अर्थ स्वातंत्र्याचा

Submitted by प्रथमेश काटे on 15 August, 2023 - 07:00

अर्थ स्वातंत्र्याचा

‌ते फार्म हाऊस रोषणाईने, तरुणाईच्या कलकलाटाने फुलून गेलेलं होतं. म्युझिक वर सगळे उत्साहाने थिरकत होते. वेटर्स ड्रिंक्स च्या ग्लासेसचे ट्रे घेऊन हॉलभर फिरत होते. ट्रे भराभर रिकामे होत होते. मंद संगीताचा आणि धुंद करणाऱ्या ड्रिंक्सचा अंमल तरूण - तरूणींच्या मनांवर, देहांवर, त्या सगळ्या वातावरणात पसरू लागला होता. पार्टीला हळूहळू रंग चढू लागला होता.
मनाली इतरांपासून जरा बाजूलाच तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत उभी होती. बोलता बोलता म्युझिक च्या तालावर हलकेच डोलत होती. गोरीपान, हसऱ्या चेहऱ्याची, सुडौल बांध्याची मनाली हलक्याशा मेकअप मध्येही आकर्षक दिसत होती. आज तिने व्हाईट शोल्डर टॉप आणि पिंक कलरचा लॉंग स्कर्ट परिधान केला होता. त्यात तिचं सौंदर्य अजूनच खुललं होतं. ती मैत्रिणीशी गप्पा मारत असताना हातात ड्रिंकचे दोन ग्लासेस घेतलेला रोहित ऐटबाज चालीत तिथे आला. ही पार्टी त्याच्याच वाढदिवसानिमित्त अरेंज केली गेलेली होती.

" हॅलो..." किंचित घसा खाकरून हसतमुखाने रोहित म्हणाला. त्याचा आवाज ऐकून मनालीची व तिच्या मैत्रिणीची तंद्री भंगली.

" ए हाय. हॅपी बर्थडे हॅन्डसम." त्याला Hug करून मनालीची मैत्रीण म्हणाली. रोहितने तिचे आभार मानले आणि त्याची नजर मनालीकडे गेली. आपल्या पासून नजर चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनालीचं लक्ष वेधून घेण्यासाठी रोहित म्हणाला.

" हाय मनाली."

" हाय रोहित. हॅपी बर्थडे." हळूवार स्मित करून आपला हात पुढे करत मनाली म्हणाली. रोहितने तिचा हात हातात घेतला, आणि हलकेच दाबला. त्याच्या हाताच्या राकट, मजबूत स्पर्शाने तिला शहारल्या सारखं झालं. हात मागे घेताना तिच्या गालांवर जराशी लाली आली होती. ओठांच्या कडेने हसू उमटलं होतं, आणि खाली झुकलेल्या नजरेत एक वेगळीच चमक आली होती. खरं म्हणजे मनालीला रोहित आवडत होता ; पण आपल्या भावना ती त्याच्यासमोर कधीच व्यक्त करू शकली नव्हती. आजच्या दिवसासाठी ती खूप उत्साहित होती. आपले खास आवडीचे आऊट फिट्स परिधान करून वेळेत ती पार्टीला हजर होती. वरवर ती आपल्या फ्रेंडशी बोलत होती ; पण तिची नजर रोहितलाच शोधत होती. स्वतःहून त्याच्यापुढे जाऊन त्याला विश करण्याचं धाडस तिला झालच नसतं. त्यामुळे तो स्वतःच त्यांच्यापाशी आल्यावर मात्र तिची कळी खुलली होती.

" काय रे दोन-दोन ग्लास एकदम."

" अं.." रोहित गोंधळून उद्गारला. मग एकदम तिच्या बोलण्याचा अर्थ समजून म्हणाला " नो नो. धिस इज फॉर मनाली." असं म्हणत हातातला भरलेला ग्लास त्यांनी मनाली समोर धरला.

" माझ्यासाठी ? अरे नाही... नको. मी.." ती गोंधळून चाचरत म्हणाली.

" अगं नको काय ? मी पाहतोय, तू आल्यापासून काहीच घेत नाहीयेस. घे ना. संकोच बाळगू नकोस."

" अरे खरंच नको न. प्लीज." त्याचंही आपल्याकडे लक्ष होतं हे समजताच ती मनातून लाजली, अन् सुखावलीही.

" कम ऑन. माझ्या बर्थडे च्या दिवशी मला तू अशी नाराज करणार आहेस का ? "

" हो मनाली. अगं तो इतका आग्रह‌ करतोय, तर घे ना. " तिची मैत्रीण ओठातल्या ओठात हसू दाबत म्हणाली.

" अगं पण.."

