DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 November, 2023 - 08:44

DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक

पठाण आणि जवान यांनी हजार करोडचा गल्ला कमावल्यावर आणि असे दोन चित्रपट एकाच वर्षात देणारा शाहरूख हा एकमेव हिरो ठरल्यानंतर त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना होतीच. तो सुद्धा असाच सुपरहिट जातोय का हा प्रश्न होताच.

पण नुसते चाहतेच नाही तर त्याचे टिकाकार सुद्धा प्रश्न विचारत होते की ते हजार करोड वगैरे ठिक आहे पण असे मसालापट ऐवजी त्याचा एखादी चांगली कथा पटकथा असलेला चित्रपट आला तर सांगा, मग बघू आम्ही..

तर आता या सर्वच प्रश्नांचे उत्तर तो घेऊन येत आहे पुन्हा एकदा डंकी या चित्रपटातून....
शाहरूख सोबत राजकुमार हिराणी हे नावच काफी आहे!

तर काय आहे डंकी म्हणजे.. याचा अर्थ काय रे बाबा? हा पहिलाच प्रश्न सामान्य लोकांना नाव ऐकून पडतो.
Dunki is a romantic comedy drama about Indians who use an illegal backdoor route to emigrate to countries like the UK and Canada
भारतातून परदेशात इकडच्या तिकडच्या मागच्या दरवाज्याने बेकायदेशीर पद्धतीने जाणे याला donkey flight म्हणतात.. चुकत असेल तर कर्रेक्ट करा.. यावरच हा चित्रपट आहे. टीजर बघून सुद्धा हे समजेलच.

हो, त्याचा पहिला टिजर काल शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभमुहुर्तावर रीलीज झाला.
जशी अपेक्षा होती तसाच उत्सुकता वाढवणारा आहे.. शाहरूखचा नेहमीच्या उत्साहाने सळसळणारा लूक फार म्हणजे फार्र आवडला आहे आणि त्यावर टीजर सुरू होताच सुखद धक्का म्हणजे आहाहा..... सोनूचा आवाज कानावर पडला Happy
तापसी पन्नू नेहमी स्त्रीप्रधान आणि हिरोईनचे कॅरेक्टर डॉमिनेटिंग असेल असे चित्रपट करते. शाहरुख सोबत कधी दिसेल असे वाटले नव्हते. यातही तिचे नाव ऐकून आधी विचित्र वाटले होते. पण टीजर मध्ये वेगळाच लूक म्हणजे कमालीची फ्रेश दिसत आहे. अगदी प्रीती झिंटा आठवली.

Dunki Drop 1 | Shah Rukh Khan
https://www.youtube.com/watch?v=LOzucm1jbzs&t=14s

डंकी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा..
एका वर्षात एका पाठोपाठ एक तीन सुपर ड्युपर हिट पिक्चर देतोय शाहरूख...
एक ईतिहास घडताना त्याचे साक्षीदार होऊया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, फॅन चित्रपटाची आठवण झाली काही ठिकाणी त्याचे हे रुप बघून...
तो चित्रपट हवा तसा जमला नव्हता.. शाहरूखचे ते रुप ती एनर्जी नीट वापरली नव्हती..
पण याबद्दल मात्र फार आशा आहेत. हा धमाल असेल असे वाटते

डंकीचे गाणे आले
https://www.youtube.com/watch?v=9Z79T_o4v8c

काय कमाल माणूस आहे यार हा...
आपल्याकडे याच वयाचा आमीर आहे, सलमान आहे, झाल्यास अक्षय सुद्धा आहे...
पण हा असला नाच शाहरूखच करू शकतो.
उत्साहाचा सळसळता धबधबा.. हॅटस ऑफ ब्रो !!!

