गोव्याला वास्कोच्या जवळ एखादे घरगुती जेवणाचे ठिकाण आहे का? किंवा मडगावच्या आजूबाजूला सुद्धा चालेल( नावेलिममध्ये खास करून)

Submitted by देवीका on 2 May, 2023 - 01:58

मी इथे हा प्रश्ण विचारेन असे वाटले न्हवते पण गोवा सध्या इतकं बदललं आहे आणि सहसा बाहेर जेवलोच नाही त्याकाळात्त गोव्याचे असून सुद्धा.
आता एका मैत्रीणीला हवे आहे जेवणाचे ठिकाण.

वास्कोच्या आजूबाजूला आणि मडगावच्या आजूबाजूला.
घरगुती ठिकाण अलीकडच्याच अनुभवातील असेल तर उत्तम. वयस्क माणसं आहेत , त्यात शारीरीक व्याधी(मधुमेह,ब्लडप्रेशर वगैरे) त्यामुळे फार चमचमीत खातील असे नाही. मराठी शाकाहारी, मासांहारी सुद्धा चालेल.

तसेच एखादे रहण्याची उत्तम सोय असलेले हॉटेल( वयस्क मंडळी आहेत तेव्हा सोयीने उत्तम असे पाहिजे आहे).

भारतीय विमान प्रवासात, इन्सुलिन इंजेक्शन कोणी घेवून गेले आहे का? त्याची प्लीज माहिती द्यावी.

धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसेच एखादे रहण्याची उत्तम सोय असलेले हॉटेल( वयस्क मंडळी आहेत तेव्हा सोयीने उत्तम असे पाहिजे आहे

.............................................. मडगाव मधील पंचशील हॉटेल चांगले आहे.

मासे खात नसल्याने वास्कोत अनेकदा अन्नपूर्णा ला गेलो. पण चमचमीत असते जेवण. भात, वरण मिळू शकेल. दही भात पण मिळेल.
माशाच्या दोन खानावळी एअरपोर्टवरून रस्ता येऊन मिळतो त्या परीसरात आहेत. नावे लक्षात नाहीत आता. खूप वर्षे झाली.

माशाच्या दोन खानावळी एअरपोर्टवरून रस्ता येऊन मिळतो त्या परीसरात आहेत. नावे लक्षात नाहीत आता. <<<

त्यातली एक 'अँटिक मारदोळ' होती का..?

Vasco, mukhyata dabolim/chikalim bhagat kurtikar khanaval kiva reema hotel sadha jevan milel.. Sadha goan jevan pan pure veg bahut, donhi thikani non veg changla milta, vasco madhe annapurna kiva tato cafe khup. Changle ahet, cafe tato rahnya sathi sudha changla ahe.. Vasco Madgaon highway sodun cansaulim majorda marge gelyas barech home stays ahet.. Nava check karun parat comment karte..

त्यातली एक 'अँटिक मारदोळ' होती का..? >>> फ्रीडम स्ट्रीटला एक हॉटेल होतं , त्याच्या शेजारी ( फेमस काजू मिळायचं दुकान त्याच्या समोर) आणि एक हॉटेल टूरिस्टच्या समोर जी लेन जाते त्या लेनने मोठा रस्ता क्रॉस केल्यावर लागायचे. पण तिथे फेणी पण मिळायची.