चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

83 मस्तच आहे. आम्ही पण (घरी) दोन तीन वेळा बघितला. थिएटरमध्ये आला तेव्हा कोविडची भीती गेलेली नव्हती त्यामुळे चालला नसेल.

राजनीती आणि ८३ दोन्ही बघितले नाहीत. बघेन नक्की.
छान पोस्ट फा. कटरीनाला सोनिया Happy

'राजनीती' मधली 'मोरा पिया मोसे' आणि 'भिगीसी भागिसी' मात्र अनेक वेळा बघितली आहेत. एक rainy day playlist केली आहे, त्यात 'मोरा पिया' ठेवले आहे. पाऊस नसताना ऐकत नाही, खास पावसाच्या दिवशी 'मोरा पिया' आणि रेनकोट मधले 'पिया तोरा कैसा अभिमान' (शुभा मुद्गल आणि गुलजारचे) हे फेवरेट.

‘मोरा पिया’ आवडलं असेल तर शफाकत अमानत अलीचं ‘मोरा सैंय्या मोसे बोले ना’ ऐक अस्मिता.

हे बुडापेस्ट ऑर्केस्ट्राबरोबरचं व्हर्जन

कट्रिना —> सोनिया. तिचा लग्नानंतरचा लूकही रादर साड्या तशाच डिझाईन केल्या आहेत. म्हणजे हॅंडलूम कॉटन पोत, जॉमेट्रीक छोटी डिझाईन्स असलेल्या बुट्ट्या व पदर. रादर काही काळापूर्वी भारतात सिरीअस राजकारण करू इच्छिणाऱ्या बायकांचा युनिफॉर्म. यांत फक्त रंग थोडे गडद आहेत.
कुकातकुका म्हणू शकता

अजिबात कुकातकुका नाही माझ्यासाठी, मीही हे लिहिता लिहिता थांबले होते. मला तिची टिकली, साड्या, सलवार, सरळ काळे केस हा अदबशीर लूक आवडला होता.

शफाकत अमानत अलींचं 'मोरा सैंया' ऐकलं होतं. बुडापेस्ट ऑर्केस्ट्रा नक्की ऐकेन माझेमन. Happy

राजनीती' मधली 'मोरा पिया मोसे' आणि 'भिगीसी भागिसी'
>>>>
ही माझीही तेव्हाची रिपीट मोड वर ऐकायची गाणी होती. मोरा पिया मोसे गायला सुद्धा आवडायचे.

राजनीती सुद्धा थिएटरला बघितला होता. पण पुन्हा कधी घरी सुद्धा बघावासा वाटला नाही. भडक आणि उथळ वाटला. मनाला भिडला नाही.

महाभारत वर आधारीत प्लॉट होता अशी चर्चा होती. नाना पाटेकर कृष्ण, रणबीर आणि अर्जुन रामपाल पांडव, अजय देवगण कर्ण, आणि तो करारा जवाब मिलेगा वाला मनोज वाजपेयी दुर्योधन होता. कतरीना द्रौपदी म्हणावे का प्रश्न आहे, पण तरी जोडी दोन्ही भावासोबत दाखवली होती. पिक्चर आवडला नव्हता. पण आता गाण्यांचा विषय वर कोणी काढला तर रात्री ती जरूर ऐकेन..

@असामी >>>>फारच सुंदर. तिच्या आवाजाला काचेच्या बांगड्यांची ‘खनक’ आहे.

शफाकत अमानत अलीचं गाणं ऐकताना युट्युबने मला ‘दोराहा’ या पाकिस्तानी पिक्चरमधलं मेहदी हसनचं ‘मुझे तुम नज़र से गिरा तो रहे हो’ सुचवलं. कित्येक वेळा मेहदी हसनचं हे गाणं ऐकलंय. पण यातला कोवळा आवाज अप्रतिम आहे. म्युझिक डोळे बंद करून ऐकलं तर शंकर-जयकिशनचं म्हणून खपेल.