बाई दवे, या हूक स्टेपचा मी फॅन झालो

डंकी चा सुपरस्टार राजकुमार हिरानी आहे. या चित्रपटात कोणताही आघाडीचा नायक असता तरी उत्सुकता तेव्हढीच असती.
इतके दिवस राजकुमार हिरानी दिग्दर्शक आणि विधू विनोद चोप्रा अशी जोडगोळी होती. या जोडीने संजय दत्तला घेऊन जेव्हां मुन्नाभाई सिरीज केली तेव्हां त्याचं करीअर डामाडौलच चालू होतं. मुन्नाभाईचे दोन्ही भाग सुपर डुपर हिट झाले. याचा आर्थिक फायदा अर्थात विधू विनोद चोप्राला झाला.

थ्री इडीयट्स आणि पीके मधे आमीर खान होता तर संजू मधे रणवीर कपूर. हे तिन्ही चित्रपट प्रचंड यशस्वी झाले. थ्री इडीयट्सने तर उत्पन्नाचे रेकॉर्डस केले. राजकुमार हिरानी कडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी अर्जुन आणि डकैत सारखे चित्रपट देणार्‍या राहुल रवैल बद्दल अशाच अपेक्षा होत्या.
घायल, दामिनी, घातक मुळे राजकुमार संतोषीकडून अपेक्षा वाढल्या.

पुढे या दिग्दर्शकांना स्वतःची निर्मिती संस्था असावी असे वाटू लागते. तसेच अमूक एक कलाकारामुळे मला यश मिळालेले नाही हे सुद्धा सिद्ध करायचे असते.
संतोषीने लज्जा बनवला तेव्हां त्यात सनी नव्हता. दोघांचे अर्थात आधीच वाजले होते. लज्जा अप्रतिम असून आपटला. नंतर संतोषी भरकटला.

राजू हिरानी सुद्धा जाणिवपूर्वक आमीरला सोडून शाहरूखला घेतलेले दिसते. यात त्याला कुठल्या एका कलाकारामुळे चित्रपट चालत नाही हे सिद्ध करायचे असणार. स्वाभाविक आहे ते. डंकी साईन केला तेव्हां शाहरूखचे करीयर डामाडौलच होते. पठाण आणि जवान आपटले असते तर या चित्रपटाकडूनच त्याला अपेक्षा असत्या.

पठाण आणि जवान इतके वाईट होते कि तिसरा चित्रपट राजू हिरानीचा नसता तर सपशेल आपटला असता.

पठाण आणि जवान इतके वाईट होते कि तिसरा चित्रपट राजू हिरानीचा नसता तर सपशेल आपटला असता.
>>>>>

या हिशोबाने पठाण वाईट होता तर जवान सुद्धा आपटायला हवा ना Happy

बाकी पोस्टला अनुमोदन.
राजूचा मी फार मोठा चाहता आहे. संजू मात्र फार वेळ बघवला नाही.

मुन्नाभाई देखील आधी शाहरुखलाच ऑफर केला होता. पण त्याला वेळ नसल्याने संजय दत्तकडे गेला. आज म्हणू शकतो जे झाले ते चांगले झाले. दोन्ही मुन्नाभाई पिक्चर माझ्या ऑल टाइम फेवरेट लिस्ट मध्ये आहेत.

शाहरुख वयाने यंग असताना या दोघांना एकत्र काम करताना बघायला आवडले असते. तरी ट्रेलर बघून आजही शाहरुखमध्ये जी एनर्जी आहे तिचा पुरेपूर वापर केला गेला असावा असे वाटते. तरी रोमान्समध्ये काही मर्यादा येतीलच. शाहरुख-तापसी पन्नू जोडी हटके वाटत आहे. पण फसायची शक्यताही आहे. शेवटी मायबाप पब्लिक कसे स्वीकारते त्यावर सगळे अवलंबून आहे. तुम्ही आम्ही इथे कितीही कोणाचीही बाजू घेऊन बोललो, चित्रपटाला कितीही चांगले वाईट ठरवले, तरी चित्रपटगृहात जाणारी सिनेमाप्रेमी जनता जनार्दनच चित्रपटाचे भविष्य ठरवणार. जसे पठाण जवानचे ठरवले..

