पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून १.
आपण अगदी दिवाळी, दसरा, गुढी पाडवा वगैरे चा फॉरवर्ड च पण छान मेसेज किंवा फोटो पाठवावा & समोरच्याने.. STU.
(सेम टू यु चा शॉर्ट पाठवावा)... हिरमोड होतो अगदीच..

रीप्लाय न देणारे/उशिरा देणारे डोक्यात जातात का? घाऊक सण वार मेसेज ना नाही पण काहीतरी महत्त्वाचे विचारले आहे, किती वाजता अमुक जागी पोहोचाल असे .. त्यावर पुढचा कार्यक्रम अवलंबून असेल , मेसेज वेळेवर न पाठवता आधी पाठवलाय १ दिवस. तरी लोक मेसेज वाचून उत्तर न देता इतर काम करत राहतात.
हल्लीच अनुभव घेतला. मुलीच्या प्लेडेट बद्दल मुलीच्या मैत्रिणी ला दिवस, वेळ देऊन जमेल का विचारले. २ दिवसांनी त्या दिवशी संध्याकाळी क्लास आहे असं उत्तर आलं. सुटी १ वीक आहे, तर मुलीच्या कटकटीला कंटाळून दुसरा दिवस, वेळ विचारली. नो उत्तर, ३ दिवस झाले. आता मी उत्तर दिले तरी कंफर्म करणार नाही.
बरेच लोकांना दुसर्‍याच्या वेळ, शेड्युल ची पर्वा नसते.

बरेच लोकांना दुसर्‍याच्या वेळ, शेड्युल ची पर्वा नसते. >> सहमत. पण....१:१ प्लेडेट असेल तर फोन का करत नाही? Text message का करायचा?

Ttyl: टॉक टू यू लेटर
मला जेन झी शॉर्ट फॉर्म/ भाषा समजून घ्यायला, वापरायला आणि योग्य वेळ साधून मुद्दाम चुकीचे वापरायला फार आवडतात. सो ड्रीप! Satisfying!

aashu29, त्यांना प्ले डेट नकोय पण थेट बोलता येत नाहीये. त्यांनी उशिराने डेट नाकारुन इशारा केला जो तुम्हाला कळला नाही Happy

उ बो शी सहमत. प्ले डेट करण्याइfunction at() {
[native code]
}अपत जवळीक आहे तर फोनवर बोलायला हवे ना…

प्लेडेट म्हणजे,
आपल्या मुलांना खेळण्यासाठी त्यांच्या वयाच्या शाळेतल्या/ओळखीच्या मुलांच्या घरी घेऊन जाणे किंवा त्यांना आपल्या घरी बोलावणे. घरी किंवा एखाद्या बागेतही चालत असावं.

मला जेन झी शॉर्ट फॉर्म/ भाषा समजून घ्यायला, वापरायला आणि योग्य वेळ साधून मुद्दाम चुकीचे वापरायला फार आवडतात. सो ड्रीप! Satisfying!>>>>>>>>>>>>>>>>>>> अमितव ते एक रील पाहिलं का ज्यात बाबा मुलींची जेन झी भाषा वापरून मॅकडी का कुठे तरी ऑर्डर करतोय आणि दुसर्‍या रिल मधे ऑफिस वर त्या भाषेत बोलतोय (प्रँक कॉल) त्याची मुलगी इतकी कावरीबावरी झालीये Lol

अंजली, बघितला. Happy
जेन झी भाषाच कशाला नुसते तोंड उघडून इंग्रजी बोलले तरी 'धरणीमाते पोटात घे' भाव आणतात मुलं. Second hand embarrassment हा शब्द मुलांनी पालकांसाठी काढलेला असावा. नुकतेच लेकीकडून सुस्काऱ्यासहित I wish I had intellectual parents ऐकलं आहे. ऐकल्याबरोबर तर 'spot on' वाटून हसलेच. नंतर तुझ्यामुळेच झिजून एवढाच उरला आहे म्हटले. त्यामुळे चिडवून/ डिवचून अती करण्यातच खरी मजा आहे. Lol

पोट्टा मला ब्रो म्हणतो. मी त्याला त्याच्या आईला कुठे गेलो की तिथल्या लोकांना त्याच्या समोर कटाक्षाने ब्र/ ब्रह/ ब्रो याच्या मधलं काही मोठ्याने म्हणतो. बाहेर खायला गेल्यावर कसं आहे विचारायला वेटर आल्यावर बसिंन म्हटल्यावर त्याचा चेहरा बघण्यालायक होता.. Lol

Second hand embarrassment >>>
नंतर तुझ्यामुळेच झिजून एवढाच उरला आहे >>>
मी त्याला त्याच्या आईला कुठे गेलो की तिथल्या लोकांना त्याच्या समोर कटाक्षाने ब्र/ ब्रह/ ब्रो याच्या मधलं काही मोठ्याने म्हणतो >>>
Lol

क्लिप बघतो. थँक्स.

