.
व्हॉटसपवर स्टेटस टाकले
आणि सोबत खालील फोटो टाकला
१) Guess The Place??
Somewhere in Mumbai
मझ्या फ्रेंडलिस्टमधील निम्मी जनता परेशान.
किधर है भाई, किधर है ...
मग तासाभराने दुसरा फोटो टाकला.
२) Same Place... Any guesses ??
अर्ध्याअधिक जनतेचा एकच अंदाज
RHTDM ???
(अधिक माहितीसाठी माधवन आणि दिया मिर्झाचा रेहना है तेरे दिल मे बघा. ज्यात माधवनने अश्याच एका जागेचा "मुंबई की मेरी सब से फेव्हरेट जगह" असा उल्लेख केलेला)
मग मी कोणाची फार परीक्षा न घेता त्यांना खरे काय ते उत्तर दिले.
खरे तर मी स्वतः जन्मापासून मुंबईकर असूनही आणि या जागेच्या प्रवेशद्वारापुढून कित्येक वेळा गेलो असूनही आत ईतकी सुंदर जागा आहे याची मला कल्पना नव्हती. तर मग ईतरांनी न ओळखल्यास नवल नव्हते. लाज तर मलाच वाटावी अशी ही गोष्ट होती.
तर झाले असे,
मुंबईचे घर पुन्हा ताब्यात आले, आईवडिलांनी तिथे राहायला सुरुवात केली. तसे आम्हा नवी मुंबईकरांच्या मुंबई वार्या सुरू झाल्या.
आला विकेंड, ऊचलली बॅग, पळालो मुंबईला.
आता दर विकेंड मुलांसोबत मुंबईला जातोय तर त्यांना शनिवार-रविवार सकाळ-संध्याकाळ फिरवणे आलेच. राणीबागेपासून जी सुरुवात झाली ते गेटवे ऑफ ईंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, हँगिग गार्डन सोबत कमला नेहरू पार्क, एके दिवशी वरळी सीफेस, तर कधी दादर परीसर, झाल्यास जवळचाच भाऊचा धक्का आणि नाक्यावरचाच माझगावचा डोंगर हे सारे एकापेक्षा जास्त वेळा फिरून झाले. सुदैवाने आमचे घर या सर्व जागांच्या केंद्रबिंदूवर असल्याने जाण्यायेण्याच्या दृष्टीने सारे सोयीचे पडायचे. पण मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुंबईतली वाढती गर्मी पाहता त्यांना मुंबईत आणखी कुठे कुठे फिरवायचे ही समस्या आणखी बिकट होऊ लागली.
अश्याच एका शुक्रवारी, मध्यरात्र उलटून गेली असताना, उद्या कुठे जायचे या विवंचनेत झोप येत नसताना, आपली मायबोलीकर म्हाळसा, देवीसारखी मदतीला धाऊन आली. (तिच्याकडे तेव्हा दुपार असते.)
तर व्हॉटसपवर तिचा मेसेज आला. आणि तिने ही जागा सुचवली. म्हणाली, छान दिसतेय. मी ही कधी गेले नाही. तू ने तुझ्या पोरांना आणि मला त्यांचा फिडबॅक दे. त्यांना आवडली तर मी सुद्धा भारतभेटीत माझ्या पोरांसोबत जाईन असे म्हणून अंतर्धान पावली.
प्रत्यक्षात ती जागा मला आणि माझ्या पोरांना ईतकी आवडली की महिन्याभरात आम्ही तिथे तीनदा जाऊन आलो. पोरांनाच नाही तर बायकोलाही सोबत घेऊन गेलो. कारण जागा केवळ पोरांनाच आवडेल अशी नव्हती तर तिला एक रोमांटीक टच सुद्धा होता
चला तर मग त्या जागेची, म्हणजेच प्रियदर्शिनी पार्कची, एका दिवसाची सैर करूया
३) दुपारी कडक ऊन असते, काही हरकत नाही. पार्क सकाळी ६ वाजता ऊघडते. मॉर्निंग वॉकलाच बाहेर पडूया. जरा ऊशीर झाला तरी ऊन कोवळंच मिळेल
.
