
अर्थ स्वातंत्र्याचा
ते फार्म हाऊस रोषणाईने, तरुणाईच्या कलकलाटाने फुलून गेलेलं होतं. म्युझिक वर सगळे उत्साहाने थिरकत होते. वेटर्स ड्रिंक्स च्या ग्लासेसचे ट्रे घेऊन हॉलभर फिरत होते. ट्रे भराभर रिकामे होत होते. मंद संगीताचा आणि धुंद करणाऱ्या ड्रिंक्सचा अंमल तरूण - तरूणींच्या मनांवर, देहांवर, त्या सगळ्या वातावरणात पसरू लागला होता. पार्टीला हळूहळू रंग चढू लागला होता.
मनाली इतरांपासून जरा बाजूलाच तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभी होती. बोलता बोलता म्युझिक च्या तालावर हलकेच डोलत होती. गोरीपान, हसऱ्या चेहऱ्याची, सुडौल बांध्याची मनाली हलक्याशा मेकअप मध्येही आकर्षक दिसत होती. आज तिने व्हाईट शोल्डर टॉप आणि पिंक कलरचा लॉंग स्कर्ट परिधान केला होता. त्यात तिचं सौंदर्य अजूनच खुललं होतं. ती मैत्रिणीशी गप्पा मारत असताना हातात ड्रिंकचे दोन ग्लासेस घेतलेला रोहित ऐटबाज चालीत तिथे आला. ही पार्टी त्याच्याच वाढदिवसानिमित्त अरेंज केली गेलेली होती.
" हॅलो..." किंचित घसा खाकरून हसतमुखाने रोहित म्हणाला. त्याचा आवाज ऐकून मनालीची व तिच्या मैत्रिणीची तंद्री भंगली.
" ए हाय. हॅपी बर्थडे हॅन्डसम." त्याला Hug करून मनालीची मैत्रीण म्हणाली. रोहितने तिचे आभार मानले आणि त्याची नजर मनालीकडे गेली. आपल्या पासून नजर चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनालीचं लक्ष वेधून घेण्यासाठी रोहित म्हणाला.
" हाय मनाली."
" हाय रोहित. हॅपी बर्थडे." हळूवार स्मित करून आपला हात पुढे करत मनाली म्हणाली. रोहितने तिचा हात हातात घेतला, आणि हलकेच दाबला. त्याच्या हाताच्या राकट, मजबूत स्पर्शाने तिला शहारल्या सारखं झालं. हात मागे घेताना तिच्या गालांवर जराशी लाली आली होती. ओठांच्या कडेने हसू उमटलं होतं, आणि खाली झुकलेल्या नजरेत एक वेगळीच चमक आली होती. खरं म्हणजे मनालीला रोहित आवडत होता ; पण आपल्या भावना ती त्याच्यासमोर कधीच व्यक्त करू शकली नव्हती. आजच्या दिवसासाठी ती खूप उत्साहित होती. आपले खास आवडीचे आऊट फिट्स परिधान करून वेळेत ती पार्टीला हजर होती. वरवर ती आपल्या फ्रेंडशी बोलत होती ; पण तिची नजर रोहितलाच शोधत होती. स्वतःहून त्याच्यापुढे जाऊन त्याला विश करण्याचं धाडस तिला झालच नसतं. त्यामुळे तो स्वतःच त्यांच्यापाशी आल्यावर मात्र तिची कळी खुलली होती.
" काय रे दोन-दोन ग्लास एकदम."
" अं.." रोहित गोंधळून उद्गारला. मग एकदम तिच्या बोलण्याचा अर्थ समजून म्हणाला " नो नो. धिस इज फॉर मनाली." असं म्हणत हातातला भरलेला ग्लास त्यांनी मनाली समोर धरला.
" माझ्यासाठी ? अरे नाही... नको. मी.." ती गोंधळून चाचरत म्हणाली.
" अगं नको काय ? मी पाहतोय, तू आल्यापासून काहीच घेत नाहीयेस. घे ना. संकोच बाळगू नकोस."
" अरे खरंच नको न. प्लीज." त्याचंही आपल्याकडे लक्ष होतं हे समजताच ती मनातून लाजली, अन् सुखावलीही.
