दीत सगळे लोक एव्हढे श्रीमंत एव्हढ्या पटकन झाले की त्यांची डोकीच फिरली!!
आता आबादीआबादच आहे, अमेरिका ग्रेट झाली आहे.
मग बिचारे हैती चे लोक शरणगति मागायला दुसरीकडे कुठे जाणार?

आता ते इथली कुत्री मांजरी खातात असे म्हंटले ते शब्दशः घ्यायचे नसते. त्यात उपहास, विनोद, मेटॅफोर का काय असे भाषेचे अलंकार असतात
आता तुम्हा लोकांना साधा covfefe चा अर्थ समजत नाही तर हे भाषण कुठुन समजणार ना?

आता धडधडीत पुरावा समोर आला आहे की बायडेननेच तो मारेकरी पाठवला होता. नुकतेच बार मधून बाहेर पडलेले कॅन्सासमधले काही लोक म्हणतताहेत. त्यातल्या एकाने सांगितले की त्याने त्याच्या स्वतःच्या कानांनी त्याने ऐकले बायडेन सांगत असताना. उगीच खोटे बोलत नाही.

उद्या हे डेमोक्रॅट्स म्हणतील त्रंप्याने स्वतःहूनच हा खोटा हल्ल आयोजित केला होता, लोकांची सहानुभूति मिळवायला.

>>-
---- असे म्हणणारा एखादा पत्रकार खरोखरच अस्तित्वात आहे का? ट्रम्पनेच स्टेज मॅनेज करुन या पत्रकाराला पढवलेले असू शकते. निवडणूका आहेत. जिंकण्यासाठी ट्रम्प काहीही करु शकतो.
<<
हो आहे. आडपडद्याने हे म्हटले आहे. लेस्टर होम्स ह्या पत्रकाराने हे मत व्यक्त केले आहे. हेतीचे लोक कुत्री मांजरे खातात असा खोटा प्रचार केला म्हणून त्यांच्यावर असा जीवघेणा हल्ला होणारच असे तारे ह्या थोर पत्रकाराने तोडले आहेत. हा पत्रकार एन बी सी न्यूज ह्या वृत्तसंस्थेचा आहे. सदर वृत्तसंस्थेला ट्रंपचा हस्तक वगैरे म्हणणे म्हणजे अत्युच्च कोटीचा मूर्खपणा आणि/किंवा ढोंगीपणा आहे हे इथे नम्रपणे नमूद करणे आवश्यक आहे.

>>
आणि हेती मधले लोक ना बेकायदा आहेत ना ओढून ताणून कायदेशीर. रेफ्युजी स्टेटस कायदेशीर आहे. आणि हेती मधली परिस्थिती पाहता तिथले लोक शंभर टक्के पात्र आहेत रेफ्युजी म्हणून.
<<
जगभरात कुठेही हाल अपेष्टा होत असल्यास त्याला अमेरिका जबाबदार आहे आणि त्यांचा तारणहार अमेरिकाच असला पाहिजे आणि अमेरिकन करदात्यांनी आपल्या खिशात हात घालून अशा लोकांना अमेरिकेत बोलावून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचललीच पाहिजे. ते बंधनकारक आहे हा दिव्य विचार कुठून आला? अमेरिका खुद्द कर्जबाजारी असताना असे पाहुणे बोलावून त्यांचे शाही आदरातिथ्य करण्याचा आचरटपणा का म्हणून बंधनकारक आहे?
आपल्या घरात परिस्थिती आर्थिक स्थिती बिकट असेल तर आपण डझनभर पाहुणे जेवायला बोलावतो का?

तरी केवळ तोच मुद्दा केंद्रस्थानी आणून ट्रंप आणि व्हान्सला धोपटून काढणे चूक आहे. >>> हे ट्रम्पला सांगा. प्रेसिडेन्शियल डिबेट मधे मांडला गेलेला आणि नंतर त्यानेच हजारदा पुन्हा आळवलेला मुद्दा इतरांनी केंद्रस्थानी आणू नये हे अफलातून लॉजिक आहे.

आता ते नक्की किती बदके, किती मांजरी, किती कुत्रे खातात हा गौण मुद्दा आहे >>> कसला गौण मुद्दा? असले काहीच झाल्याचे प्रूफ नाही तर "किती" आलेच कोठून? मूळ क्लेम बकवास असेल तर तो करायचाच कशाला? तो ही प्रेसिडेन्शियल डिबेट मधे? स्वतःच्या रॅलीत माना डोलावणार्‍यांपुढे बोलावे काय वाट्टेल ते. "बिग लाय" च्या नंतर असल्या थापा.