हो ना करत शेवटी मनालीने ग्लास घेतला, आणि पिऊन रिकामा केला. एक हलकीशी सुखद संवेदना शरीरभर पसरत गेल्यासारखं तिला वाटलं. ओठांवर स्मित उमटलं.

" अजून एक." रोहित.

" अरे नाही. नको." मनाली म्हणाली.

मात्र तिच्या नकाराकडे दुर्लक्ष करीत रोहित ने एका वेटरला आवाज दिला.

" हेss वेटर.."

तो जवळ येताच रोहित त्याच्या कानात काहीतरी पुटपुटला. वेटर ग्लास घेऊन आला. रोहितने पुन्हा मनालीला आग्रह करून तो संपवायला लावला. पुन्हा तीच फिलींग ; पण यावेळी थोडी अधिक स्ट्रॉंग. पूर्ण शरीर हलक होऊ लागल्यासारखं मनालीला वाटू लागलं.

" वील यू डान्स वुईथ मी ? " रोहित ने आपला हात पुढे करत मनालीला विचारलं. मनालीने क्षणभर धुंदावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तो हसत होता. मनालीची मैत्रीण नवलाने आणि कौतुकाने तिच्याकडे बघत होती.
मनालीने स्मित करत मूकपणे आपला हात त्याच्या हातात दिला. तो तिचा हात पकडून हॉलच्या मध्यभागी आला. दोघेही हातात हात गुंफून डान्स करू लागले. रोहितच्या स्पर्शाने मनाली क्षणाक्षणाला अधिकाधिक मोहरत होती. तिला हे स्वप्नवत वाटत होतं. हातांप्रमाणे हळूहळू नजराही एकमेकांत गुंतू लागल्या. त्याचे डोळे तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असल्या सारखे खोलवर पाहत होते. त्यांत उत्सुकता होती, मिष्कीलपणा होता. तर तिच्या नजरेत स्त्रीसुलभ लज्जा होती. मध्येच तो थांबला. आणि हात उंचावून जरा मोठ्या आवाजात म्हणाला -

" स्टॉप."

म्युझिक थांबलं. हॉलमध्ये उपस्थित सर्वांच्या नजरा गोंधळून त्याच्याकडे वळल्या. मनाली ही गोंधळली होती. थोडावेळ शांततेत गेल्यावर, रोहित बोलू लागला.

" लेडीज अॅन्ड जंटलमेन. अटेन्शन प्लीज."
आणि असं म्हणून तो मनाली समोर गुडघ्यावर बसला. मनालीच्या मनातील गोंधळ अधिकच वाढला.

" मनाली मला तू खूप आवडतेस. वील यू मॅरी मी ? "

त्याच्या या अनपेक्षित वागण्याने, बोलण्याने मनाली क्षणभर स्तब्धच झाली. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर ती भानावर आली. तिला अगदी आस्मान ठेंगणे झाल्यासारखं वाटत होतं. काय बोलावं नि काय नको ते सुचेचना. लाजून किंचित स्मितहास्य करीत तिने होकारार्थी मान डोलावली. तो हसत झटकन उभा राहिला. क्षणभरच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, आणि एकमेकांना मिठी मारली. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

" मनाली..."

अचानक एक संतापलेला आवाज त्या हॉलमध्ये घुमला. मनाली आणि रोहित पटकन एकमेकांपासून दूर झाले. सगळ्यांनी दचकून आश्चर्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. मनालीची आई दरवाजाच्या आत थोड्या अंतरावर उभी होती. नाजूक, बांधेसूद शरीरयष्टी, मध्यम उंची, गोऱ्यापान रंगाची नाकी डोळी रेखीव असलेली मनालीची आई मालती चिडलेल्या नजरेने मनाली कडे बघत होती.

मालती मनाली अन् रोहितच्या कॉलेज मध्येच शिक्षिका होती. आपल्या परिपक्व, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावामुळे ती सगळ्या स्टुडंट्स ची फेवरेट होती. संपूर्ण कॉलेजच्या स्टुडंट्सनाच नाही तर स्टाफ, टीचर्सना ही तिच्या विषयी प्रेमपूर्वक आदर होता.

मनालीचा चेहरा प्रथम भीती व शरमेने पांढरा पडला ; पण मग त्यावर निश्चय व गंभीरता आली. तिच्यावर एक रागाचा कटाक्ष टाकून एकदम मालती तरातरा चालत तिच्या व रोहितच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.

" हे सगळं काय चाललंय ? "

" अ..आई. हे बघ." मनाली बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे डोळे, किंचित जडावलेली जीभ, देहबोली यांवरून मालतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने मनालीच्या तोंडाजवळ तोंड नेलं, आणि क्षणार्धात सगळा प्रकार तिच्या ध्यानात आला. ती दारू प्यायली
होती. रोहितने खरंतर मगाशी कोल्ड् ड्रिंक च्या बहाण्याने तिला दारू प्यायला लावली होती.

