
नारळी पौर्णिमेला जनरली नारळीभात केला जातो पण तो ज्यांना आवडत नाही त्यांच्या साठी ही एकदम सोपी , पट्कन होणारी आणि ही चवीला अप्रतिम अशी नारळाची बर्फी ...
साहित्य
डेसिकेटेड कोकोनट पाव किलो ( तीन मेजरिंग कप )
साखर दीड कप
दूध अंदाजे पाव लिटर
साय / क्रीम छोटे दोन तीन चमचे.
सुकामेवा, केशर रंग, चांदीचा वर्ख वैगेरे ऐच्छिक
एका pan मध्ये दूध उकळत ठेवा. उकळल्यावर दोन तीन मिनिट ढवळत राहून थोड कमी करा. नंतर त्यात साखर घालून ढवळत रहा आणि निम्मं होय पर्यंत आटवा. नंतर त्यात डेसिकोटेड कोकोनट आणि क्रीम घालून पुन्हा ढवळत रहा. तो कीस कोरडा असल्याने दूध पटकन शोषून घेतो आणि मिश्रण पटकन आळतं. Pan पासुन सुटू लागल्यावर थोड मिश्रण हातात घेऊन त्याची गोळी वळत असेल तर गॅस बंद करा. तूप लावलेल्या थाळ्यात जाडसर थापा ( बर्फी आहे वड्या नाहीत ). वरून जो हवा तो सुकामेवा घाला, साधारण गार झाल्यावर वड्या कापा पूर्ण गार झाल्यावर खा. ( त्या आधीच काढून घेऊन खाल्ल्या जातात )
हा फोटो

हा आणखी एक फोटो ह्यात टेक्सचर बेटर दिसतय.

ही दुरंगी बीट रुट रस घालून.

१) डेसिकेटेड कोकोनट असला तरी कोरडी होत नाही मस्त मॉईस्ट आणि क्रिमी होते. प्लस नारळ खोवण्याचा त्रास वाचतो ते वेगळच.
२) दोन रंगाचं मिश्रण केलं तर डबल डेकर बर्फी बनते आणि मस्त दिसते. नुसती पांढरी ही छानच दिसते. मी आंब्याचा आटवलेला रस घालून केली आहे.
३) ह्याची चव खरचं नारळाच्या बर्फी सारखी लागते. वड्यांसारखी लागत नाही.
४ ) कोणी चहाला येणार असेल तर गोड म्हणून हा एक चांगला ऑप्शन आहे. एक दिवस आधी ही करुन ठेवू शकतो.
बर्फी आणि वडीतला फरक स्पष्ट करायचा प्रयत्न करणारी ही ती फेसबुक लिंक
https://m.facebook.com/groups/606730686147413/permalink/2777766349043825...
अप्रतीम दिसतेय बर्फी!
अप्रतीम दिसतेय बर्फी!
वा वा! नविन व्हेरीएशन तर
वा वा! नविन व्हेरीएशन तर खल्लास दिसतय.
कसली सुंदर दिसतेय बर्फी ममो!
कसली सुंदर दिसतेय बर्फी ममो!
नवीन बर्फी अतिशय आवडली. सारखं
नवीन बर्फी अतिशय आवडली. सारखं सारखं पिंक पिंक करणार्या लेकीसाठी करून बघेन.
वाह! रंगही सुरेख आलाय एकदम.
वाह! रंगही सुरेख आलाय एकदम. सगळं एकदम निगुतीने करता अगदी.
खूपच छान ममो. डबल लेअर बर्फी
खूपच छान ममो. डबल लेअर बर्फी तर भारीच दिसतेय. जरा बैजवार कृती लिहा ना.
सामो, मानव, प्राजक्ता, वावें
सामो, मानव, प्राजक्ता, वावें, मनमोहन, अंजली, जयू धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
लेअर वाली करायची मनात होत पण पहिल्यांदा च नको मोठी उडी म्हणून केली नाही, नंतर केली.
सामो थँक्यु पण परीसस्पर्श वैगेरे थोड जास्त होतय ग
जयू, अग लिहिली आहे कृती. सेम टु सेम तसच करायचं आहे. कट करताना वर लिहिली आहे ती काळजी घ्यायची फक्त नाहीतर लेअर मिटून जातील. गुलाबी रंग घातला तरी चालेल किंवा केशर घालून केशरी पांढरी ही करता येईल.
भारी दिसते आहे! मी लेयर्स
भारी दिसते आहे! मी लेयर्स ट्राय केलेले नाहीत अजून कधी - आता करून बघेन.
एकरंगी आणि दुरंगी दोन्ही
एकरंगी आणि दुरंगी दोन्ही बर्फ्या मस्तच.
सुरेख दिसतेय गुलाबी बर्फी.
सुरेख दिसतेय गुलाबी बर्फी.
काय सुरेख दिसतेय गुलाबी बर्फी
काय सुरेख दिसतेय गुलाबी बर्फी!
आहाहा अप्रतिम दुरंगी बर्फी.
आहाहा अप्रतिम दुरंगी बर्फी.