स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ९/११ हल्ल्यानंतर बिनबुडाची कारणे शोधून इराकवर हल्ला करून अब्जावधी डॉलरचा चुराडा करणारे इराक युद्धाचे शिल्पकार डिक चेनी आणि बुश यांनी आपला पाठिंबा कमलाबाईना असणार असे जाहीर केले. आणि कमलाबाईंनीही हुरळून जाऊन हा मला मिळालेला सन्मान मानते वगैरे डायलॉग मारले. म्हणजे पारंपारिक रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष कुठे आलेत ते पहा!
डेमोक्रॅट नेते ह्या हल्ल्यानंतर अनेक वर्षे चेनी आणि बुश हे नरसंहार घडवून आणणारे नराधम आहेत. त्यांना बेड्या ठोकून आंतरराष्ट्रीय कोर्टात न्यावे. तिथे रीतसर खटला चालवून ह्या ह*मखोरांना तुरुंगात डांबावे वगैरे जहाल विचार मांडणारे अनेक नेते आजही आहेत.
पण तरी आज डिक चेनीने दिलेला पाठिंबा म्हणजे एक सन्मान आहे वगैरे विचार दिसत आहेत. एकंदरीत शस्त्रास्त्र लॉबी, त्यांच्या हितासाठी अनंतकाळ चालणारी युद्धे हे एखाद्या यज्ञासारखे अव्याहत धडधडत रहावे याकरता डेमोक्रॅटिक पक्षच योग्य आहे अशी धारणा बनली आहे.
अमेरिकेचा आणि जगाचा विनाश करायला सज्ज असणारा वगैरे समजला जाणारा ट्रंप, त्याने आपल्या कारकीर्दीत एकही युद्ध सुरु केले नाही. उलट अहिनकुल वैर असणारे इस्रायल आणि सौदी अरेबिया असले देश वाटाघाटी करताना दिसले.
उलट म्हातार्‍याने चार वर्षात जगाच्या दोन तीन कोपर्यात प्रचंड मोठी युद्धे भडकवत ठेवली आहेत. आणि कमलाबाई तोच कित्ता पुढे गिरवणार यात शंकाच नको!

जगभरात कुठेही हाल अपेष्टा होत असल्यास त्याला अमेरिका जबाबदार आहे आणि त्यांचा तारणहार अमेरिकाच असला पाहिजे आणि अमेरिकन करदात्यांनी आपल्या खिशात हात घालून अशा लोकांना अमेरिकेत बोलावून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचललीच पाहिजे. ते बंधनकारक आहे हा दिव्य विचार कुठून आला? अमेरिका खुद्द कर्जबाजारी असताना असे पाहुणे बोलावून त्यांचे शाही आदरातिथ्य करण्याचा आचरटपणा का म्हणून बंधनकारक आहे?

>>>.. अमेरिका जबाबदार आहे असे मी कुठे म्हणले? इतकेच कीं रेफ्युजी स्टेटस असणारे लोक अमेरिकेच्याच कायद्यानुसार इलीगल ईमिंग्रंट नसतात. ह्यात ओढून ताणून काहीही नाही, कायदा सरळ साधा व सुस्पष्ट आहे हया बाबत. आणि तुम्हाला हे पसंद नसेल तर कितीही भंकस भिंती बांधून काही फरक पडणार नाही, लेजिसलेशन बदलायला लागते. भिंत वैगेरे बाळबोध गोष्टींनी फारसे काही होतं नसते. तेच ते लेजिसलेशन जे ट्रम्पने पास होऊ दिले नाही. त्यात असायलम मिळवण्यासाठी आणखी अटी घातल्या होत्या.

उगाच काहीही कारण नसताना हेतीच्या लोकांना टार्गेट करण्याचे समर्थन का करत आहात तुम्ही? उद्या तुमचे मित्र समविचारी भारतीय ईमिंग्रंट बद्दल सुद्धा street shitter, curry smell असले शब्द, गोबर खाण्याचे जोक करतील (सोमि वर बघा, ऑलरेडी होतं असतात त्या क्राऊड कडून ) तेव्हा सुद्धा हा अटीट्युड बाळगाल का? मग का विनाकारण एका एथनिक ग्रुपवर शिंतोडे उडवण्यात सहभागी होताय समजतं नाही.

