DUNKI - डंकी = शाहरूखपटांची हॅट्रीक
पठाण आणि जवान यांनी हजार करोडचा गल्ला कमावल्यावर आणि असे दोन चित्रपट एकाच वर्षात देणारा शाहरूख हा एकमेव हिरो ठरल्यानंतर त्याच्या पुढच्या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना होतीच. तो सुद्धा असाच सुपरहिट जातोय का हा प्रश्न होताच.
पण नुसते चाहतेच नाही तर त्याचे टिकाकार सुद्धा प्रश्न विचारत होते की ते हजार करोड वगैरे ठिक आहे पण असे मसालापट ऐवजी त्याचा एखादी चांगली कथा पटकथा असलेला चित्रपट आला तर सांगा, मग बघू आम्ही..
तर आता या सर्वच प्रश्नांचे उत्तर तो घेऊन येत आहे पुन्हा एकदा डंकी या चित्रपटातून....
शाहरूख सोबत राजकुमार हिराणी हे नावच काफी आहे!
तर काय आहे डंकी म्हणजे.. याचा अर्थ काय रे बाबा? हा पहिलाच प्रश्न सामान्य लोकांना नाव ऐकून पडतो.
Dunki is a romantic comedy drama about Indians who use an illegal backdoor route to emigrate to countries like the UK and Canada
भारतातून परदेशात इकडच्या तिकडच्या मागच्या दरवाज्याने बेकायदेशीर पद्धतीने जाणे याला donkey flight म्हणतात.. चुकत असेल तर कर्रेक्ट करा.. यावरच हा चित्रपट आहे. टीजर बघून सुद्धा हे समजेलच.
हो, त्याचा पहिला टिजर काल शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभमुहुर्तावर रीलीज झाला.
जशी अपेक्षा होती तसाच उत्सुकता वाढवणारा आहे.. शाहरूखचा नेहमीच्या उत्साहाने सळसळणारा लूक फार म्हणजे फार्र आवडला आहे आणि त्यावर टीजर सुरू होताच सुखद धक्का म्हणजे आहाहा..... सोनूचा आवाज कानावर पडला 
तापसी पन्नू नेहमी स्त्रीप्रधान आणि हिरोईनचे कॅरेक्टर डॉमिनेटिंग असेल असे चित्रपट करते. शाहरुख सोबत कधी दिसेल असे वाटले नव्हते. यातही तिचे नाव ऐकून आधी विचित्र वाटले होते. पण टीजर मध्ये वेगळाच लूक म्हणजे कमालीची फ्रेश दिसत आहे. अगदी प्रीती झिंटा आठवली.
Dunki Drop 1 | Shah Rukh Khan
https://www.youtube.com/watch?v=LOzucm1jbzs&t=14s
डंकी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा..
एका वर्षात एका पाठोपाठ एक तीन सुपर ड्युपर हिट पिक्चर देतोय शाहरूख...
एक ईतिहास घडताना त्याचे साक्षीदार होऊया 
सारुख बहुत चालू माणस है.
सारुख बहुत चालू माणस है.
सर, तुम्ही ती विश्व चषकची क्लिप बघितली का?
आशा भोसले, सारुख आणि जय शहा असे बसले आहेत. आशाजी चहा पिऊन कप कुठे ठेवावा म्हणून इकडे तिकडे बघताहेत. लगेच सारुख उठून अदबीने आशाजींचा कप हातात घेऊन दोन पाउले चालत जाऊन वेटरला कप देतोय.
जय शहा माख्खासारखा तिथे बसला आहे.
ह्याला तुम्ही काहीही म्हणा. शोमनशिप वा चापलुसी.
कुणी काहीही म्हणा आपण तर पिच्चर बघणारच!
हो पाहिली ती क्लिप..
हो पाहिली ती क्लिप..
त्याच्या साठी हे फार बेसिक संस्कार आहेत.
शाहरूखला जे पर्सनली ओळखतात त्यांना यात काही नवल वाटणार नाही.
कारण मागे अजून एक क्लिप पाहिलेली. बरेच इतर कलाकारांची जोडलेली मिक्स होती. ज्यात त्यांनी शाहरूख त्याच्या घरी गेलेल्यांचा पाहुणचार कसा करतो याचा उल्लेख होता.
बरेच क्लिप आहेत. बरेच शिकण्यासारखे आहे त्या माणसाकडून.. तो माणूस समोरच्याला प्रेमात पाडतोच
शाहरूखला जे पर्सनली ओळखतात .
शाहरूखला जे पर्सनली ओळखतात ...
यात काय हसण्यासारखे?
यात काय हसण्यासारखे?
देव नाहीये तो
यात काय हसण्यासारखे?>>>
यात काय हसण्यासारखे?>>> "शाहरूखला जे पर्सनली ओळखतात" ह्यात तुझा टोन असाय की तू त्यातला एक आहेस. नाहीतर तुला कसं माहित रे? की त्याला पर्स. ओळखणार्यांनी तुला कानात सांगितले?
