DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 November, 2023 - 08:44

DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक

पठाण आणि जवान यांनी हजार करोडचा गल्ला कमावल्यावर आणि असे दोन चित्रपट एकाच वर्षात देणारा शाहरूख हा एकमेव हिरो ठरल्यानंतर त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना होतीच. तो सुद्धा असाच सुपरहिट जातोय का हा प्रश्न होताच.

पण नुसते चाहतेच नाही तर त्याचे टिकाकार सुद्धा प्रश्न विचारत होते की ते हजार करोड वगैरे ठिक आहे पण असे मसालापट ऐवजी त्याचा एखादी चांगली कथा पटकथा असलेला चित्रपट आला तर सांगा, मग बघू आम्ही..

तर आता या सर्वच प्रश्नांचे उत्तर तो घेऊन येत आहे पुन्हा एकदा डंकी या चित्रपटातून....
शाहरूख सोबत राजकुमार हिराणी हे नावच काफी आहे!

तर काय आहे डंकी म्हणजे.. याचा अर्थ काय रे बाबा? हा पहिलाच प्रश्न सामान्य लोकांना नाव ऐकून पडतो.
Dunki is a romantic comedy drama about Indians who use an illegal backdoor route to emigrate to countries like the UK and Canada
भारतातून परदेशात इकडच्या तिकडच्या मागच्या दरवाज्याने बेकायदेशीर पद्धतीने जाणे याला donkey flight म्हणतात.. चुकत असेल तर कर्रेक्ट करा.. यावरच हा चित्रपट आहे. टीजर बघून सुद्धा हे समजेलच.

हो, त्याचा पहिला टिजर काल शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभमुहुर्तावर रीलीज झाला.
जशी अपेक्षा होती तसाच उत्सुकता वाढवणारा आहे.. शाहरूखचा नेहमीच्या उत्साहाने सळसळणारा लूक फार म्हणजे फार्र आवडला आहे आणि त्यावर टीजर सुरू होताच सुखद धक्का म्हणजे आहाहा..... सोनूचा आवाज कानावर पडला Happy
तापसी पन्नू नेहमी स्त्रीप्रधान आणि हिरोईनचे कॅरेक्टर डॉमिनेटिंग असेल असे चित्रपट करते. शाहरुख सोबत कधी दिसेल असे वाटले नव्हते. यातही तिचे नाव ऐकून आधी विचित्र वाटले होते. पण टीजर मध्ये वेगळाच लूक म्हणजे कमालीची फ्रेश दिसत आहे. अगदी प्रीती झिंटा आठवली.

Dunki Drop 1 | Shah Rukh Khan
https://www.youtube.com/watch?v=LOzucm1jbzs&t=14s

डंकी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा..
एका वर्षात एका पाठोपाठ एक तीन सुपर ड्युपर हिट पिक्चर देतोय शाहरूख...
एक ईतिहास घडताना त्याचे साक्षीदार होऊया Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंजाब्यांच कॅनडा तसे गुज्जू लोकांचे यूएस आहे .
>>
गुज्जू यूके मधे पण
मल्लू दुबईत
तमिळ सिंगापूरला
तेलगू अमेरिकेत

त्या 'लुट पुट गया' गाण्यात घराच्या गच्चीवर विमानाच्या आकाराची पाण्याची टाकी दिसते.
>>
ती टाकी सोडली तर बाकी गाणं जाम बोअर झालं
शाहरुख थोडा फॅन मधून आल्यासारखा वाटला

मला इक्वेशन कळाले नाही.
इंग्रजीत लिहिलेल्या DUNKY तुन देवनागरी डंकी वजा केल्यावर हॅटट्रीक कशी होते?