आता या धाग्याचा ‘गाकवा’ होतोय.

खास पावसाच्या दिवशी 'मोरा पिया' आणि रेनकोट मधले 'पिया तोरा कैसा अभिमान' (शुभा मुद्गल आणि गुलजारचे) हे फेवरेट<< जियो अस्मिता

मोरा पिया आणि भिगिसी आवडतातच. पण रेनी डे आधी फिगर्टीव्ह मग पाऊस वाचून लिटरल विचार केला तरी पावसात ही गाणी का कनेक्शन समजलं नाही .. आम्हाला आपलं रिमझिम गिरे सावन च आठवत फक्त... आता ही आठवून लावेन... Lol पाऊस कब है कब है पाऊस

मोरा पिया मस्तच.
गाकवा केलंत तर मी म्हटलेलं गाणं शिक्षा म्हणून पाठवीन. Happy

पावसात ही गाणी का कनेक्शन समजलं नाही ..
>>> मळभ दाटून आलेलं असलं की अशी गाणी तुमच्या अंतरंगातील काही गूढ -अनवट भावना बाहेर काढतात. पण त्यात 'रिमझिम गिरे' येत नाही तेही सुरेख आहे पण नितळ आहे, तळ ढवळून काढत नाही. गाणी/संगीत आणि वातावरण मूडवर थेट परिणाम करतात. टळटळीत दुपार वास्तववादी असते आणि आभाळ स्वप्नाळू असतं. स्वप्नाळू गोष्टीत कल्पनांना वावच वाव असतो. आपण सगळ्यात जास्त स्वतःच्या मनाला घाबरत असतो, ते असं समोर उघडंनागडं आलं की 'पळता भुई' होते. त्यामुळे अशी 'भट्टी' क्वचितच जमते.

--------
असामी आणि माझेमन, लिंक्स बघितल्या/ ऐकल्या आणि आवडल्या. धन्यवाद. Happy
अवलताई Happy

आता या धाग्याचा ‘गाकवा’ होतोय. >>> Lol

"८३" मधले १७५ (आणि तेथील वातावरण कसे बदलत जाते ते ही) आणि श्रीकांतचा तो सीन हे दोन्ही माझेही फेवरिट आहेत. काल पंकज त्रिपाठीचा उल्लेख करायचा राहिला. त्याचेही काम भारी आहे. १९८३ च्या बीसीसीआय च्या ऑफिस मधले ते दोन जणही धमाल आहेत.

कप्तानपदाबद्दल गप्पा चालू असताना...
(कपिल बद्दल के आर मानसिंग) "...लेकिन क्रिकेट अच्छा खेलता है"
(त्या दोघांपैकी एक अत्यंत कॅज्युअली) "उससे क्या होता है?"
Happy

रिचर्ड्सच्या बॅटिंग मधली ग्रेस त्या कलाकाराने बर्‍यापैकी चांगली दाखवली आहे. मार्शलची बोलिंग सुद्धा. फक्त यात मार्शल जसा खुनशी दाखवला आहे तसा तो नव्ह्ता असे वाचले आहे. कपिल-मोहिंदरची केमिस्ट्री मस्त आहे. गावस्कर ची कामगिरी काही खास नव्हती त्या कप मधे पण यात दाखवला आहे तसा तो aloof असे का वगैरे माहीत नाही.

इथे अमेरिकेत लोकल लीग्स मधल्या टीम्स कशा तयार होता हे पाहिल्याने श्रीकांत 'इस्ट आफ्रिका' चा उल्लेख करतो ते नेहमी सुपरलोल वाटते Happy

अनेक वेळा चित्रपटातील सीन व मूळचे फोटो हे एकापाठोपाठ एक दाखवतात ते फार भारी आहे.

पण मला सर्वात आवडतो तो कपिलचा प्रेस कॉन्फरन्स मधला संवाद. आम्ही इथे जिंकायला आलो आहोत असे सहज म्हंटल्यावर समोरचा तो ब्रिटिश पत्रकार खुर्चीतून पडायचा बाकी असतो. तो विचारतो "वर्ल्ड कप जिंकायला?" त्यावर कपिलचे अगदी निर्विकार उत्तर

(शब्दशः) What else we here for?