मनालीच्या मनातील रोहित बद्दल असलेल्या भावना मालती चांगल्या ओळखून होती. अजाण वयात बाह्य रंगाच्या आकर्षणालाच भुलून जाऊन व्यक्ती त्यालाच प्रेम समजून बसतो, आपल्या मुलीच्या बाबतीतही हेच घडत असल्याचं तिला समजत होतं. म्हणूनच दोन तीन वेळा अप्रत्यक्ष पणे तिने आपल्या मुलीला ती अजून लहान, अजाण असून तिने आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असेही समजावलं होतं. तसेच ती हेदेखील जाणून होती की मनाली सारख्या जराशा बुजऱ्या स्वभावाच्या मुलीला आपल्या मनातलं रोहित समोर उघड करण्याचं धैर्य होणार नव्हतं ; पण आता त्या बीयरच्या अंमलाखाली तिच्या मनात जरा हिंमत आणि बेपर्वाई आली होतं. तसे फक्त दोनच पेग्ज घेतले असल्यामुळे ती अगदीच काही ऑफ ही झालेली नव्हती. सांगितलेल्या गोष्टी समजण्याएवढ्या शुद्धीत नक्कीच होती.

" काय बघू ? तू घरी चल. आणि पुन्हा याच्या सोबत दिसलीस तर याद राख." मालती उद्विग्नतेने बोलत होती.

" एक मिनिट आई. रोहित आवडतो मला. आणि मी याच्याशीच लग्न करणार आहे." मनाली उद्दामपणे उत्तरली.

" लग्न ? हे तूच ठरवलस. स्वतःच ? अं ? "

" हो आई. आता मी काय लहान बाळ नाहीये. मोठी झाली आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला हवं आता."

" स्वातंत्र्य ? हं." मालती तुच्छतेने हसली. " स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळतो का तुला ? सगळं मनासारखं, भल्या बुऱ्याचा विचार न करता हवं तसं वागता येणं, म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, स्वैराचार आहे. ज्यामुळे पुढे फक्त पश्चात्ताप करावा लागतो. आपल्या आईला उलट उत्तर देऊन, दुखावून, तिला न जुमानता तु जे स्वातंत्र्य मिळवशील ते तुला सुखी करू शकेल असं वाटतं तुला ? " शेवटी तिच्या आवाजात जरा नरमाई, आणि कळवळा होता.

मनालीने खाली झुकलेली मान खाडकन वर करून आईकडे पाहिलं. प्रथमच तिच्या डोळ्यांत काहीसा पश्चात्ताप दिसत होता. काही क्षण थांबून मालती म्हणाली -

" तसं असेल तर तुझं स्वातंत्र्य तुला लखलाभ." असं म्हणून मालती माघारी वळाली. आणि चालू लागली.

" थांब आई." मनाली म्हणाली. मालतीने थांबून तिच्याकडे पाहिलं. मनाली आईजवळ आली, आणि म्हणाली.

" खरं आहे आई तू म्हणालीस ते. आईला दुखावून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसतच. आणि ते कधीच कुणाला सुखी करू शकत नाही."

मग ती रोहित कडे वळून म्हणाली -

" आय अॅम सॉरी रोहित. हे सगळं आपल्यासाठी योग्य नाही. तुला वाढदिवसाच्या आणि पुढील करियरच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा."

असं म्हणून ती आई सोबत निघाली

समाप्त
@ प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

ताजा कलम: ह्या कथेचे विडंबन करण्यासाठी
परवानगी द्यावी. >> मी इतक्या प्रयासाने ही गंभीर विषयावरील, प्रेरणादायी कथा लिहिली ती कुणी तिचं विडंबन वैगेरे करावं म्हणून नक्कीच नाही.

कथा वाचण्यासाठी असते. आवडली तर छानच. नाही आवडली तरी हरकत नाही, सोडून द्यावे. पण अमुक टक्के हे, तमुक म्हणजे पेग, नुसत्या वासाने ओळखू येईल वैगेरे निरर्थक उहापोह करायला हा काही गहन विषयावरील लेख, प्रबंध वैगेरे नाही. मी दारू नाहीच पित, आणि मला गरजही नाही.

संपादित करायच्या आधीचा प्रतिसाद मी वाचला होता. संपादित केले ते बरे झाले.

मला वाटतं विडंबन करायला परवानगीची गरज नसावी. अत्र्यांनी झेंडूची फुले लिहिताना एवढ्या सगळ्या कवींकडून परवानगी घेतली असेल आणि त्यांना ती मिळाली असती असे वाटत नाही.

