Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...
(Just चंमतग :P)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरंच. थॅनोसांचं अगदीच काही
पेट्रोलच्या किमती केवढ्या
पेट्रोलच्या किमती केवढ्या वाढल्या आहेत!
>>>>>
हे वाचा हपा..
इतके स्वस्त आहे बघा..
India's maiden Mars mission Mangalyaan incurred a cost of ₹7 per kilometre in covering the 65 crore km distance to the red planet, making it cheaper than an auto ride
रिकामे यान सोडू शकतो आपण पार मंगळापर्यंत.. पण त्यात दोन चार माणसे भरून चंद्रापर्यंत जाणे जड होते का?
शाहरूख खान गेला आहे मंगळापर्यंत..
पण ते पिक्चर मध्ये..
प्रत्यक्षात हे धाडस कोणी कधी केले नाही.
We should use Mangalyaan for
We should use Mangalyaan for daily commute
पृथ्वी गोल असती तर केव्हाच
पृथ्वी गोल असती तर केव्हाच शेषनागाच्या फण्यावरून घरंगळुन पडून फुटली असती.
चाणक्याने कुठे सिरीयस उत्तर द्यावे / देऊ नये याबद्दल काही लिहिले नाही. ही एकच गोष्ट खटकते मला त्याची.
Fake moon landing विषयी
Fake moon landing विषयी पहिल्यांदा नववी दहावीत असताना ऐकले होते. त्यामुळे "लहानपणीच्या अफवा" मध्ये त्याचा नक्कीच समावेश होईल. १९५५ च्या दरम्यान रशिया-अमेरिका यांच्या दरम्यान अवकाश स्पर्धा सुरू झाली. अखेर चंद्रावर माणूस पाठवून अमेरिकेने बाजी मारली. त्यामुळे Fake moon landing चा प्रचार/प्रोपॅगंडा रशियाने सुरू केला असे म्हटले जाते (निदान माझ्या माहितीनुसार तरी)
पुरावे देऊन थियरी मांडणे हा वैज्ञानिक अप्रोचच आहे त्यामुळे त्यात वावगे काहीच दिसत नाही. पण त्या थियरी मधले पुरावे सबळ नाहीत, विविध देशातील स्पेस एजन्सीज कडूनही त्यास दुजोरा नाही व त्यास NASA ने सुद्धा त्यांना उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे ती केवळ एक conspiracy theory बनून राहिली आहे. १९७२ नंतर NASA ने मनुष्य पाठवला नाही कारण या मोहीमा अत्यंत खर्चिक असतात. अपोलो मोहीम हीच "मानवी इतिहासातील सर्वाधिक खर्चिक व सर्वाधिक मनुष्यबळ वापरले गेलेल्या प्रकल्पांपैकी एक" होती असे म्हटले जाते. त्यामुळे NASA ने नंतरच्या काळात पृथ्वीभोवती फिरत राहणाऱ्या प्रयोगशाळांची निर्मिती करण्यावर निधी खर्चायला प्राधान्य दिल्याने चांद्रमोहिमा बंद झाल्या. चंद्रावर माणूस पाठवून जे काही संशोधन/माहिती/प्रयोग करायचे होते ते तसेही सगळे करून झाले होते.
चंद्रावर मनुष्य गेल्याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत व इतर देशांतील अवकाश संस्थांनी त्यांची पडताळणी केली आहे. खोटे असते तर इतकी वर्षे इतके खोटे व इतक्या मोठ्या जागतिक लोकसंख्येसमोर टिकूच शकले नसते.
सगळ्यात भक्कम पुरावा म्हणजे चंद्रावर बसवलेले आरसे (retroreflectors) ज्यांच्यावरून लेसर किरणे परावर्तित होऊ शकतात. ज्याचा वापर आजही भारतासहित इतर अनेक देशांतील प्रयोगशाळा पृथ्वीपासून चंद्राचे अचूक अंतर मोजण्यासाठी करतात.
मागच्या आणि या पानावरील अ
मागच्या आणि या पानावरील अ वरून सुरू होणाऱ्या आयड्यांनो (अन्जू व्यतिरिक्त) माबोचा अभ्यास वाढवा.