स्वाती, ऋतुराज, अस्मिता,
स्वाती, ऋतुराज, अस्मिता, स्वाती २, अन्जु... सर्वांना धन्यवाद.
गुलाबी बर्फी आपली मराठमोळी
गुलाबी बर्फी आपली मराठमोळी नाही वाटते. आमच्या इथल्या ब्रार किंवा तत्सम सीख दुकानातल्या असते तशी वाटत्येय. आंब्याची कशी आपली वाटते.
अमितव :). पॉइंट आहे.
अमितव :). पॉइंट आहे.
नारियल की बर्फी हा नॉन मराठीच पदार्थ आहे. आपण जनरली वड्याच करतो ओल्या खोबऱ्याच्या . बटाटा, टोमॅटो रस, आंबा अस काहीतरी घालुन.
गुलाबी माझा ऑल टाईम फेवरेट कलर आहे. त्यामुळे मराठी दिसत नसली तरी मस्तच दिसत होती . ते ही नैसर्गिक गुलाबी रंग वापरून. गुलाबी कृत्रिम रंग तर मी वापरला नसता मुद्दाम विकत आणून.
ह्या रेसिपी मधला सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे सेडिकेटेड कोकोनट. नारळ खोवण्याचा मला भयंकर कंटाळा आहे.
मस्त रेसिपी आणि त्याहीपेक्षा
मस्त रेसिपी आणि त्याहीपेक्षा फोटो मस्त.... आवडले. नारळीपाक म्हणुन एक प्रकार मिठाईच्या दुकानात मिळतो ते हेच असावे असे वाटते.
मला नारळाच्या वड्याच जास्त आवडतात. अर्थात नारळ + साखर्/गुळ कायम आवडीचे आहेच.
तर आज शेवटी या वड्या/बर्फ्या
तर आज शेवटी या वड्या/बर्फ्या करायला मुहूर्त लागला.
रेसिपी अशीच्या अशी करायची नाही हे वाचताक्षणीच ठरलं होतं. (पहा : माझा पहिला प्रतिसाद).
रेसिपीत काही दोष आहे म्हणून नव्हे, तर मला ममोंइतका दूधबीध आटवत बसायचा उत्साह नाही म्हणून.
मग त्यात असे बदल केले:
१ कप कोकोनट पावडर पूर्ण भिजेल इतकं हाफ अॅन्ड हाफ (दूध+क्रीम असं इथे मिळणारं तयार मिश्रण) गरम करून त्यात घातलं आणि थोडा वेळ बाजूला ठेवून दिलं. साधारण पाऊण कप हा&हा घातलं असावं.
२. कढईत ही भिजलेली सुक्या खोबर्याची पूड, अर्धा कप साखर, चमचाभर तूप आणि दोन मोठे चमचे मावा पावडर असं एकत्र करून मध्यम आचेवर परतायला सुरुवात केली.
३. मिश्रण अगदी झटपट म्हणजे पाचेक मिनिटांतच छान आळत आलं.
४. नेहमीप्रमाणे कडा कोरड्या व्हायला लागल्या आणि चमचा खोबर्याच्या गोळ्यात उभा राहिला तेव्हा गॅस बंद करून दोन मिनिटांनी तुपाचा हात लावलेल्या ताटलीत वड्या थापल्या.
५. इथवर सगळं नीट झालं म्हणून लाडात येऊन वर बदामाचे काप लावले आणि वड्या गार व्हायला ठेवून दिल्या.
कमरेचा एप्रन काढून ठेवताच विक्रमाला आपला हट्ट आठवला आणि झाडापाशी जाऊन त्याने वेताळाला खांद्यावर घेतलं. वेताळ म्हणाला, 'राजा, वड्या कापताना मिश्रण मला तरी मऊ वाटलं बुवा!' विक्रमाने उत्तरादाखल चमच्याने कढईतली वड्यांची खरवड काढून वेताळाला दाखवून तोंडात टाकली. 'सुकली आहे की नीट!' तो मनाशी म्हणाला.
तासाभराने बघू म्हणताना मुद्दाम टंगळमंगळ करत विक्रम दोन तासांनी पुन्हा ताटलीपाशी गेला आणि वड्या सोडवायला लागला. वड्या अजूनही मऊच होत्या. वेताळ खदाखदा हसायला लागला. म्हणाला 'जाऊ दे रे, एकेक बर्फी वॅक्स पेपरमध्ये रॅप करून दे - सांग की बर्फी वडीपेक्षा मऊच असते! चव चांगली आहे ना? मग झालं तर!'
पण विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. त्याने हलक्या हाताने ते लाडाचे बदामाचे काप काढले, सगळ्या वड्या मोडून मिश्रण काचेच्या बोलमध्ये घेतलं आणि तीन वेळा पाऊण पाऊण मिनिट असं फुल पॉवरवर मायक्रोवेव्ह केलं.
