पुणेकरांचं चिपको आंदोलन

Submitted by नानबा on 28 April, 2023 - 01:29
ठिकाण/पत्ता: 
<strong>सम्भाजी उद्यान, जंगली महाराज रोड पुणे. https://goo.gl/maps/5rcn3wf9EY92AC576 </strong>

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली अनेक झांडांची कत्तल करण्याचं आणि तीरावर कॉन्क्रीट ओतून बिल्डिंग बांधण्याचं मनपा ने घाटलेलं आहे. ४५००+ कोटींचा हा प्रकल्प नक्की कुणासाठी?

महानगर पालिकेला प्रश्न विचारण्यासाठी आणि हा विनाश थांबवण्यासाठी पुणेकरांनो जागे व्हा! पुणेकरांनो एकत्र या!

आपण काय करणार आहोत?

२९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासह संभाजी उदयान, जंगली महाराज रोड इथे २ तासाकरता भेटायचं. शांततामय मार्गाने नदी किनार्‍यानं चालत जायचं आणि आपल्याला जगण्यासाठी लागणारं बरंच काही देणार्‍या झाडांना मिठी मारत प्रशासनाला सांगायचं की आम्हाला नदी हवीये, झाडं हवीत - सिमेंटच्या पात्रातून वाहणारं गटाराचं पाणी नकोय!

प्रशासनाला विचारायचे प्रश्नः

१. महत्त्वाचं काय? झाडं तोडून कॉन्क्रीट ओतून केलेलं सौंदर्यीकरण(!)" का स्वच्छ वहाती नदी, प्रक्रिया करून नदीत जाण्यापूर्वी सांडपाणी शुद्ध करणं अशा आरोग्यासाठी सुयोग्य गोष्टी?

२. ७५०० पेक्षा अधिक झाडं तोडून आपण तिथे कॉन्क्रिट ओतू तेव्हा पुण्याचं तापमान वाढल्याशिवाय राहील का? त्याचा त्रास कुणाला होणार?

३. नदीची रुं दी, वहाण्याचा मार्ग, पसरण्यासाठी लागणारी जागा बळकावल्यावर दरवर्षी येणार्‍या पुरात बळी कोणाचा जाणार? त्याला जवाबदार कोण? आणि हे खरंच तथाकथित सौंदर्यीकरणाकरता गरजेचं आहे का?

४. ५० हून अधिक वर्षांची जुनी झाडं, झुडपं, वेली, पक्षांचे अधिवास हे खरंच नवीन झांडानी भरून काढता येतील?

५. विहीरी आणि बोअर्वेल रिचार्ज कसे होणार?

मुळात नदी नदी राहील का अशा प्रकारानं?

पुणेकरांनो, ह्या उत्तरांमुळे तुमच्यावर परिणाम होईल असं वाटत असेल तर २९ एप्रिल ला नक्की भेटू या!

अधिक माहितीसाठी /आपला पाठींबा दर्शवण्यासाठी खालील लिंक वर *क्लिक करा-*
https://forms.gle/j6WL59YtRHAUx61Y6

लक्षात ठेवा: अभि ना हुवा तो फिर कभी नही कभी नही! Happy

ता.क. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ५ आहे. इथे मायबोलीवर आपल्या टाईम्झोन नुसार वेगवेगळी वेळ दिसतेय. पण ती कम्प्ल्सरी असल्याने काढून टाकता येत नाहीये.
संध्याकाळचे ५ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) ही वेळ संभाजी पार्क ला भेटण्यासाठी धरावी.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 29, 2023 - 07:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमाला शुभेच्छा.
पुण्यातील काही active WhatsApp groups var तुमच्या नावासहित (शिरीष kothavale) share करु का?

चांगल कार्य करत आहात.. खुप लोकांनी सामिल व्हाव यात हि इच्छा...... +१.

तुमच्या कामात यश लाभो ही मनापासून सदिच्छा!

चांगला उपक्रम. शुभेच्छा. सगळीकडेच अश्या आंदोलनाची गरज आहे.
मूठभर स्वार्थी लोकांच्या विकासासाठी आपण सारे विनाशाकडे चाललो आहोत.
जे मूळ पुणेकर नाहीत आणि आता तिथे कामानिमित्त तातुरते राहत असतील त्यांनीही यात सामील व्हा. हा प्रश्न फक्त पुण्याचा नाही तर पर्यावरणाचा आहे. त्याचे रक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.

पांचाळेश्व र देवळाच्या मागे दोन दुर्मी ळ वृक्ष आहेत. त्यात ते आत शिव लिंगा सारखी पराग रचना अस्लेली फुले येतात. ते ही जाणार का? वाइट वाटेल. का देउळ पण जाणार? अर्बन प्लेनिन्ग वाले बिन्डोक आहेत.