" कम ऑन. माझ्या बर्थडे च्या दिवशी मला तू अशी नाराज करणार आहेस का ? "
" हो मनाली. अगं तो इतका आग्रह करतोय, तर घे ना. " तिची मैत्रीण ओठातल्या ओठात हसू दाबत म्हणाली.
" अगं पण.."
हो ना करत शेवटी मनालीने ग्लास घेतला, आणि पिऊन रिकामा केला. एक हलकीशी सुखद संवेदना शरीरभर पसरत गेल्यासारखं तिला वाटलं. ओठांवर स्मित उमटलं.
" अजून एक." रोहित.
" अरे नाही. नको." मनाली म्हणाली.
मात्र तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करीत रोहित ने एका वेटरला आवाज दिला.
" हेss वेटर.."
तो जवळ येताच रोहित त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. वेटर ग्लास घेऊन आला. रोहितने पुन्हा मनालीला आग्रह करून तो संपवायला लावला. पुन्हा तीच फिलींग ; पण यावेळी थोडी अधिक स्ट्रॉंग. पूर्ण शरीर हलक होऊ लागल्यासारखं मनालीला वाटू लागलं.
" वील यू डान्स वुईथ मी ? " रोहित ने आपला हात पुढे करत मनालीला विचारलं. मनालीने क्षणभर धुंदावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत होता. मनालीची मैत्रीण नवलाने आणि कौतुकाने तिच्याकडे बघत होती.
मनालीने स्मित करत मूकपणे आपला हात त्याच्या हातात दिला. तो तिचा हात पकडून हॉलच्या मध्यभागी आला. दोघेही हातात हात गुंफून डान्स करू लागले. रोहितच्या स्पर्शाने मनाली क्षणाक्षणाला अधिकाधिक मोहरत होती. तिला हे स्वप्नवत वाटत होतं. हातांप्रमाणे हळूहळू नजराही एकमेकांत गुंतू लागल्या. त्याचे डोळे तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असल्या सारखे खोलवर पाहत होते. त्यांत उत्सुकता होती, मिष्कीलपणा होता. तर तिच्या नजरेत स्त्रीसुलभ लज्जा होती. मध्येच तो थांबला. आणि हात उंचावून जरा मोठ्या आवाजात म्हणाला -
" स्टॉप."
म्युझिक थांबलं. हॉलमध्ये उपस्थित सर्वांच्या नजरा गोंधळून त्याच्याकडे वळल्या. मनाली ही गोंधळली होती. थोडावेळ शांततेत गेल्यावर, रोहित बोलू लागला.
" लेडीज अॅन्ड जंटलमेन. अटेन्शन प्लीज."
आणि असं म्हणून तो मनाली समोर गुडघ्यावर बसला. मनालीच्या मनातील गोंधळ अधिकच वाढला.
" मनाली मला तू खूप आवडतेस. वील यू मॅरी मी ? "
त्याच्या या अनपेक्षित वागण्याने, बोलण्याने मनाली क्षणभर स्तब्धच झाली. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर ती भानावर आली. तिला अगदी आस्मान ठेंगणे झाल्यासारखं वाटत होतं. काय बोलावं नि काय नको ते सुचेचना. लाजून किंचित स्मितहास्य करीत तिने होकारार्थी मान डोलावली. तो हसत झटकन उभा राहिला. क्षणभरच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि एकमेकांना मिठी मारली. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.
" मनाली..."
अचानक एक संतापलेला आवाज त्या हॉलमध्ये घुमला. मनाली आणि रोहित पटकन एकमेकांपासून दूर झाले. सगळ्यांनी दचकून आश्चर्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. मनालीची आई दरवाजाच्या आत थोड्या अंतरावर उभी होती. नाजूक, बांधेसूद शरीरयष्टी, मध्यम उंची, गोऱ्यापान रंगाची नाकी डोळी रेखीव असलेली मनालीची आई मालती चिडलेल्या नजरेने मनाली कडे बघत होती.