४) हे गेटमधून आत शिरल्यावरचे पहिले द्रुश्य. पण फोटो मात्र आम्ही निघताना टिपला आहे. ईथेच गेटच्या आत स्नॅक्स कोल्ड्रींकचा स्टॉल आहे. तिथेच आईसक्रीम खाता खाता क्लिक केला.
.
५) तिथून लहान मुलांच्या गार्डनला जाणारा रस्ता. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणारी मंडळी ईथून भेटायला सुरुवात होईल.
.
६) पोहोचलो. हेच ते गार्डन. समुद्राच्या बाजूने नारळाच्या झाडांनी आच्छादलेले.
.
७) आजकाल कुठल्याही गार्डनमध्ये हे ऑल ईन वन स्लाईडस असते आणि मुलांना खेळायला पुरते. ईथेही अपवाद नाही.
.
८) सोबत झोके आहेतच!
.
९) पण आम्हाला चार झोके झाल्यावर मातीतच खेळायला आवडते
.
१०) हे एक मचान आहे. पण साधेसुधे नाही तर महान आहे. याच्या मधोमध एक झाड प्रगट झाले आहे.
.
११) पोरांना काही एडवेंचरस हवे असल्यास... त्याचीही सोय आहे.
.
१२) खेळून मन भरले की समुद्राच्या कडेकडेने वॉकला निघायला हरकत नाही.
.
१३) बारकाईने पाहिले तर आपल्या रंग बदलण्याच्या शक्तीचा गैरफायदा उचलत झाडांवर असे सरडे लपलेले दिसतात. पण चालता चालता रस्त्यावरच्या मुंग्या टिपणारी आमची पोरं, त्यांच्या नजरेपासून ईतके अजस्त्र प्राणी लपणे अवघडच.
.
१४) चला तर मग वॉकचा आनंदम लुटत अजून पुढे जाऊया
१५)
.
१६) छान स्वच्छ आणि शांत रस्ते वाटत आहेत ना. सोबत नजरेला सुखावणारा समुद्र. कानावर अलगद आदळणारा लाटांचा आवाज. आणि अंगावर येणारी थंडगार खार्या वार्याची झुळूक... मॉर्निंग वॉकचे सुख सुख म्हणतात ते हेच
.
१७) हा क्षितिजाकडून येणारा उताराचा रस्ता आम्हाला ईतका आवडला आहे की लेकीने पुढच्यावेळी ईथे नाचाची ईन्स्टा रील बनवायचे ठरवले आहे.
.
१८) हे आतले स्पोर्टस कॉम्प्लेक्स. ईथे आत शिरायला पैसे भरून मेंबरशिप घ्यावी लागेल.
.
१९) या बाहेरच्या हिरवळीचा आनंद मात्र मोफत लुटू शकतो.
.
२०) अरे हो, हा खालील फोटो टिपल्यावर या रस्त्यावर आम्हाला एक ऊच्चभ्रू कुत्र्यांची जोडी दिसली. मला कुत्र्यांमधील फारसे म्हणजे काहीच कळत नाही. पण ते चक्क क्यूटसे कोल्हेच वाटत होते. त्यांचेही फोटो मालकाची परवानगी घेत काढायला हवे होते असे आता वाटतेय. पण असो, पुढच्यावेळी... त्यांना टाटा बाय बाय करत आम्ही आमची प्रभातफेरी संपवून तिथून निघालो.
.
चला तर मग, आता संध्याकाळची मजा बघूया. संध्याकाळचे फोटो बघूया.
पण जी मजा फोटोत समजणार नाही ती म्हणजे या गर्मीच्या सीजनमध्ये जिथे दिवसभर वार्याच्या नावावर गरम वाफ झेलावी लागते. तिथे या ठिकाणी मात्र संध्याकाळच्या वेळी बेफाम बेछूट थंड वारे सुटले होते. जणू आपण वेगळ्याच अवकाशात प्रवेश केला असे गार्डनमध्ये पहिले पाऊल ठेवताच वाटू लागले.
