तुमच्या बालपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत?

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47

आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.

त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.

जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.

..... आणि

एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!

आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...

(Just चंमतग :P)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मानव यांनी लिहिलेला कपाळावार घासून नाम काढायचा त्या नामाला रामकाठी म्हणायचे, आठवत होते मी बराच वेळ आत्ता आठवलं
@सामो Lol , आम्ही लहान असताना कॉलेज मधल्या ताया दोन्ही side ला बटा काढायच्या, एका side ला फ्लिक्स ठेवायाच्या किंवा डोक्याच्या मध्यात puff ठेवयाच्या उंच, कोंबड्याच्या तुऱ्यासारखा. त्यांचा मला हेवा वाटायचा कारण आमच्या शाळेत केस घट्ट पट्ट्यात, नाहीतर वेणी त कोंबून यायचा रूल होता.

शीर्षकात अंधश्रद्धा शब्द टाकला तर छान होईल/

तळहाताच्या करंगळीकडच्या बाजूवर दोन रेषा असतील तर दोन मुलं अशी एक अंधश्रद्धा होती. नेमकी दोनच मुलं झाली.
अजून एका ठिकाणच्या रेषेवरून किती लग्नं होणार ते सांगायचे. मला दोन रेषा होत्या ( आता नेमक्या कोणत्या ते आठवत नाहीत) Lol

हो हो हपा कान बाहेर असतात ते पण हुशार आणि डोकं अंड्या च्या वरच्या portion सारखं निमूळतं होत गेलेले ते पण हुशार म्हणे.
डोक्यावरून आठवलं बाळांना side ला डोकं करून झोपवल की त्यांचं डोकं त्या side ने चपटे होते असं ऐकलं होतं. मामी चे बाळ होतं लहान, आणि ती राहायला आलेली आमच्या कडे, मी पूर्ण वेळ घारी सारखी त्या बाळाला बघत राहायचे, झालं डोकं side ला की कर सरळ, एवढंच करायचे दिवसभर

डोक्यावरून आठवलं बाळांना side ला डोकं करून झोपवल की त्यांचं डोकं त्या side ने चपटे होते असं ऐकलं होतं >> हो, पण हे खरं असावं. त्याला 'फ्लॅट हेड सिन्ड्रोम' असं नाव आहे. (अर्थात 'नाव' आहे म्हणून सायंटिफिक आहे, असा दावा नाही. पण बर्‍याच अधिकृत सरकारी-वैद्यकीय वगैरे संस्थळांवर ह्याची माहिती आढळते. इथल्या वैद्यकीय लोकांनी खुलासा करावा.)

<<झालं डोकं side ला की कर सरळ>> इतकं पण लगेच होत नसेल सिन्ड्रोम डेव्हलप.

डोकं एका बाजुने चप्पट होतं हे खरं आहे. माझं आहे कारण आईला तेव्हा माहित नव्हते. पुढच्य मुलांवेळी तिने गोल उशी करुन घेतली डोकीखाली ठेवायला. त्यांची चांगली गोल गरगरीत आहेत. मी दोन वेण्या घातल्या की चप्पट डोके कळायचे. एवढा अनुभव असुनही मी माझ्या पोरीचे डोके चप्पट केलेच.

दोन भोवरे म्हणजे २ बाया हे आम्हीही बोलायचो.

मुलीचे पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजुचे बोट मोठे असले तर घरात राज्य गाजवणार असेही तेव्हा म्हटले जात असे.

करेक्ट साधना. Happy

मी पण मुली साठी मोहरी ची उशी बनवून घेतली होती डोके गोल रहावे म्हणुन.

१. साप डूख धरतो
२. तीन तिघाडा , काम बिघाडा
३. ऊसाचा रस पिउ नये( पाली भरडतात मशीनमध्ये) ( हे बाहेरचं काही खाउ नये म्हणून)
४. संध्याकाळी ७ नंतर बाहेर खेळू नये , चांगलं नसतं. का ते चांगलं नसतं हे कधीच सांगितले नाही
५. चुकीचं वागलं की देव कान कापतो

