पाककृती स्पर्धा-१ - स्वीट रॅव्हिओली - साक्षी

Submitted by साक्षी on 28 September, 2023 - 08:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

रॅव्हिओली सारण -
खजूर : ४-५
काजु - ७-८
बदाम - ७-८
अक्रोड - ५-६
तूप - १ चमचा

रॅव्हिओली आवरण (उकड) -
तांदूळ पिठी - १/२ वाटी
पाणी - १/२ वाटी
तेल - १ चमचा (फोटोत ठेवायचं राहिलं)
मीठ (अर्धी चिमूट)

रस/ सॉस
ओलं खोबरं - १/२ वाटी
गरम पाणी - १/२ वाटी
खजूर सिरप - २ चमचे

Ingredients.jpg

क्रमवार पाककृती: 

१) रॅव्हिओली सारण -
अ) तूप घालून सगळी ड्राय फ्रुट्स मिक्सरवर भरड वाटून घ्या.
Saaran_0.jpg

रॅव्हिओली आवरण
अ) तांदूळ पिठीची उकड काढा. गरम असतानाच मळून त्याचे दोन भाग करुन दोन पोळ्या लाटा. शक्य तितक्या पातळ पोळ्या लाटा.
ब) सारणाचे छोटे चपटे गोळे करुन चित्रात दाखवल्याप्रमाणे एका पोळीवर मांडा. प्रत्येक गोळ्याभोवती पाण्याचे बोट फिरवा
क) त्यावर दुसरी पोळी ठेवून चित्रात दाखवल्याप्रमाणे बाजूने दाबून चिकटवून घ्या.
ड) कातण्याने चित्रात दाखवल्याप्रमाणे कापून घ्या.
इ) हे चौकोन वाफवून घ्या.
Steps.jpg

रस/ सॉस
अ) नारळाचे दूध काढून घ्या. जितकं दाट दूध असेल तितकं चांगलं (विकत आणलं तर हा वेळ वाचेल)
ब) त्यात २ चमचे किंवा गोडाच्या आवडीप्रमाणे खजूर सिरप घाला.
NaralDoodh.jpg

असेंब्ली Happy
अ) आधी वाफवलेल्या स्वीट रॅव्हिओली मांडा आणि त्यावर गोड नारळाचं गोड दूध घाला.

खायला तयार
Plating1.jpgPlating.jpg

वाढणी/प्रमाण: 
गोड आवडणार्‍या एकाला पुरेल
अधिक टिपा: 

१) फक्त करंज्या करून नारळ दूध न घालता तशाच खाता येतील. (खजूराचं प्रमाण वाढवून गोडी वाढवता येइल)
२) आवडीची ड्राय फ्रुट्स घेता येतील. पिस्ते, सुकं अन्जीर हे चालेल. माझ्याकडे संपले होते म्हणून वगळले

माहितीचा स्रोत: 
मीच
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त ग Happy
ए खूप इनोव्हेटिव्ह, भारी झालय. पाश्चात्य पदार्थाला थेट कोकणात आणून स्थानापन्न केलयस Happy

हे छान आहे

रसमलाईच्या दुधातपण चालेल

Pages