कोणत्याही स्पर्धेत किंवा जेथे चांगली कामगिरी करायची आहे अशा कोणत्याही ठिकाणी स्वतःला मोटिवेट करायला यापेक्षा साधा सोपा विचार सापडणे कठीण आहे Happy आणि कपिलच्या एकूण व्यक्तिमत्त्वाशी अगदी चपखल मॅच होतो तो संवाद.

इथली चर्चा वाचून आणि त्यामुळे तयार झालेले हाइप बघून तेबामेऐउजि बघायला घेतला. सुरुवात अगदी रटाळ होती. त्यानंतर शहीद जेव्हा अमेरिकेत जातो तेथील ऑफिस मधील सीन म्हणजे "Boston Dynamics" चे YouTube वरील व्हिडिओ वाटले. ते आधीच बघितलेले असल्याने तिथेच चित्रपट बघणे बंद केला. जर वेळ मिळाला तर पुढील भाग बघणार.

BD चे काही व्हिडिओ
https://youtu.be/-9EM5_VFlt8?si=rNVUu2IRWFK_JbgP
https://youtu.be/-e1_QhJ1EhQ?si=pwfRE0cV7mBEVQnt
https://youtu.be/29ECwExc-_M?si=dWEZfy5licFyWbZp

83 बद्दल छान पोस्ट एकदम.
खूप आवडता सिनेमा आहे. बऱ्याच वेळा पाहिला आहे, आणि दुसरं काही नसेल तर बघितला जातो पुन्हा.
मध्ये मध्ये दाखवलेले रियल फोटो छान वाटतात.
सिनेमा पाहून झाल्यावर रणवीर खरा कसा दिसतो हे बघावं लागतं इतका तो कपीलच वाटत राहतो.
श्रीकांतची स्टाईल पण खरीच आणि मजेदार वाटते. पंकज त्रिपाठीचे डायलॉग छान आहेत.

वरती अस्मिताने पावसाच्या गाण्यांबद्दल लिहीले आहे त्यावर क्रिकेटने जाड रोलर फिरवला Happy

मलाही पाऊस म्हंटले की जुलैतील मुंबई व मौशुमी-अमिताभ आठवतात. त्या गाण्याच्या संगीतात व चित्रीकरणात काहीतरी जबरदस्त आहे. शुभा मुद्गल की अशाच कोणाचेतरी एक बर्‍यापैकी वेगवान गाणे पूर्वी प्रसिद्ध झाले होते. आता आठवत नाही. ओ सजना बरखा बहार आयी, रिमझिम के तराने लेके आयी बरसात, ते राजेश खन्ना व झीनत चे भीगी भीगी रातोंमे वगैरे ही गाणी सहसा आठवतात पावसाळी वातावरण असले की. आणखीही असतील. इथे लिस्ट करण्याचा उद्देश नाही. कारण गाण्यात नायक आहे, नायिका आहे आणि स्टुडिओमधे वरतून फवारा येत आहे या मुदलावर पन्नासएक गाणी सहज सापडतील. पण जी गाणी ऐकताना बाहेर पाऊस पडत आहे असे मला वाटते ती ही वरची ३-४ Happy

अस्मिता,माझे मन, असामी आणि फारएण्ड सर्वांच्या मस्त पोस्ट्स आहेत. इतरांच्याही अलिकडच्या तीन चार पानातल्या पोस्टी छान आहेत.

धाकटा भाऊ हवा असलेल्या सिनेमाच्या तिकीटा काढून आणतो नेहमी. त्याच्यामुळे सन ऑफ सरदार आणि हॅपी न्यू इयर पहावे लागले. बाहेर पडताना आम्ही बाकीचे एकमेकांकडे हसू दाबून बघत होतो , त्याला वाईट वाटू नये म्हणून पार्किंग मधे जाऊन हसावं लागलं. सांवरिया पण असाच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. नंतर ती ब्ल्यू फिल्म असल्याचे जाहीर झाले. ८३ पण असाच पाहिलेला.