यात काय हसण्यासारखे?
यात काय हसण्यासारखे?
देव नाहीये तो>> याचा अर्थ मज पामराला कोणी सांगेल काय?
वीरू भाऊंनी आणखी एका अनाकलनीय
वीरू भाऊंनी आणखी एका अनाकलनीय पोस्टची सोय केली
आणखी एका अनाकलनीय पोस्टची सोय
आणखी एका अनाकलनीय पोस्टची सोय केली
>>
मला तर भीती आहे की नवीन धागा तर नाही ना येणार यामुळे...
अनाकालनीय नका हो म्हणू.
अनाकालनीय नका हो म्हणू.
काहीतरी भव्य दिव्य अर्थ असेल त्याच्या मागे.
मुंबई मधील galaxy
मुंबई मधील galaxy मल्टीप्लेक्स च्या मालकाची मुलाखत व्हायरल होत आहे , त्याने सांगितले की १०० % शो फक्त सारुक च्या donkey ला मिळाले पाहिजेत असा वितरकांचा दबाव आहे .
थोडक्यात प्रभास च्या सालार ला शो द्यायचे नाहीत .
पुन्हा एकदा उत्तर विरूद्ध दक्षिण वाद पेटणार तर.....
हे सलार काय आहे? कश्यावर आहे?
हे सलार काय आहे?
कश्यावर आहे?
आय मीन स्टोरी, थीम, जॉनर काय आहे?
डंकीला साउथ मधे शो द्यायचे
डंकीला साउथ मधे शो द्यायचे नाहीत फिट्टंमफाट. अमेरिकेत सालारला डंकी पेक्षा जास्त advance booking झाले आहे असे वाचले.
A gang leader makes a promise
A gang leader makes a promise to a dying friend by taking on other criminal gangs.
सालार स्टोरी गूगल केले तर असे मिळाले..
थोडक्यात अनिमल सारखा आहे हा..
सालार डंकी वाद त्या चिकवा
सालार डंकी वाद त्या चिकवा धाग्यावर सुद्धा सुरू आहे.. ज्यात शाहरूख असेल आपण त्या बाजूने.. मग बॉक्स ऑफिसला काहीही होऊ दे..
डुंकी चित्रपटाच्या विषय
डुंकी चित्रपटाच्या विषय असलेल्या चित्रपटांमध्ये शाखाने आधीच काम करायला पाहिजे होते। किंवा तश्या चित्रपटांची निर्मिती तरी करायला हवी होती। तेवढाच यंग दिसला असता , चिपाड गाल जे तेव्हा गुबगुबीत होते त्यातल्या खळ्या अजून खुलल्या असत्या आतासारखे फिल्टर व ग्राफिक्स ची मदत घ्यावी लागली नसती।
रजनीकांत सुद्धा वय झाले असून
रजनीकांत सुद्धा वय झाले असून तरुण भुमिका करतो की..
चाहते स्विकारत आहेत तो पर्यंत टेन्शन नाही..
असो, पिक्चर रीलीज झाला आहे..
असो, पिक्चर रीलीज झाला आहे..
रिव्यू बरेपैकी छान येत आहेत.
पब्लिक रिव्यू .. पेड किंवा अजेंडावाले नाही..
काहींना खूप आवडत आहे.. हसवणारा तसेच ईमोशनल करणारा चित्रपट असा सूर आहे..
तर काही जण म्हणत आहेत आमच्या राजकुमार हिराणी कडून मुन्नाभाई वा थ्री ईडियट्समुळे अपेक्षा जास्त होत्या, हा तितका भारी नाही पण एंटरटेनिंग आहे.. कदाचित या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आहे.
शाहरूख सोबत विकी कौशल भाव खाऊन गेला आहे..
क्लायमॅक्स बद्दल सुद्धा काहींनी चांगले म्हटले आहे.
चित्रपटाचा कन्सेप्ट , त्यामागचा विचार, त्यातून जाणारा संदेश छान आहे, आवडला असेही बरेच लोकं आवर्जून म्हणत आहेत.
एकंदरीत कधी एकदा बघायला जातो असे मला झालेय.
पण सध्या मेडीकल टेस्ट चालू आहेत, त्यामुळे हा विकेंड शक्य होईल की नाही शंका आहे
मला आवडणाऱ्या रिव्हयुवरने
मला आवडणाऱ्या रिव्हयुवरने ह्या सिनेमाचा जो प्रॉब्लेम सांगितला आहे तो मला पिकेत सुद्धा जाणवला होता. टोनली इनकनसीस्टंट. पांचट विनोद, गंभीर नसलेले सिली जग असे एक सीन मध्ये असते आणि पुढचा सीन अचानक अगदी रियालिस्टिक स्टाईल मध्ये सामाजिक प्रबोधन करायला जातो. त्यामुळे पिके पण आवडला नव्हता. हा पण थेट्रात बघायची इच्छा झाली नाही.
