हरीश महिंद्रा चिल्ड्रन पार्क - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 June, 2023 - 16:26

मायबोलीकर म्हाळसाने प्रियदर्शिनी पार्क बद्दल सुचवले. तिथल्या सुंदर अनुभवाचा मायबोलीवर धागा काढला. तिथे प्रतिसादात मायबोलीकर शरदजी (Srd) यांनी जवळच्याच त्याच समुद्र किनार्‍याला लागून असलेल्या अजून एका गार्डनचे नाव सुचवले. गूगल केले. छान वाटले. म्हटले चला भेट देऊन येऊया.

ते गार्डनही मुलांसाठी छान वाटल्याने म्हटले चला याची माहितीही पुन्हा फिरून मायबोलीकरांशी शेअर करूया. त्यातून अजून काही सापडेल Happy

मुलांची शाळांची सुट्टी संपायच्या आधी शेवटचा विकेंड आणि चिल्ड्रन पार्क. त्यामुळे गर्दी असणारच हे गृहीत धरून संध्याकाळी जरा लवकरच घरून निघालो. थोडे ऊन्ह लागते. पण गार्डन मोकळे ढाकळे मिळते हा अनुभव. जो खरा ठरला.

गार्डन पुरेसे रिकामे होते. झाडे आणि समुद्राचा वारा यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. लहान मुलांसाठी खेळायला बरीच जागा होती. पण तरीही खरी मजा सुर्य मावळताना वातावरण बदलले तेव्हाच आली. त्यामुळे पहिला फोटो तेव्हाचाच टाकतो.

१) दिवे लागणीची वेळ

01_3.jpg
.

२) आणि हा आमचा वर उल्लेखलेला गार्डन प्रवेश

02_3.jpg
.

३) प्रवेशद्वारापाशीचे कारंजे -
जेव्हा एखादे कारंजे बंद दिसते तेव्हा नेहमीच माझ्या कपाळाला आठ्या पडतात. फार रुक्ष वाटते ते द्रुश्य बघायला. आणि असा आऊट ऑफ ऑर्डर कारंज्याचा अनुभव हल्ली बरेच ठिकाणी येतो. ईथेही अपवाद नव्हता. काय कारण असावे? पाणी टंचाई?

03_3.jpg
.

४) पहिलेच गार्डन ईटुकल्या पिटुकल्या सवंगड्यांचे दिसले. आमची पोरे मोठे झाली असल्याने आम्ही तिथला एक फोटो काढून पुढे सटकलो

04_3.jpg
.

५) हे पुढचे गार्डन जे आम्हाला आमच्या वयाचे वाटले म्हणून ज्यु. ऋन्मेष थोडा वेळ ईथे रमला.

05_3.jpg
.

६) पण आम्हाला वाळूतच खेळायला जास्त मजा येते. कारण झोके आणि घसरगुंड्या हल्ली सोसायटीतही असतात.
मलाही वैयक्तीकरीत्या माती, गवत किंवा आर्टिफिशिअल रबर मॅटपेक्षा अशी वाळू असलेली गार्डन जास्त आवडतात.

06_3.jpg
.

७) थोडे पुढे जाऊन आणखी थोड्या मोठ्या मुलांची सोय दिसली

07_3.jpg
.

८) एक आवडले ईथले. ते म्हणजे गार्डन मुलांसाठीच असल्याने बाकी फाफटपसारा नव्हता. सारे स्लाईडस एकाच जागेत कोंबले नव्हते. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा मुलांची गर्दी झाली तेव्हा ती विखुरली गेली. अन्यथा हल्ली मुंबईत गर्दी बघूनच अश्या स्लाईडसवर जावेसे वाटत नाही. मुले धक्काबुक्की करत खेळत असतात आणि त्यांचे पालक कौतुकाने फोटो काढायला त्यांना अध्येमध्ये थांबवून आणखी ट्राफिक जाम करत असतात.

08_3.jpg
.

९) या बॅलन्स करत चालायच्या टायरनाही नंतर फार डिमांड दिसला. बरीच मुले चकवा लागल्यासारखे फिरून फिरून यावर चालत होते.

09_3.jpg
.

१०) तिथून या झाडांमधील वाटा पकडून आम्ही पुढे निघालो

10_3.jpg
.

११) हळूहळू झाडांखालच्या कट्ट्यावर सावली बघून लोकं जमायला सुरुवात झाली होती.

11_3.jpg
.