अमित Lol
बापाने आपले शब्द वापरणे हा पोरांचा पेट पीव्ह असू शकेल. (काहीतरी करून मी अवांतर नाही हे दाखवतोय. मला धन्यवाद द्या)

त्यांना प्ले डेट नकोय पण थेट बोलता येत नाहीये>>> हो तसंच आहे. फोन केला तर तोंडावर मला नाही म्हणता येणार नाही Wink आणि लग्गेच शेडुल बघून सांगता येत नाही ना फोनवर, म्हणुन मेसेज.
माझी काही जबरदस्ती नाही पण ती मैत्रिण आणि माझी लेक आधीच प्लॅन करून तडफडत आहेत. आम्हा आयांची जवळीक नाही. असो.. मी लेकीला समजावले की तिला वेळ नसेल, इट्स ओके Happy

मी त्याला त्याच्या आईला कुठे गेलो की तिथल्या लोकांना त्याच्या समोर कटाक्षाने ब्र/ ब्रह/ ब्रो याच्या मधलं काही मोठ्याने म्हणतो >>> Lol मस्त आयड्या.

माझी लेक मला आणि बापा ला दोघांना ब्र म्हणते Uhoh
मागल्या खेपेस माझ्या बाबांना पण म्हणाली तसं, तर बाबा म्हणाले- तिने तोंडातून ब्र काढायचा नाही, अशी शिक्षा दिली होतीस का? आता ती तेवढाच शब्द उच्चारते आहे Rofl

नुकतेच लेकीकडून सुस्काऱ्यासहित I wish I had intellectual parents ऐकलं आहे > अर्रे देवा Lol तिला दादा कोंडके पांचट पणा लेख बद्दल समजले का काय? हाहा

नुकतेच माझ्या लेकीने वाढदिवसाच्या कार्ड वर लिहिलेले वाक्यः No matter how hard life gets- Always be Grateful, atleast you don't have "UGLY KIDS" Uhoh

टीनेजर आहेत का सगळी मुलं? म्हणजे मी मानसिक तयारी करून घेते. कारण आमच्याकडे ट्वीन्स म्हणजे काय वगैरे चौकशी व मी साधारण किती वर्षांनी ट्वीन्समधे जाईन याची गणना सुरू झालेली आहे. माझ्याच फोनवरून ग्रुप चॅट करून आमचे मेसेज वाचायचे नाहीत ही धमकी पण मिळतेय.

माझी मुलगी ११ ची आहे पण स्वतः ला (केपॉप फॅन असल्याने बहुधा) - १६-१७ ची समजते.. केपॉप माहीत नसलेल्यांना य:कश्चित समजते.
टीन १३+ ही समजूत आता डीकेड भर जुनी झाली असावी.. Lol Wink

बरेचसे प्रतिसाद वाचले आज या धाग्यावरचे. बाकी काही नाही, एक नविन म्हण सुचली: आपली ती सवय, दुसर्‍याचं ते पेट पीव्ह! Happy

हे पेट पिव्ह आहे की कसे माहित नाही .. पण खालचा whatsapp वरचा संवाद बघा व तुम्हाला असा आलाय का अनुभव सांगा..
मी: रात्री जेवायला घरी येणार की बाहेर जेऊन येणार?
नवरा: हो

म्हणजे ?? वाचणाऱ्याने काय समजायचं?

मी: तू अजून इथेच आहेस कि भारतात गेलीस?
ती: हो

डोळे वर करणारी बाहुली Angry

मी : आधी उपक्रम आणि मग सुट्टी असे करूया की सुट्टीच आधी दिलेली बरी गणपती पण जवळ आलेत ?
सर: हो

???

हे पेट पिव्ह आहे की वेगळे काहीतरी?

हो

Wink

पण हो, लोक असा रिप्लाय देतात आणि वाचून खरंच वैताग येतो

हाहाहा
मागे टिम लंचला, एकदा नवीन असते वेळी स्टेक रेअर, मिडीअम की वेल डन असे वेटरने विचारले असता, इंग्रजी उच्चार न कळल्याने मी येस असे उत्तर दिलेले.

गणपतीला बरीच जेन झी मंडळी भेटतील तर काल मी पुन्हा एकदा त्यांचे स्लँग डोळ्याखालून घातले, नाहीतर काही म्हणता काही कळत नाही. गेल्या वर्षी कुणाची तरी बारकी नवर्‍याला विचारत होती तू आजोबा आहेस की काका म्हणून. Proud

अमितवचे रील पाहिले,काही कळले नाही.रीलामधाल्या प्रतिसादा मध्ये पण बरेच जणांना कळले नाही असं वाचले.मग बरं वाटले.

त्या वयातल्या मुलांचे म्हणजे आईबाबा कूल नाहीत म्हणून लाज आणि आईबाबांनी कूल वागायचा प्रयत्न केला की डबल लाज! एकंदरीत तुम्हाला कुठे न्यायची सोय नाही पण तरी शोफर म्हणून तुमचेच पाय धरणे भाग आहे.

Pages