त्याहीपुढे लिहितो. अगदी जरी खरे असते कीं ईमिंग्रंट ने कुत्रे मांजर खाल्ले तरी सुद्धा संपूर्ण ईमिंग्रंट कमी्युनिटीला दोष देणे चूक आहे. असली थेरं अमेरिकन काही कमी करत नाहीत. जर रोज अमेरिकन लोकांनी केलेल्ल्या exceptional घाणेरड्या गोष्टी टाकून हे म्हणजे सगळेच अमेरिकन असे चित्रं तर ते हि चूकच असेल.

<< अमेरिकेत बोलावून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचललीच पाहिजे. ते बंधनकारक आहे हा दिव्य विचार कुठून आला? >>

अहो अमेरिकेने गेली ७५ वर्षे बोंबलून जगाला सांगितले की आम्ही सर्वात ग्रेट राष्ट्र आहोत. स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याखाली काय लिहीले आहे?
हा देश इम्मिग्रंट लोकांच्या मुळे ग्रेट झाला आहे, वगैरे.

मेक अमेरिका ग्रेट असे बोंबलून सांगितल्यावर सहाजिकच लोक धावत इथेच येणार!
मग आता तेव्हढ्याच जोरात बोम्बलून सांगा की आमचा देश कर्जबाजारी झाला आहे, आमची राज्यव्यवस्था, न्याय, सगळे काही धुळीला मिळाले आहे, आमच्याकडे येऊ नका.

टेलर स्विफ्ट सारख्या विद्वान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल जाण बाळगणार्‍या, सर्वज्ञानी, गडगंज श्रीमंत कलाकार स्त्रीने कमलाबाईला पाठिंबा जाहीर करताच जेडी व्हान्स आणि ट्रंप दोघांनी स्वच्छ शरणागती पत्करून आता जवळपास कमलाबाई जिंकल्यातच जमा आहे. >> शेंडे तू हे तात्याला सांगितलेस का ? काल तो टेलरला उद्देशून बरळत होता. एकिकडे 'मी घाबरत नाही' नि दुसरीकडे हे . एकदा ठरवा कि नक्की काय ते. Wink

कोण टेलर!!! मला तर तिच्या बॉयफ्रेंडच्या कलीगची बायको जास्त आवडते.
काय लॉजिक काय लॉजिक!

>>शेंडे तू हे तात्याला सांगितलेस का ? काल तो टेलरला उद्देशून बरळत होता. एकिकडे 'मी घाबरत नाही' नि दुसरीकडे हे . एकदा ठरवा कि नक्की काय ते.
<<
आपणास उपरोध वगैरे अलंकार शिकण्याची तातडीची गरज आहे! असो.

>>
इतकेच कीं रेफ्युजी स्टेटस असणारे लोक अमेरिकेच्याच कायद्यानुसार इलीगल ईमिंग्रंट नसतात. ह्यात ओढून ताणून काहीही नाही, कायदा सरळ साधा व सुस्पष्ट आहे हया बाबत. आणि तुम्हाला हे पसंद नसेल तर कितीही भंकस भिंती बांधून काही फरक पडणार नाही, लेजिसलेशन बदलायला लागते. भिंत वैगेरे बाळबोध गोष्टींनी फारसे काही होतं नसते.
<<
रेफ्युजी स्टेटस किती लोकांना द्यावे आणि कुणाकुणाला द्यावे हे सरकारच्या म्हणजे जो कोणी राष्ट्रपती आहे त्याच्या हातात असते. त्याने ह्या अधिकाराचा बेछूट वापर करून कोट्यावधी लोकांना रेफ्युजी म्हणून घोषित केले तर अमेरिकेत उत्पात घडेल.
अमेरिका कर्जबाजारी, दिवाळखोर आहे. अमेरिकेच्या कर्जाचे आकडे मारुतीच्या शेपटासारखे वाढता वाढता वाढे पद्धतीने मोठे होताना दिसत आहेत. असे असून लाखो निरक्षर लोकांना रेफ्युजी म्हणून आणून त्यांना करदात्यांच्या पैशावर ऐश करायला देणे ह्यासारखा मूर्खपणा नाही.
हेतीच्या लोकांचा अमेरिकेला काहीही उपयोग नाही. उलट नुकसानच आहे. जेव्हा परके लोक अमेरिकेत आणले जातात तेव्हा अमेरिकाला काय फायदा हे बघूनच आणायला हवे. राजकीय लाभ बघून आणल्यामुळे असले उत्पात होत आहेत.
निरक्षर, इंग्रजीचा गंध नसणारे, अमेरिकन संस्कृती, कायदे, कानून नियम काहीही न जाणणारे अडाणी लोक प्रचंड संख्येने आयात करून अमेरिकेची भरभराट होणार आहे अशा भ्रमात असणार्‍या समस्त लोकांना कोपरापासून प्रणिपात!