१२) समुद्राच्या दिशेहून येणारा वारा सोबतीला होता. पण तिथून तितकाच छान समुद्र नजरेस पडेल अश्या अपेक्षा ठेऊ नका. तिथे कोस्टल रोडचे काम चालू आहे ज्याने या गार्डनला समुद्रापासून तोडून टाकले आहे.

12_3.jpg
.

१३) पुढे जाऊन आम्ही शार्क आणि किल्ला असलेल्या गार्डनला पोहोचलो.

13_3.jpg
.

१४) थोडे ऐकायला बघायला विचित्र वाटेल. पण किल्याच्या आत लहान मुलांना ईथून तिथून रांगता येईल ईतकीच जागा असल्याने बरीच मुले किल्यावर चढूनच खेळत होती.

14_3.jpg
.

१५) शार्कही त्याला अपवाद नव्हता.

15_3.jpg
.

१६) त्याने अशी आपल्या तोंडात डोकावायचीच नाही तर त्याच्या तोंडात बसून फोटो काढायचीही परवानगी दिली होती.

16_3.jpg
.

१७) आता ऊन्हं मावळून संध्याकाळचा माहौल तयार होत होता.

17_2.jpg
.

१८) त्या संधीप्रकाशात न्हाऊन निघालेले हे एक तेथील अतिभव्य आणि अतिप्राचीन वृक्ष!

18_2.jpg
.

१९) आणि हा त्याच वृक्षाचा Front View Happy
(वरचा फोटो लेकीने काढलेला. हल्ली मुलांना लहान वयात हातात मोबाईल कॅमेरा मिळत असल्याने त्यांचे असे वेगवेगळ्या अँगलने झूम वगैरे करत फोटो टिपणे चालू असते.)

19_1.jpg
.

२०) संध्याकाळी एक कट्टा पकडून मी सुद्धा बसलो. तिथून टिपलेला हा फोटो.

21_1.jpg
.

२१) आणि मुले जिथे खेळत होती तिथून दिसणारा हा सुर्यास्त

20_2.jpg
.

२२) या टायरचे नेमके प्रयोजन काय आहे हे मला समजले नाही. यात कोणता खेळ खेळायचा हे काही कळले नाही

22_1.jpg
.

२३) तिथे लेकीने बसल्याबसल्या एक ईन्स्टारील बनवली आणि ईथे असा स्वॅग दाखवायचा असतो म्हणत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले.

23 updated.jpg
.

२४) तिथे पलीकडे सुर्य झावळ्यांमागून डोकावत आपला स्वॅग दाखवत होता.

24_1.jpg
.
२५) अंधारू लागले तसे वेडी वटवाघूळे अशी ऊलटी लटकताना दिसू लागली.

25_0.jpg
.

२६) शहाणी पाखरे मात्र शिस्तीत रांग लाऊन आपल्या घरट्याकडे परतत होती

26_0.jpg
.

२७) दिवे लागल्यावर तिथले रस्ते असे मोहक दिसू लागले

27_0.jpg
.

२८) आमचेही खेळून मन भरले असल्याने आम्ही मग फेरफटका मारणे पसंत केले.

28_0.jpg
.

२९) ३०) ३१) चालता चालताच बागेचे दोनचार फोटो टिपले.

29_0.jpg
.
30_0.jpg
.
31_0.jpg
.

३२) लहान मुले मात्र अजूनही त्यांचे प्लेग्राऊंड पकडून रमली होती

32_0.jpg
.

३३) ही मत्स्यकन्या तेवढी एकटीच झाडी झुडुपात दडून बसली होती. बिचारीला कोणीच भाव देत नसल्याने मग मीच तिचा एक फोटो काढला. त्यातही लेकीने मला दोन्ही हात हवेत ऊडवत विचारलेच, "हिचा का फोटो काढतोयस?"... बिचारी!

33_0.jpg
.

३४) तिचाच मग निरोप घेत, शेवटचा फोटो या दिव्यापलीकडच्या न दिसणार्‍या समुद्राचा टिपत मग आम्ही निघालो...

34_0.jpg

-----------------------------------------------

Address: Bhulabhai Desai Road, Breach Candy, Cumballa Hill (Behind American Consulate) , Mumbai, Maharashtra 400026

प्रवेश शुल्क - १० रुपये फक्त

ईथे शेजारीच Amarsons Garden म्हणून जॉगिंग पार्क आहे. तिथले प्रवेश शुल्क शून्य आहे.