२१) ही तीच सकाळची मचान, आता संध्याकाळच्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाली आहे.
.
२२) हे तिथून टिपलेले बागेचे विहंगम दृश्य.
.
२३) आणि हे ही तिथूनच, पण समुद्राच्या दिशेने, नारळीच्या बागांचे..
.
२४) त्याच नारळाच्या बागेत संध्याकाळचे मतलई वारे खात बसलेली एक फॅमिली..
.
२५) सोबत पफकॉर्न खाणारी खारूताई
.
२६) चला थोडे ऊन कमी झालेय तसे समुद्राकडे जाऊया
.
२७) समुद्राचे वारे आता थेट खाऊया
.
२८) हा अस्सा पसरलेला समुद्र दिसतो समोर
.
२९) की जणू सुर्यही आपला सोबती वाटतो.
.
३०) वारा ईतका की बारक्या पोरांचेही केसं ऊडतात
.
३१) लोकं घरच्यासारखे मिळेल ती जागा पकडून पसरतात.
.
३२) कारण समोरचे द्रुश्यच ईतके भन्नाट आणि विलोभनीय असते.
.
३३) समुद्र! समुद्र! समुद्र!... हिच तर मजा आहे मुंबईची
.
३४) एक दगड पकडून आपल्यालाही तो जवळून बघायचा मोह आवरत नाही.
.
३५) काहींना पुढे जाऊन त्याला स्पर्श करावेसे वाटते. पण तुम्ही थोडे अंतर राखण्यातच धन्यता मानता.
.
३६) पण मग तो स्वतः तुम्हाला स्पर्श करायला पुढे सरसावतो
.
३७) पण जर तुम्ही आधीच त्याच्या ओढीने पुढे गेलात....
.
३८) तर मग जरा जपून...
.
३९) हे असे होण्याची दाट शक्यता असते.
लगेचच ती धोक्याची घंटा, परतीचा इशारा समजावा...
.
४०) जर तुमच्यासोबत तुमची प्रेयसी/प्रियकर नसेल, तर मावळत्या सुर्याला निरोप देऊन घरी परतायला हरकत नाही.... पुढची मजा प्रेमी युगुलांना करू द्यावी. बाकी तसा त्यांचा ऊच्छाद ईथे कुठे दिसला नाही हे विशेष.
------------------------------------------------
खालील नकाश्यात जवळपासच्या फिरायच्या जागा हायलाईट केल्या आहेत. आम्ही खादाडीसाठी माझगाव, भायखळा, गिरगाव चौपाटीचा रस्ता धरल्याने जवळच्या खाऊगल्ली ठिकाणांची कल्पना नाही.
४१) नकाशा क्रमांक १
४२) नकाशा क्रमांक २
------------------------------------------------
Priyadarshini Park
Address: Nepean Sea Rd, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006
Timing: 6–11 am, 4–9 pm
धन्यवाद,
ऋन्मेष
@ अमितव, धन्यवाद. राणीबागेत
@ अमितव, धन्यवाद. राणीबागेत पुन्हाही जाऊ शकता. संदर्भ क्रोकोडाईल पार्क. आणि सिंहही येणार आहेत. सुशोभिकरण सतत चालू आहेच.
या पार्कमध्येही नक्की जा. ईथली कमी गर्दी हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. म्हाळसाचेही माझ्याशी हेच बोलणे झालेले. तुमची तिथे वाढलेली मुले आपल्याकडची गर्दी बघूनच वैतागतात.
@ Srd
@ Srd
सायनचा किल्ला,शिवडीचा किल्ला,वसईचा किल्ला >> +786
संजय गांधी national park sarvottam >>> अगदीच. मागे खूपदा जाणे व्हायचे. हल्ली कित्येक वर्षात नाही. पण आता या पावसाळ्यात आहे ते लिस्टवर.
कान्हेरी केवसमधून पाणी वाहायला लागले की मस्त छोटेमोठे धबधबे तयार होतात. तिथे भिजायच्या हिशोबातच जायचा विचार करत आहोत
उलट गर्दी नसेल तर माझा जीव घाबरा होतो. >>>> केशवकूल
पुष्पक आठवला. कबूतरांचा आवाज रेकॉर्ड करून झोपणारा कमल हसन..
