पुणेकरांचं चिपको आंदोलन

Submitted by नानबा on 28 April, 2023 - 01:29
ठिकाण/पत्ता: 
<strong>सम्भाजी उद्यान, जंगली महाराज रोड पुणे. https://goo.gl/maps/5rcn3wf9EY92AC576 </strong>

नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली अनेक झांडांची कत्तल करण्याचं आणि तीरावर कॉन्क्रीट ओतून बिल्डिंग बांधण्याचं मनपा ने घाटलेलं आहे. ४५००+ कोटींचा हा प्रकल्प नक्की कुणासाठी?

महानगर पालिकेला प्रश्न विचारण्यासाठी आणि हा विनाश थांबवण्यासाठी पुणेकरांनो जागे व्हा! पुणेकरांनो एकत्र या!

आपण काय करणार आहोत?

२९ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजता आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासह संभाजी उदयान, जंगली महाराज रोड इथे २ तासाकरता भेटायचं. शांततामय मार्गाने नदी किनार्‍यानं चालत जायचं आणि आपल्याला जगण्यासाठी लागणारं बरंच काही देणार्‍या झाडांना मिठी मारत प्रशासनाला सांगायचं की आम्हाला नदी हवीये, झाडं हवीत - सिमेंटच्या पात्रातून वाहणारं गटाराचं पाणी नकोय!

प्रशासनाला विचारायचे प्रश्नः

१. महत्त्वाचं काय? झाडं तोडून कॉन्क्रीट ओतून केलेलं सौंदर्यीकरण(!)" का स्वच्छ वहाती नदी, प्रक्रिया करून नदीत जाण्यापूर्वी सांडपाणी शुद्ध करणं अशा आरोग्यासाठी सुयोग्य गोष्टी?

२. ७५०० पेक्षा अधिक झाडं तोडून आपण तिथे कॉन्क्रिट ओतू तेव्हा पुण्याचं तापमान वाढल्याशिवाय राहील का? त्याचा त्रास कुणाला होणार?

३. नदीची रुं दी, वहाण्याचा मार्ग, पसरण्यासाठी लागणारी जागा बळकावल्यावर दरवर्षी येणार्‍या पुरात बळी कोणाचा जाणार? त्याला जवाबदार कोण? आणि हे खरंच तथाकथित सौंदर्यीकरणाकरता गरजेचं आहे का?

४. ५० हून अधिक वर्षांची जुनी झाडं, झुडपं, वेली, पक्षांचे अधिवास हे खरंच नवीन झांडानी भरून काढता येतील?

५. विहीरी आणि बोअर्वेल रिचार्ज कसे होणार?

मुळात नदी नदी राहील का अशा प्रकारानं?

पुणेकरांनो, ह्या उत्तरांमुळे तुमच्यावर परिणाम होईल असं वाटत असेल तर २९ एप्रिल ला नक्की भेटू या!

अधिक माहितीसाठी /आपला पाठींबा दर्शवण्यासाठी खालील लिंक वर *क्लिक करा-*
https://forms.gle/j6WL59YtRHAUx61Y6

लक्षात ठेवा: अभि ना हुवा तो फिर कभी नही कभी नही! Happy

ता.क. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ५ आहे. इथे मायबोलीवर आपल्या टाईम्झोन नुसार वेगवेगळी वेळ दिसतेय. पण ती कम्प्ल्सरी असल्याने काढून टाकता येत नाहीये.
संध्याकाळचे ५ (भारतीय प्रमाण वेळे नुसार) ही वेळ संभाजी पार्क ला भेटण्यासाठी धरावी.

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 29, 2023 - 07:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम, शुभेच्छा.

झाडे तोडून आणि काँक्रिट टाकून सुधार प्रकल्प राबविण्याची दिवाळखोरीची कल्पना कुणाची?

I will update once I return to pune.
It was great as so many common citizens took it to roads!

नमस्कार,
उशीरा डिटेल्स टाकल्याबद्दल दिलगीरी. काही कामासाठी बाहेरगावी जावे लागल्याने (आणि कामात गुंतल्याने) टाकायला उशीर होतोय.
आंदोलनाची अधिकृत लिंकः
https://www.facebook.com/puneriverrevival1/
https://puneriverrevival.com/

आंदोलन उत्तम झाले. मध्यमवर्गीय पांढरपेशा समाज जो शक्यतो बाहेर पडत नाही, असा समाज ४०००-५००० च्या संख्येने बाहेर पडून आंदोलन करतो ही ह्यातली सगळ्यात जमेची बाजू!

आंदोलन संभाजी बागेच्या इथे सुरू झाले आणि भिडेपुलाच्या शेजारून नदीपात्राकडे जाऊन थांबले.