>>मेक अमेरिका ग्रेट असे बोंबलून सांगितल्यावर सहाजिकच लोक धावत इथेच येणार!
किती मूर्खपणा करणार राव? अमेरिकेला सरहद्द आहे (निदान असा माझा समज आहे) ती ओलांडणार्‍या व्यक्तीची कसून तपासणी करून मगच त्या व्यक्तीला प्रवेश दिला जावा असा कायदा आहे. त्याकरता करदात्यांचे भरपूर पैसे खर्च करुन इमिग्रेशन विभाग चालवला जातो. सीमेच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च करदात्यांच्या खिशातून भरला जातो.
किती लोकांना कुठल्या परिस्थितीत प्रवेश द्यावा हे सर्वथा सरकारच्या हातात आहे.
आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपल्या मनुष्यबळाच्या गरजा किती आहेत, कुठल्या प्रकारचे मनुष्यबळ कमी आहे ह्याची माहिती सरकारकडे असते. त्यावर आधारित निर्णय घेऊन योग्य तितक्या व्यक्तींना देशात प्रवेश दिला जावा अशी अपेक्षा आहे.
कुणीही उठावे, धावत सुटावे आणि अमेरिकेत घुसावे इतका बिनडोक विचार आपल्या डोक्यात येत असेल तर डोके तपासून घ्या.

<<भरपूर पैसे खर्च करुन >>
नाही हो. सरहद्द चिक्कार चिक्कार मोठ्ठी आहे, सगळीकडे लक्ष ठेवायला अनेक लोक लागतील, तेव्हढे पैसे नाहीयेत बजेट मधे.
इतके कमी आहेत पैसे की त्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याखालचे शब्द झाकून ठेवायला पण पैसे नाहीत.
नि शिवाय ACLU सारखे लोक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. नुसते "जरा थांबा" असे जरी त्या येणार्‍यांना सांगितले तरी त्यांच्या हक्काची पायमल्ली झाली असे ओरडतात!
अहो गेल्या ६० वर्षात दोन्ही पक्षांनी तात्पुरते कायदे केले नि बदलत्या काळाप्रमाणे ते पुनः तपासून पाहिले नाहीत.
आता उगाच एकमेकांना शिव्या देण्यात काय अर्थ आहे?
त्यातून राजकारण नि लॉजिक, अक्कल यांचा ३६ चा आकडा. निव्वळ स्वार्थ बघणे, सत्ता हाती येणे एव्हढेच ध्येय. सुप्रिम कोर्ट वगैरे सगळे उगीचच दाखवायला.
खुद्द राष्ट्राध्यक्षाचा मुलगा गुन्हे करतो, ड्रग्स करतो. हे असले लोक! काय यांच्या बाजूने किंवा विरुद्ध बोलणार? अगदी राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवारावर बलात्कार केल्याचे सिद्ध होते - हे असले लोक.
कय फुकट डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन करता? सगळे चोर!!

आपणास उपरोध वगैरे अलंकार शिकण्याची तातडीची गरज आहे! असो. >> कमाल आहे बुवा, तात्या 'I hate Taylor Swift' म्हणालाय नि तुझ्यासारखे पाठीराखे ' आम्हाला आमच्या लायनीप्रमाणे जाऊ दे' म्हणताय ह्यात उपरोधापेक्षा मला विरोधाभास दिसतो. Lol

<< तात्या 'I hate Taylor Swift' >>

------ द्राक्षे मिळाली नाहीत म्हणून आंबट अशी वस्तुस्थिती आहे. विरोधाभास, उपरोध (किंवा जोक ) हे नंतर सुचलेले शहाणपण असते.

३५०० पेक्षा जास्त स्विफ्टीज ( for Kamala) काम करत आहेत. स्वयंसेवक तहान भूक विसरुन काम करतात.

टेलर स्विफ्टने एंडोर्स केल्यावर, २४ तासांत ४०६००० भावी मतदारांनी vote.gov या संकेत स्थळाला भेट दिली आहे.
https://www.cbsnews.com/news/taylor-swift-kamala-harris-endorsement-vote...

रेफ्युजी स्टेटस चे निकष एकदा ठरवले असतात. त्यानंतर प्रत्येकवेळेस राष्ट्रध्यक्ष "हा, ह्यांना द्या रेफ्युजी स्टेटस" असे म्हणत नसावा. निकष पाहिले जातात.