मस्स्त ओळख आणि धागा. राणी
मस्स्त ओळख आणि धागा. राणी बागेचे नुतनिकरण तुझ्या धाग्या मुळेच कळाले आणि बहिण आणि कुटुंब तिथे गेले. खूप छान अनुभव..
हल्ली शाळेच्या सहली त्याही
हल्ली शाळेच्या सहली त्याही डिसेंबरमध्ये/जानेवारीत कोणत्यातरी रिझॉटला किंवा वाटरपार्कला नेतात. मुले मोजून आत सोडायची आणि मोजून परत आणायची हेच मोठे काम असते. मग नोंदवहीत नोंद करायची ' सहल नेली'. सहलीच्या बसेसना अपघात होऊ लागल्यावर दूरच्या सहली बादच केल्या शाळांनी.
बरं हल्लीचे नवीन प्रकार म्हणजे खाजगी ट्रेकिंग ग्रुपबरोबर पाठवणे. ठिकाणं - माथेरान/प्रबळगड/भीमाशंकर/तांदुळवाडी किल्ला सफाळे/ वगैरे. किंवा मे-जून आठवडे काजवा महोत्सव राजमाची/भंडारदरा. दहा वर्षे वयापुढच्या मुलांना ठीक आहे.
पण इतरांचे काय? इतर ठिकाणांचं काय? वर्षभरात इतर वेळेला काय? खाजगी ग्रूप नेत नाहीत त्या ठिकाणांचं काय? तर तिथे पालकांनाच न्यावं लागतं. लहान मुलं खूप उत्साही असतात आणि जिने पटापट चढून भटकून येतात. या वयात नेलं नाही तर मोठेपणी त्यातली गंमत जाते.
सायनचा किल्ला - सुंदर स्वच्छ डोंगरावरील बाग आणि किल्ला. सायन स्टेशनपासून चालत दहा मिनिटांत पोहचता येते. १९६२ पासून अजूनही स्वच्छ आणि सुंदर. (धबधब्याचं पाणी मात्र १९६४ला बंद केलं.)
शिवडीचा किल्ला - शिवडी स्टेशनपासून चालत दहा मिनिटांत पोहोचता येतं. स्वच्छ भव्य जागा. बाजूलाच फ्लेमिंगो येतात. (डिसेंबर ते मे)
वसईचा किल्ला - पूर्वी यांचा वापर वेगळ्याच कारणासाठी सकाळी होत असे. पण आता पुरातत्व खात्याकडे आहे. स्वच्छ, निगा राखलेला मोठा पसरलेला किल्ला. वसई स्टेशनपासून दर दहा मिनिटाला नगरपालिकेच्या मिनि बसेस किल्ल्यात येतात. किल्ला परिसरातील आंब्याच्या झाडांचे आंबे खाली पडत असतात.
आशू धन्यवाद
आशू धन्यवाद
Srd, शिवडी की सायन किल्ल्याबाबत कोणाचातरी ईथे धागाही होता. शोधायला हवे.
संजय गांधी राष्ट्रीय
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये लहान मुलांना आवडेल असं फारसं काही नाही. एक मिनी ट्रेन होती ती तीन चार कि.मी.च्या वर्तुळात मुलांना आणि पालकांना फिरवून आणायची. आता आहे की नाही हे माहीत नाही. मात्र ज्यांना वृक्ष वल्लींमध्ये रस आहे त्यांच्यासाठी भरपूर खाद्य आहे. तसेच पक्षीनिरीक्षणासाठीसुद्धा. खरे तर इथल्या कान्हेरी गुंफा ह्या geology, archaeology, anthropology इत्यादींमध्ये माहिती आणि रस असणाऱ्यांच्या दृष्टीने फार मोठे आकर्षण आहे. मात्र इतर सर्व लहान, युवा, थोरांसाठी बाण आणि बदाम स्वतःच्या नावासकट कोरण्यासाठीच फक्त उपयुक्त आहे. आणि इथे आतले रस्ते म्हणजे मातीच्या पायवाटाच असतात. मुले कंटाळतात. खादाडीसाठी रानाबाहेरच यावे लागेल.