आणि हो,
शाहरुख ऐवजी कोणीही चालला असता असे नसते हो.. निर्माता दिग्दर्शक वेडे नाही जे करोडो रुपये मोजून शाहरूखला च घेतात Happy

यातल्या काही वाक्यांचे प्रयोजन हे मुद्दाम प्रतिसाद वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे एकतर मेलने उत्तर देईन, विपूत देईन किंवा नवीन धागा काढेन. पण मुद्दामून पेरलेल्या वाक्यांना उत्तरे देणे हा वेळेचा अपव्यय तर आहेच, पण बघा मी कसा सर्वांना वेड्यात काढतो या अविर्भावाला ते खतपाणी सुद्धा आहे.

तापसी पन्नू नेहमी स्त्रीप्रधान आणि हिरोईनचे कॅरेक्टर डॉमिनेटिंग असेल असे चित्रपट करते.

>>>>>

आणी एक पण चालत नाही

पठाण आणि जवान इतके वाईट होते कि तिसरा चित्रपट राजू हिरानीचा नसता तर सपशेल आपटला असता.
>>>>>

या हिशोबाने पठाण वाईट होता तर जवान सुद्धा आपटायला हवा ना Happy

>>>>

आपट्ण आणिचान्ग्ल असणे वेग वेग्ळ्या गोष्ती आहेत

आणी एक पण चालत नाही
>>>>>

कारण
1) ज्या बॅनर चे चित्रपट चालतात अश्यासोबत तिने कधी काम केले नाही.
2) ती भारतीय मानसिकतेमधील स्त्रियांच्या प्रतिमेला सतात्याने छेद देते त्यामुळे तिच्या त्या भूमिकांना लोकाश्रय मिळत नाही.

तिचा एखादा थप्पड चालला किंवा नाही चालला याने मला फरक पडत नाही. मला आवडला हे पुरेसे आहे.

आपट्ण आणिचान्ग्ल असणे वेग वेग्ळ्या गोष्ती आहेत
>>>

चित्रपट चांगला वाईट असणे हे आपले मत असते. ते व्यक्तीसापेक्ष असते.
चित्रपट चालणे न चालणे हे बॉक्स ऑफिसवरचे फॅक्ट असते.

तापसी पन्नू नेहमी स्त्रीप्रधान आणि हिरोईनचे कॅरेक्टर डॉमिनेटिंग असेल असे चित्रपट करते.
>>>>>
आणी एक पण चालत नाही

>>
डायलॉग डिलिव्हरी जाम फॉल्टी आहे तिची. नुकतीच झोपेतून जागी झाल्यासारखं मोनोटोनस बोलते. चढ उतार / मोड्युलेशन वगैरे गेलं तेल लावत.
फक्त कंटेंट वर नाही ना पिक्चर चालत. तितक्याच ताकदीने परफॉर्म पण करायला लागतं.

(तुम्ही शाखा / सलमान / आमिर वगैरे असाल तर मात्र पाट्या टाकून पण गल्ला खेचता येतो)

तुम्ही शाखा / सलमान / आमिर वगैरे असाल तर मात्र पाट्या टाकून पण गल्ला खेचता येतो
>>>>

आमीर सुद्धा?
त्याला तर लोक पर्रफेक्शनिस्ट बोलतात..

तापसीच्या डायलॉग डिलीव्हरी बद्दल सहमत. तरीही एकूण पर्सनालिटीत काहीतरी आहे तिच्या जे असे रोल शोभतात. म्हणून मिळतात.
यात मात्र ती वेगळी आणि फ्रेश दिसली आहे त्यामुळे उत्सुकता जास्त आहे.

थप्पड प्रचंड बोर झालेला. इवलिशी कथा उगाच अडीच तास खेचलीये असे वाटले.
>>>

मला नेमके तेच आवडलेले होते.
नवऱ्याने बायकोला अशी चारचौघात थप्पड मारणे ही इवलीशी समजली जाणारी घटना, तशी नाहीये हेच सांगायला त्याचा दोनअडीच तासांचा चित्रपट बनवला.