प्रत्येक देवनागरी अक्षराचे मूल्य १ राहील. जोडशब्द असला तरी १ च

इंग्रजी अक्षरांचे मूल्य जास्त राहील. कारण डिमांड जास्त.
इंग्रजी व्यंजन मूल्य २
इंग्रजी स्वर मूल्य ३

आता इकवेशन सोडवून बघा
DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक
१२-२ = १० मिळेल Happy

शाहरुख थोडा फॅन मधून आल्यासारखा वाटला
>>>
थोडा नाही, बराच तिथून आलाय. निदान नाचात तरी.
पण मला तो त्यात आवडलेला. भले चित्रपट आवडला नसला तरी ती बेअरीग छान जमलेली. दुर्दैवाने पिक्चर फसलेला..
इथे चित्रपट सुद्धा छान असेल अशी अपेक्षा..

हिरो सब कूछ नसतो हे मान्य करतो की मी..
पण म्हणून हिरोचे फॅन होऊ नये का?
दिलीपकुमार, देवानंद, राजेश खन्ना ते अमिताभ सर्वांची क्रेझ होतीच ना..

फॅन होना. इतरांना किळस येई पर्यंत बोर नको करूस. विषय रनबीर कपूर/इतर कुणाचा ही चालला असेल तर शाहरूख चं काय मधेच? यत्र तत्र सर्वत्र..

९० टक्के वेळा लोकंच काढतात पहिले शाहरूखचा विषय.
काहींना तर मलाच बघून शाहरूख आठवतो. मग मलाही उत्तर द्यावे लागतेच.
तरी बरेचदा मीच विनंती करतो, आवरायची. कारण शाहरूखबद्दल बोलायला लोकांना ईतके आवडते की धागा हायजॅक होणार हे मला माहीत असते.

हा धागा शाहरूखचा आहे ईथले नाही म्हणत आहे. तर ईतर धाग्यांवरचे सांगत आहे..

नवीन ट्रेलर बघा लोकहो...
पिक्चर नेक्स्ट लेव्हल गेला आहे..
उत्सुकता तितकीच...
रेकॉर्ड ब्रेक व्यू लाईक झाल्या आहेत.. ते वेगळेच.
पण आता वाटतेय की काही चांगला मूवी बघायला मिळणार आहे लवकरच

https://youtu.be/ACKQDAlAfFE?si=miA9ZfRbZvk7RiNN

९० टक्के वेळा लोकंच काढतात पहिले शाहरूखचा विषय. >> लोक मूर्ख आहेत पण तू तर शहाणा आहेस ना ? मग दुर्लक्ष कर की. दर वेळी ९०% लोक विषय काढतात म्हणून किती खेचणार रे.

करतो काही वेळा दुर्लक्ष.
पण शाहरूख माझ्याही आवडीचा विषय आहे म्हणून सुटतो संयम Happy
बघूया नव्याने प्रयत्न करतो..

पण ते जाऊ द्या.. ट्रेलर बघा आता नवीन..
यावर्षी जवान पठाण दोन्ही आल्या आल्या थिएटरला पाहिलेत.. हा सुद्धा बघणार.. 21 डिसेंबरला येतोय.. त्याच वीकेंडला जमवावे म्हणतोय

नवा ट्रेलर आणि आधीचे पण पाहिले. राजकुमार हिरानीने काही चांगले प्रयोग केले आहेत पूर्वी, सो होपफुली काहीतरी बघणेबल असावा ही थोडिशी आशा आहे.
पण या रोल मधे शाहरुख जस्टिफाय होईना मला अजून , स्पेसिफिकली त्यालाच घ्यावे ही व्हिजन (अजून तरी) लक्षात आलेली नाही.

मै +१ ! ट्रेलर बघुन कुठल्यातरी जुन्या इरातला असल्यासारखा मुव्हि वाटतोय १९९५ म्हणजे फार काही जुना काळ नाहिये ...पण ट्रेलरमधले सेट नकली वाटतायत....लण्डनला वैगरे आजकाल कुणीही जात/जाता येत...सोमी वैगरे मुळे तर जग इतक जवळ आलय की कुठेही खुट्ट वाजल तरी सगळिकडे कळतय...अशा काळात फॉरेनला जायची ओढ त्यासाठी इग्लिश शिकायची हौस हे विषय आउटडेटेड वाटतात त्यातही "य" वेळा हे आधी दाखवुनही झालेत त्यामुळे काहिच नाविन्य जाणवले नाही....
त्यातही घिसेपिटे जोक्स आणी स्टिरियोटिपिकली पन्जाबी बॅकग्राउन्ड तर अजुनच बोअर करत...