तो येडा बनून पेढा खाऊन राहिलाय. त्याला माहितीय सगळं.
ते सोडून उगाच 'अभ्या'स वाढवत आहात.
मानव! "तो" कोण? मी का "तो"?
मानव!
"तो" कोण?
मी का "तो"?
मानव
मानव
अल्यू ओलंबसे यांचे सर्वच धागे त्यांनी रतिसाद न देताही हिटप्पा होत आहेत.
मानवदादा छान पोस्ट अतुल.
मानवदादा

छान पोस्ट अतुल.
केकू, 'अभ्या'स म्हणजे
केकू, 'अभ्या'स म्हणजे अभ्याला /ऋन्मेषला.
तुम्ही गमतीने लिहिलंय हे उघड आहे तुमच्या विज्ञान कथां/लेखां मुळे. तो ही गमंत करतोय पण ते सगळ्यांना उघड नाहीय.
सत्यमेव जयते/जयति हे वाक्य
सत्यमेव जयते/जयति हे वाक्य किती असत्य आहे याची प्रचीती आली.
म्हणतात ना खऱ्याची दुनिया नाही राहिली.
"सॉरी शक्तिमान."
मायबोली वरचीच ताजी.
मुंबई असं टायपाला गेलं कि भिंग येतं.?/?
मोठेपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत? असा धागा काढा कुणीतरी.
पुणे
पुणे
मुंबई
नाही आलं भिंग
>> अ वरून सुरू होणाऱ्या
>> अ वरून सुरू होणाऱ्या आयड्यांनो (अन्जू व्यतिरिक्त) माबोचा अभ्यास वाढवा.
मला बोलायचंच होतं हो हे मानव कुठेतरी. किती दिवस गरीब बिचाऱ्या प्रामाणिक व होतकरू अशा अमेरिकेवर होत असलेला अन्याय बघत बसू
किल्लीhttps://www.maayboli
किल्ली
https://www.maayboli.com/node/84816?page=19 पहा.
कदाचित थोड्या वेळेपुरता इफेक्ट असावा. गणपती सुद्धा रोज दुध पीत नाही ना.
कदाचित points table मध्ये मुंबई कुठे दिसतीय का ते बघण्यासाठी येत असावे.
केकू हो बरोबर
केकू हो बरोबर
मागे अजून काही pages वर पाहिलं आहे भिंग.
मला का येत नाही हे feature वापरता असं वाटून गेलं होतं क्षणभर
एखाद्या गोष्टीचं भ्या
एखाद्या गोष्टीचं भ्या वाटण्यास जो परावृत्त करतो तो अ-भ्यास (मानव, थोडा प्रयत्न केला, पण तुमच्या इतकं छान जमलं नाही)
आणि अशा रितीने अजून एक धागा
आणि अशा रितीने अजून एक धागा यशस्वी रित्या अपहरण करण्यात आला आहे.....
मानव हाहाहा.
मानव हाहाहा.
आणि अशा रितीने अजून एक धागा
आणि अशा रितीने अजून एक धागा यशस्वी रित्या अपहरण करण्यात आला आहे>>> वाचकहो अफवांवर विश्वास ठेऊ नका.
भुताचे पाय उलटे असतात! आणि त्याची सावली पडत नाही.
पहाटेची स्वप्ने खरी होतात.
स्वप्नात नाग दिसला कि मुलगा होणार आहे ह्याचे संकेत.
स्वप्नांवर तर खूप लिहिता येइल.
मांजर आडव गेल तर आम्ही थांबून पाच पावलं माग जाऊन परत चालायला लागत असू.
घरातून बाहेर पडल्यावर आधी पूर्वेकडे पाच पावलं चालून मग जिकडे जायचंय त्या दिशेला जायचं.
घरातून बाहेर पडताना "येतो" म्हणायचं, "जातो" असं नाही म्हणायचं.
भाजी चिरायची, कापायची नाही. हे आमच्या घरी फार स्ट्रीक्ट होते.
फुटका आरसा घरात ठेवायचा नाही.
तसेच शिंका आणि उचक्या ह्या पण फार मीनिगफुल असत. त्यावर मग पुन्हा कधीतरी.