आता ते थापताना छान खुटखुटीत वाटलं हाताला. मग यथावकाश नीट
वड्याबर्फ्याही पडल्या. चव सुंदरच जमली आणि हरवाळ पोतही!वेताळ म्हणाला, 'राजा, तुझ्या चिकाटीचं मला कौतुक वाटतं. पण चमचा उभा राहण्याची हुकुमी खूण या वेळी का बरं लागू पडली नसेल? या प्रश्नाचं उत्तर तुला माहिती असून मला दिलं नाहीस तर वड्या उद्यापर्यंत अती कोरड्या होऊन त्यांची शंभर शकलं डब्यात पसरतील.'
विक्रम म्हणाला 'वेताळा, मला खरोखरच या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही, पण आधी तू सांग, ते पहिल्या ब्याचला लावलेले बदामाचे काप कुठे रे गेले? इथेच ना वाटीत काढले होते? जर या प्रश्नाचं...'
विक्रमाचा प्रश्न विचारून होण्याच्या आत वेताळ त्याच्या खांद्यावरून उडाला आणि झाडावर जाऊन लटकू लागला.
>>>>> पण आधी तू सांग, ते
>>>>> पण आधी तू सांग, ते पहिल्या ब्याचला लावलेले बदामाचे काप कुठे रे गेले? इथेच ना वाटीत काढले होते?
हाहाहा कोणी गपाटले?
>>>>>या प्रश्नाचं उत्तर तुला माहिती असून मला दिलं नाहीस तर वड्या उद्यापर्यंत अती कोरड्या होऊन त्यांची शंभर शकलं डब्यात पसरतील.'
हाहाहा
मस्त दिसते आहे.
विक्रम वेताळ कथा ज ब र द स्त
विक्रम वेताळ कथा ज ब र द स्त भ न्ना ट
मनीमोहोर यांच्या फोटोंतल्या
मनीमोहोर यांच्या फोटोंतल्या सगळ्या बर्फ्या सुंदर दिसताहेत.
मला गावाहून कधीतरी आलेल्या ओल्या नारळाच्या खुटखुटीत वड्यांचीच चव आवडते.
स्वाती, विक्रम वेताळ कथा भारी. बहुतेक तुमच्या बदाम कतली रेसिपीने मोदक करत असताना माझ्याकडचा मिश्रण सैल राहण्याचा बग तुम्हांला ट्रान्सफर झाला.
साधना धन्यवाद , बरोबर, हा
साधना धन्यवाद , बरोबर, हा नारळी पाकच आहे मिठाईच्या दुकानात मिळणारा.
भरत thanku , " वड्या झाल्यात , गॅस बंद करू या " हे ओळखण मला वाटत लक चा फॅक्टर आहे. हाहाहा
स्वाती विक्रम वेताळ गोष्ट भारी जमली आहे , वड्या अति कोरड्या होऊन >>> वगैरे सगळचं भन्नाट आहे.
शेवट मात्र गोड झाला. बदामाचे काप नसले तरी दिसतायत खूपच मस्त. आणि गोल ताटलीत चौकोन अगदी परफेक्ट थापला आहेस पण त्यामुळे कडा खायचा चान्स मात्र गेला.
केली मागच्या आठवड्यात, आवडली
केली मागच्या आठवड्यात, आवडली. धन्यवाद
स्वातीताई... भारीच प्रस्तावना
स्वातीताई... भारीच प्रस्तावना आणि वड्या.
हे वडी मऊ राहण्यात माझा हातखंडा आहे. दरवेळी घरच्यांना अरे ताजी असली की अशी मऊच असते असं म्हणता येतं.
पण या वेळी या रेसिपीप्रमाणे झाली बरोबर खुटखुटीत.
विक्रम वेताळ कथा ज ब र द स्त
विक्रम वेताळ कथा ज ब र द स्त भ न्ना ट.....+१.
आत्ताच पुन्हा एकदा केल्या.
आत्ताच पुन्हा एकदा केल्या. छान झाल्यात. एरवी गोड न खाणार्या माझ्या लेकीने पण आवडीने खाल्या आणि उद्या शाळेत न्यायला पण भरून ठेवल्यात.
एरवी गोड न खाणार्या माझ्या
एरवी गोड न खाणार्या माझ्या लेकीने पण आवडीने खाल्या आणि उद्या शाळेत न्यायला पण भरून ठेवल्यात. >> धनवंती, खूपच छान वाटलं हे वाचून.
ही बर्फी छानच होते आणि त्यामानाने विना कटकटीची ही आहे.
तोंपासु
तोंपासु
धन्यवाद शशांक
धन्यवाद शशांक
आजl नारळी पौर्णिमा म्हणून
आजl नारळी पौर्णिमा म्हणून केली. पण आज एकदम पांढरी शुभ्र केलीय. विकतचा खोबरा किस, साखर, थोडं दुध , थोडी मिल्क पावडर आणि दोन चमचे तूप. वेलची घालायचा मोह होत होता पण वेलचीचे काळे कण किती ही बारीक कुटली तरी दिसतात म्हणून घातली नाही. खूपच सुंदर दिसतेय आणि चवीला ही छानच लागतेय.

किती सुबक आणि सुंदर दिसते आहे
किती सुबक आणि सुंदर दिसते आहे!
Pages