बोलाई बद्दल :बोलाईचे म्हणजे मेंढीचे हे बरोबर. मटन हा शब्द स्पेसिफिकली मेंढीच्या मांसासाठी वापरला जातो. विशेषतः १ वर्षापेक्षा जास्त वयाची मेंढी. त्या पेक्षा लहान मेंढीच्या मांसाला लँब म्हणतात सरळ. आपल्याकडे बकर्‍याच्या/इन जनरल कोणत्याही मासाला मटन म्हणायची पद्धत आहे, जी जगात सर्वत्र वापरात नाही.
***
आमच्या इथे 'रस्त्यावर पैसे टाकून ते उचलायला येणाऱ्या मुलांना पळवणारे बैरागी' ही अफवा एकदम एव्हरग्रीन होती.दर 3 वर्षांनी यायची.
<<
प्रेतयात्रा (खास करून वृद्धापकाळाने गेलेल्या व्यक्तीची) नेतांना पैसे/कवड्या उधळत, वाजत गाजत न्यायची प्रथा काही समाजांत आहे. हे रस्त्यावर पडलेले सुट्टे पैसे घरात आणू नयेत असा संकेत आहे. त्यामुळे मुलांनी ते उचलून आणू नयेत म्हणून तयार केलेली ही अफवा असावी.

अशा प्रकारे कित्येक अफवांचे मूळ कारण सेन्सिबल असावे असे वाटते.
***
व्हेटरनरी लोकांनी डायक्लोफेनॅक वापरायला सुरुवात केल्यानंतर गिधाडे संपली. आमच्या लहानपणी गिधाडे भरपूर पहायला मिळत. गिधाडाला दगड मारला तर तो झेलून गिधाड नदीकाठी जाते, अन तिथे तो दगड मोठ्या कातळावर घासत बसते. जसा दगड झिजतो तसे आपण झिजत जाऊन शेवटी मरतो अशी एक समजूत होती.
***
अन लहानपणीची सगळ्यात कॉमन समजूत तर इथे दिसलीच नाही : हातातला खाऊ जमीनीवर पडल्यावर उचलून "राम का भूत?" असे विचारावे. मित्राने राम म्हणून उत्तर दिले तर तो खाऊ खायला हरकत नसते. भूत म्हटले तर फेकून द्यावा लागतो.

पण मग हे रस्त्यावर पडलेले सुटे पैसे बॅडलक म्हणून कोणीच नाही उचलायचे तर त्या काळी त्यांचे करायचे काय?असेच झाडून कचऱ्यात टाकून द्यायचे का सुटे पैसे?

यावरून आठवलं.मी डिप्लोमाला होते त्याच्या आसपास तया नाक फुगवून गाणं गाणाऱ्या डॉक्टर सिंगर चं मायरी आल्बम सॉंग प्रसिद्ध होतं.त्यात गाडीखाली नाणं चपटं करायचा सीन होता.आम्ही रेल्वे लाईन ओलांडून कॉलेजला जायचो.तेव्हा मग गाडी येताना पाहून लगेच रुळावर नाणं ठेवायचं आणि मग गाडी निघून गेल्यावर ती चपटी नाणी गोळा करायची हे धंदे करायचो.प्रचंड धोकादायक प्रकार होता असं आता वाटतं.

गिधाडाला दगड मारला तर तो झेलून गिधाड नदीकाठी जाते, अन तिथे तो दगड मोठ्या कातळावर घासत बसते. जसा दगड झिजतो तसे आपण झिजत जाऊन शेवटी मरतो>>>
हे आमच्याकडे घुबडासाठी सांगायचे.
एका वर्षी आजीकडे अंगणात घुबडं यायची. त्यावेळी मोठी माणसंही जरा बिचकून असायची. कारण घुबडाभवतीचं अशुभत्वाचं वलय.
बंगालमधे मात्र घुबडाचं दर्शन शुभ मानतात कारण तिकडे ते लक्ष्मीचं वाहन. युपी, एमपीतही. म्हणून तिथे लक्ष्मीसोबत गणपतीची मूर्ती ठेवतात, घुबड इफेक्ट नलीफाय करायला. आपल्याकडे लक्ष्मीला बहूतेक वाहनच नाही.

गिधाड बिचारं स्वतःचं खाणंपिणं सोडून नदीवर दगड घासत बसलंय.
पण लहान मुलांना 'प्राण्यापक्ष्याना दगड मारू नका' असं थेट सांगण्यापेक्षा असं सांगून ऐकत असतील.