थप्पड वर फार छान चर्चा इथे झाली आहे. लिंक शोधून देतो थांबा...

Donkey flight म्हणून सर्च करा.
मला स्वतःला सर्च करून, माहिती संकलित करून, त्याचा अभ्यासू लेख पाडायला फार वैताग येतो.

तरी हे घ्या...
What Does a 'Donkey Flight' Mean?
Donkey Flight refers to the illegal method of entering a foreign country by making multiple stops in other countries.

मला मराठी मिडीयमच्या पोराला हे समजले .. तुम्ही तर सायन्स मिडीयमचे आहात.. नक्की समजेल

आणी एक पण चालत नाही
>>>>>

कारण
1) ज्या बॅनर चे चित्रपट चालतात अश्यासोबत तिने कधी काम केले नाही.
2) ती भारतीय मानसिकतेमधील स्त्रियांच्या प्रतिमेला सतात्याने छेद देते त्यामुळे तिच्या त्या भूमिकांना लोकाश्रय मिळत नाही.

तिचा एखादा थप्पड चालला किंवा नाही चालला याने मला फरक पडत नाही. मला आवडला हे पुरेसे आहे.

>>

नाम शबाना
गाझि अटाक
जुडवा

अजुन पाहीजे?

सर, समस्जल.
पुन्हा लिंक मागणार नाही.

<< मला मराठी मिडीयमच्या पोराला हे समजले .. तुम्ही तर सायन्स मिडीयमचे आहात >>
हे कुठले मिडीयम? म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांना विज्ञान शिकवत नाहीत, फक्त सायन्स मिडियमला शिकवतात का?

त्या 'लुट पुट गया' गाण्यात घराच्या गच्चीवर विमानाच्या आकाराची पाण्याची टाकी दिसते.

मी मागे एकदा अनुभव दिवाळी अंकासाठी एका पंजाबी लेखकाच्या कथेचा अनुवाद केला होता.
शीर्षक होतं- जहाजवाली टंकी.
त्या कथेचा विषय हाच होता. कॅनडाला जाण्याच्या हव्यासापायी त्यातला नायक काय काय करतो, त्याचं पुढे काय होतं, वगैरे. त्याच हव्यासापायी आणि कॅनडातल्या वास्तव्यातून मिळालेल्या पैशांतून घराची डागडुजी करायची आणि वर विमानाच्या आकाराची पाण्याची टाकी बसवायची हीच आस. ज्यांच्या घरांवर अशा टाक्या असतात, ते इतरांना खिजवतात. समाजात त्यांचा वरचष्मा.
ती कथा केवळ फिक्शन नव्हती. पंजाबमधल्या खेडोपाडी ही वस्तुस्थिती होती. (अजूनही असावी.) हे अनुवाद करताना समजलं होतं.
फार सुन्न करणारी होती ती कथा.

डायलॉग डिलिव्हरी जाम फॉल्टी आहे तिची. नुकतीच झोपेतून जागी झाल्यासारखं मोनोटोनस बोलते. चढ उतार / मोड्युलेशन वगैरे गेलं तेल लावत.
>>> अगदी!

पण तरी मला ती आवडते.

पंजाब्यांच कॅनडा तसे गुज्जू लोकांचे यूएस आहे .
मागेच कॅनडा की मेक्सिकोमार्गे यूएस बॉर्डर ओलांडायचा प्रयत्न करताना एका गुजराती कुटुंबाचा मृत्यू झालेला.
गुज्जू स्पेशली पटेल लोकांत यूएसमध्ये सेटल होणे mandatory असावे.
ह्या स्टोरीवर पण एक पिक्चर निघू शकेल म्हणा

आणि वर विमानाच्या आकाराची पाण्याची टाकी बसवायची
>>>>>

अच्छा तरीच...
मी सुद्धा विचार करत होतो की याच्या चित्रपटात फराह खान स्टाईल कोरिओग्राफी कशी... ते विमान टाकी प्रकरण खरे असते तर..

Pages