तुमच्या बालपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत?

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47

आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.

त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.

जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.

..... आणि

एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!

आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...

(Just चंमतग :P)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सळक भरली की पायाळू व्यक्ती कडून पाय लावून घेतला की सळक उतरते अशी अफवा होती. आमच्या वाड्यात एक पोरग होत पायाळू त्याची आई सांगायची कौतुकाने खरं खोटं देव जाणे >>> सळक म्हणजे उसण का, माझे बाबा पायाळू होते, पाठीत उसण भरल्यावर त्यांच्याकडे यायची आजूबाजूची लोकं, त्यांना बरं वाटायचं असं म्हणायचे. बाबा कधीच कोणाला मी पायाळू आहे सांगायचे नाहीत, आई सांगायची.

निरुदा
गळ्यात तुळशी माळ घातलेले माळकरी लोकं अजिबात नॉनव्हेज खात नाहीत.
अंडेही नाही. त्यामुळे बोल्हाई त्यांच्यासाठी नाही.

चिमणी देखील फेमस झाली माबोवर Lol
आमच्या लहानपणी कावळा शिवणे केव्हा केव्हा ऐकलंय.
नंतर अर्थ कळाला.

विमान दिसलं की ( तेव्हा फार उंचावरून जाणारे ,बारीक दिसणारे, आवाज करणारे विमान असायचे ) त्याच्याकडे हात करत विमान विमान चिठ्ठी दे म्हणायचो, नखावर पांढरट डाग दिसला की विमानाने चिठ्ठी दिली Lol

बीजेचा चंद्र दिसला की अजूनही मी नेसलेल्या वस्त्रातला बारीक दोरा काढून चंद्राला अर्पण करते आणि जुने घे, नवं दे म्हणते. खरंतर हा सवयीचा भाग झालाय. आता बीजेचा चंद्र फार दिसत नाही, सगळं बांधकाम असल्याने, लक्षातही रहात नाही. लहानपणी सगळं आजूबाजूला मोकळं होतं, बीजेचा चंद्र सहज दिसायचा आणि नवीन कपडे वर्षातून एक दोनदा मिळायचे, तेव्हा खूप क्रेझ होती, मी आणि मैत्रीण हे करायचो. आता गरजही नाही हे करण्याची पण सवयीचा किंवा आठवणीचा भाग म्हणून होतं माझ्याकडून हे. बाकी ती चंद्रकोर फार कयूट दिसते. काहीजण ती बघितल्यावर महिना छान जातो म्हणतात.

वर पापणीच्या केसाबद्दल आहेना wish मागण्यासाठी, ते ही करते मी .

मी बोल्हाई म्हणजे तुकाई, जाखाई आदी आयांच्या बहिणीपैकी एक असावी, असं समजत होते. रसवंती गृह बऱ्याचदा नवनाथांची असतात तशी मटणांची दुकाने बोल्हाई मातेची असावीत अशी समजूत करून घेतली होती.

<<<मी बोल्हाई म्हणजे तुकाई, जाखाई आदी आयांच्या बहिणीपैकी एक असावी, असं समजत होते>>>

हो बोल्हाई देवीच आहे. म्हणजे तुकाई परिवारातील आहे का नाही ते माहीत नाही. पण बोल्हाई ही मेंढपाळांची देवी. तिला मेंढीच्या मांसाचा नैवेद्य असतो. जे उत्तम ते देवाला अर्पण करावे ह्या पारंपरिक समजुती नुसार बहुतेक. मेंढीच्या शरीरात शेळीच्या तुलनेत मेद जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे भेंडीचे मांस चविष्ट आणि मऊसुत असते. त्यामुळे त्या मासांचा विशिष्ट पद्धतीने बनवलेला पदार्थ हा बोल्हाईचा नैवैद्य. पुढे मग ती डेलीकसी झाली आणि बोलाई मटण म्हणून प्रसिद्ध झाली. बोल्हाईभक्त मेंढपाळ देवीला आवडत नाही या समजुतीने शेळीचे मांस खात नाहीत.

