हिट अँड रन अपघात चालकाला दंड व शिक्षा : संदर्भाने नव्या कायद्या बद्दल चर्चा.

Submitted by अश्विनीमामी on 2 January, 2024 - 02:35

नव्या भारतीय न्या य संहिते नुसार हिट अँड रन अपघात झाल्यास चालकाला १० वर्शे शिक्षा व ७ लाखाचा दंड अशी तरतूद आहे. नक्की कायदा काय आहे. आय पीसी मध्ये, २ वर्शे परेन्त शिक्षेची तरतूद होती. ह्या कायद्या च्या अनुषंगाने चर्चा करु. विरोधात देश भर ट्रकर लोकांनी संप चालू केला आहे व टॅक्सी ड्रायव्हर पण संपात सहभागी होणार आहेत. पेट्रोल पंपावर अभूत पूर्व गर्दी आहे. ट्रकर संपाचे दूरगामी परिणाम होत असतात.
सर्व माल महाग होत राहील.

ही मूळ बातमी
https://www.ndtv.com/india-news/petrol-pumps-hit-and-run-bharatiya-nyaya...

तुमच्या तिथे पेट्रोल मिळते आहे का? काय परिस्थिती? काही दिवसांनी आटो पण बंदच पडतील.

डिस्क्लेमरः मजकडे गाडी/ चालक/ ट्रक काही ही नाही. सामान्य नागरीक आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ह्याच वेळेला दानिश अली ह्यांनी PM बद्दल derogatory टिप्पणी करून बिधुरीला provoke केले होते अशी नोंद निशिकांत दुबे ह्यांच्या कडून करण्यात आली आहे.
के सुरेश यांनी माईक का बंद केला नाही, हे तुम्ही त्यांना विचारायला हवे. बाकी बिधुरी यांचे बोलणे नियमानुसार नव्हते म्हणूनच ते खोडून टाकण्यात आले आहे आणि संसदीय समिती समोर चौकशी ही सुरू आहे.
Submitted by WallE on 4 January, 2024 - 00:35 >>

------ बिधुरीला provoke केले गेले अशी नोंद दुबे यांच्याकडून करण्यात आली. सगळे कसे योजनाबद्ध रितीने झाले.

अगदी याच वेळी भाजपाचे दोन खासदार ( एक माजी " कायदा " मंत्री आहे) मागे हसत असल्याचे चित्र आहे.... त्यांना हसण्यासाठी कुणी provoke केले असेल ?

Pages