>> साप डूख धरतो

+१
साप, नाग इत्यादी बाबत भीतीमुळे बऱ्याच अफवा असायच्या तेंव्हा. त्यात सिनेमावाले अजून भर घालायचे.
कोणतासा एक नाग रात्री मध्यभागी एक चमकता मणी तोंडातून काढून ठेवून सभोवती फिरत असतो अशी अफवा होती. ते ऐकूनच किती थरार वाटायचा (पुढे टीव्ही च्यानल्स व सिरियल्स वगैरे बरीच वाढली आणि असल्या थरार अफवा कम कथांचा पार कचराच करून टाकला त्यांनी. पण तो भाग वेगळा)

अजून एक अफवा आठवली
कोल्हापूरला जोतिबाच्या डोंगरावर चैत्र पौर्णिमेच्या कि कोणत्या रात्री स्वत: ज्योतिबा देव घोड्यावरून मंदिराला प्रदक्षिणा घालत असतो. व सकाळी त्या घोड्याच्या तोंडाचा फेस मंदिराभोवती पडलेला दिसतो. अशीही अफवा होती (किंबहुना अजूनही असेल त्या भागात)

गावात खेळताना मुलं एकमेकांकडून आपल्याला हवं ते काम करून घ्यायचे असेल तर शपथ घालायची की, ' तुला आई रक्ता बाळाची शप्पत(शपथ) हाय '. आता याचा अर्थ काय आहे, असे का म्हणायचे हे काहीच माहीत नसले तरी आम्ही पोरं घाबरायचो याला आणि ते काम करून लगेच त्या पोराच्या रडकुंडीला येऊन मागे लागायचो, ' सुटली म्हण(शपथ), ' म्हणत.

पुढच्य मुलांवेळी तिने गोल उशी करुन घेतली
>>>>>
आणि ती उपलब्ध नसेल तर फडका फेट्यासारखा गोलाकार गुंडाळून त्यात मधोमध डोके ठेवायचे..
पण हे अंधश्रद्धा किंवा अफवा मध्ये येते का?

जिभेवर काळा डाग असला की जे वाईट बोलू ते खरे होते.

आमच्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा होता त्याबाबत हे खरोखर व्हायचे.. त्याचे कित्येक किस्से फेमस होते.

एकदा मुंबईत भारत श्रीलंका टेस्ट मॅच चालू होती. श्रीलंका पाचव्या दिवशी मॅच वाचवायला खेळत होती. हा येऊन म्हणाला की पाऊस पडला तर ड्रॉ होईल..
आणि सारे हसायला लागलो.
कारण मॅच मुंबईमध्ये होती. वानखेडे मैदान आमच्या खिडकीतून दिसेल इतक्या जवळ होते. आणि आमच्याइथे मस्त कडकडीत ऊन पडले होते. पावसाचा बहुधा सीजन सुद्धा नव्हता. पण तरीही तो पडला.. आणि त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.

त्याआधी देखील आम्ही त्याला घाबरायचो...
पण तो निसर्गाला सुद्धा कंट्रोल करू शकतो आणि आपल्या पणवतीने भारतीय संघाचे सुद्धा भवितव्य बदलू शकतो हे बघून आम्ही अजून घाबरू लागलो.

आता सर म्हणताहेत ना मग आपण माना डोलवायच्या. मोठे सर खोटे का बोलतील? सरांकडून स्फुर्ती उसनी घेऊन मी पण लिहितो. इथे सगळ्यांनी आपल्या बालपणीच्या भ्रामक समजुतीन्बद्दल लिहिले आहे. पण ते अजून त्याच्यावर विश्वास ठेवतात का? ने चतुराईने लिहिण्याचे टाळले आहे. मात्र मी तस करणार नाहीये.
१ पृथ्वी गोल आहे. सगळ्या भ्रामक समजुतींचा राजा आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि आपल्या विरुद्ध बाजूला (अमेरिका) राहणारे लोक उलटे होऊन चालतात काय? मी अनेक जणाना हा प्रश्न विचारला, तर ते हसून उत्तर द्यायचे टाळतात.
२ अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरवला. माझे बाबा म्हाणाले, "बेबट्या लेका, अमेरिकेत हॉलीवूडमध्ये शूटींग करून हे लोक आपल्याला मूर्ख बनवताहेत. ते बघ. ते अमेरिकेचे निशाण बघ. म्हणे चंद्रावर त्यांनी रोवले आहे. ते बघ कसे हवेत फडफडतय. कुणाला फसवताय? चंद्रावर हवा नाही हे सगळ्या जगाला माहितय. अरे video तरी नीट बनवा लेको.
३ पृथ्वी म्हणे सूर्याभोवती फिरते. तरी बरं कि रोज दिवसा ढवळ्या सूर्य चकरा मारतोय. पृथ्वीवर लाईन मारतोय. हा सूर्य आणि ही पृथ्वी. पण नाही आम्ही मानणार.
४ कोर्टात न्याय मिळतो. कोर्टात काय मिळतं तर तारीख पे तारीख. कोर्ट सिनेमा पहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा.
५ छातीच्या डाव्या बाजूला हृदय असते. तिथे खर तर चित्रगुप्त बसतो. ह्या विषयावर मला जास्त बोलायचं नाहीये. नाहीतर तो माझ्या खर्चाच्या बाजूला एन्ट्री टाकायचा. चित्रगुप्त माफ करा ह.
सध्या पुरतएव्हढे ठीक आहे. आठवेल तसे लिहीन.