शुभा मुद्गल की अशाच कोणाचेतरी एक बर्‍यापैकी वेगवान गाणे पूर्वी प्रसिद्ध झाले होते
>>
अब के सावन ऐसे बरसे...

राजेश खन्ना व झीनत चे भीगी भीगी रातोंमे
>>
याचं अनुपमा वर्मा असलेलं रीमिक्स पण मस्त होतं...

मलाही पाऊस म्हंटले की जुलैतील मुंबई व मौशुमी-अमिताभ आठवतात. त्या गाण्याच्या संगीतात व चित्रीकरणात काहीतरी जबरदस्त आहे >>> १०१%
गेल्या पावसात एका मराठी जोडप्याने ते गाणं स्वतःसाठी रिक्रिएट केले. तोही फार छान व्हिडीओ होता.

बाकी माझ्यातर्फे वरच्या लिस्टमध्ये ‘नही सामने’ व ‘तू ही रे’ ऍड. यात ऍक्चुअल पाऊस नाही पण पावसाळी वातावरण फार छान आहे.

तेबाऐ…. इथले वाचुन पाहिला. अजिबात एन्गेजींग नाही, कंटाळा आला. शाहीद आवडायचा पण यात विचित्र दिसलाय, उडता पंजाबमध्ये व्यक्तिरेखेला फिट वाटला पण यात मुद्दामहुन रोडावल्यासारखा वाटला. कृती सननने चांगले काम केलेय. रोबोटिक्स ओफिस बघुन फारसे भारी वाटले नाही पण ठिकाय. एकच खटकले. रोबो तिच्या अ‍ॅडमिनचे ऐकणार मग त्या शेजारच्या मुलाकडुन कमांड कशा स्विकारल्या.. पण तेही असोच.

शेवटचे रोबोत मानवी भावना येत असल्याचे दाखवले हे उगीच काहितरी…तेव्हा मला कळले की रोबो फक्त अ‍ॅडमिनचे ऐकतो.

झान्वी एक मिनिटही सहन न करण्याजोगी वाटली. सुदैवाने तिचा एकही चित्रपट अजुन पाहिलेला नाही. सगळ्या सुंदर्‍या ए आय वापरुन अजुन सुंदर केल्यासारख्या वाटल्या. अजुन काही वर्षांत पुर्ण ए आय चित्रपट पाहावा लागणार याची खात्री वाटतेय.

हा धागा वेगाने 'मला आवडणारी पावसाळी गाणी' कडे वाटचाल करतो आहे.
बॅक टू चिकवा.काल आर्टिकल 370 पाहिला.घरातल्याना खूप आवडला.मला खूप नाही, पण आवडला.प्रियामणी च्या साड्या ब्लाऊज खूप मस्त आहेत.तिला चांगल्या लांबीचा रोल मिळाला हे बरं वाटलं.यामी गौतम ऍक्शन रोल मध्ये चांगलं काम करते.अरुण गोविल मोदी म्हणून, आणि अमित शाह म्हणून जो कोणी कलाकार आहे दोघांनी बॉडी लँग्वेज हुबेहूब पकडलीय.
नेहमीप्रमाणे एखादं पात्र खूप छान जिंदादिल असलं, शेर अर्ज करत असलं, लोकांना ते आवडत असले तर पुढच्या अर्ध्या तासात ते मरतं हा सिद्धांत परत सिद्ध झाला.