मालती मनाली अन् रोहितच्या कॉलेज मध्येच शिक्षिका होती. आपल्या परिपक्व, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावामुळे ती सगळ्या स्टुडंट्स ची फेवरेट होती. संपूर्ण कॉलेजच्या स्टुडंट्सनाच नाही तर स्टाफ, टीचर्सना ही तिच्या विषयी प्रेमपूर्वक आदर होता.
मनालीचा चेहरा प्रथम भीती व शरमेने पांढरा पडला ; पण मग त्यावर निश्चय व गंभीरता आली. तिच्यावर एक रागाचा कटाक्ष टाकून एकदम मालती तरातरा चालत तिच्या व रोहितच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.
" हे सगळं काय चाललंय ? "
" अ..आई. हे बघ." मनाली बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे डोळे, किंचित जडावलेली जीभ, देहबोली यांवरून मालतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने मनालीच्या तोंडाजवळ तोंड नेलं, आणि क्षणार्धात सगळा प्रकार तिच्या ध्यानात आला. ती दारू प्यायली
होती. रोहितने खरंतर मगाशी कोल्ड् ड्रिंक च्या बहाण्याने तिला दारू प्यायला लावली होती.
मनालीच्या मनातील रोहित बद्दल असलेल्या भावना मालती चांगल्या ओळखून होती. अजाण वयात बाह्य रंगाच्या आकर्षणालाच भुलून जाऊन व्यक्ती त्यालाच प्रेम समजून बसतो, आपल्या मुलीच्या बाबतीतही हेच घडत असल्याचं तिला समजत होतं. म्हणूनच दोन तीन वेळा अप्रत्यक्ष पणे तिने आपल्या मुलीला ती अजून लहान, अजाण असून तिने आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असेही समजावलं होतं. तसेच ती हेदेखील जाणून होती की मनाली सारख्या जराशा बुजऱ्या स्वभावाच्या मुलीला आपल्या मनातलं रोहित समोर उघड करण्याचं धैर्य होणार नव्हतं ; पण आता त्या बीयरच्या अंमलाखाली तिच्या मनात जरा हिंमत आणि बेपर्वाई आली होतं. तसे फक्त दोनच पेग्ज घेतले असल्यामुळे ती अगदीच काही ऑफ ही झालेली नव्हती. सांगितलेल्या गोष्टी समजण्याएवढ्या शुद्धीत नक्कीच होती.
" काय बघू ? तू घरी चल. आणि पुन्हा याच्या सोबत दिसलीस तर याद राख." मालती उद्विग्नतेने बोलत होती.
" एक मिनिट आई. रोहित आवडतो मला. आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे." मनाली उद्दामपणे उत्तरली.
" लग्न ? हे तूच ठरवलस. स्वतःच ? अं ? "
" हो आई. आता मी काय लहान बाळ नाहीये. मोठी झाली आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला हवं आता."
" स्वातंत्र्य ? हं." मालती तुच्छतेने हसली. " स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळतो का तुला ? सगळं मनासारखं, भल्या बुऱ्याचा विचार न करता हवं तसं वागता येणं, म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, स्वैराचार आहे. ज्यामुळे पुढे फक्त पश्चात्ताप करावा लागतो. आपल्या आईला उलट उत्तर देऊन, दुखावून, तिला न जुमानता तु जे स्वातंत्र्य मिळवशील ते तुला सुखी करू शकेल असं वाटतं तुला ? " शेवटी तिच्या आवाजात जरा नरमाई, आणि कळवळा होता.
मनालीने खाली झुकलेली मान खाडकन वर करून आईकडे पाहिलं. प्रथमच तिच्या डोळ्यांत काहीसा पश्चात्ताप दिसत होता. काही क्षण थांबून मालती म्हणाली -
" तसं असेल तर तुझं स्वातंत्र्य तुला लखलाभ." असं म्हणून मालती माघारी वळाली. आणि चालू लागली.
" थांब आई." मनाली म्हणाली. मालतीने थांबून तिच्याकडे पाहिलं. मनाली आईजवळ आली, आणि म्हणाली.
" खरं आहे आई तू म्हणालीस ते. आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही."