ये गुनाह है….>>> च्रप्स, अहो ते बेमालूमपणे पाजायचा प्रयत्न करत आहेत ना म्हणून तो पर्याय.. कसंय कि खूप थंड कोल्ड्रिंक असेल तर त्यात घातलेल्या व्हिस्कीची वाफ चटकन होणार नाही, परिणामी वास येणार नाही.

मला वाटतं विडंबन करायला परवानगीची गरज
नसावी. >> आपण नको तिथे लक्ष घालताय ? ते अत्रेंचं वैगेरे नका सांगू. माझ्या कथेचं असं माझ्या परवानगीशिवाय विडंबन वैगेरे मला चालणार नाही.

संपादित करायच्या आधीचा प्रतिसाद मी वाचला
होता. संपादित केले ते बरे झाले. >> भीती दाखवत आहात काय ? तुमची या दृष्टीने काहीच महत्त्व नसलेली कमेंट वाचून तो विडंबनाचा लेख लिहून मोकळा सुद्धा झाला. यावरून माझी कमेंट एडिट करण्याची मला गरज नव्हती हे समजलं. पूर्वीचीच कमेंट बरोबर होती. ती लेखकाची परवानगी नसताना कुणा तिसऱ्याच्याच कमेंटच्या आधारे विडंबन लिहून टाकणाऱ्या त्यालाही लागू होते. आणि नको तिथे नाक का खुपसून प्रॉब्लेम Creat करणाऱ्या तुम्हालाही.

•••••••

तो विडंबनाचा लेख डिलीट करून टाकायचा.

हे हे हे. प्रथमेश काटे यांनी अजिंक्र्यराव पाटील यांना उद्देशून लिहिलेल्या आणि मग संपादित केलेल्या प्रतिसादातला उडवलेला भाग - जसाच्या तसा आठवत नाही. पण आशय साधारण असा - मद्याचा शौक करणार्‍याला आम्ही बेवडा म्हणतो. हा प्रतिसाद मद्याच्या धुंदीत लिहिला आहे असे वाटते.

तुला डीवचण्यासाठीच परवानगी वगैरे लिहिलं होतं,
तशी गरज कधीच नसते. आणि,
नाही करत डिलीट >> काय संबंध ? आपली काही ओळखपाळख नाही. किंवा मी तुझ्या एखाद्या पोस्टवर स्वतःहून काही चुकीची कमेंट कधी केलेली नाही. मग तू मला डिवचण्याचा प्रयत्नच का करावा ? राहिला त्या विडंबनाच्या लेखाचं तर ते बाकीचं मला ठाऊक नाही ; पण मला ते मुळीच चालणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो लेख डिलीट करायचाच्च्च.

•••••••

हे हे हे. प्रथमेश काटे यांनी अजिंक्र्यराव पाटील
यांना उद्देशून लिहिलेल्या आणि मग संपादित
केलेल्या प्रतिसादातला उडवलेला भाग - जसाच्या
तसा आठवत नाही. पण आशय साधारण असा ->> अहो आशयाचं काय घेऊन बसलात. मला जवळ शब्दशः ती कमेंट आठवत आहे. - तुमचं अभ्यासपूर्ण मत वाचून आणि तुम्ही मलाही पिण्याचा सल्ला दिलात यावरून आपणही मद्यपान करणारे दिसता. ही कमेंट ही मद्याच्या विलक्षण सुखकारक धुंदीत केलेली असावी. तुमच्या सारख्या मद्य प्रेमी ( ज्याला माझ्यासारखे साधारण माणसं ' बेवडा ' असं संबोधतात ) व्यक्तीच्या मताला कितपत महत्त्व द्यावे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. - अशी काहीशी ती कमेंट होती.

आणि हे शब्द तुम्हा दोघांना लागू होतात असं म्हणालो, त्यासाठी माफी मागतो. कारण दारूच्या नशेत असलेला व्यक्ती इतक्या स्पष्ट शब्दांत उद्धटासारख्या कमेंट करू शकत नाही.

•••••••

@ अॅडमीन - हा काय प्रकार आहे ? काही ओळखपाळख नसताना, काही संबंध नसताना कुणीही कुणालाही डिवचतोय. आपण जरा इकडे लक्ष द्याल का ?

इथे मायबोलीवरचे अनेक कथालेखक [ज्यातील अनेकांच्या कथा ' छापून' आल्या आहेत (म्हणजे त्या दर्जेदार आहेतच असं नाही)] कथालेखनाबद्दल कशी वेड्यासारखी चर्चा करीत होते.
https://www.maayboli.com/node/39365

Pages