हे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाने आयोजित केले नव्हते. आंदोलनाच्या आयोजनाच्या कुठल्याही टप्प्यात आर्थिक, प्रत्यक्ष कष्ट , आराखडा ह्यात कुठल्याही राजकीय पक्षाचे काहीही योगदान नव्हते आणि तसे न होणेच अपेक्षित होते.
हा लढा सामान्य माणसाचा आहे आणि तो त्यानेच लढावा अशी संकल्पना ह्यामागे होती.

"रद्द करा रद्द करा आरएफडी रद्द करा," "आरएफडी हाय हाय", "कावळा म्हण तो काव काव आमची झाडे ठेवा राव", "नाय पाहिजे नाय पाहिजे नदीवर बांधकाम नाय पाहिजे" अशा अनेक घोषणांनी रस्ता दुमदुमून गेला. सुरवातीचा टप्पा वगळता मागे स्पीकर वगैरे काहीच नव्हते, पण आमच्या सारख्या सामान्यांच्याच आवाजांनी रस्ता दुमदुमला.

अगदी ३-४ वर्षांच्या मुलांपासून ते म्हातार्‍या आजी आजोबां पर्यंत प्रत्येकजण ह्यात सहभागी झालेलं!
"पुणेकरांच्या जोडीला पिंपरी चिंचवडकर साथीला" असं म्हणत पिंपरी चिंचवडकर देखील ह्यात उत्साहाने सामील झाले!

व्यवस्थापन उत्तम होतं! इतके लोक येवढ्या छोट्या जागेत आल्यावर गोंधळ होऊ नये, वहातुक सुरळीत चालू रहावी ह्याकरता व्यवस्थित साधने आणि अनुभवी माणसे होती. पोलिस परवानगी आणि इतर सोपस्कार आधीच पार पाडले होते. अँब्युलन्स आणि इतर सोयी ही होत्या.
नदीपात्रा च्या जवळ गेल्यावर आयोजकांनी त्यांच्या नक्की आक्षेप का आणि इतर माहिती सांगितली. त्याबद्दल वेगळ्या धाग्यात अधिक सविस्तर लिहीन.

अखेरीस झाडांना मिठ्या मारून सेल्फी काढले आणि हा कार्यक्रम नियोजित वेळेत आटोपला.

ह्यावेळेस लोक अधिक जागे झाले आहेत हे जाणवलं. केवळ एका फोनकॉलवर माझ्या माहितीतली अनेक लोकं आली, तसंच स्टेटस अपडेटस बघूनही लोकं स्वतःहून आली.
हे वाचून स्वतःहून आलेली एक मायबोलीकरीण मला तिथे भेटली. ( तिला इथे नाव डिस्क्लोज केलेल चालेल का माहित नसल्याने करत नाहिये.)
आश्चर्य म्हणजे ती आणि मी आजूबाजूला होतो इतक्या लोकांच्यात आणि तिने तू नानबा का असे मला विचारले देखील.

लाँग वीकेंड असूनही इतकी लोकं आली आणि इतकी लोकं स्वतःहून आली ही फार मोठी गोष्ट वाटली मला! " रद्द करा रद्द करा, आरएफडी रद्द करा" हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे असे वाटते कारण अनेक पक्षांनी आंदोलनानंतर पाठिंबा जाहीर केला आहे. ही लढाई राजकीय नाही, ही लढाई जगण्यासाठीची आहे.
जर अधिकृत रिपोर्टनुसार जर पाण्याची पातळी ४-५ फुटांनी वाढणार असेल - तर हे पुराचे ४-५ फुट असलेले पाणी जेव्हा पसरते तेव्हा त्याचा परिणाम किलोमिटर्स मधे होतो. पूर आला तर वाटेत आलेल्या कुणालाच तो सोडणार नाही. जर झाडं तोडली तर वाढणार्‍या तापमानाने, होणार्‍या उष्माघाताने बळी जाणार ते रोजीरोटीसाठी बाहेर पडलेल्या माणसांचे.

ही लढाई अर्थातच संपलेली नाही. अनेक कॉन्ट्राडिक्टरी माहिती पी एम सी आता समाजमाध्यमात जाहीर करतय. परवानगी शिवाय झाडं तोडली जाताहेत आणि फक्त सुबाभूळच तोडली जातेय अशी माहिती दिली जातेय.
जीवि तनदी आणि पुणे रिवर रिवायवल गृप nature walk, रिवर वॉक्स असे नदी किनार्‍यावर आयोजित करतेय.
ज्यांना ह्या माहितीच्या सत्यतेब द्दल माहिती हवी आहे, त्यांनी हे वॉ क्स करून सत्यता जरूर तपासावी असे मी सुचवेन.

https://puneriverrevival.com/join-the-movement
ह्या पानावर तुम्हाला भरपूर माहिती मिळेल.