गंभीर नसलेले सिली जग असे एक
गंभीर नसलेले सिली जग असे एक सीन मध्ये असते
>>>>>
काल शाहरूख आणि राजकुमार हिराणी यांची चित्रपटावरील चर्चा युट्यूब वर पाहीली. त्यात त्यांनी काही रिअल व्हिडिओ दाखवले होते.
उदाहरणार्थ …
ट्रेलर मध्ये जे बोमन इराणी नाच गात इंग्लिश शिकवताना दाखवला आहे ते खरेच तसे शिकवले जाते. आणि त्याही पेक्षा फनी स्टाईलने..
गच्चीवर असलेल्या विमानाचे देखील कित्येक फोटो आणि स्टोरी त्यांनी शेअर केल्या..
एक गुरुद्वारा आहे त्याचे नावच व्हिसा गुरुद्वारा आहे जिथे रोज हजारो लोकं येऊन देवाला विमानाची प्रतिकृती अर्पण करतात..
भिंतीवर एकेक चित्रविचित्र पोस्टर आणि अश्या इल्लेगल पद्धतीने परदेशात जायच्या जाहिराती...
म्हणजे खरोखर एक सिली जाग आहे अस्तित्वात
अर्ररर !!!!!
अर्ररर !!!!!
डाँकी बघून बाहेर येणारे प्रेक्षक सिनेमाला शिव्या घालत बाहेर येत आहेत....
तुम्हाला धागाकर्त्याशी
तुम्हाला धागाकर्त्याशी प्रॉब्लेम असेल तर तसे ठेवा.
पण उगाच न बघितलेल्या सिनेमाला शिव्या कशाला द्यायच्या ?
अर्ररर !!!!!
अर्ररर !!!!!
डाँकी बघून बाहेर येणारे प्रेक्षक सिनेमाला शिव्या घालत बाहेर येत आहेत....
>> इथे जर्मनीमध्ये हाऊसफुल शो सुरू आहेत . आणि सगळे चांगला सिनेमा म्हणतच बाहेर येत होते.
आता आवड आपली आपली
बघितला. हिरानीचा देव आनंद
.
>> इथे जर्मनीमध्ये हाऊसफुल शो
>> इथे जर्मनीमध्ये हाऊसफुल शो सुरू आहेत . आणि सगळे चांगला सिनेमा म्हणतच बाहेर येत होते.
आता आवड आपली आपली Happy
वाइट असे जास्त नाही पण स्वदेश ,पर्देश आदि चित्पताटा पुढे जाम फिका
त्यांना धाग्याकर्त्याशी काही
त्यांना धाग्याकर्त्याशी काही प्रॉब्लेम नाही. मी त्यांना ओळखत सुद्धा नाही.
त्यांना शाहरूख खान शी प्रॉब्लेम आहे. मगाशी त्यांनी एका धाग्यावर खानावळ वगैरे सरसकट उल्लेख केलेला
अर्थात त्यांच्याही मताचा आदर आहे. पण हे वाद राजकारणाच्या धाग्यावर ठिक, चित्रपट धाग्यावर नको आणूया, अश्या पोस्ट किमान या धाग्यावर इग्नोर करणेच उत्तम.
मला एका गोष्टीची उत्कंठा
मला एका गोष्टीची उत्कंठा लागून राहिली आहे.
या चित्रपटात एका इल्लीगल गोष्टीची बाजू घेतली आहे, समर्थन केले आहे, सॉफ्ट कॉर्नर दाखवला आहे की तसे न करता जसे आहे तसे निव्वळ प्लेन फॅक्ट मांडले आहे...
शाहरूखवर तसा विश्वास आहे. पण चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्यातही जर तो राजकुमार हिरानी असेल तर तो आधी त्याचाच पिक्चर आहे मग शाहरूखचा...
त्यांना शाहरूख खान शी
त्यांना शाहरूख खान शी प्रॉब्लेम आहे. मगाशी त्यांनी एका धाग्यावर खानावळ वगैरे सरसकट उल्लेख केलेला
अर्थात त्यांच्याही मताचा आदर आहे. पण हे वाद राजकारणाच्या धाग्यावर ठिक, चित्रपट धाग्यावर नको आणूया, अश्या पोस्ट किमान या धाग्यावर इग्नोर करणेच उत्तम. >>>>>>>
काही मतांशी सहमत !
पण सारुक् तुमचा आवडता आणि धागा पण तुमचाच . तुम्ही त्या सारुक ला ओव्हर रेट करून ठेवलंय म्हणून बाकीच्यांनी पण आरती केली पाहिजे अशी तुमची अपेक्षा असणे बाकीच्यांना चुकीचे वाटणारच ...
मी सुद्धा सेम असाच विचार करतो
मी सुद्धा सेम असाच विचार करतो.
कोणाला काय वाटतेय याचा विचार न करता शाहरूख वर प्रेम करतो
Pages