फुटका आरसा घरात ठेवायचा नाही.
फुटका आरसा घरात ठेवायचा नाही.
>>>>
यात काही अंधश्रद्धा नाही. काच लागून रक्त येऊ शकते.
प्रत्येक गोष्टी मध्ये तुम्ही
प्रत्येक गोष्टी मध्ये तुम्ही शाहरुख खान का आणता ऋन्मेश. शाहरुख खान माझा आयडॉल आहे पण प्रत्येक बाबतीत त्याला आणण्याचा काही अर्थ नाही उगाच लोकांना irritate होतं.
दाराच्या चौकटीत उभे राहून
दाराच्या चौकटीत उभे राहून काहीही बोलायचे नाही.
तसेच घरात वाईट बोलायचे नाही, कारण वास्तूपुरुष तथास्तु असे म्हणत असतो.
डोळा/ पापणी लवत असेल तर कुणी तरी येणार असा संकेत मिळतो.
काळे तीळ फक्त श्राद्धात आणतात.
आपल्या हातून चुकून मांजर मारले गेले तर सोन्याचे मांजर दान करून काशीला जावे लागते.
आपण काही बोलत असताना पाल चुकचुकली तर ती किती वेळा चुकचुकली याचे गणित मांडले जाते.
वरच्या यादीवरून आठवलेले:
वरच्या यादीवरून आठवलेले:
१. सूर्याचे किरण आरशाने (परावर्तित करून) घरात पाडू नयेत नाहीतर घरात ढेकुण होतात
२. घराच्या दरवाजात उंबरठ्यावर उभे राहून कोणी शिंकल्यास तिथे पाणी शिंपडावे
३. बोलत असताना पाल चुकचुकली तर ते बोलणे सत्य असते (पाल चूक चूक चूक चूक म्हणत असते तरीही)
पाल चूक चूक चूक चूक म्हणत
पाल चूक चूक चूक चूक म्हणत असते तरीही)>>> हे भारी आहे... खूप हसले..!
पण अतुल " मनात शंकेची पाल
पण अतुल " मनात शंकेची पाल चुकचुकली" अस का म्हणतात.?
घराच्या दरवाजात उंबरठ्यावर उभे राहून कोणी शिंकल्यास तिथे पाणी शिंपडावे >>> हे आमच्या घरीही होते.
आमच्या शेतात एक "राखणदार" होता. म्हणजे मोठ्ठा भुजंग. त्याला शेतात फिरताना बघितले असे शपथेवर सांगणारे लोक होते. शेतीची कामे सुरु करायच्या आधी त्याला कोंबडी देण्याची पद्धत होती/आहे.
हल्ली शनिवारी दुकानदार लिंबू
हल्ली शनिवारी दुकानदार लिंबू मिरची तारेत ओवलेले रस्त्यात फेकतात. आणि नवीन लावतात. आम्हाला घरी सांगितलेले कि त्यावर पाय द्यायचा नाही. फार जपून चालावे लागतंय.
पुस्तकात मोराचे पीस ठेवायचं आणि त्याला "जिवंत" ठेवण्यासाठी कुंकू खिलवत राहायचं. मग ते बाहेर काढले आणि बोट जवळ नेले कि ते बोटाकडे झुकायचे. म्हणजे जिवंत आहे!
मनचकप्रीत पाल नावाच्या मुलीला
मनचकप्रीत पाल नावाच्या मुलीला खूप शंका असायच्या.
त्यावरूनच मशंपाचु रूढ झाले.
>> मनात शंकेची पाल चुकचुकली"
>> मनात शंकेची पाल चुकचुकली" अस का म्हणतात.?
बरोबरच तर आहे. म्हणजे शंका खरी आहे.
मनचकप्रीत पालची एक चीनी
मनचकप्रीत पालची एक चीनी प्रतिस्पर्धी होती. तिच्यावर ही आणि हिच्यावर ती सारख्या शंका घ्यायची. त्या चीनीचं नाव होतं Chukchuk Lee.
सगळ्याना कोपरा पासून नमस्कार
सगळ्याना कोपरा पासून नमस्कार.
आता मला जास्त सहन होत नाहीये.
Pages