पुन्हा तुम्ही म्हणताय कीं अमुक लोकांना का आत येऊ दिले, आपल्याला काय फायदा. अहो मेख तिथेच तर आहे. जर रेफ्युजिन्ना थांबवायचे असेल तर कायदा बदलायला लागतो. भिंती उपयोगाच्या नाहीत. रेफ्युजी किंवा असायलम सिकर असतील तर लीगल पॉईंट ऑफ एंट्री मधून आत येता येते. अमेरिकेच्या इलीगल ईमिंग्रंट मधले सुद्धा ४४-४५% लोक लीगल पॉईंट ऑफ एमतरी मधून आले असतात, तेव्हा कायदा बदल करून बऱ्यापैकी मोठा लोंढा थांबवणे शक्य आहे. ट्रम्पला कधीही कायदा पास करता येणार नाहीये. ते त्याच्या कुवतीतले कामच नाहीये. एक टॅक्स कट सोडून त्याला काहीही पास करता आले नाही. बायडेन करत होता बॉर्डर बिल तर उलट त्याने प्रयत्न करून आडकाठी घातली.

आणि "कसली करदात्यांच्या पैश्यावर ऐश"? द्या आकडेवारी!

आणि स्प्रिंगफिल्ड ओहयो चा gdp चा ग्राफ वैगेरे बघा. त्याशिवाय कसे म्हणता कीं हेशियन लोकांचा काहीच फायदा झाला नाही अमेरिकेला?

जगांतला सर्वात कर्जबाजारी देश अमेरिका ३५ ट्रिलीयन $ चे कर्ज आहे.

ट्रम्प काळांतले योगदान ८.४ ट्रिलीयन $ चे आहे. ३.६ ट्रिलियन $ कोरोना काळातली मदत, २.५ ट्रिलियन $ टॅक्स कट्स, २.३ ट्रिलियन $ चा वाढता खर्च.

ज्यो बायडन च्या काळांत आतापर्यंत ६.६ ट्रिलियन $ ची भर पडली आहे, हा आकडा अजून वाढेल.

https://www.usatoday.com/money/blueprint/banking/national-debt-by-presid...

कोरोनाकाळांत लोकांकडे सहज पैसा आला, खरेदी वाढली, वस्तूंची मागणी वाढली, त्यामानाने पुरवढा तेव्हढा वाढला नाही उलट कमीच झाला आणि याचा परिणाम म्हणून इन्फ्लेशन वाढले. इन्फ्लेशनला आटोक्यात आणायचे उपाय योजण्यास उशीर झाला आणि इन्फ्लेशन ८ % पर्यंत गेले. पण आता आटोक्यात येत आहे. बायडनला इन्फ्लेशन कमी करण्याचे श्रेय द्यायचे का ट्रम्पच्या उधळपट्टीमुळे इन्फ्लेशन सुरु झाले ?

ट्रम्प आणि बायडन यांनी कर्जामधे जवळपास सारखीच भर टाकली आहे. ट्रम्प आला म्हणजे कर्ज कमी होणार असे नाही. पण लहरी पणाने निर्णय होतील आणि uncertainty चा उद्योगधंद्यांना मोठा फटका बसेल.

>>किंबहुना उमेदवारांकडुन ते अपेक्षितच असते. अरे पण एक-दोन प्रश्नांना बगल दिली तर ठिक आहे<<
आता जाउदे रे. मॉडरेटर्स तिच्या बाजुने असल्यावर अजुन काय होणार? ट्रंपचे दावे रियल टाइम फॅक्टचेक होताना दिसले, पण हॅरिसच्या दाव्यांकडे मात्र कानाडोळा... Happy

ट्रंपचे दावे रियल टाइम फॅक्टचेक होताना दिसले, पण हॅरिसच्या दाव्यांकडे मात्र कानाडोळा... Happy >> कुत्रे खाण्याचा दावा फॅक्ट चेक गरज तरी व्हायची गरज होती का ? नाही उगाच तो उपरोध असे ऐकायला लागायचे Lol

ट्रम्प इतक्या घाऊक प्रमाणात थापा मारतो कीं तोच जास्त फॅक्ट चेक होतो. ह्यात मॉडरेटर बायस असण्याचा हात जरी असला तरी ट्रम्पचीच चूक आहे. स्वतः थापा मारणे बंद करावे. Democrat जन्मलेल्या बाळांना मारतात अशी थाप लावली. इतके ओपनली खोटे बोलून वर फॅक्ट चेक झाल्यावर गळा काढण्याला काही अर्थ नाही.

Pages