मग ती रोहित कडे वळून म्हणाली -
" आय अॅम सॉरी रोहित. हे सगळं आपल्यासाठी योग्य नाही. तुला वाढदिवसाच्या आणि पुढील करियरच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा."
असं म्हणून ती आई सोबत निघाली
समाप्त
@ प्रथमेश काटे
>>> रोहित दोन ग्लास घेऊन फिरत
>>> रोहित दोन ग्लास घेऊन फिरत होता म्हणजे प्रत्येक हातात एक ग्लास ना?
नाही, ग्लास विसळायला नेताना कसे आपण दोनतीन एकदम धरतो, तसे धरले असणार असा एक अंदाज. किंवा वेटरसारखे ट्रेमध्ये.
मनालीला रोहित दारू पिण्याआधीपासून आवडत होता असं दिसतंय, फक्त त्याबद्दल काही कृती करायचं धाडस तिच्यात नव्हतं. ते दोन पेगांनंतर आलं. पण मुळात तिला रोहित इतका आवडेपर्यंत आपली बांधेसूद नायिका काय करत होती? तिने वेळीच - आणि मुख्य म्हणजे घरीच - मुद्देसूद डायलॉग का मारला नसेल? ही चारचौघांत शोभा कशाला?!
उलट रोहित ब्याड गाय म्हणायचा तर तो दारू पाजल्यानंतरही मनालीचा गैरफायदा घेत नाही, लग्नाची मागणीच घालतो आहे!
कथा उद्बोधक आहे यात शंकाच नाही.
पण दोन पेग म्हणजे बीयर
पण दोन पेग म्हणजे बीयर मिसळलेल्या कोल्ड्रिंकचे दोन पेग्ज असा अर्थ घ्यावा.>> एक पेग ३० ml चा असतो. म्हणजे साधारण सहा टी स्पून. थोडक्यात घोटभर. असं घोट घोटभर कोल्ड्रिंक ग्लासात घेऊन पिण्याची पद्धत कुठे पहिली नाही
बीयर आणि कोल्ड्रिंक चे प्रमाण ५०-५०% धरले तर तिने ३० ml बीयर प्यायली होती. बीयर मध्ये साधारण ६-७% अल्कोहोल असतं. म्हणजे व्हिस्कीच्या एक षष्ठांश. म्हणजे effectively ती ५ ml (एक टी स्पून) व्हिस्की प्यायली होती. त्यामुळे "ती अगदीच काही ऑफ ही झालेली नव्हती" असे म्हणणे बरोबरच आहे. पण इतक्याश्या अलकोहोलने जीभ वगैरे जडावणे म्हणजे ...
काटे साहेब तुम्ही कधी बीयर प्यायली आहे का? किंवा इतर काही मादक पेय ? तुम्ही अनुभव घेतला तर त्याचा प्रत्यय लेखनात उतरण्याची शक्यता असते. प्यायची नसल्यास हरकत नाही, पण मग दारू ह्या विषयाचा थोडा अभ्यास करायला हवा. जे पितात त्यांच्याशी बोलून माहिती घ्यायला हवी. तुमची लेखनशैली बऱ्यापैकी आहे. त्याला थोड्या मेहनतीची जोड दिली तर अधिक चांगले लेखन होईल. शेवटी "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे" असे "केतकी पिवळी पडली" चे लेखक स. त. कुडचेडकर ह्यांनी म्हटलेच आहे. त्यांच्याप्रमाणेच ख्यातनाम होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
ता. क.
इथल्या प्रतिक्रिया गंभीरपणे घेऊ नका. काही लोक उगीच टेर खेचत असतात.
मला तर वाटतं मालतीचाच रोहितवर
मला तर वाटतं मालतीचाच रोहितवर डोळा होता. पण तिने मनालीला प्रपोज केल्यामुळे तिचा जळफळाट झाला.
तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नही, तुम मेरी बेटी को चाहोगे तो मुश्किल होगी.
प्रकाजी, तुम्ही चांगले लेखक
प्रकाजी, तुम्ही चांगले लेखक व्हाल. केशवकुल आणि अन्य काही माबोवरच्या आघाडीच्या लेखकांचे मार्गदर्शनपर मिळेल तुम्हाला.