बेबट्या लेका, अमेरिकेत हॉलीवूडमध्ये शूटींग करून हे लोक आपल्याला मूर्ख बनवताहेत
>>>

हे मात्र खरे आहे.. कोणी चंद्रावर वगैरे गेला नाही..
जर खरच त्या काळी गेला असता.. तर एव्हाना चंद्रावर वसाहती झाल्या असत्या.

Happy कुणीही चंद्रावर गेले नाही, अमेरिकन झेंडा वाऱ्याने हलतोय आणि चंद्रावर वातावरण नाही म्हणजे हा फोटो चंद्रावरचा नाही. या सगळ्या प्रोपॅगंडा थेअरी आहेत. तो झेंडा वेगळ्या प्रकारचा होता. त्यात आडवा telescopic (?) रॉड घालताना तो तुटल्याने ripple effect तयार झाला आहे.‌ नील आर्मस्ट्राँग तर निरासक्त व अतिशय कर्मनिष्ठ होता, अक्षरशः योगी होता म्हणतात. फार वेगळा होता तो..! त्याच्याबद्दल नीट जाणून घ्यायचं आहे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Lunar_Flag_Assembly

https://www.washingtonpost.com/national/health-science/the-real-story-of...

अशा अनेक प्रोपॅगंडा थेअरींचा प्रसार करणारे अनेक फेसबुक ग्रुप कार्यरत आहेत. पृथ्वी चपटी आहे, पृथ्वीचा नाश जवळ आहे, एलियन्स आपल्यात वावरत आहेत ई ई. हाकानाका. उलट अफवांना आता मल्टिप्लाय करून एका क्षणात हजारो लोकांपर्यंत पसरवता येतं. दर पिढीत कुणीतरी आपापल्या परीने अथक कष्ट केले नसते तर अजून चाकाचा शोधही लागला नसता आणि मी हे टाईपही करू शकले नसते. Happy

गूगल केले आणि खाली माहिती मिळाली.

Twelve people have walked on Earth's Moon. The first one was Neil Armstrong and the last one was Harrison Schmitt. All crewed moon landings took place between July 1969 and December 1972 as part of the United States Apollo program. All twelve people who have walked on the Moon are American men.

तीन वर्षात 12 माणसे चंद्रावर गेली. सर्व अमेरिकन.
आणि त्यानंतर आजवर गेल्या 52 वर्षात कोणीच गेले नाही.
हे खरे आहे का? असल्यास का असे? विज्ञानाची प्रगती पाहता हे सोपे व्हायला हवे ना. की इतर कुठल्या कारणाने चंद्रावर जाणे बंद केले आहे?

अस्मिता +१
तुम्ही तुमची उत्तरं शोधा. मूर्खांच्या नंदनवनात रहायचं असेल तर खुशाल रहा! शुभेच्छा!

ओके Happy

आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडिया युगात प्रत्येकाला आपल्याला गवसते तेच सत्य वाटते. गुगल बाबा ज्ञान पुरवते त्यामुळे तर्काच्या कसोटीवर माहिती तपासून घेणे बंद झाले आहे.

त्यानंतर आजवर गेल्या 52 वर्षात कोणीच गेले नाही. >> पेट्रोलच्या किमती केवढ्या वाढल्या आहेत! इथल्या इथे जायला नको वाटतं. चंद्रावर कोण जाणार?

नेहमी जायला काय मामाचं गाव आहे का ? Lol
----------

कौटिलीय अर्थशास्त्रात चाणक्याने नमूद केल्याप्रमाणे अफवा पसरवणाऱ्याला फाशीची शिक्षा होती. आता तर पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या फाशी जाईल. किमान या अफवांना हातभार लावू नये, दुजोरा देऊ नये, देणाऱ्यांचा उदोउदो करू नये, न वाचता अंधाधुंद फॉरवर्ड करू नये, अशा सोशल मीडियाचा भाग होऊ नये. एवढं तर आपण सहज करू शकतो.

कौटिलीय अर्थशास्त्रात चाणक्याने नमूद केल्याप्रमाणे अफवा पसरवणाऱ्याला फाशीची शिक्षा होती. आता तर पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या फाशी जाईल. >> चाणक्या वॉज द रियल थानोस

Pages