1995 ला सोशल मीडियाने जग जवळ आलेले नव्हते. साधे मोबाईल सुद्धा नसतील ना तेव्हा?

1995 ला तरुण म्हणजे 1980 आधीचा जन्म. तेव्हा मुंबई सारख्या शहरात सुद्धा मराठी शाळा vernacular medium जास्त आणि इंग्लिश मिडीयम कमी होते.

आपल्याला नव्वदीच्या दशकात पुणे मुंबई किंवा महाराष्ट्रातील गावाकडे काय परिस्थिती होती हे माहीत असेल. पण पंजाब मधील गावात काय हे चोप्रा जोहर यांच्या चित्रपटात सुद्धा दिसले नाही. कारण ते फार टिपिकल असायचे. उडता पंजाबमुळे मला पंजाबचे दुसरे रूप समजले.

मागे कोणीतरी एका प्रतिसादात लिहिले आहे की गच्चीवर विमानाची टाकी खरेच बसवली जायची. त्यात प्रतिष्ठा समजली जायची. याचा अर्थ तशीच क्रेझ असल्याशिवाय हे शक्य नाही.

मला तर फार उत्सुकता लागली आहे की काहीतरी नवीन आणि आपल्याला माहीत नसलेले बघायला मिळेल. किंवा जे माहीत आहे त्यातही एक नवीन दृष्टीकोन सापडेल. मुन्नाभाई आणि तीन वेड्यांनी हेच केले होते.

उडता पंजाबमुळे मला पंजाबचे दुसरे रूप समजले.>>> कठीण आहे Sad पेपर वाचत जा रे. मुव्हीज वाले दाखवतात त्यावर ज्ञान प्राप्ती होते का तुझी?

हिरानी मुळे हा चित्रपट बघणार, पण ओटीटी वर.

पठाण आणि जवानच्या ट्रेलर वेळेस स्टोरी कळणार नाही याची काळजी घेतलेली .
डंकी च्या वेळेस ट्रेलर मधून स्टोरी कळते आहे.
हा ड्रॉ बॅक ठरु शकेल का ?

मुव्हीज वाले दाखवतात त्यावर ज्ञान प्राप्ती होते का तुझी?
>>>>
त्यामुळे विषय सर्वदूर पोहोचतो. लोकांना कळतो. मग वाचले जाते त्याबद्दल.

ट्रेलर बघून निम्मी कथा काय असेल याचा अंदाज आला.
मात्र पुढे कथा काय वळण घेते याची उत्सुकता वाढली आहे. ते कळत नाहीये. ती मारधाड, action, शाहरूखचे पुन्हा म्हातारपणी गावात येऊन धावणे वगैर.. याची काही टोटल लागत नाहीये.

पण पंजाब मधील गावात काय हे चोप्रा जोहर यांच्या चित्रपटात सुद्धा दिसले नाही. कारण ते फार टिपिकल असायचे. उडता पंजाबमुळे मला पंजाबचे दुसरे रूप समजले. >> ह्या तीन वाक्यांमधे काय परस्पर संबंध आहे देव जाणे ! १९८० मधे पंजाब काय होते हे सिनेमातूनच माहित करायचे असेल तर किमान माचिस तरी बघितला असेल अशी अपेक्षा ठेवूया का ? थोडे कष्ट घेतले तर अजूनही सिनेमांची लिस्ट शोधता येईल तेंव्हाचा पंजाब दाखवणारी.