संजय गांधी national park
संजय गांधी national park sarvottam.>>>>
नॅशनल पार्कातली मिनी ट्रेन कित्येक दिवस बंदच आहे. पण मुले हरणे, माकडे वगैरे बघून खुश होतात. १०-१२ वर्षांच्या मुलांना सायकल रेंट करून फेरफटका मारता येतो. टायगर व लायन सफारी मात्र सकाळी लवकर ८:३० च्या दरम्यान केलीत तर नक्की दिसतात. कारण त्यावेळी प्राण्यांना खाणे देण्यात येते. दुपारी ते त्यांच्या एनक्लोजर मध्ये किंवा दूर झाडाझुडपात बसून असतात.
पण पिकनिक चांगली होऊ शकते. त्यासाठी मोजक्याच का होईना कवर्ड हट्स आहेत. आम्ही शाळकरी शाळेतल्या मुलांचा ग्रुप घेऊन गेल्या पावसाळ्यात गेलो होतो. मोठा ग्रुप होता तर मुलांनी एन्जॉय केले.
आत्ता सुट्टीतल्या वीकेंडला खूप रांगा होत्या. पावसाळा सुरु होऊन २-३ आठवडे झाले कि मग जा. पहिल्या २-३ वीकएंडला तर चुकूनही फिरकू नका.
बाकी राणीची बाग आणि तिथले पेंग्विन आमचे आवडते आहेत. आता तर पक्ष्यांचे एनक्लोजर पण केले आहे. ते ही छान आहे. पेंग्विन एनक्लोजर मध्ये समुद्र/पाणथळ जागेतील पक्ष्यांची पाणथळ फिल्म दाखवतात. ती पाहून पक्ष्यांचे एनक्लोजर पाहिले तर नीट निरीक्षण करता येते.
वीकेंडला सकाळी राजभवनाच्या परिसरातही ऑनलाईन बुकिंग करून फिरता येते. पण काही कार्यक्रम असले तर बुकिंग कॅन्सल होते. आणि सकाळी ६:३० ची एन्ट्री उपनगरातल्या लोकांना सोयीची नाही. आमच्या टू डू लिस्ट मध्ये आहे.
@ हीरा
@ हीरा
नॅशनल पार्क मिनी ट्रेन मजा यायची. आमच्या क्लासची ट्रिप दरवर्षी तिथेच जायची. मी क्लास दोन वर्षे केला पण त्यांच्यासोबत पिकनिकला चार वर्षे गेलो.
कान्हेरी गुंफा मात्र लहान मुलांनाही आवडायला हरकत नाही. मी माझ्या मुलीला एलिफंटा केव्हसला नेलेले. बोटीचा प्रवास + केव्हस तिने दोन्ही एंजॉय केले.
छान लेख , छान जागा, छान छान
छान लेख , छान जागा, छान छान फोटो.
तुलाही छान छान धन्यवाद
तुलाही छान छान धन्यवाद वर्णिता
योग आला तर नक्की जा ..
कान्हेरी गुंफांच्या दर्फाषआणि
कान्हेरी गुंफांच्या दर्शनी पटांगणात लहान मुलांना क्रिकेट खेळतांना पाहिले आहे. चेंडू आतल्या शिल्पांवर, कोरीव कामावर स्तूपावर जाऊन आपटत होता आणि पालक मंडळी कौतुकाने पाहात होती. एरवी सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळतात येत नाही कारण चेंडू वाहनांवर अथवा लोकांवर आदळून नुकसान आणि तक्रारीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. इथे २००० वर्षे मूक राहिलेले बिचारे पाषाण काय बोलणार?