मी रिवर वॉक्स चे डिटेल्स पण टाकेन इथे लवकरच

आंदोलनाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला हे वाचून बरे वाटले. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, नानबा.

झाडे वाचवा, याला १००% पाठिंबा. काही वर्षांपूर्वी, बऱ्याच वर्षांनी पुण्याला जाण्याचा योग आला, तेव्हा फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलीस ग्राउंड येथील झाडांची झालेली कत्तल बघून जीव खूप हळहळला होता.

मात्र मुळा मुठा या गटारांना नदी म्हणणे हा नद्यांचा अपमान आहे. ज्यांना कुणाला या वाक्याचा राग येणार असेल, त्यांनी लकडी पुलावर किंवा संगम ब्रिजवर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती बघावी.

मात्र मुळा मुठा या गटारांना नदी म्हणणे हा नद्यांचा अपमान आहे. ज्यांना कुणाला या वाक्याचा राग येणार असेल, त्यांनी लकडी पुलावर किंवा संगम ब्रिजवर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती बघावी.>> मी लकडीपुलाला लागुनच राहिले आहे. लहान पणी मुठा नदीला भरपूर पाणी होते. शेजारी झाडे असत व नदीत पण जलपर्णी व इतर झाडे झुडुपे असत. एक दोन बेटे आत आमच्या नजरेतच होती. नदीत मासे खेकडे साप पाण कोंबडी असे वाइल्ड लाइफ होते. कोळी मासे पकडत. जाळ्याने नव्हे तर काठीला आमिष लावुन. व थोड्या मागे बेटांजवळ खेकडे पकडत. मी तासंतास नदीला बघत घालवले आहेत.

पाव्साळ्यात तर भर्पूर पाणी यायचे नदीला. अगदी पूर म्हणत असत इतके. पांचाळेश्वराच्या वरच्या पायरी परेन्त यायचे. एकदा तर देवळात एक कमान बांधली होती ती पण बुडली होती व भागवत बिल्डिन्गच्या पायथ्यापरेन्त आले होते पाणी. इतका पाउसही असे.
टायटानिक यायच्या आधी मी पांचाळेश्वराच्या समोरील मैदान व कठडा नवीन झाले - लाल कोबा टाकला तेव्हा - तो टायटानइक मोमेंट अनुभवला आहे लहान पणी १० ११ वर्शाच्या वयात.

पूल व्हायच्या आधी कॉजवे होते तिथे गणेश विसर्जन केले आहे.

नदीच गटा र व्हायला अकार्यक्षम कारभार कारणी भूत आहे. जनता तर आंदोलन करतेच आहे.

त्या म्हणण्याला आज काहीच अर्थ नाही.>> माझ्या दृष्टीने आहे. वेताळ टेकडी, नद्या ओढे हवेत मला स्वच्छ व सुंदर. कारण मी रिटायरमेंट् साठी तिथेच जाणार आहे. कितीकांची लहान मुले तिथे वाढत आहेत.

जनतेनेच प्रयत्न केले पाहिजेत कारण कारभार तर दिवसेंदिवस भयानक होत चालला आहे. पुण्याचे सुरेख पर्यावरण अनुभवले आहे. त्यामुळे नद्यांचे गटार झाले ह्याचे वाइट वाट्ते राग येत नाही.

पुण्याचे सुरेख पर्यावरण कधीच नष्ट झाले आहे आणि आता इतिहासात जमा झाले आहे.

<< मी रिटायरमेंट् साठी तिथेच जाणार आहे. >>
आजचे फोटो काढून ठेवा. २० वर्षांनी म्हणाल की २०२३ सालचे पुणे कित्ती कित्ती सुंदर होते.

<< मी रिटायरमेंट् साठी तिथेच जाणार आहे. >>
नका येऊ. तुमची हाडे मजबूत असतील तरी येऊ नका. उगाच कशाला विषाची परिक्ष! जब गीधडकी ... इत्यादी

*Muthai River walk* / मुठाई नदीविहारः

जिच्या काठावर पुणे बहरलं अशी आपली मुठाई आज स्वतः च्याच अस्तित्वासाठी झगडतेय!
तिचा इतिहास, तिचा भूगोल, तिची परिसंस्था जाणण्यासाठी ६ , १३ आ णि २० मे च्या शनिवारी सकाळी जिवितनदी नदीकाठ विहार आयोजित करतय. तुम्ही ह्यापैकी कुठल्याही एका शनिवारी येऊ शकता.