तर अजूनही सिनेमांची लिस्ट शोधता येईल तेंव्हाचा पंजाब दाखवणारी.
>>>>

पिक्चर तसाच लोकप्रिय असेल तर तो लोकांतर्फे बघितला जाईल ना...
उदाहरणार्थ माचिस बघणारे कमी आहेत. लोकांना लक्षात आहे तो गाण्यांमुळे. मी सुद्धा त्याची गाणी आजही ऐकतो. पिक्चर आजवर पाहिला नाही.

लोकं अभ्यास करायला किंवा अमुकतमुक जाणून घ्यायला मुद्दाम चित्रपट बघत नाहीत तर चित्रपट एखादा गाजला तर त्या निमित्ताने लोकांपर्यंत ते पोहोचते. हा मुद्दा लक्षात घ्या.

बाई दवे, मी उडता पंजाब सुद्धा पाहिला नाहीये.

"बाई दवे, मी उडता पंजाब सुद्धा पाहिला नाहीये." नि "उडता पंजाबमुळे मला पंजाबचे दुसरे रूप समजले." >> धन्य आहेस ! सिनेमा बघितला तर कळेल हा मुद्दा लक्षात घ्या.

असामी,
पिक्चर लोकांकडून बघितला तेव्हा जाणार जेव्हा तो हिट होणार.
मुद्दा हाच आहे.

उडता पंजाब भले मी पाहिला नसला तरी शाहीद कपूर मुळे उत्सुकता निर्माण झाली. विषय काय आहे हे कळला. त्या निमित्ताने वाचन झाले. तेच लोकप्रिय नट नसता तर चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली नसती.

स्वदेशमध्ये शाहरूख होता म्हणून तो चित्रपट जास्तीत जास्त लोकाकडून बघितला गेला.

तुम्ही पंजाब चे कैक चित्रपट द्याल. आणि हे लोकांनी बघायला हवे होते असे म्हणाल. पण लोकं आपला वेळ पैसा खर्च करून मुद्दाम का बघणार जर ते त्यांच्या आवडीचे नसतील तर..

सामान्य लोकं अभ्यास करायला चित्रपट बघत नाही. तर मनोरंजनासाठी बघतात. त्यांच्यापर्यंत काही पोहोचवायचे असेल तर त्यासोबत पोहोचवता यायला हवे.

"उडता पंजाब भले मी पाहिला नसला" ह्याचा अर्थ तू पैसे खर्च केले नाहीस असा धरतो पण तू शोधलेस नि वाचलेस. मग "पण लोकं आपला वेळ पैसा खर्च करून मुद्दाम का बघणार जर ते त्यांच्या आवडीचे नसतील तर.. " ह्याला अर्थ उरत नाही. इच्छा असेल तर माणूस हवे असेल ते शोधेल. "पिक्चर लोकांकडून बघितला तेव्हा जाणार जेव्हा तो हिट होणार.
मुद्दा हाच आहे." नक्की मुद्दा ठरव कारण वर आपण सिनेमा हिट कसा होतो ह्याबद्दल बोलत नव्हतो.

आता मलाच मागे जाऊन पुन्हा सर्व पोस्ट वाचाव्या लागतील...
सध्या आजारी असल्याने हाताला थूक लाऊन टाईम प्लीज.. Happy

तो पर्यंत निकले थे कभी हम घर से गाणे ऐकुया...

थ्री इडियट मधील बेहती हवासा था वो.. चे अजून स्लो वर्जन वाटले.
ठिकठाक वाटले..
पिक्चर मध्ये कदाचित अजून भिडेल.
शेवटच्या वाक्याची मात्र टोटल नाही लागली. जिथे जन्म घेतला तिथेच कश्याला मरायला हवे..
पण याचा स्टोरी आणि कलायमॅक्सशी काहीतरी संबंध असावा..

गाणे इथे बघू शकता
https://youtu.be/Kp95Wat3YsA?si=Yog6wM4uDivtH3fs

Pages