अवांतर माहिती
बोल्हई देवी मंदिर वाघोली जवळ वाडेबोल्हाई गावात आहे
माहिती प्रसारण समाप्त
Happy

कुठल्याशा गावात 2 कबरी आहेत,त्या दरवर्षी तांदळाच्या दाण्याइतक्या एकमेकींच्याजवळ सरकतात,ज्या वर्षी त्या एकमेकांना चिकटतील तेव्हा जगबुडी कुव असच काहीतरी होणार

असंच कोल्हापूरला अफवा होती. रंकाळा तलावात (की जयप्रभा स्टुडिओच्या जवळपास) हत्तीचा पुतळा आहे तो दरवर्षी गहूभर पुढे सरकतो, व जेंव्हा तो पाण्यात पडेल तेंव्हा जगबुडी येणार, असे काहीसे.

सोमेश्वर च्या महादेवाच्या देवळातल्या नंदीची पण अंधश्रद्धा (अफवा नाही) आहे ना काही तरी ?
गहू भर पुढे सरकतो. प्रलय होणार. तसेच इथे चोरी कबूल करण्यासाठी आणतात. तो काय विधी आहे ?

असाच काहीसा किस्सा एकदा विराट कोहलीने जडेजा किती फेकू आहे म्हणत सांगितला होता. जडेजा त्यांना सांगायचा की त्यांच्या गावाला दोन इमारती आहेत. त्या दरवर्षी जवळ सरकतात जेव्हा त्या चिकटणार तेव्हा जगाचा अंत होणार.. कदाचित जडेजा फेकू नसेल. तर अफवेचा अंधश्रद्धेचा बळी असेल.. तसेही बरेच क्रिकेटर अंधश्रद्धाबाळू असतात..

पर्णीका यांनी थोडक्यात सांगितले आहेच. पण बोलाई बाबत बोलभिडू वर विस्तृत लेख आहे:
https://bolbhidu.com/what-is-bolhai-matan

त्यानुसार असे की बोकड/शेळी म्हणजे नर मादी. तर या भागात पूर्वी शेळ्यांची संख्या कमी होती व शेळीच्या दुधावर मुले लहानाची मोठी होत. म्हणून शेळी ही गरिबाची गाय समजली जात असे. म्हणून जशी गोहत्या निषिद्ध तशीच शेळी/बोकड हत्या सुध्दा निषिद्ध. त्यामुळेच व त्याकाळी मेंढ्याचे प्रमाणही जास्त असावे. म्हणून मेंढीचे मटण खाण्याची पद्धत रूढ झाली.

१.
मी सहावी सातवीत होते तेव्हा एक अफवा पसरलेली की विलायती चिंचेची बी सोलुन डॉक्टरला दिली तर प्रत्येक बीचे २५ पैसे मिळतात. विलायती चिंचेच्या बिया काळ्या रंगाच्या असतात. त्या अलगद सोलल्या तर आत एक चॉकलेटी रंगाचे आवरण असतत, ते सोलले की आत पांढरा गर असतो. तर २५ पैश्याची अट ही असायची की चॉकलेटी बी द्यायला हवी. आम्ही शाळेत व घरी कित्येक तास बिया सोलण्यात घालवले होते, पुर्ण चॉकलेटी बी मिळवणे खुप कठिणअसायचे, कुठेतरी ते फाटायचेच. पैसे मिळालेले लोक्स कायम कोणाच्या तरी ओळखीतले असायचे, मला मिळाले असे सांगणारा एकही जण भेटला नाही तरी बिया सोलणे काही सोडले नाही.