मालती बाई हे नाव माबोवरच्या कथात सुपरहिट आहे. इथे पण आलेय, मनाली सुद्धा बर्याच कथात असते.
https://www.maayboli.com/node/83707
तुमची लेखनशैली बऱ्यापैकी आहे.
तुमची लेखनशैली बऱ्यापैकी आहे. त्याला थोड्या मेहनतीची
जोड दिली तर अधिक चांगले लेखन होईल. >> दारू या विषयावर अभ्यास करून मेहनत घ्यायची मला गरज वाटत नाही. हे काम आपल्यासारखे निराळीच विचारशीलता, बुद्धिमत्ता लाभलेले करू जाणे. बाकी कथा लेखनावर मी मेहनत घेतोच आहे. तुम्ही कधी काही लेखन वैगेरे केलं असतं तर आपल्याला ती दिसून आली असती.
ता. क.
इथल्या प्रतिक्रिया गंभीरपणे घेऊ नका. काही लोक
उगीच टेर खेचत असतात.>> हो. आणि काही लोक काही माहिती नसताना मी लेखनावर मेहनत घेत नाही, असं ठरवून मोकळे होतात.
•••••••
@भरत
मला तर वाटतं मालतीचाच रोहितवर डोळा होता.
पण तिने मनालीला प्रपोज केल्यामुळे तिचा
जळफळाट झाला.
तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नही, तुम मेरी
बेटी को चाहोगे तो मुश्किल होगी.>> hehe नाही हो असं नाहीये काही.
•••••••
ढंपस टंपू
प्रकाजी, तुम्ही चांगले लेखक व्हाल. >> थॅंक्यू सर.
केशवकुल आणि
अन्य काही माबोवरच्या आघाडीच्या लेखकांचे
मार्गदर्शनपर मिळेल तुम्हाला. >> हो मिळत आहे. या अनुभवी लेखकांच्या मार्गदर्शनाने अधिकाधिक प्रगती करण्याचा प्रयत्न असेल.
ढंपस टंपू
ढंपस टंपू
तुम्ही मला "आघाडीचे लेखक" असे संबोधल्यामुळे गहिवरून आले. आता मी माझ्या नातेवाईकाना आणि मित्र मंडळीना हे शिफारस पत्र दाखवून म्हणेन, "बघा लेको, ढंपस टंपू सर काय म्हणताहेत. शिका लेको ... " इत्यादी.|
असाच आपला वरदहस्त राहू द्या.
मनालीला रोहित दारू
मनालीला रोहित दारू पिण्याआधीपासून आवडत
होता असं दिसतंय, फक्त त्याबद्दल काही कृती
करायचं धाडस तिच्यात नव्हतं. ते दोन पेगांनंतर आलं.
पण मुळात तिला रोहित इतका आवडेपर्यंत आपली
बांधेसूद नायिका >> मी एवढं स्पष्टीकरण दिल्यानंतरही आपलं घोडं तिथंच अडलं आहे का ? असो
काय करत होती? तिने वेळीच -
आणि मुख्य म्हणजे घरीच - मुद्देसूद डायलॉग का
मारला नसेल? ही चारचौघांत शोभा कशाला?! >> तिने आपल्या मुलीच्या भावना ओळखल्या होत्या. आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केलाही होता, असं कथेत नमूद केलं आहे ना. (अर्थात एखाद्याच्या भावना ओळखणं म्हणजे त्याच्या भावनांबद्दल अचूक तर्क करणं. कारण शेवटी त्याला काही पुरावा नसल्याने तो एक तर्कच असतो. आणि फक्त तर्कावरून आपण म्हणताय तसं मुद्देसूद डायलॉग मारणं तिच्यासारख्या विचारी स्त्रीला योग्य वाटणार नाही.) तुम्ही नक्की कथा सविस्तर वाचली तरी आहे का ? की फक्त टीका करण्यापुरता मालमसाला हाती लागावा म्हणून घाईघाईने नजर फिरवलीत. नाही. चूका आढळल्यास त्यांबद्दल थेट विचारणा करण्यास अर्थात काहीच हरकत नाही. वाचकांचा तो अधिकार आहे ; पण आधी कथा नीट वाचायला हवी आणि आपला मुद्दा valid असावा ना.
