पाककृती स्पर्धा-३ - Milets किंवा भरड धान्य वापरून पाककृती.- रागी कोकोनट पुडिंग- स्वरुप

Submitted by स्वरुप on 27 September, 2023 - 04:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

मूळ पाककृतीसाठी आवश्यक घटक:
रागी (नाचणी) - २५० ग्रॅम
कोकोनट (नारळ) - दीड कप
पाणी - अडीच कप
तूप - एक चमचा
गूळ पावडर - पाऊण कप
वेलदोडा पूड - अर्धा चमचा
खसखस - एक चमचा

सजावटीसाठी:
ओल्या खोबऱ्याचे काप
पिस्ता
केसर

क्रमवार पाककृती: 

20230923_235440.jpg

पूर्वतयारी:
साधारण पाव किलो नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि नंतर तीन ते चार तासासाठी पुरेश्या पाण्यात भिजवत ठेवावी

ओल्या नारळाचे काप (साधारण पणे दीड कप होतील इतके) तयार ठेवावे किंवा तितक्याच प्रमाणात ओल्या नारळाचा चव पण चालू शकेल.
पण हे प्रत्यक्ष कृती सुरु होण्याआधी जेमतेम १५ मिनिटे अगोदर करावे जेणेकरुन ते जास्त कोरडे होणार नाहीत.

प्रत्यक्ष कृती:
आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करु
भिजवत ठेवलेली नाचणी बारीक चाळणी किंवा स्ट्रेनर मधून निथळून घ्यावी.
आता निथळलेली नाचणी, दीडकप ओल्या नारळाचे काप आणि अर्धा कप पाणी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात फिरवून घ्यावे. नंतर परत दोन कप पाणी थोड्या थोड्या वेळाने मिक्सरच्या भांड्यात ओतून फिरवून घ्यावे.

20230924_000533.jpg

आता तयार झालेले मिश्रण एका स्वच्छ सुती कापडात थोडे थोडे घेऊन त्याचा अर्क काढून घ्यावा. तयार झालेला अर्क/द्रवमिश्रण परत एकदा गाळून घ्यावे म्हणजे थोडाफार गाळ आला असेल तर निघून जाईल.
दिलेल्या प्रमाणाचे या कृतीद्वारे साधारणतः एक चार कप तरी द्रवमिश्रण तयार होते.
नंतर एक चमचाभर खसखस मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजून वेगळी ठेवावी.
मग एका खोलगट पॅनमध्ये चमचाभर तूप टाकून त्यामध्ये तयार असलेले चार कप द्रवमिश्रण परत एकदा गाळून ओतावे
द्रवमिश्रण गरम होईपर्यंत मंद आचेवर ढवळत रहावे
मग त्यात पाऊण कप गूळ पावडर हळूहळू मिसळावी आणि सतत ढवळत रहावे.
मंद आचेवर तापवत ठेवून ते मिश्रण सतत हलवत रहावे..... थोड्या वेळातच ते घट्ट व्हायला सुरुवात होईल

20230924_003505.jpg

मग त्यात अर्धा चमचा वेलदोडा पूड घालून परत एकदा मिश्रण एकजीव करुन घ्यावे .
पूडिंगसाठी आवश्यक तेव्हढा घट्टपणा येईपर्यंत मिश्रण मंद आचेवर सतत हलवत रहावे.

नंतर ते सर्व्हिंग बाऊल/ग्लास मध्ये ओतून हळूवारपणे पणे टॅप करुन घ्यावे.
मग हे बाऊल/ग्लास साधारणतः अर्ध्या तासासाठी सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेऊन द्यावेत.
अर्ध्या तासाने ते फ्रीजबाहेर काढून त्यावर मग भाजलेली खसखस पखरावी.
वरुन सजावटीसाठी ओल्या नारळाचे काप, पिस्त्याचे काप, केसराच्या काड्या ठेवाव्यात.

आता हे अतिशय रुचकर आणि पौष्टिक तरीही ट्रेंडी दिसणारे 'रागी कोकोनट पुडिंग'खाण्यासाठी तयार असेल Happy

20230924_130505.jpg

Nutritional Highlights:
*Gluten Free
*Protin & Fiber Rich (Ragi & Coconut)
*Iron-Rich (Ragi & Jaggery)
*Calcium Rich (Ragi)
*No Preservatives/Thickening agents added

वाढणी/प्रमाण: 
भूक आणि आवडीनुसार कितीही :)
माहितीचा स्रोत: 
Youtube
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! Nutritional Highlights खासच! गाळा-गाळी थोडी गाळ ली तर चालेल का?

धन्यवाद मंजूताई !!
गाळागाळी शक्यतो गाळू नये कारण मिश्रणात जर चुकून गाळ राहिला तर पुडिंगची कन्सिस्टन्सी बिघडू शकते

छान!

नाचणी सत्त्व/सतू (वड्या) आकर्षक पॅकमध्ये आलंय.

Yummy