नेहमीप्रमाणे एखादं पात्र खूप छान जिंदादिल असलं, शेर अर्ज करत असलं, लोकांना ते आवडत असले तर पुढच्या अर्ध्या तासात ते मरतं हा सिद्धांत परत सिद्ध झाला.>>>> अगदी अगदी

रेनकोट मधले 'पिया तोरा कैसा अभिमान' (शुभा मुद्गल आणि गुलजारचे) >> +२. त्यात गुलजार यांचं गद्य जे आहे - वो कोई मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुई तस्वीर तिरछी कर गया है - नितांत सुंदर. शिवाय "मथुरा नगरपती काहे तुम गोकुल जांव" हे गाणं लई फेवरेट. हे गाणं एकांतात डोळे मिटून ऐकावं. बिरह के आसू म्हणताना शुभा मुद्गल यांचा आवाज काळीज चिरत जातो.

ओ सजना बरखा बहार आयी, रिमझिम के तराने लेके आयी बरसात, ते राजेश खन्ना व झीनत चे भीगी भीगी रातोंमे >> अगदी अगदी. या गाण्यांना पावसाचा "फील" आहे. असा फील फक्त मेघ मल्हार रागातच येतो ही समजूत या गाण्यांनी फोल ठरवली आहे.

चिकवा आहे म्हणून मुद्द्यावर येतो, रेनकोट सिनेमा मला खूप आवडतो.

Silence 2: The Night Owl Bar Shootout (झी)

नाव जरी इंग्लीश असले तरी सिनेमा हिंदी आहे. एका बारमध्ये शूट आऊट होते. त्यात एका मंत्र्याच्या सेक्रेटरीचा मृत्यू होतो. महत्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे पोलीस कमिशनर अविनाश वर्माच्या (मनोज वाजपेयी) हाती ती केस सोपवतात. पण जसजसा केसचा तपास पुढे सरकत जातो, तशी वेगळीच माहिती पुढे येऊ लागते. राजकीय हत्या वाटणारी केस चाइल्ड ट्रॅफिकींगची बनत जाते.

तपासातील थरार, वेगवान कथानक, थोडेसे ट्विस्ट्स, मनोज वाजपेयी आणि नीना कुलकर्णीचा एक छोटासा सीन -सिनेमा मस्त आहे. याचा पहिला भाग जास्त आवडला होता (संपूर्ण वेगळी कथा). तो पण झी वर आहे अजून.

अब के सावन ऐसे बरसे... >>> हो हेच Happy

नेहमीप्रमाणे एखादं पात्र खूप छान जिंदादिल असलं, शेर अर्ज करत असलं, लोकांना ते आवडत असले तर पुढच्या अर्ध्या तासात ते मरतं हा सिद्धांत परत सिद्ध झाला. >>> Lol

बहुतांश पिक्चर्स किंवा सिरीज मधे आता लगेच मरणार्‍या कॅरेक्टरच्या मृत्यूपूर्व सत्कार समारंभाचा सीन असतो. काहीतरी कारणाने त्या कॅरेक्टरच्या आयुष्याचा किंवा चांगल्या सवयींचा आढावा घेतल्यासारखे संवाद असतात. किंवा पूर्वी काही वाईट गोष्टी केलेले कॅरेक्टर असेल तर ते संबंधितांची आउट ऑफ द ब्लू माफी वगैरे मागून टाकते. त्यावरून सहसा ओळखता येते. गॉट सारख्या काही सिरीजनी हा प्रकार वापरला नाही. पण अजूनही अनेक सिरीज्/पिक्चर्स मधे असतो.

८३ वर माझाच धागा होता Happy काल इथे लिहिताना आठवले होते पण इथल्या फ्लो मधे लिहिलेले इथेच ठेवले.
https://www.maayboli.com/node/80817

हो, हर्पा. त्या नितांत सुंदर गद्याने कुठल्याकुठे नेले आहे ते गाणं. 'मथुरा नगरपतीला' सुद्धा अनुमोदन.
ओ सजना बरखा बहार आयी, रिमझिम के तराने लेके आयी बरसात, ते राजेश खन्ना व झीनत चे भीगी भीगी रातोंमे >> अगदी अगदी. +१

माधव, तो सध्या यादीत ठेवला होता. बघण्यासारखा वाटतोय.

Pages