आपल्या जिवनदायीनीशी पुन्हा एकदा जोडलं जाण्यासाठी नक्की या! ह्या विहारासाठी नोंदणी आवश्यक आहे.
नोंदणीसाठी जिवीतनदीच्या साईटला भेट द्या: https://www.jeevitnadi.org/muthai-river-walk/

मात्र मुळा मुठा या गटारांना नदी म्हणणे हा नद्यांचा अपमान आहे. ज्यांना कुणाला या वाक्याचा राग येणार असेल, त्यांनी लकडी पुलावर किंवा संगम ब्रिजवर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती बघावी. >> नदीचे नाले होणं आणि त्या बद्दल नागरिकांना कळवळा नसणं हा नक्कीच नदीचा अपमान आहे!
म्हणूनच जायका प्रकल्प हवा. सांडपाणी, इन्डस्ट्रियल वेस्ट नीट उपचार न करता (ट्रीटमेंट) नदीत सोडणं बंद व्हायला हवं.
डिटरजंटस मुळे पाणी खराब होतय तर डिटरजंटस मधल्या त्रासदायक घटकांवर नियंत्रण आणणे , जनजागृती करणे आणि STP मध्ये जे शक्य आहे त्यावर ट्रीटमेंट करणे हा उपाय असायला हवा, बरोबर ना?

पुण्याच्या नद्यांचे भवितव्य नक्की कशात आहे?
केवळ नदीकाठ सुशोभित करण्यात की नदी पुनरुज्जीवित करून तिचे मूळचे सुंदर रूप परत मिळवण्यात...
जाणून घेऊयात...
रविवार दि ७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता
मोठ्या संख्येने सहभागी व्हा
सभेत सहभागी होण्यासाठी झुम लिंक
https://us02web.zoom.us/j/86352624617...
नदीकाठची झाडे वाचवण्यासाठी चिपको आंदोलनात हजारोंच्या संख्येने पुणेकर रस्त्यावर उतरले. ह्या अभूतपूर्व घटनेनंतर जाणून घेऊयात नदीविषयक काही महत्त्वाच्या बाबी. नदीकाठ सुशोभीकरणासाठी पर्यावरणपूरक उपाय काय ? कुठलाही नाश, विध्वंस न करता नदीला पुनरुज्जीवित कसे करता येईल ? जाणून घेऊयात नदीची परिसंस्था अबाधित राखून विकास साधणे चराचरांच्याच नाही तर मानवी हिताचे पण कसे आहे ते.
सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील तज्ञ वक्ते:
१) डॉ प्रियदर्शिनी कर्वे, संचालक, समुचित एनवायरोटेक
२) शैलजा देशपांडे, संस्थापक संचालक,
जीवितनदी
३) केतकी घाटे, सहसंस्थापक, संचालक, ऑयकॉस
४) मानसी करंदीकर,
सहसंस्थापक, संचालक, ऑयकॉस
झुम सभा क्र: 863 5262 4617
स्वीकृती क्र: 809727

नानबा, हा धागा पर्यावरण किंवा चालू घडामोडी मधे हलवणार का? मला सापडेनासा झाला आज.

गेल्या रविवारी लोकायत संस्थेतर्फे श्री. सारंग यादवाड्कर यांच्या सोबत रिव्हरवॉक बंड गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. मी गेलो होतो. साधारणपणे पन्नास-साठ जण जमले होते.

बंडगार्डन जवळ पथदर्शी प्रकल्प म्हणून जो भाग विकसित केला आहे तिथेच हा वॉक आयोजित केला होता. पुलावरून येता जाताना नजर टाकून जे दिसते त्याची व्याप्ती खोली आणि गांभिर्य प्रत्यक्ष जाग्यावर गेल्यावर नीटच कळते. त्या भागातली नैसर्गिक अधिवासातली सगळी झाडे झुडुपे तोडून नेस्तनाबूत करून नदीपात्रातच भराव घालण्यात आला आहे. ह्याचा सर्वात मोठा धोका हा आहे की पुराचे पाणी वाहून नेण्याची नदीची क्षमता एकदमच कमी होणार आहे.

पाऊस चिखल आणि राडा रोडा ह्यामुळे वॉक फार नाही झाला. पण टॉक नक्की छान प्रकारे झाला. माहीती सांगणे, चर्चा, प्रश्नोत्तरे, शंका-समाधान हे सर्व सकाळी साडेसात वाजल्या पासून ते साडे नऊपर्यंत चालले. अत्यंत उद्बोधक असे हे सत्र होते.

समारोप 'हम होंगे कामयाब' ह्या गाण्याने झाला. समूहगान करताना एकदम शाळकरी झाल्यासारखे वाटले. Proud

Pages