बरं केलंस स्वतंत्र धागा उघडलास ते
खरेतर हा नदीकाठ सुधार (Riverfront development) प्रकल्प आहे, नदी सुधार नाही. आणि तिथेच मेख आहे.

मन्यामाऊ, तुम्ही वेळेचा घोळ लक्षात आणून दिल्याबद्दल थँक्यू.. मी तळटीप टाकली आहे आता गोंधळ टाळण्यासाठी.

प्रकल्पास विरोधच!!! अरे आमच्या लहानपणीचं जे काही उरलंसुरलं पुणं आहे ते तरी राहू द्या ना.

चांगला उपक्रम! पुणे हल्ली ओळखता न येण्याइतके बदलले आहे. मोस्टली वाईट अर्थाने. नदीत भराव घालून बिल्डिंगा बांधणे म्हणजे अजूनच विद्रुप करण्याचा उद्योग वाटतो आहे Sad
या कार्यक्रमात प्रशासनातील किंवा या नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित कुणाला आमंत्रित केलेले आहे का? हे म्हणणे किंवा हा इनिशिएटिव्ह त्यांच्यापर्यन्त कसा पोहोचवणार?

उपक्रमाला शुभेच्छा!
नानबा, मलाही संध्याकाळी साडेसहाची वेळ दिसते आहे, म्हणजे तुम्ही मायबोली सदस्यत्वात तुमचा टाइम झोन बदलायची गरज आहे.
माझे सदस्यत्व -> संपादन - स्थानीक वेळ - एशिया कोलकत्ता

>>>>या कार्यक्रमात प्रशासनातील किंवा या नदी सुधार प्रकल्पाशी संबंधित कुणाला आमंत्रित केलेले आहे का? हे म्हणणे किंवा हा इनिशिएटिव्ह त्यांच्यापर्यन्त कसा पोहोचवणार?
उत्तम प्रश्न! निदान पत्रकारांच्या तरी कानावरती पडो.

आंदोलनाला शुभेच्छा आणि पाठिंबा.
असंच आंदोलन वेताळ टेकडीसाठीपन आहे ना?
या अभद्र विकृत निर्णयांमागे कोण आहे? मोहोळ ? चंद्रकांत पाटील? भाजपला पुण्यातून हक्काचे मतदारच तडीपार करून टाकणार असं दिसतंय. They deserve it.

Mumbai मधून पुण्यात स्वारगेट ला पोचायला ५ तास पेक्षा जास्त वेळ लागतो.
एक्स्प्रेस वे झाला तेव्हा मुंबई पासून सातारा पोचायला ४ तास लागायचे आता परत ७ ते ८, तास लागतात.
बायपास च जाम असतो .
पुणे शहराची पूर्ण वाट लागली आहे

आरे प्रकल्प घड़ताना आणि पर्यावरण बिघड़ताना सर्वानी हताश होऊन मूकपणे पाहिले. ह्यात काहिनी राजकीय हेतुने तर काहिनी खऱ्या पर्यावरणवादी भूमिकेत राहून आक्रंदन केले पण सर्व व्यर्थ गेले तसेच इथेही घडू शकते.

फक्त कुठल्याही परिस्थितीत दुर्मिळ वृक्ष जमीनदोस्त होऊ न देता ते सरकारी / बिन सरकारी, संस्था / खर्चाने दुसऱ्या उचित स्थानी सुरक्षित रित्या समूळ स्थलांतरित होतील ह्यासाठी ठामपणे आग्रही राहणे फार आवश्यक आहे. त्याचाही बॅकअप प्लान आंदोलनाचे आवाहन / आयोजन करणाऱ्या मंडळीनी आखला असेल तर बरे.

हा प्रश्न बरेच दिवस चर्चेत आहे. संबधित लोकांना विरोधाचे कारण, त्यावरील पर्याय दिले गेले होते.
पेपर्स मधून बातम्या आहेत. सयाजी शिंदे ह्यांनीही उचलून धरला आहे.

काहीच होत नसल्याने - ह्या क्षेत्रात काम करणार्‍या अनेकांनी त्यांना मिळालेला पर्यावरण दूत हा पुरस्कार परत केला आहे.

मी आयोजक नाही. पण आयोजकांचे काम (उदा. जिवीत नदी) जवळून पाहिले असल्याने आणि उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्या मार्गे संबंधित लोकांचे लक्ष वेधले जावे ह्या हेतूने मी लेखाचे भाषांतर करून इथे टाकले आहे.

उद्याच्या उपक्रमात मुख्य मुद्दा झाडं तोडू नका हे शांततामय मार्गाने संबंधितांपर्यंत पोहोचवावे हा असणार आहे.

पुण्यात असते तर नक्कीच आले असते.

झाडे तोडून सुशोभिकरण करणे ही कुणाच्या उरफाट्या मेंदूची कल्पना आहे ?
आधीच पुणे लाह्रांच्या भट्टीसारखे तापत चालले आहे.

Pages