२. वर कोणीतरी ओलांडुन जाणे या प्रकाराबद्दल लिहिले आहे. आमचे म्हाडाचे घर लहान आणि माणसे भरपुर. त्यामुळे बसण्यासाठी सोफा, खुर्ची वगैरे न वापरता जिथे जागा मिळेल तिथे आम्ही पसरलेलो असायचो. एका सुट्टीत माझी गावची मावसबहिण आमच्या कडे राहायला आली होती. ]ती अशीच दरवाजात लोळत पडली होती आणि माझा भाऊ तिला ओलांडून किचनमधुन बाहेरच्या खोलीत गेला. बहिणी जोरात ओरडली, 'माजो वलांडो आधी काडा'. आणि तिची रडारड सुरू झाली. आम्हाला कळेनाच हिला काय झाले ते. शेवटी हुंदके देत ती म्हणाली की असे जमिनीवर लोळत असताना कोणी आपल्याला ओलांडून गेले तर आपण बुटके राहतो. यावर उपाय म्हणजे ओलांडून जाणार्‍याने परत उलट्या बाजुने ओलांडुन जायचे म्हणजे ओलांडा काढला गेला. माझा भाऊ पण कसला खट... त्याने सरळ नकार दिला. बहिण पण तशीच आडवी पडुन रडत राहिली. ओलांडा काढल्याशिवाय ती उठणार तरी कशी?? शेवटी आई भावाला ओरडली आणि ओलांडा काढुन घेतला. ओलांडा काढला तरी पुढे जाऊन बहिण पाच फुटच राहिली. Happy

३. मी अगदी पहिली दुसरीत असताना आम्ही सावंतवाडीत राहात होतो. कधी व कसे काय माहित नाही, पण माझ्या डोक्यात फिट झाले की लग्नाच्या आधी मुल होणे वाईट. बायका गॉसिपींग करत असताना आजुबाजुला मुले आहेत का हे पाहात नाहीत आणि त्यामुळे असली मौल्यवान माहिती मुलांना मिळते जी मिळायला नको असे त्याच बायकांचे मत असते. माझ्या लहानपणी तरी असे होते. तर मला ही गोष्ट वाईट हे तर कळले पण मुल कसे होते हे मला तेव्हा माहित नव्हते. त्यानंतर बरेच दिवस मी देवाला प्रार्थना करायचे की काहीही कर पण लग्न होईपर्यंत माझ्या गळ्यात मुल टाकु नकोस. नंतर कितीही टाकलीस तरी चालतील Happy

@साधना same तुमच्या सारखाच गॉसिपिंग चा खोल परिणाम आमच्या लहानपणी माझ्यावर झालेला आणि माझ्या मैत्रिणीनवर पण. फक्त आमचा विषय पळून गेलेल्या मुलींची आयुष्यात कशी वाट लागते हा होता. मोठी बाया माणसं गप्पा मारताना हे इतकं ऐकलं गेलं आणि हा विषय मग मैत्रिणीं च्या गॉसिप चर्चा सत्रात आणला, तर त्यांनीही दुजोरा दिला की हो बरोबर पळून लग्न ह्या प्रकाराने वाट लागते, असं त्यांनी पण ऐकलंय मोठ्यांकडून,मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पळून लग्न नाही करायचं.:)

रस्त्याने जाताना नंबर रिपीट झालेली नंबर प्लेट असेल तर तो no. जोरात म्हणून बरोबर चालणाऱ्याला दोनदा धपके द्यायचे पाठीला म्हणजे आपल्याला गोड खायला मिळत

साधनाताई एकदम भारी किस्से..!
ते पाय ओलांडून गेले तर बुटके राहतो हा किस्सा आमच्याकडे पण फेमस होता.

बंद मुठीवर तुटलेली पापणी ठेवून मनातल्या मनात इच्छा व्यक्त करणं ... मग ती पूर्ण होते हि अजून एक बाळबोध अफवा..!