एकेकाळी ईथून सुर्यास्त छान दिसत असावा... पण असो, गेले ते दिवस, विकासाची किंमत मोजावीच लागते Happy

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच सुंदर बाग आहे (होती). समुद्र किनारा गेला कोस्टल रोडच्या चार पुलांत. तिकडे तर बारा फुटी भिंती बांधून ठेवली आहे. जुने फोटो गूगल सर्च केल्यावर दिसतील. आता हळहळतोय. ५/५ रेटिंग आहे ते समुद्रामुळेच.

बेस्ट बस एसी ६३ (भायखळा पश्चिम ते जे. मेहता मार्ग)-मुंबई सेंट्रल स्टेशन- ताडदेव -हाजी आली -महालक्ष्मी मंदिर - ब्रीच कँडी हॉ. -पारसी जेनरल हॉस्पिटल स्टॉप इथे उतरा-मुकेश चौक-.. प्रियदर्शनी पार्क...जे.मेहता मार्ग.
स्टॉपच्या समोरच्या रस्त्यावर हरिश महिंद्रा पाटी आहे आणि लगेच पार्किंग पाच सहा गाड्यांचे..एकमेव नॉन वेज पदार्थ,चहा मिळणारा स्टॉल...अमरसन्स गार्डन.

(पारसी जेनरल हॉस्पिटल स्टॉपजवळच मागे प्रसिद्ध 'सिल्वर ओक' बंगला पवार साहेबांचा. पण सध्या तिकडे एकट्याने जाणे बरोबर नाही म्हणून गेलो नाही शोधायला.)

फोटोंमुळे मजा आली.
पालकहो, नक्की घेऊन जा मुलांना या दोन गार्डनला. सुटीचा शेवटचा आठवडा आहे आणि पावसाळ्यात नेता येणार नाही.

Instagram reel /
युट्यूबवर? संधी आहे.

मस्त!
संध्याकाळी डास नसतात का या बागांमध्ये? आम्हाला इथे डासांचा फार वैताग येतो संध्याकाळी कुठल्याही जवळच्या बागेत.

धन्यवाद कुमार सर

शरद जी छान माहिती आणि पुन्हा एकदा धन्यवाद.
हो, जुन्या फोटोत समुद्राशेजारचे गार्डन फारच छान वाटतं होते.

खायच्या स्टॉलवर बाहेर फार गडबड गोंधळ वाटल्याने आम्ही तिथून फ्रूटी माझा वगैरे घेऊन सटकलो.

वावे, मुंबईत नसतो डासांचा त्रास. इथे नवी मुंबईत आहे तसा.
घरीही आम्ही कधी गुड नाईट लावले नाही की संध्याकाळी खिडक्या बंद केल्या नाहीत.
त्यामुळे मुद्दाम उल्लेख केला नाही. पण तरी इतर ठिकाणच्या गार्डनशी तुलना करता याला प्लस पॉइंट बोलू शकतो.

इथे टॅग करायची सोय असती तर म्हाळसाला केले असते. ती अजून मिनी सी शोअरच्या डासांची आठवण काढते Happy

बाई दवे,
वाशीच्या मिनी सी शोअर वर सुध्दा लिहायला हवे. ते ही एक बरेच दिवस मनात आहे.

Mandvi hill resort ,विरार पूर्व,शिरसाड वज्रेश्वरी रोड .
https://www.mandvihillresort.com/
मागच्या आठवड्यात ओळखीचा ग्रूप जाऊन आला. ६००/- पाण्यात खेळणे, खाणं फ्री (फक्त वेजी). धमाल केली.
मी गेलो नाही पण व.वि.वाल्यांनी जाऊन खात्री करावी.

हा पण बाफ छान व जागा फोटो पण छान. फोन वरुन बघते त्यामुळे प्रतिसाद द्यायचे राहून जाते. वीकेंडला मुलांना घेउन जाणे मोस्ट प्रेशस. दे विल्ल रिमेंबर व्हेन दे ग्रो अप. आता फादर्स डेला पण काहीतरी मस्त प्लान करा.

मला टाउन मध्ये आर टी आय ला भेट द्यायची आहे. रतन टाटा इन्स्टिट्युट. बघु कधी जमते ते.

डास इथे मुलुंड मध्ये पण नाहीत. मी रात्री वारा फिरावा म्हणून किचनचे दार व ड्रॉइन्ग रूमची खिडकी उघडी टाकते. घर गार होते पण डासो येत नाहीत. बाजूला ऑलमोस्ट जंगल आहे.

खिडकीवर पाटी आणि हातावर गोंदवण = HIV + कवटी दोन हाडांचे गुणाकार चिन्ह.
एव्हढे केले कि डास चावत नाहीत.