उलट रोहित ब्याड गाय म्हणायचा तर तो दारू
पाजल्यानंतरही मनालीचा गैरफायदा घेत नाही,
लग्नाची मागणीच घालतो आहे! >> असा थेट गैरफायदा कसा घेऊ शकेल ? विना रिलेशन एखाद्या मुलीचा फायदा घेणं म्हणजे काय असतं ? विचार करा. पूर्ण कथा तर मी करू शकत नाही ती तुम्हालाच समजून घेता आली पाहिजे. आणि काही इंग्रजी शब्द इंग्रजीतच लिहावे. म्हणजे गैरसमज होत नाही.
कथा उद्बोधक आहे यात शंकाच नाही.>> हा Taunt आहे यातही शंकाच नाही
______
@केशवकूल
तुम्ही मला "अनुभवी लेखक" असे संबोधल्यामुळे
गहिवरून आले. >> अनुभवी लेखक मी म्हणालोय हो. त्यांनी आघाडीचे लेखक असा उल्लेख केला आहे.
चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद
चूक दुरुस्त केली आहे. धन्यवाद.
अहो काटेबुवा रागावू नका हो.
अहो काटेबुवा रागावू नका हो. लोकांचं काय? काहीबाही प्रतिक्रिया द्यायला त्यांचं काय जातंय? पण प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देण्यात तुमचा मात्र बराच वेळ जाईल. तुमच्या शाळा/कॉलेज/कामा कडे दुर्लक्ष न करता जमेल तसे लिहीत चला. तुमचे लेखन खूप चांगले किंवा वाईट नसले तरी इंटरेस्टिंग नक्कीच आहे. इतक्या लोकांना प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या हे बरीक तुमच्या लेखणीचे यश हो.
प्रथमेश काटे
प्रथमेश काटे
तुम्ही ते अमर प्रेम मधले "कुछ तो लोग ..." गाणे आठवा आणि पुढे चला.
सुरुवातीचा फोटो कोणाचा आहे?
सुरुवातीचा फोटो कोणाचा आहे?
सुरुवातीचा फोटो कोणाचा आहे? >
@केशवकूल - ते खरं आहे ; पण वाचकांच्या शंकांचं निरसनही करावं लागतं ना.
सुरुवातीचा फोटो कोणाचा आहे? >> आपण कथेच्या संदर्भात विचारत असाल तर तो मालतीच्या पात्राचा प्रतिनिधित्व करणारा आहे. आणि मुळात, पल्लवी कुलकर्णी या टीव्ही सिरीयल अभिनेत्रीचा आहे.
सर प्रत्येक वाचकाच्या शंकांचे
सर प्रत्येक वाचकाच्या शंकांचे निरसन करताहेत हे कौतुकास्पद..
पाहिला फोटो मालतीचा आहे हे
पाहिला फोटो मालतीचा आहे हे वाचून मनालीचा बघायची उत्सुकता वाढली
@रिक्शाचालक
@रिक्शाचालक
नाही नाही. आम्ही सगळे एकच आहोत. हम सब एक है. चन्दिफन्दि सोडून.
झालच तर रुनमेस आणि रशिआ चा पुटिन सुधा.
पाहिला फोटो मालतीचा आहे हे
पाहिला फोटो मालतीचा आहे हे वाचून मनालीचा

बघायची उत्सुकता वाढली >>
इथे देणं मात्र खूपच अवघड आहे
इथे देणं मात्र खूपच अवघड आहे बुवा.
इथे देणं मात्र खूपच अवघड आहे
इथे देणं मात्र खूपच अवघड आहे बुवा.>> द्या हो. कशाला लाजता..
(No subject)
खास लोकाग्रहास्तव. हा घ्या मनालीचा फोटो.
खास लोकाग्रहास्तव. हा घ्या
खास लोकाग्रहास्तव. हा घ्या मनालीचा फोटो.>>>सकाळी सकाळीच ये रहा मायबोलीका सिक्सर!