माझ्या पाहण्यात नाही असे मुले
माझ्या पाहण्यात नाही असे मुले क्रिकेट खेळताना. पण असू शकेल. नव्हे असेलच. पण यावर कायद्याने बंदी हवी. तसेच अंमलबजावणी हवी. लोकांना आवाहन करून फायदा नाही. त्यांना अक्कल नसते. नियम लिहून दाखवला तरच समजतो.
इथे प्रतिसादात सुचवण्यात
इथे प्रतिसादात सुचवण्यात आलेल्या अजून एका जागी काल जाऊन आलो
सध्या फोन बंद पडलाय. नवीन ऑर्डर केलाय. तो आला की वीकेंडला त्या जागेची सुद्धा फोटोंसह ओळख करून देईन
खूप सुंदर ठिकाण, ती
खूप सुंदर ठिकाण, ती दाखवण्यातली कल्पकता आणि त्यांचे तितकेच सुंदर फोटो.. झक्कास!
धन्यवाद मानसी
धन्यवाद मानसी
Pdp चे अनेक लचके उडाले आहेत.
Pdp चे अनेक लचके उडाले आहेत.
Nepanse rd resident जे श्रीमंत गुजराती लोक आहेत त्यांनी लचका तोडला आहे,
काही मोजक्याच भाग सर्व सामान्य लोकांसाठी आहे
फोटो खूप मस्त आहेत!
फोटो खूप मस्त आहेत!
नव्या ठिकाणाची छान ओळख.
नव्या ठिकाणाची छान ओळख. धन्यवाद ऋन्मेऽऽष आणि म्हाळसा. Srd ,तुम्ही माहिती दिलेली ठिकाणे ऐकून माहीत होती पण कधी जाणे झाले नाही. एकदा तरी जायला हवे.
संजना निर्देश धन्यवाद.
संजना निर्देश धन्यवाद.
हेमंत, हो लचके तोडलेले दिसतात खरे. पण जे शिल्लक आहे ते ही सुंदर आहेच
इथे प्रतिसादात सुचवण्यात
इथे प्रतिसादात सुचवण्यात आलेल्या अजून एका जागी काल जाऊन आलो Happy
>>>>>>>>
काढला धागा ईथे
https://www.maayboli.com/node/83561
हे पण छान दिसतय!
हे पण छान दिसतय!
धन्यवाद छन्दिफन्दि
धन्यवाद छन्दिफन्दि
हा पण बाफ छान आहे. तुमच्या
हा पण बाफ छान आहे. तुमच्या मुळे माहिती मिळाली.
छान फोटो.
छान फोटो.
आम्ही साधारण २००८-०९ च्या सुमाराला कधीतरी इथे गेलो होतो. तेव्हा सी-फ्रंट डेवलप होत होता. नंतर जाणं झालं नाही. पार्किंगची सोय नाही हा मोठा प्रॉब्लेम.
धन्यवाद अमा आणि ललिता प्रीती
धन्यवाद अमा आणि ललिता प्रीती
आज गेट वे ला खूप मोठ्या लाटा
आज गेट वे ला खूप मोठ्या लाटा उसळताहेत. समुद्र ढवळून निघाल्यासारखे पाणी लाल दिसते आहे.
लाल नाही काळे दिसत असेल.
लाल नाही काळे दिसत असेल.
गटार,लोकांनी टाकलेला कचरा ह्या मुंबई च्या समुद्रात घाण खूप आहे पाण्याचा रंग काळा च असतो मुंबई मध्ये
हो कालपासून वादळी वारी सुटले
हो कालपासून वादळी वारी सुटले आहेत. नक्कीच लाटा उसळत असतील. पाऊस सुद्धा तुफान पडत होता मध्ये.
आणि हो मुंबईचे काही समुद्रकिनारे काळे आहेत. जसे की गिरगाव चौपाटीला सुद्धा आम्ही पाण्यात जात नाही.
मायबोलीकर माणिक मोती
मायबोलीकर माणिक मोती प्रियदर्शिनी पार्कला भेट देऊन आली. तिला आवडले. तिने मला शेअर केलेले फोटो तिच्या संमतीने इथे शेअर करतो.
.
सुन्दर फोटो!
सुन्दर फोटो!
Pages