अनु , बहुतेक आपलं बालपण जवळपास सारख्याच एरियात गेलयं ... शाळेत असताना दोन्ही हात जोडून लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज ते पाहिलं जायचं रेषांचा चंद्र जुळला का मग लव्ह मॅरेज पक्कं होणार... लग्न झाल्यावर मुलं किती होतील तो पण अंदाज बांधला जायचा... चिमणीचा कार्यक्रम पण मेहंदीत मिक्स व्हायचा. खाटेवर बसून पाय हलवायचे नाहीत.. रात्री शीळ घालायची नाही...

डोक्यात दोन भोवरे असले की दोन लग्न होणार ही अजून एक अफवा...!
लहानपणी आमच्या सोबतीचा एक मुलगा होता. दोन-तीन वर्षे लहान होता. त्याच्या डोक्यात चार भोवरे होते. आम्ही त्याला खूप चिडवायचो. बापरे बाप... तुला चार बायका मिळणार.. फार हैराण करायचो.. एवढ्या बायका घरात एकत्र कश्या राहणार ..? भांडतील दिवसभर... असे प्रश्न पण विचारायचो.. तो पण एवढा वात्रट होता ना की, त्याचं उत्तर असायचं, एक बायको शेतात काम करेल, एक कामाला जाईल , एक घर सांभाळेन आणि चौथी माझ्याबरोबर फिरेन... हा गंमतीचा भाग झाला.. चार तर सोडा मात्र अजूनही त्याच्या पत्रिकेत एकाही विवाहाचा योग जुळून आलेला नाही.

शाळेत होते तेव्हाची गोष्ट गावाच्याजवळ एक औष्णिक प्रकल्प बांधला जात होता.. त्याची धूर सोडणारी चिमणी खूप उंच होती. तर शाळेत अशी अफवा उडवलेली की, ती चिमणी चुकून उंच बांधलीय.. वर जाऊन त्या चिमणीचे दोन मजले जो तोडेल त्याच्या घरच्यांना लाखात बक्षिस मिळेल... जो चिमणीचं बांधकाम तोडताना खाली कोसळेल त्याला बिचाऱ्याला त्या पैश्यांचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून मी हळहळत राहायचे...

आम्ही शाळेत असताना हे खूळ आलं होतं.
कपाळावर उभं गंध लावल्यागत बोट वर खाली घासत १०८ (की हजार) वेळा राम राम म्हणायचं न थांबता. त्याने मनोकामना पूर्ण होते.

त्याने सतत घर्षणाने तांबडा चट्टा उमटत असे कपाळावर, तो जायला दोन तीन आठवडे लागत. बऱ्याच मुलामुलींनी हा उपद्व्याप केला होता.

@मानव हो हो तुम्ही म्हणाल्यावर मला पण आठवलं हे असे होते. मी आमच्या आस पास हे पाहिलं होते तेव्हा, मुलगे जास्त करून करायचे हे राम नामाचा नाम प्रकरण

शब्द वा वाक्य दोघांनी एकत्र म्हटले तरी गोड खायला मिळते बरं का.... त्याच दिवशी गोड खायला मिळाले असे घडले नाही पण असे झाले की मी लगेच म्हणायचे आज गोड खायला मिळणार. Happy

अरे हां रूपाली, बरेच सारखे आहेत आपले बालपण गैरसमज. एका एरियात तर अर्थातच वाढलोय.

ते भोवऱ्याचं वेगळ्या स्वरूपात ऐकलंय.पहिल्या बाळाला जितके भोवरे तितकी त्याला भावंडं होतील म्हणे.

आणि गाईच्या खड्ड्यात(खुराने झालेल्या) पाय दिला तर आई मरते ही पण समजूत होती.

>> डोक्यात दोन भोवरे

अगदी अगदी. हि बहुतेक बऱ्याच जणांच्या बालपणी कॉमन अफवा असावी. त्यामुळे शाळेत दोन वा तीन भोवरे असणारा मुलगा भेटला की मला तो माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे असे वाटून उगाचच कॉम्प्लेक्स यायचा Lol
चार भोवरे हे मात्र दुर्मिळ आहे. माझ्या तरी पाहण्यात नाही.

Pages