बुलाती तुम्हें मनाली
बुलाती तुम्हें मनाली
आसमान में बिजली ज़्यादा,
घर में बिजली कम।
टेलीफ़ोन घूमते जाओ,
ज़्यादातर गुमसुम॥
बर्फ ढकीं पर्वतमालाएं,
नदियां, झरने, जंगल।
किन्नरियों का देश,
देवता डोले पल-पल॥
हरे-हरे बादाम वृक्ष पर,
लाडे खड़े चिलगोज़े।
गंधक मिला उबलता पानी,
खोई मणि को खोजे॥
दोनों बांह पसार,
बुलाती तुम्हे मनाली।
दावानल में मलयानिल सी,
महकी, मित्र, मनाली॥
(मेरी इक्यावन कविताएं, अटल बिहारी वाजपेयी)
अस वाटतंय कि प्रका सरांची
प्र का टा आ
द्या हो. कशाला लाजता..>>
द्या हो. कशाला लाजता..>> स्मायली देणं अवघड आहे असं म्हणायचं होतं.

@केशवकूल - म्हणजे ?
म्हणजे प्रतिसाद काढून टाकला
म्हणजे प्रतिसाद काढून टाकला आहे.
@केशवकूल - अच्छा.
@केशवकूल - अच्छा. कोणता प्रतिसाद ? आणि असा काढून टाकता येतो का ?
@रिक्शाचालक - अहो काय हे ? मी तुम्हाला विनंती केली होती ना, की हे वेबसाईट वैगेरे जरा बाजूला ठेवा. विश्रांती घ्या, आणि एखाद्या चांगल्या सायकिअॅट्रिस्टची भेट घ्या. आतातरी ऐका हो. खरंच गरज आहे तुम्हाला.
हो. बाजूला संपादन म्हणून एक
हो. बाजूला संपादन म्हणून एक बटण दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा प्रतिसाद एडीट करता येईल. पण हा फक्त चार तासांचा अवधि मिळेल. तुम्ही सर्व म्याटर डिलीट करू शकाल. पण त्या तिथे प्लेस होल्डर म्हणून काहीतरी लिहावे लागेल. दोन डॉट टाकले तरी चालेल.
मी अटलजींनी लिहिलेल्या कवितेबद्दल काही लिहिले होते. नंतर ते मला योग्य वाटले नाही म्हणून काढून टाकले.
छान कथा..
छान कथा..
धन्यवाद
धन्यवाद
पेग हे (ज्यात ४०%+ मद्यार्क
पेग हे (ज्यात ४०%+ मद्यार्क किंवा अल्कोहोल असते अश्या) मद्याचा साठ मिलीचे एकक आहे. पेग म्हणजे ६० मिली मद्य, छोटा पेग म्हणजे ३० मिली मद्य. बिअर कोल्ड्रिंक मध्ये मिसळून घेत नाहीत, आणि पाजायचे म्हटली तरी बिअरयुक्त कोल्ड्रिंक नुसत्या वासाने ओळखू येईल. पुढल्या वेळी असे काही करायचे झाल्यास तुम्ही थंड कोल्ड्रिंकमध्ये सिंगल माल्ट, किंवा कोणतीही प्रीमियम व्हिस्की वापरलीत तर अधिक बरे पडेल. अधिक माहिती साठी तुम्ही दारू कशी पिता (https://www.maayboli.com/node/66421) हा धागा वाचावा. बाकी कथा छान आहे, दारू पिट नसाल तर उत्तमच आहे, पण लिखाणासाठी म्हणून का होईना, १०-१५ मिनिट अभ्यास नक्की करा. एखादे वेळी घेऊन बघायला हरकत नाही. लेखनाचे धुमारे छान फुटतील.
ताजा कलम: ह्या कथेचे विडंबन करण्यासाठी परवानगी द्यावी.
तुम्ही थंड कोल्ड्रिंकमध्ये
तुम्ही थंड कोल्ड्रिंकमध्ये सिंगल माल्ट
>>>
ये गुनाह है….
Pages